Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चित्रकविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » चित्रकविता « Previous Next »

Mankya
Friday, February 23, 2007 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chitrakavita

हि छोटी परी या दिव्याकडे पाहुन काय विचार करते ओळखा पाहू !

माणिक !


Vaibhav_joshi
Friday, February 23, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो .. गज़लप्रेमी व गज़लेच तंत्र शिकण्यास उत्सुक कवी / कवयित्रींसाठी कार्यशाळा करण्याचा विचार आहे . अधिक माहितीसाठी मराठी गज़ल बीबी वाचावा

Marhatmoli
Friday, February 23, 2007 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जळणारि हि ज्योत दाखवि
फ़ेर सावल्यांचे
कि माझ्या डोळ्यांतिल ते
खेळ स्वप्नांचे?


Mankya
Friday, February 23, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Marhatmoli... कल्पना आवडली गं !
आणि मांडणी पण उत्तम पण अजुन मोठी करता आली असती तर अजुन उत्तम ! हे आपल्याला वाटल बुवा बाकी चु. भु. दे. घे., कसं !

माणिक !


Marhatmoli
Saturday, February 24, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks माणिक,

ह्Yअ BB वर मी पहिल्यांदाच आले. मला वाटल कि इथे 'समस्यापुर्ति' करायचिय. इथे पुर्ण कविता करायचि असते हे माहितिच नव्हत मला. पुढच्या वेळि नक्कि try करेन.


Tusharvjoshi
Monday, February 26, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग्नी दादा
ताई म्हणाली
तू मोठ्ठा झाल्यामुळे
सुलू चे घर जळाले.
हे खोटं आहे,
किनई रे?

तू तर मला
रोज भेटायला येतोस
सुंदर प्रकाश देतोस
तू असे करणार नाहिस ना रे?

सुलू खूप रडत
होती रे
मलाही खूप रडायला आलं
आपल्याला आई सांगते ना
की मुंगीलाही त्रास द्यायचा नाही
तूच नाहीस ना
मोठ्ठा झालास?

आज सुलू आमच्या घरी
झोपली आहे
तू माझा पक्का
दोस्त आहेस ना?
मग त्या अग्नीला
सांगशील का रे?
की मी त्याच्याशी कट्टी आहे
बघ हं देवा शप्पथ

तुषार जोशी नागपुर




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators