" बोला. " न वळताही संयूचा चिंताक्रांत मूड लक्षात घेत मी विचारलं. " काही नाही गं. चल ना कॅन्टीनला " म्हणजे नक्कीच ताजा खबर. " चल. " मी पिसी लॉक केला. संयू माझी जवळची मैत्रीण. याच ऑफिसात फ्रेशर्सची सेम बॅच आणि पहिलं प्रोजेक्ट सुधा. फक्त ती जावावाली आणि मी ऑरॅकल मधे. ट्रेनिंग़मधे फुल धमाल केली होतीच आणि पहिल्या प्रोजेक्टमधे पण. या प्रोजेक्ट मधेच तिची आणि दिविशची ओळख झाली, वाढली आणि स्टेबल पण झाली. ते दोघं लग्न करणार हे सरळ दिसत होतंच. संयू तशी बर्यापैकी इंजिनियर स्वभावाची. म्हणजे लाजणं बिजणं प्रकार नाहीत. नवीन प्रेमात होत असलेले साक्षात्कार मैत्रिणीला सांगणं नाही. म्हणजे काय काय घडलं ते सांगायची पण त्यात ती गम्मत नव्हती. त्यांचं प्रेम खुलत असताना मी पाहिलं होतं. जे बदल मी दिविश मधे पाहिले ते संयू मधे दिसलेच नाहीत. अगदी सुरुवातीला ते दोघं हळूच एकांत शोधायचा प्रयत्न करायचे ना म्हणजे एकत्र कॅन्टीन, लायब्ररी. एवढंच कशाला अगदी आयटी रीटर्न्स भरायला वगैरे पण एकत्र जायचे. तेंव्हा बाकी कुणाच्या आधी माझ्या लक्षात आलेलं. पण ते संयूच्या वागण्यातून नाही तर दिविश मुळे. ते परत आले की त्याचा चेहरा इतका खुललेला असायचा ना. मीही स्वतःहून तिला विचारलं नाही की चिडवलं नाही. म्हटलं तिनं स्वतःच सांगू देत. कारण एकदा मला सांगितलं की त्या लपाछपीत मला जी मजा येत होती तीच संपणार होती. आणि तसंच झालं. तिनं दिविश समोरच मला सांगितलं. तोच एकदम लाजला असं वाटलं मला. अरे हो एक सांगायचं राहिलंच. प्रोजेक्टच्या पहिल्या दिवसापासून मला जाणवत होतं की दिविश मला नोट करतोय. सहज नजर गेली तरी नजर चुकवायचा किंवा मोठं स्माईल द्यायचा. अरे देवा. या सगळ्या गोंधळात मला पडायचं नव्हतंच. आत्ता तरी. पण तो होताच असा की मला माझीच भिती वाटत होती. एकदा मला एक जॉब लावायचा होता सर्वर वर. तर जॉब ची फाईल मी एडिट करायच्या ऐवजी डिलीट करून टाकली. आणि बसले चिंता करत. " हाय " मी मान वर केली. " एनी प्रॉब्लेम? " एक खळीतले जीवघेणे स्मित. वर माझ्या डेस्क वर कोपर टेकवून उभा आहे. " हलो? " मी मनातल्या मनात. काय JA समजतो की काय स्वतला? " काही नाही रे. मी ना क्रॉन जॉब ची फाईल उडवलीय. " मी ह्याला का सांगितलं? परत एक खळीतले जी. घे. स्मि. वैतागच आहे. आधीच मी अशी का वागतेय ते कळत नाहीये. आणि हा आपला अल्ट्रा चिल. कृष्णाचा अवतारच जणू. " वेट " दोन मिनिटात त्याची मेल. जॉब फाईलच्या अटॅचमेंटसह. " ओह गॉड. थॅन्क यु सो मच. " " अगं मी पहिल्याच दिवशी केला होता हा प्रकार त्यामुळे मी नेहमी सेव्ह करून ठेवतो ही फाईल. " " थॅन्क यु सो मच. " मी यडबंबूसारखं परत तेच म्हणाले. " फक्त थॅन्क्स? " मग काय आता? " ओके. उद्या एक टेम्प्टेशन. " हे आमच्या प्रोजेक्टमधले चलन आहे. कुणीही कुणाचे काम केले की टेम्प्टेशन चे वायदे होतात. प्रत्यक्षात मिळते कधीतरीच. आणि मिळाले तरी एक कॅडबरी तेरा जणात वाटून खावी लागते. " टेंप्टेशन? प्लीज रसा. ग्रो अप. " इतक्यात आमचा पिएल आला आणि ते तसंच राहिलं. क्रमशः
|
Asmaani
| |
| Monday, November 27, 2006 - 9:37 pm: |
| 
|
हं ssssssssssssssssssss ! चालूदे! सही चाल्लय!
