Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 10, 200720 01-10-07  2:00 am

Mankya
Wednesday, January 10, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा आवडली रे.... मस्तच !

माणिक


Himscool
Wednesday, January 10, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा ही कविता "कविता बीबी"वर का नाही पोस्ट केलीस.. काहीच्या काही काय आहे ह्यात...

Sati
Wednesday, January 10, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेजार

झाली तयार माला होई मनात काला
लाडात सांगते ती आधी विचार 'बा'ला

प्रेमात आंधळा मी तैसा प्रयास केला
होते नशीब मोठे होकार ही मिळाला

"आणून मात्र सोडा पुन्हा घरी दहाला"
पाठून धाडले का संगे असे चिम्याला

पाहू कसा सिनेमा मध्ये लहान साला
भुर्दंड फार आहे घ्या पॉपकॉर्न त्याला

कोठे नदी किनारा आला समोर नाला
साती कसे हसावे बेजार जीव झाला


Sarang23
Wednesday, January 10, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साती (की सती?) good one

Meenu
Wednesday, January 10, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साती मस्त गं .... ....

Sati
Wednesday, January 10, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग मीनु धन्यवाद!
सती नाही हो! साती. :-)


Jayavi
Wednesday, January 10, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साती....... सलाम :-) एकदम सही बा :-)

Lopamudraa
Thursday, January 11, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही काहिच्याकाही झुळुका..

१.
भेटतच नाही हल्ली
तुझी तक्रार रास्त आहे
खर सांगु मलाही..
कळत नाहि सध्या मी
रिकामीये की busy जास्त आहे.

२.कुणी रस्त्यात थांबुन जर विचारले
" आज तु कसा आहे? "
मी न टाळता हसुन उत्तर देतो..
" तसा बरा आहे!! "
" माणुसपणाचा " अंश आजही
माझ्यात " जरा " आहे.

३.प्रत्येक शहरात माणसे
ओळखीची वाटतात,
कारण मुखवटे सगळे
सारखेच...
खरे चेहरे कुठे असतात???

४.प्रत्येक जण काहितरी शोधत असतो
सारख google search करत असतो
समोर landline तर हाताशी mobile असतो,
मात्र प्रत्येकाच्या दाराशी त्याचा " सोनु "
काहितरी विचारण्यासाठी मघापासुन उभा असतो...!!!

५. office मधुन परस्पर मित्रांसोबत
जेवुन दोघही घरी येत असतो
घरी आल्यावरही बॉसची order
मित्राचा टोमणा डोक्यातुन जात नसतो,
त्याला / तीला काही सांगुन डोक्याचा ताप वाढवण्यापेक्षा..
गप्प बसुन T.V पाहणेच आपण प्रीफ़र करतो..
एकमेकांना आज काय झाले? म्हणुन
विचारण्यापेक्षा शांतपणे झोपणेच श्रेयस्कर असते..
" जन्माची सोबत " आहे म्हणून की काय..
" रोज " सोबत राहण्याचा
हट्ट्न न धरणेच कदाचित रास्त असते...???

६.
चोविस तास PC वर असुन
आम्ही offline असतो..
हाय..! करतांना
समोरचा चेहरा कडवट होतोय
हे online ही कळतं...!!!


Mankya
Thursday, January 11, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा छान आहेत .. दुसरी विशेष आवडली !

माणिक !


Ravindrakadam
Saturday, January 20, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रविन्द्र, नमस्कार मित्रहो,

लोपा, मित्रा फारच छान!

साती, अप्रतिम......... काय दाद दयावी बरे? खरच प्रश्न पडला मला!


Ganeshbehere
Sunday, January 21, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपाताई,
लई भारी, येऊ द्या अजुन...........

Dineshvs
Sunday, January 21, 2007 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा,

तु, तु, तुझं प्रेम
तुझं प्रेम म्हणजे
तुझं प्रेम म्हणजे
ब्रम्हपुत्रा नदितली मगर
किंवा
अफ़झलखानाची कबर

अश्या कवितांपेक्षा, खुपच अर्थपुर्ण आहेत तुझ्या या कविता.







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators