|
Vinaydesai
| |
| Thursday, November 09, 2006 - 12:20 pm: |
| 
|
हा घ्या Map... त्यातला चौकोन (सीताराम आबांचे घर) हे माझं मुळं घर... http://www.wikimapia.org/#y=15968746&x=73568670&z=18&l=0&m=s
|
Nalini
| |
| Thursday, November 09, 2006 - 12:53 pm: |
| 
|
दिनेशदादा, वाचता वाचताच कोकणाची सहल घडली. कधी जाईन आणि कोकण पाहिन असे झालेय.
|
Manuswini
| |
| Thursday, November 09, 2006 - 9:49 pm: |
| 
|
छान वाटले वाचुन माझे आजोळ पावस अतीशय सुंदर ठिकाण आता खुप comemrcialized झाले एकलय by the time I was born, things were changed in kokan बोटीने वगैरे प्रवास बंद झाला होता मुळात आई सुद्धा तिथे वाढली नसल्याने मला कमी संधी मिळाली पण जेवढी काही मिळाली त्यात बर्याचश्या similar आठवणी आहेत कोकणातील घराच्या बाबतीत खाण्याच्या सवयीत. पण आईला स्वामी स्वरूपांनदाचा आशीर्वाद मिळाला होता... कोकणात नेहमी घर तीन विभागात असते खळं, पडवी, ओटी मग येते ते माजघर वगैरे वगैरे फणसा, आंब्यासाठी वेगळी खोली, नुकतेच झालेले वासरु पडवीत बांधयला जागा, एक मोठा झोपाळा हा असतोच असतो पडवीत आजोबा नी आजी आम्हा भावंडाना हमखास पावसेला घेवुन जात आणि तेव्हाच घराची बरीच कामे करत. मुंबईला असताना तेच घर नोकरांवर सोपवले असायचे. घरी पिकल्वलेला भात, चवळीची शेंगाची भाजी, वरण किंवा पिठले घरची वांगी तिखत भाजी,खारा अंबा, रायते, fresh कैरी चुलीत भाजुन लोणचं जेवणाला.. .. सकाळी न्याहरीला घावणं, साठणं,अंबोळ्या मजा असायची. त्या जेवणाला चव नक्केच वेगळी असायची. तीच वाअंगी मुंबईत आणली तरी मला वेगळीच लागायची. ......... दिनेशदा छान आहेत आठवणी आता कधी हे अनुभवायला मिळेल असे वाटत नाही आजी गेल्यापासुन.......
|
Bee
| |
| Thursday, November 09, 2006 - 10:19 pm: |
| 
|
मनु आणि दिनेश, कैरी चुलीत भाजून काय करायचं असतं पुढे? दिनेश, मला मालवण बद्दल कोकणाबद्दल जराही माहिती नाही. तुम्ही छान माहिती दिली.
|
Saee
| |
| Friday, November 10, 2006 - 2:08 pm: |
| 
|
आई ग! दिनेश, धन्य आहे तुमच्यापुढे! मी इतक्यात येतेच आहे मालवणहुन अजुन.. म्हणजे तनानं इकडे आले असले तरी मन अजुन तिथेच रेंगाळतंय.. तोवरच पुन्हा तिकडे नेऊन ढकललंत!! चिवळ्याच्या वेळेवरच संध्याकाळी घालवल्या, लोकांना मनसोक्त माशे हाणताना बघुन करमणुक झाली, भरपुर डॉल्फिन्स बघितले... संध्याकाळच्या माशांच्या होड्या किनार्याला लागल्यापासुन ते पुन्हा रात्री त्यांची निघायची तयारी होईतोवर आम्हीही