Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 19, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through November 19, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Friday, November 17, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हलकेच घ्या म्हणालो
"ताणून द्या!", म्हणालो>>>.

पणत्या चिकार झाल्या;
"कंदील न्या", म्हणालो!>>..

मस्तय हझल.. पहिल्या दोन ओळी लक्षात नाही आल्यात.
बाकी आवडली.. पहिल्यंअदाच वाचला.. हा प्रकार..


Jayavi
Friday, November 17, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा, मस्तंय रे! मज्जा आली :-)

Maggy
Friday, November 17, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग छान जमली आहे हजल...

आले 'कवी' पळा हो!
"भेटू उद्या", म्हणालो!

हे तुझ्या बाबतीत नाहि ना घड्लंय??


Sarang23
Friday, November 17, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, वैभवच्याच प्रतिक्रियेत आलयं की हलकेच घ्या... :-)
मायबोलीकरांना हलकेच घ्या माहीत नाही म्हणजे कमाल झाली... :-)
आणि त्यामुळेच शेवटी पणती पण आलीये...

मंगेश... आजपर्यंत तरी अशी वेळ नाही आली :-) (म्हणजे पुढचे सांगत येणार नाही...)

वैभवराव...

झटक्यात "छ्या" म्हणाला;
"कैसे चुक्या?", म्हणालो!

समिधाच या सख्या रे...
असती "सुक्या" म्हणालो!
(कुसुमाग्रजांची माफी मागून...)

कविता कळ्यांप्रमाणे,
"होत्या मुक्या!", म्हणालो...


हलकेच घ्या :-)


Chinnu
Friday, November 17, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग ह. घ्या. मस्त. वैभवची प्रतिक्रिया पण मस्त! :-)

Sarang23
Friday, November 17, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

    हासताना!!!

ऐनवेळी तोल गेला हासताना!
चेहरा गंभीर झाला हासताना!

उत्तराची वाटते भीती अताशा...
का तुझा होकार आला हासताना?

पाहुनी मज, लाल डोळ्यांचा फकीरा-
"जागणे टाळा", म्हणाला हासताना!!

चारचौघांसारखा साधाच होतो!
फक्त होता गाल ओला हासताना!!

जो दिला तो शब्द माझा पाळला मी!
प्राण सुद्धा सोडलेला हासताना!!

मी कुठे रडलो तुझ्या विरहात वेडे?
कस्पटाने घात केला हासताना!!!


सारंग


Swaatee_ambole
Friday, November 17, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, वर सारंग आणि वैभवने उत्तर दिलं आहेच, खरंतर ते तुझ्या पोस्टमधेच आहे.
>>>> पुढे धबधब्यामुळे तो कडा झिजेल
पटतंय का? :-)

इतक्या भरभरून प्रतिक्रिया आल्या की मला अगदी लाजल्यासारखं झालं. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दोस्त्स.

सारंग, हज़ल धमाल आहे.
वैभव, ' छ्या!'..


>>>> कविता कळ्यांप्रमाणे,
"होत्या मुक्या!", म्हणालो...
व्वा!!! व्वा!! मजा आ गया!

' हासताना' पण आवडली. आणि ' शब्द पाळला'स ( गालगागा) म्हणून धन्यवाद. :-)


Sarang23
Friday, November 17, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, धन्यवाद...        

Paragkan
Friday, November 17, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तू म्हणतेस म्हणून 'सोडुन देतो'. :-)

सारंग, हजल छान! अन् गजलेतला शेवटचा शेर आवडला.


Dineshvs
Friday, November 17, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती तुझी कविता खुपच आवडली म्हणुन एवढीही कसर खपली नाही. तुझी प्रतिमा जितकी कल्पनेत पटली, तितकी वास्तवात भिडली नाही.
हि चर्चा ईथे अस्थानी आहे.
मोठा अडथळा आला तर प्रवाह त्याला वेढुन जाईल. जसे स्विसमधल्या र्हाईनफ़ॉलला झालेय.
जर फुगीर म्हणजे बाहेर आलेला उंचवटा आला तर पाण्याचा वेग मंदावतो आणि त्या खडकाला वेढुन प्रपात ओघळत राहतो. गोव्याचा दुधसागर पण असाच आहे. त्याचे दोन फोटो माझ्या BB वर टाकतोय, अवश्य बघ. दोन्ही प्रकार तुला एकाच ठिकाणी दिसतील. वरच्या टप्प्यात तडे जरुर आहेत, पण ते मिरवले जात नाहीत. म्हणजे तितक्या उघडपणे दिसत नाहीत.
भंडारदार्‍याच्या एलीफंट फ़ॉल्स पण असाच आहे. तिथुन जवळच असलेला रंधा फ़ॉल्स मात्र मागे मागे सरकत गेलाय.
माझी चर्चा अस्थानी आहे, त्यामुळे क्षमा मागतो. पण ते फोटो बघुन तुला एखादी नवीन कल्पना नक्कीच सुचेल.