|
Daad
| |
| Monday, November 27, 2006 - 10:21 pm: |
| 
|
मस्तंच वाटतय वाचायला... संघमित्रा, लवकर येऊदे पुढचा भाग!
|
Athak
| |
| Monday, November 27, 2006 - 11:37 pm: |
| 
|
खरचं हे सॉफ्टवेअरवाले म्हणजे ना .... येउ दे पुढच लवकर
|
Badbadi
| |
| Monday, November 27, 2006 - 11:56 pm: |
| 
|
खरचं हे सॉफ्टवेअरवाले म्हणजे ना ... >>> तरल असतात असंच ना अथक!!! सन्मी छान लिहिते आहेस... शेवटपर्यंत असाच मूड यीउदेत.
|
Tulip
| |
| Tuesday, November 28, 2006 - 7:11 am: |
| 
|
लिही लिही. छान चाललय! ते JA वाचून उत्साह वाढलाय आमचाही
|
Hems
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:34 am: |
| 
|
मस्तच चाललय संघमित्रा ! कथेचा लूक एकदम mod बनलाय .. आवडेश !!
|
थॅंक्स लोक्स. तुम्ही वाचताय म्हटल्यावर आता पुढचं टाकायला हरकत नही.
|
पिएलशी बोलणं चालू असताना माझ्या लक्षात आलं की तो काय सांगतोय ते मी ऐकतच नाहीये. मी दिविशबरोबरचा संवाद पुन्हा पुन्हा आठवतेय. अस्सा राग आला ना. म्हणजे माझा स्वतःचा. आणि थोड्या वेळानं हे पण लक्षात आलं की राग त्याचा यायला हवाय तो येतच नाहीये. आणि अजूनच राग आला स्वतःचा. आता यावर काय उपाय करावा तेच सुचत नव्हतं. मरू दे. And well i know i can brainwash myself. एका वीकेंडचं काम होतं. दोन दिवसात मी स्वतःला नक्कीच समजाऊ शकते. " काय गं कसला विचार चालूय? " संयुक्ताबाई अवतरल्या. " ही चिमणीनं साग़ितलेली डेटा फ़्लो डायग्रॅम उद्यापर्यंत कशी तयार होईल याचा. वीकेंडच्या आत हवीय. " चिमणी म्हणजे आमचा पिएल. म्हणजे चिमणी एवढा नाही हं तो. साधारण दिड हिप्पोपोटॅमस इतका असेल. सारखं सिग्रेटचं धुराडं चालू असतं म्हणून आम्ही चिमणी म्हणतो. आम्ही म्हणजे मी आणि संयू. लंचनंतर मी त्या कामाशी झगडायला सुरुवात केली. काहीतरी वेगळंच जाणवतंय. मी मान वर केली. दिविश माझ्याकडे पहात होता. पण यावेळी त्यानं दोन्हीपैकी एकही गोष्ट केली नाही. मोठं स्माईल पण नाही आणि नजर चुकवणं पण. आता काय करू? मग मीच एक मोठं स्माईल दिलं. पण तरीही तो हसलाही नाही आणि त्यानं नजरही चुकवली नाही. मी पुन्हा DFD मधे डोकं घातलं. आता मी संध्याकाळपर्यंत डोकं वर काढणार नाहीये. मी स्वतःलाच बजावलं. चिमणीने काय स्पेसिफिकेशन्स दिले होते ते मी नीट ऐकले नाहीयेत हे मला माहिती होतं. पण ठीक आहे. त्याच्याकडे रिव्ह्यूला गेले डॉक्युमेंट की तो पुन्हा सांगेलच. एखादा तुच्छ कटाक्ष टाकेल किंवा माझ्या कॉलेजचा थोडक्यात उद्धार करेल पण त्याची तर सवय होतीच. " हाय " पुन्हा तोच विरघळता आवाज. " हाऽऽऽय. बोलो " मी जरा कॅज्युअल व्हायचा प्रयत्न केला आणि परत ते यडपटासारखं स्माईल दिलं. यावेळी दोन्ही हात टेबलावर ठेवून मी तयार केलेल्या DFD चा अभ्यास चालू होता. " Are you sure? त्याने तुला हेच करायला सांगितलंय? " " म्हणजे? " " म्हणजे तो सांगत होता तसं नाही करत आहेस तू. " याने ते