त्यांच्याबरोबर तिथेच! ताज्या मासळीचा अज्जिबातच कसा वास येत नाही, त्यामुळे ते सगळं पुन्हा पुन्हा पाहिलं, सोलकढी होता होईल तेवढी नुसती रिचवली पोटात इकडे परतताना नुसतं उदास व्हायला होतं.. आपण परत इकडे का यायचं असा छळवाद होतो मनाचा. जरी तुम्ही ३० वर्षांपुर्वीचं वर्णन केलंत तरी अजुनही तिथल्या परिस्थितीत फारसा बदल नाही. आपुलकी, गोडवा, आगतस्वागत, दिलदारपणा सगळं अगदी तस्संच. चौथीत पहिल्यांदा गेले, दहावीनंतर मग थोड्या थोड्या काळाने आणि आता तर सारखीच जातेय. पण त्या सगळ्या परिसराचं वेड काही कमी होत नाही. केवळ स्वर्ग! पण खराखुरा. कोकण सगळंच स्वर्गीय पण त्यातही उत्तर कोकणापेक्षाही दक्षिण कोकण जास्तच सुंदर आणि पुन्हा पुन्हा खुणावणारं. कोणीतरी नेटीव्हांनी जरा धामापुर - वालावल - चौक्याच्या भागाबद्दलही लिहा की. खाली वेंगुर्ला - होडावडा - शिरोडा - आरवलीचं लिहा कुणी. कुणी इकडच्या सह्याद्रीकडच्या पट्ट्याचं लिहा. तिथली देवळं आणि देव, त्यांचे उत्सव, सण साजरे करण्याचे प्रकार, रितीरिवाज, समाजजीवन, निसर्ग, कित्तीतरी आहे. जे प्रत्यक्ष तिथलेच त्यांनी प्रत्येकानी आपापला परिसर पोचवा. बाहेरच्यांनी लिहिली की ती प्रवासवर्णनं होतात आणि त्यातली मजाच जाते. तुम्ही खुद्द तिथलं सांगण्यातली खुमारी वेगळीच. कोण लिहीतंय आता पुढचं? लिहीते व्हा जन हो..
|
Manuswini
| |
| Friday, November 10, 2006 - 2:34 pm: |
| 
|
दिनेशजीचे वर्णन वाचुन मला आता 'पावस' बद्दल माझ्या separate post मध्ये लिहावेसे वाटते. ते दिवस 'मंतरलेले दिवस' असे असायचे सुट्तीतील पावस, रत्नागीरी, पप्पांच्या गावी चिपळुणला,गोव्याला मी सुद्धा लिहिते आता आरामात हे दिनेशजीचे post वाचुन nostalogia झालाय
|
Prajaktad
| |
| Friday, November 10, 2006 - 3:00 pm: |
| 
|
मने,सई दोघी लिहा बर!...
|
Dineshvs
| |
| Monday, November 13, 2006 - 1:17 pm: |
| 
|
आता नोस्टालजिया नाही वाटत. बदल झालेत पण त्याना वाईट म्हणता येणार नाही. आता कोकणातहि रोजगार उपलब्ध होवु लागलेत. पिढिजात आळस झटकला जातोय. आणि सई बरोबर आहे, प्रवासवर्णापेक्षा स्थानिक व्यक्तीनी लिहिलेले कधीही जास्त विश्वासु वाटते. म्हणुन मनुस्वीनीला माझाहि आग्रह. सई, काल कोल्हापुरात जुन्या राजवाड्याच्या आवारात तलवारबाजीही प्रात्यक्षिकं बघितली. हनुवटीखाली, जिभेखाली, ठेवलेले लिंबु तलवारीने सपकन कापताना बघुन अंग शहारले. बी, चुलीत कैरी भाजुन, त्याच्या गरात तिखट मीठ साखर घालुन रायते करतात. त्याचे पन्हे पण चांगले होते.