Swaatee_ambole
Friday, November 17, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो सुंदर आहेत दिनेशदा. उत्तर तिथे लिहावं की इथे हे आधी ठरत नव्ह्तं. मग म्हटलं परागचंही समाधान झालेलं नाही तेव्हा इथेच लिहावं. तुझ्या म्हणण्यानुसार
>>> वरच्या टप्प्यात तडे जरुर आहेत, पण ते मिरवले जात नाहीत. म्हणजे तितक्या उघडपणे दिसत नाहीत.
इथे ' मिरवणे' हे ' अभिमान वाटणे' या लाक्षणिक अर्थाने आलंय.

शिवाय मार्गातील कडे झिजल्या / भंगल्यामुळे धबधब्यांचे प्रवाह over the years बदलत रहातात. नायगारा धबधबा हा असाच आधी पाच प्रवाहांचा होता, पुढे कड्याची मधली पुढे आलेली टोकं फुटून त्याचा एक प्रवाह झाला, कालांतराने पुन्हा असेच बदल होत आता सद्ध्या US falls, Canada falls & Bridal falls असे तीन मुख्य प्रवाह दिसतात. तसंच धबधबा जिथे कोसळतो, तिथलेही कातळ फुटून / झिजून त्यांचे interesting आकार / पोत झालेले दिसतात.

मॉड्स, ही चर्चा अस्थानी / अनावश्यक वाटत असल्यास ( दिनेशदा आणि परागने वाचल्यावर) उडवावी / योग्य जागी हलवावी.


Ashwini
Friday, November 17, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवितेवरची चर्चा ही कवीच्या प्रगतीला उपकारक असते की नसते हा वेगळा मुद्दा आहे. परंतु मला असे वाटते, एखाद्या उत्कट भावनेची चिरफाड केली तर त्यातले काव्य लोपते.

बाकी चालूद्या..


Ashwini
Friday, November 17, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खंत

कालच्या आसवांचे
व्रण अजून ताजे होते
कोण जाणे कुठले हे
नवे दुःख माझे होते

शुष्क आसवांचे ओघळ
ओल ना कुठेच होती
हृदयाला मात्र जरा
बसलेली ठेच होती

जीवापाड जपलेले
स्वप्न तुटल्याचे दुःख नाही
खंत याची की तुटताना
आवाज न झाला इतकासाही


Swaatee_ambole
Friday, November 17, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा. मस्त, अश्विनी.

कुछ तो नाजुक मिज़ाज़ हैं हम भी, और ये चोट भी नयी है अभी..
ची आठवण झाली.


ह्या कवितेचं विडंबन
इथे टाकलंय.

Daad
Friday, November 17, 2006 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, हं.. हं... ह्ज़ल झकास आहे, 'हासताना', सुद्धा!! - 'चारचौघांसारखा साधाच होतो!
फक्त होता गाल ओला हासताना!!' - व्वा!!
अश्विनी सुंदर- खंत याची की तुटताना ..... अप्रतिम



Dineshvs
Friday, November 17, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, माझे वाचुन झालेय. आपण हि चर्चा ईथेच थांबवुया.
नेमस्तक, कृपया आमची हि अस्थानी चर्चा डिलीट करा.


Vaibhav_joshi
Friday, November 17, 2006 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग .... हासताना झकास गझल आहे ... विशेषतः शेवटच्या तीन शेरमधला लहजा फार मस्त आहे.

चारचौघांसारखा साधाच होतो

हे वाक्य आपण कितीतरी वेळा बोलून जातो पण त्याचा मिसरा होऊ शकतो हे कुणीतरी लिहील्यावर कळतं . बहोत अच्छा है . मज़ा आ गया

अश्विनी ... खंत अप्रतिम आहे . तू साधंसुधं कधी लिहीतच नाहीस का ? तुझ्या कविता दीर्घकाळ रेंगाळत राहतात ... त्याही " श्वास घेतल्याइतकं सहज " अनेक शुभेच्छा

स्वाती ... मला वाटलं तू " दिल में एक लहर " चं विडंबन केलंस की काय . इथे लिहीलंय त्यावरून तरी तसंच वाटतंय
:-)


Swaateemumbhai
Saturday, November 18, 2006 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय फ़ंडू कविता लिहितात इथे एकेक मायबोलिकर!

स्वाती तुझी गझल अप्रतीम!!!!!!


Sarang23
Saturday, November 18, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, छान आहे!    

Ashwini
Sunday, November 19, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनापासून धन्यवाद मित्रांनो.
दिग्गजांच्या शुभेच्छा मिळाल्या. आणखी काय पाहीजे?
वैभव, तू म्हणालास....यातच सगळं आलं.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators