योग्या, काय रे? जल्ला ठीक हाय ना सगला?? काय हार्ट वर ऍटॅक नाय ना कुनी केला?
|
Meenu
| |
| Thursday, December 28, 2006 - 7:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जल्ला ठीक हाय ना सगला?? >>> जळल्यावर ठीक कसं काय असेल सगळ ..?? कायतरीच बाबा भ्रमा तुझं बोलणं
|
" काल माज़्या सखी ने रात्र रडून काडली कारे आसवानो तुम्हाला... माज़्या डोळ्याची इतकी भीती वाट्ली! " गणेश
|
काय हे असं तुझं रुसणं.. चूलीवरच्या दुधाचं उतू जाणं. काय ही तुझी छळायची तर्हा तुझ्या अश्रूनी माझ्या डोळ्यात येणं..
|
Poojas
| |
| Thursday, December 28, 2006 - 1:20 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
डोळ्यात भावनांना शोधू नको कधी तू... मिळतील आसवेही... रोखू नको कधी तू.. नक्षत्र वेचताना.. अगणित चिंब ओल्या.. त्या स्वैर तारकांना..मोजू नको कधी तू..!!
|
त्या स्वैर तारकांचा आधार आज होता नको सूर्य मज परंतू अंधार फार होता.. दीप लक्ष आठवांचे जपले मनात आहे कल्लोळ सावल्यांचा हृद्यात फार होता.. पूजा सहीच.. मिनू
|
Poojas
| |
| Thursday, December 28, 2006 - 5:02 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हृदयात सावल्यांचे घरकुल बांधले मी.. कित्येक आसवांना.. नयनात कोंडले मी... त्या गूढ आर्जवांचा.. कळला न अर्थ मजला संदीग्ध भावनांना..शब्दात मांडले मी..!!!
|
Yogi050181
| |
| Thursday, December 28, 2006 - 11:39 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा छानच झुळुका.. too good नको कोंडुस त्या आसवांना, वाट करुनी दे संदीग्ध भावनांना.. विश्वास ठेव मनावरी जगताना, तेजोकिरणाची साथ लाभेल आयुष्यात ज्याची प्रखरता अंधुक करील त्या सावल्यांना..
|
Deep_tush
| |
| Friday, December 29, 2006 - 12:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पुजा मस्त लिहलस नको कोंडुस आसवंना त्यांनाही मोकळ करायला हव.... घेउन आसवांना सोबती जगण तु शिकायला हव.... तुषार....
|
Meenu
| |
| Friday, December 29, 2006 - 1:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दळत्या हाताच्या, मुखी ओवी येई .... जात्याची घरघर, गोड होई ....
|
R_joshi
| |
| Friday, December 29, 2006 - 5:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झुळुकेचा बहर असाच वाढु दे
|
R_joshi
| |
| Friday, December 29, 2006 - 5:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुझ्या मधाळ बोलण्याने शुगर माझ वाढल आवर बाई स्वत:ला डॉक्टरने मला पुरत आहे कापल प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, December 29, 2006 - 5:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नको इतके आसु नदिलाहि पुर आला बुडेन मी त्यात या भीतिने माझा खिसा पुरा रिकामा केला प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, December 29, 2006 - 5:30 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी सहज तिला विचारले "तु इतकि अबोल का?" ती म्हणालि मला "लग्न करा अन माझे बोल ऐका." प्रिति
|
कोंडलेल्या अश्रुंना आज किनारा मिळाला संदिग्ध भावनांना सख्याचा आसरा मिळाला रुप
|
मित्र आणि मैत्रिनींनो लगे रहो. आज माझ्या डोळ्यांनी रडणं शिकलं आहे काळाने तिला माझ्यापासून आज दुर नेलं आहे. श्री
|
हवं तसं रडता येत नाही कारण एकांत कुठे मिळत नाही. श्री
|
आली कितीही याद तरी साद मी देनार नाही मनात कितीही आल तरी आता पाउल तुझ वळनार नाही......
|
तु बरसताना चिंब भिजायचय.. तुझ्या नकळत मनात रुजायचय
|
जडावलेल्या पापण्या आता पटकन मिटतात.. स्वप्नात तुला पहायला त्याही अधीर असतात
|