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 12:06 am: |
| 
|
thanks दिनेश लिहिण्यास केलेल्या प्रोत्साहनास तुम्ही लिहिल्या प्रमाणे सकाळी भरपुर पोट फुगवुन नास्ता केल्यावर आम्ही गायब व्हायचो आजी भंयकर कडक होती, गावी गेलो की ती कोकणी बोलायची, आम्ही तुटक मुटक कोकणी बोलायचो, सकाळी सगळ्यांच्या अंघोळी झाल्याशिवाय breakfast नाही, तर मुंबईला सुट्टीच्या दिवशी अस काहीच rule नसल्याने ती जरा कटकट वाटायची मला. त्यात आजीचा एकदम मोठा आवाज. १० १५ जणांच्या अंघोळी होईपर्यन्त भूक लागलेली असायची. रोज नास्त्याला वेगळे प्रकार असायचे. टोपसांजा हा एक प्रकार आहे तो मातीच्या भांड्यात चुलीवर करायची आजी खास. खुप चविष्ट लागतो. तांदूळाचा जाड रवा काढून नारळाचे दूध काढून, गूळ, वेलची,केसर टाकुन शिजवतात. गोड पदार्थामध्ये हे पदार्थ असत बहुतेक करून, घावन नी घाटले. शीरा, लापशी(दलियाचा गूळ घालुन केलेला शीरा,त्यात घरचे काजु), टोपसांजा, माल्पोवा, आप्पे, खरवस, निवर्या, घारगे वगैरे वगैरे सांडणं, तिखट मध्ये, तिखटसांजा, पोहे,(त्यात सगळे प्रकार), तिखट वड्या, ईतर मध्ये अंबोल्या, घरचे ग्लास भरुन दूध पिवुन गायब. काट्यातील करंवदे खा, काजु खा मग घसा धरला की आजीकडे जायचो, चुलीत काजुच्या बीया टाकुन भाजयचो, घरी काजु आणले असतील थोडे मिठ लावुन खायचो,रतांबे तोडुन आण,कैर्या पाड असे प्रकार चालत. छतावर सुकत घातलेले कापा फणसाचे गरे खा आजीची नजर चुकवून, साठं पळवा अर्धवट सुकलेली, नदीत पोहा. पुन्हा १० ते १२ मध्ये घरी यायचो कारण पुन्हा भूक लागलेली असायची. गावी असताना इतके खायचो तरी आपले बारीक मग कळायचे की गावात मुले हे एतकी काटक का असतात.? आम्ही सख्खी आणी मावस भांवडे मिळून १०-१५ जणे आरामात असायचो. १० ते १२ वाजता आजी सगळ्यांना प्रत्येकी एक असा बरका रसाळ फणस(त्याला आम्ही हजारी गरा म्हणत कारण आकाराने लहान असुन सुद्धा त्यात लहान लहान गोड असे गरे मिळत mainly ते साठंण किंवा साठ घालण्यासाठी वापरत.) फोडुन द्यायची नी आम्ही खायचो. सुरवातीला आम्हा मुंबईकरांना जमायचे नाही. पण नंतर तो अक्खा फणस खावुन दाखवण्याची शर्यत असायची. उन्हातून आलो की पन्ह प्यायचो. ते कायम आजी सकाळी बनवून ठेवायची fresh . कधी कधी स्वामींच्या मठात जेवण असायचे. ते जेवुन पुन्हा घरी येवुन माश्यावर हात मारायचो. सोलकढी नुसती पाण्यासारखी प्यायचो. मग दुपारी झोपाळ्यावर गलका कारण सगळ्यांना झोपाळ्यावर बसायचे असायचे. मला नेहमीच माझी मावस भांवडे रडवत सगळ्यात मीच लहान असल्याने.......... अंगणात पिवळा चाफ़ा,सोनचाफ़ा,तगर, प्राजक्ता,जास्वंद हा असतोच असतो, गुर नेहमी खायचे ते, आम्ही हार करयचो नाहीतर अंग्ठ्या. चिकु,पेरु ही कायम घरासमोरच्या अंगणात आजी ते चिकु तांदूळात पिकवायची. घरच्या कोंबडीची अंडी पण आजी अशीच ठेवताना मी बघीतली आहेत. मला लहनपणी एक कोडे कायम असायचे की ही गुरे संध्याकाळी बरोबर कशी घरी येतात? ते पण पायरी चढून वगैरे? आजीला बर्याच वेळा हा प्रश्ण विचारला असेन मी लहनपणी. आणी जिथे हे गडी चरायला सोडत ति जागा सोडुन चुकुन सुद्धा बाहेर जात नसत. गावी प्रत्येकाची गुर चरायला सोडायची जागा असते, गडी लोकं तिथे सोडत पण संध्याकाळी ही गुरं बरोबर परत येत नी गोठ्यात जात. पाण्याची 'दोणी'(गुरांना पाणी प्यायला ठेवलेली छोटी विहीर) गडी लोक भरुन ठेवत. कोकणात गड्यांची नावं अगदी