स्पेसिफिकेशन्स पण ऐकलेत? " ओह मला वाटलंच काहीतरी चुकतंय " मी आत्तापर्यंत इतक्या बावळटपणे माघार घेतलेली मला आठवत नव्हती. पण काय करणार? खरंच असणार ते. माझं लक्ष नव्हतं चिमणी बोलत असताना. त्यानं शेजारची खुर्ची ओढली. आणि मला इशार्यानं बाजुला करून तो डायग्रॅममधे फटाफट चेंजेस करायला लागला. " दिविश " उत्तर नाही. मी पुन्हा हाक मारली. " बोल " नजर स्क्रीनवरच. " मी करेन हे " माझा आवाज इतका मृदू? मला परत माझा राग यायला लागला. बरं आणि तो शहाणा बोलत पण नव्हता. मी सरळ मॉनिटरच ऑफ करून टाकला. माझ्या डोळ्याला डोळे भिडवून तो हसला. ओह गॉड आता ही नजर वळवावी तरी कुठं? पण ती हा विचार करायच्या आधीच झुकली होती. " गुड. झालंच आहे. दे त्याला पाठवून. " असं म्हणून तो उठला. " तुला कुणी सांगितलाय आगावूपणा करायला ?" अर्थातच मनातल्या मनात. " थॅंक्स " मी त्यातल्या त्यात कोरडेपणाने म्हणाले. पण नाहीच. तो पंच नव्हताच त्यात. " फक्त थॅंक्स ?" पुन्हा तेच? " मग काय आता कातड्याचे जोडे हवेत का ?" हा प्रश्न मी आमच्या जॉइनिंग ग्रुप मधे नक्की विचारला असता. " बोल ना. काल पण... " माझाच आवाज आहे का हा? " कॉफी ?" हे सगळं काय घडतंय हे मला कळत नव्हतं असं नाही फक्त मी ते थांबवू शकत नव्हते आत्ता. पण नो इश्युज वीकेंडला सगळं ठीक होणार होतंच. क्रमशः
|
Fulpakhru
| |
| Tuesday, November 28, 2006 - 10:15 pm: |
| 
|
मस्त वाटतय वाचताना सन्घमित्रा लवकर लवकर पुरी कर कथा. एकदम आपली गोश्ट वाटते आहे.
|
Lampan
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:06 pm: |
| 
|
1 दम typical soft कथा :-) ... मजा येतिये वाचताना .. लगेच माझ्या महितीतली लोकंही त्यात अडकवली मी .. पण problem हा आहे कि अश्या कथा मी सोडुन जगातल्या सगळ्यंच्या बाबतीत घडतात :D
|
Meenu
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:36 pm: |
| 
|
मित्रा छान चाल्लिये सॉफ्टकथा ..
|
Maku
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:38 pm: |
| 
|
मित्रा मास्त चालु आहे . लवकर पुधचा भाग येउ दे.
|
Princess
| |
| Wednesday, November 29, 2006 - 1:25 am: |
| 
|
आहा... मज्जा येतेय वाचताना. लंपन म्हणतोय तसेच... मी पण पटकन माहितीतली लोक चिकटवली कथेत. लवकर लिहुन टाक आता पुढचा भाग.
|
Athak
| |
| Wednesday, November 29, 2006 - 7:08 am: |
| 
|
सॉफ्टकथा जमेश , अगदी ते संवाद प्रसंग हापिसच वातावरण समोर उभे
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 29, 2006 - 7:25 am: |
| 
|
सन्मी..मस्त ग.. छाने.. .... .. .. .. .. ...
|
Chinnu
| |
| Wednesday, November 29, 2006 - 11:01 am: |
| 
|
सन्मी, बरी हेस ना? काय कस चाल्लय टेम्प्टेशन? सॉफ़्टकथा पेक्षा गोडु-गोडुकथाच आहे ही! चिमणी लयी बेस हं!!
|
मित्रा, मस्त वाटतेय. office मध्येच बसुन वाचली अन अगदी सेम टू सेम आहे ग...पटकन पुर्ण कर pl.