ठरलेली असतात अशीच असायची मोरु, म्हाद्या, सोन्या, हरचन(हे कायम नाव लहनपणी मला हरचन म्हणजे हरिशचंद्र हे नंतर कळले .... ). अतीशय प्रामाणीक असत(तेव्हा होती), अक्खे घर सोडत आजोबा मुंबईला असताना आणी हे गडी निगा राखत. संध्याकाळपर्यन्त इतके दमलेलो असायचो. माश्याचे जेवण असो का काही हाफ़ुस आंबा हा असायचा ताटात. आजीची भरलेली वांगी, आमटी, एखादी उसळ, गरम गरम संध्याकाली भाकरी, रायते नेहमीच असायचे ताटात. पापड घालाचा प्रकार हा नेहमीच चालयचा, बहुतेक आजी आमचा उपयोग ह्या कामासाठी करून घ्यायची म्हणुन उन्हाळ्यात आम्हाला घेवुन जायची . बट्याट्याचे पापड,उडीदाचे,फेण्या(तांदूळाच्या, साबुदाण्याच्या) मसाले पण चालत. येताना भरपुर आंबे, फणस, ओले काजु, फेणी,पापड,साठं, गावचे पोहे,मुगाचे लाडु,अंबावडी,मसाले,नारळी वड्या, नारळ, शहाळी,सुपे, रोवळी(खोलगट भांड विणलेले), गावचे तांदूळ, सुकलेले खारे मासे,सोडे(सुकी कोंळबी) वगैरे वगैरे. बरीच वर्षे झाली, आता तर भारतातुन इथे settle झालो ने आजी, आजोबा सुद्धा नाहीत तर हे सगळे पुन्हा अनुभवले नाही. मुंबईला आल्यावर आमचा रंग बराच रापलेला नी तांबुस झालेला असायचा. एक वेगळीच छटा गोर्या रंगावर असायची. मोठे झाल्यावर बहुधा रहायला आवडणार नाही असे वाटते...... माहीत नाही पण मुंबईत सुद्धा कंटळवाणे वाटते एक महिन्याने. ...
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 12:25 am: |
| 
|
बर्याच आठवणी आहेत एक एक आठवतात तश्या लिहिते अंगणात छान कोरीव काम केलेली तुळसेचे वृंदावन होते. आम्ही आजिच्या मागोमाग rounds मारायचो ती जेव्हा सकाळी पाणी घालायचे तुळशीला आजीला हसायला यायचे. ...... तिच्या बरोबर फेर्या count करायचो आजी तु फेर्या का घालते? .. ती हसायची.... मुंबईला फक्त एक कुन्डी होती त्यामुळे ती सजवलेली तुळस वृंदावन छान वाटायचे. ... जवळ जवळ अडीच फुट उंचीचे हे वृंदावन आजोबा नेहमी सुट्टीत गेल्यावर रंगवायचे. ... कोरीव काम तर इतके सुंदर होते ना त्यात दिवा ठेवायला जागा असायची. .. अंगणातील बांबु एक रोवलेला असायचा मध्ये. गुरें अगदी trining दिल्या प्रमाणे कधी ही चुकुन तोंड नाही लावायची तुळशीला पण चाफ़ा मात्र खायचीत
|
Bee
| |
| Tuesday, November 14, 2006 - 5:04 am: |
| 
|
वा मनु, किती निरागस लिहिलसं.. अगदी तुझ्याप्रमाणे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 14, 2006 - 12:09 pm: |
| 
|
मनु, आत्ताहि जाऊन रहावे असे आहे कोकण. आपली सई, दरवर्षी जाते तिथे. उन्हाळा कडक असतो म्हणा. पण मला पावसातले कोकण आवडते. जनशताब्दीने निघायचे. हिरवाईची आणि पांढर्याधोप नद्यांची चित्रमालिका संपतच नाही.
|
Sami
| |
| Tuesday, November 14, 2006 - 2:50 pm: |
| 
|
वा मस्तच दिनेश, मनु, माझं गाव लांजा. माझ्या सुद्धा आठवणी जाग्या झाल्या कोकणातल्या. आम्ही जायचो उन्हाळ्याच्या सुटीत आणि माघ महिन्यातल्या गणपती ऊत्सवाला. आमच्याकडे सकाळी मऊ भात नाश्त्याला ठरलेला असायचा. न्याहारीनंतर आंबे काढायला जायचं काकाबरोबर..ऊन रणरणतं असायचं. आल्यावर मस्त अंघोळ आणि मग आमरसाचं जेवण. गावाला भूकही सारखी लागायची. आणि मनु, तू म्हणतेस तसं मुंबईला परत आल्यावर चेहरे आणि कपडे अगदी रापलेले असायचे. मी आणि माझा नवरा, मुलगा यावेळी भारतात गेलो तेव्हा लांजा आणि राजापूरला माझ्या आजोळी गेलो होतो. मस्त वाटलं, पण पाय निघत नव्हता.
|
दिनेश मस्तच लिहिलत.. ह्या dec मधे नक्कीच एक चक्कर टाकणार आहे मी कोकणात मालवणला सुद्धा जायचा plan आहे. आम्ही पण गणपतीतच जायचो. तुडूंब पोट भरून जेवण आणि मग आंब्याच्या कापलेल्या फ़ोडी मध्यभागी ठेऊन त्यावर ताव मारत मारलेल्या गप्पा. ओल्या काजुची उसळ माझी फ़ेव.. अगदी मागच्या वर्षीपर्यंत आज्जी माझ्यासाठी आंब्याच साटं पाठवायची. माझ्यासाठी खास तिने काही ना काही राखून ठेवलेले असायचे. आता माझे आजी आजोबा दोघेही नाहीत त्यांच्यावाचून घर अगदी पोरकं वाटत
|
Pendhya
| |
| Tuesday, November 14, 2006 - 10:23 pm: |
| 
|
दिनेश, नेहमी प्रमाणेच, तुमच्या ईतर लेखांसारखेच ऊत्तम लिहिलेत. छान वर्णनात्मक लिखाण असतं तुमचं. तुम्हाला एखाद्या वर्णनाला, दुसर्या गोष्टीचा संदर्भ द्यायला छान जमतं. त्यामुळे वाचन सुलभ होते. ईथे, काही अपरिचित शब्द वाचनात आले : घुला = गोगलगाय मुळ्ये = शिंपल्या तुम्ही जो, केंड मासा म्हणताय, तो Japanese, FUGU blowfish सारखा असतो का? मी कोकण बरच फ़िरलोय, पण केवळ फ़िरलोय......... ते " अनुभवलं " नाही, ह्याची खंत नेहमी वाटते.
|
Pendhya
| |
| Tuesday, November 14, 2006 - 10:33 pm: |
| 
|
मनुस्विनी, संक्षिप्त, पण छान लिहिलयस. अजुन तुझे अनुभव लिहू शकतेस. तिथली देवळं आणि देव, त्यांचे उत्सव, सण साजरे करण्याचे प्रकार, रितीरिवाज, समाजजीवन, निसर्ग, कित्तीतरी आहे. जे प्रत्यक्ष तिथलेच त्यांनी प्रत्येकानी आपापला परिसर पोचवा.>>>>> सई ने म्हंटल्या प्रमाणे, कुणीतरी, असं वर्णन करायला काहीच हरकत नाही. प्रत्येक गावाचे, तिथल्या परीसरातले रितीरिवाज वेगळे असतात. पद्धती वेगळ्या असतात. आजकालच्या झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनात, ह्या सगळ्यांचे वर्णन केलेले जास्त चांगले होईल. कोकणचाही, दिवसेंदिवस कायापालट होतोय, तेव्हा, तिथले रिवाज, रहाणीमान, सणवार साजरे करण्याच्या पद्धती, ई; ईथे किंवा एखादी नवी लिंक ऊघडून, लिहिता आल्या तर त्या वाचकांना, नक्कीच आवडतील.
|
Bhagya
| |
| Tuesday, November 14, 2006 - 11:18 pm: |
| 
|
काय सुंदर लिहिलय सगळ्यांनी. कसं सगळ्यांना अशी छान जागा सोडून राहवतं?