|
मी कॉफी व्हेंडींग मशिनकडे निघाले. " रसा " दिविशने लिफ्टपाशी जाताजाता हाक मारली. " अरे कॉफी ?" " इथे? " असं म्हणून तो हसला आणि लिफ्टमधे शिरला. आता यात हसण्यासारखं काय आहे? " चल " मी मुकाट्याने त्याच्यामागून लिफ्टमधे शिरले. ओह हा कॅंटीनकडे चाललाय. खरंतर ती शेट्टीची कॉफी मला अज्जिबात आवडत नाही. पैसे खर्च करून कशाला ते रसायन घशाखाली ओतायचं? मी हे त्याला सांगितलं. " ठीक आहे. तू वर येऊन परत व्हेंडींगची कॉफी घे. " काय व्हिम्जी आहे हा? " त्या DFD बद्दल थॅंक्स. सलीलने चक्क त्यात एकही चूक नाही काढली. बोल आता काय हवंय त्याबद्दल? " मी मनापासून म्हणाले. पुन्हा एक गूढ स्मित. अशावेळी नक्की कसं रिऍक्ट करायचं ते मला अजून कळलेलं नाही. प्रश्नांची उत्तरं अशा हसण्यात सापडतात का? आणि मी ती शोधणार पण नाहीये Mr. Handsome. " हे काय त्यासाठीच तर आपण आलोय ना इथं " तो नजर माझ्यावर रोखून म्हणाला. ओह. शहाणाच आहे हा. माझ्या डोळ्यांना आता सवय झाली होतीच खाली पहाण्याची. पण यावेळी ओठांनीही न विचार करता हळूच चीझ म्हणायची काय गरज होती? वर आलो तर बिग बी आला होता. आमचा बिग बी म्हणजे पिएम एकदम एव्हरग्रीन माणूस. सकाळी नऊला असो की रात्री नऊला. तितकाच लाईव्हली. हं आता त्याला आमच्यासारख्या चिल्ल्यापिल्ल्यांशी बोलायला वेळ नसतो. पण काही महत्वाचं असेल की तो वेळ काढतोच. कुठलाही प्रॉब्लेम घेऊन गेले की त्याच्याकडे उत्तर तयार. त्याने शुक्रवारचे प्रोजेक्ट डिनर डिक्लेअर केले. प्रोजेक्टमधल्या बॅचलर्सनी उड्या मारायच्या बाकी ठेवल्या. जसे काही इतर वेळी यांना खायला बंदी आहे. लग्न झालेल्या पोरांनी अंगठे उंचाऊन ती सोय असल्याची खात्री केली. यांना घरी खायला मिळते त्यामुळे पिण्यात इंटरेस्ट जास्त. बायकांनी कितीला जायचेय आणि कुठे याची चौकशी केली. " लौकर होईल ना अथर्वच्या क्रेशमधे साडेदहापर्यंत चालते. " वगैरे वगैरे. आणि मुलींनी आपल्याला काऽऽऽही फरक पडत नाही असा व्यवस्थित आव आणला. नंतर फोनवरून, रेस्टरूम मधे आणि येताजाता त्याची भरपूर चर्चा होणार होतीच. विशेषतः ड्रेसिंगची. तो एक वैताग असतो. काही जणी तर दर सोमवारी वीकेंडला कुठे आणि कितीची शॉपिंग केली याची हौसेने चर्चा करतात. काहीतरी विचित्र कपडे घालून आल्या आल्या " ये देख कल लिया. फक्त दोन हजार " वर असे तोंडी प्राईस टॅग पण चिकटवतात. संयू पण अगदी शॉपोहोलिक नसली तरी बरंच कलेक्शन आहे तिचं. विशेषत ऍक्सेसरीजचं. सगळा दिवस कष्टाळू माणसांनी कामं केली. बाकीच्यांनी टाईमपास केला. मग निघायचं ठरलं. सगळ्या टीमला पुरतील इतक्या कार्स होत्या. पटापट लोक कोंबून आम्ही निघालो. " You are looking different today. " कारमधे बसल्यावर दिविश म्हणाला. काय बोलू? माझ्या बरोबर अमृता होती. " वेगळी? का रे छान नाही का ?" तिने विचारलं. " छान तर ती आहेच. नो डाऊट अबाऊट इट. पण आज वेगळी दिसतेय. " छान. इथे मला सॉफ्टवेअर मधल्या मुलींना पण लाजता येतं याची प्रचिती येत होती. आणि अमृता विचारतेय. " आणि मी ?" ह्या मॅरिड बायका पण ना बिन्धास्त विचारतात. पण बरे झाले. आता येईल मजा. मी अगदी उत्तर ऐकायला आतुर झाले. " सॉरी. एका वेळी मी एकाच मुलीला कॉम्प्लिमेंट देऊ शकतो. " माय गॉड. अमृता आम्हाला चांगलीच सिनियर होती. पण ती हसायला लागली. " You are too smart Divish. " डिनर मधे काय वेगळं असणार? तेच स्टार्टर्स, तेच पनीर आणि त्याच तंदुरी रंगाच्या पंजाबी भाज्या. आणि काहीजणांजवळ भरलेले नाजूक प्याले. घरी निघताना मी स्वतःला आठवण करून दिली. रसा वीकेंड सुरू झालाय. your time starts now. क्रमशः
|
Meenu
| |
| Wednesday, November 29, 2006 - 11:26 pm: |
| 
|
हं wish u all the best रसा ..
|