|
Aditih
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:38 am: |
| 
|
माझे वडिल कोकणात सावंतवाडी जवळ बांदयाला १९६० साली डॊक्टर बनून गेले. लग्नानंतर आई पण अर्थातच तिथे गेली. त्या काळी एकदम वेगळं होतं बांदा.वीज नव्हती.बायका भाजी आणायला बाजारात येत नसत.आई शहरात वाढलेली.सुरवातीला जरा अवघड गेलं पण नंतर तिनेच नवीन पायंडे पाडले. गावातल्य़ा बायकांना जमा केलं. देवळात जमून जप चालू केले, भजनी मंडळ तयार केलं. आईचं वॆद्यकीय शिक्षण झालेलं होतं.त्यामुळे बायकांना तिचा आधार वाटाय्चा. रात्री ,बेरात्री आई आणि बाबा बांद्याजवळ्च्या लहानलहान खेडयात व्हिजीट्स ना जात असत.बाबांनी कित्येको रात्री न झोपता व्हिजीट्स केल्याचं स्मरतंय मला.प्रचंड धोधो पाऊस,चिखल,पूर सगळं काही असायचं , पण या दोघांचं काम अविरत चालू. या सगळ्याच्या बदल्यात पॆसे त्यामानाने कमी मिळायचे. पण अगणित आपुलकी, प्रेम मिळायचं. आदर तर काही विचारुच नका.देव मानायची लोकं त्यांना. मला लिखाण करायची कला फ़ारशी अवगत नसल्याने ,१५ वर्ष कोकणात राहीलेली असून सुध्दा आत्तापर्यंत त्यावर काहीच लिहीलं नाही. आज लिहीलं आहे. कोकणापेक्षा आई बाबांविषयी जास्त लिहीलं गेलं.आशा करते सांभाळून घ्याल. बरंच लिहायचं आहे ... आज इथेच थांबते.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 15, 2006 - 7:20 am: |
| 
|
अरे वा.. सगळेच जण लिहा.. आपल्या.. आपल्या.. गावाविषयी छान वाटते वाचायला...!!! माझही असच होतं जेव्हा.. गावाकडच्या अनुभवाबद्दल लिहायला..जाते तेव्हा.. आजी आजोबा.. या शिवाय पलिकडे मी जातच नाही..!!!
|
नका ना अशा जीवघेण्या आठवणी आठवून देऊ... नुकतीच घर सोडून आलेय... परत जावंसं वाटतं........ माझे बालपण कोकणात गेले.. किती मजा केली ती आज कळते.. त्यावेळेला तर ती आमची लाईफ़स्टाईल होती.. मस्त आबे पाडायचे,, कैर्या वाटून घ्यायच्या,, रात्री फ़िल्मला जायचे.. टुकार पिक्चर पण मस्त enjoy करायचा.. अभ्यासाला कुणाच्या तरी बागेत जाऊन बसायचे आणि भुतखेतच्या गप्पा मारायच्या.. सगळ्यानी मस्ती करायची.. माझ्या मैत्रिणी मला अस्सल कोकणी पदार्थ आणून द्यायच्या आणि मी त्याना कर्नाटकी.. ते दिवस आठवले की मग वाटते की धावत पळत ज़ावे आणि ते क्षण जगावेत. आता हे लिहायला बसले की इतक्या गोष्टी आठावतायत.. कोई लौटा दे मेरे बिते हुये दिन....
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 15, 2006 - 12:45 pm: |
| 
|
पेंढ्या बहुतेक तोच मासा असावा. हा खात नाहीत, आणि जाळ्यात सापडला तरी जाळ्याचे नुकसान करतो. मी अलिकडे असे वाचले कि नोस्टाल्जिया जागवणारे काहि लिहिले कि ते लोकाना आवडते. म्हणजे लेखन यशस्वी करायचा तो सोपा मार्ग आहे वैगरे. मला स्वतःला ते पटले नाही. जुनं ते सगळं कालाच्या ओघात बदलणारच ना. प्रवासाच्या सोयी होणार, पर्यटक जाणार. त्यात काहिच वावगे नाही. हे बदल हवेतच व्हायला. पण तरिही आपण लहानपणी जे अनुभवलं त्याचे मोल कमी होत नाही. आता ते जागवायचं ते असे शब्दातुनच. आपल्या आजीच्या वयाची एखादी सिनेमानटी कशी दिसत होती, बोलत होती ते अजुनहि पाहता, ऐकता येते. पण आपली आजी अशी शब्दातुनच जिवंत करता येते, हो ना ? माझ्या आजोळबद्दलहि लिहिन आता.
|
Pendhya
| |
| Wednesday, November 15, 2006 - 9:51 pm: |
| 
|
जुनं ते सगळं कालाच्या ओघात बदलणारच ना.>>>>> दिनेश, मला तुमचं मत पटतं. म्हणूनच मी वरती म्हंटलं होतं की, कोकणचाही कायापालट होतोय, त्यामुळे ह्या बदलाच्या ओघात, पद्धती पण बदलतात. शेवटी, आपण केवळ आठवणीतून आणी अनुभवातून गेल्या दिवसांचे, " शाब्दिक " जतन करु शकतो. आता जरी आपण video camera ई. मार्गे काही क्षण " बंदिस्त " करु शकलो तरी, गेलेलं बालपण शेवटी आठवणींतूनच जागं होणार, नाही का?
|
Manuswini
| |
| Wednesday, November 15, 2006 - 11:11 pm: |
| 
|
thanks पेंढ्या, Actually मला दिनेशदांचा लेख वाचुन ओघात लिहत गेले, ठरवून काहीच न्हवते. in fact मी लिहिताना पुर्ण visualize करत होते ते दिवस. खरे तर आम्ही मुळचे गोव्याचे पण आजीचे(आईची आए) आई, वडील हरचीरीला Settle झाले बर्याच वर्षापुर्वी, आजोबा मात्र मुळचे पावसेचे. लग्न झाल्यावर आजीपावसेला आली.पण आजीचे सर्व Relative गोव्याला, त्यामुळे आमची मजा. खाण्या,पिण्यात्ज्यास्त कोकणी पद्धीतीचा पण influence होता. बर्याच गोष्टी आहेत पण लिहायचा कंटाळा येतो त्यादिवशी असेच मूड जमला अदिती, बांदा मी पाहीला, भरपुर मालवणी आहेत तिथे. माझ्या एका दुरच्या मावशीला बांद्यात दीले होते. काय कोकणी नी मालवणी बोलते........ फर्डु एकदम. मला मात्र पावस हेच आवडले...... रत्नागीरीला गेल्यावर मावशीक दुसरी मजा मांडवीचा समुद्र, तिथे चाललेला मासळी बाजर, गणपती पुळे... कालवं हा एक प्रकार मिळतो, तो खुप चविष्ट लागतो.
|
Saee
| |
| Tuesday, November 21, 2006 - 4:33 am: |
| 
|
अरे वा! काय छान वाटतंय सगळ्यांनीच लिहीलेलं वाचायला. प्रत्येकाचा आपापला view आणि style ! दोन शेजार्यांनी जरी लिहिलं तरी ते वेगळं मांडलं जाईल, निदान कोकणाबाबतीत तरी. मी वर्षातुन किमान ४ - ५ वेळा तरी कोकणात जाते. लागुन सुट्टी आली की निघायचंच, थांबायचं नाही. आणि दिवाळी तर हक्काची आहेच. दिवाळीलाही खरंतर कोकणात गणपतीएवढं महत्व नाही. पण तरीही देशावरच्या तुलनेत ती मोठ्याच प्रमाणावर साजरी केली जाते. आपल्याकडे कितीही मोठं घर असलं तरी एखादा आकाशकंदील, काही पणत्या आणि रांगोळी इतपतच काम असतं. तिकडे म्हणजे सर्रास घरटी ४ - ५ कंदील (बरेचसे घरीच बनवलेले जरा वेगळ्या आकारांचेही), आंगणभर, गडग्यांवर आणि देवळांमधेही लावलेल्या भरपुर पणत्या (मेणबत्त्याही खुपच वापरतात) दिसतात. रात्रीच्या वेळी एका गावातुन दुसर्या गावात जाताना वाटेतली एखादी छोटी वाडी किंवा लांबवरचं आतल्या बाजूचं एकुलतं घरसुध्दा उजळलेलं दिसतं. ते बघितल्यावर पटतं की हा खरा दिव्यांचा सण. आपल्या इतका इतर प्रकाशाचा झगमगाट नसतो त्यामुळे शब्दश: अंधार उजळून निघतो. रांगोळ्या तर असतातच, त्याही एकदम सुबक. शेणसडा, काव सगळं ताजं. सकाळ संध्याकाळ वेगळी. (अर्थात जागा, वेळ, घरात भरपुर बायका या गोष्टींची इकडे वानवा, नाहीतर आपणही करु, पण तरी हौस कौतुकास्पदच.) या शिवाय पोह्यांचं महत्वही आपल्यापेक्षा जास्त. बायका भात घेऊन गिरण्यांसमोर रांगा लावुन उभ्या असतात. बाजारातही पोहेच पोहे दिसतात. ताजे पोहे असलेच पाहिजेत नरक चतुर्दशीला. बाकी खरेदी वगैरे दुय्यम असते बहुतेक. गंमत म्हणजे कुणालाही विचारा, तो म्हणणार की हे काहीच नाही, गणपती १००% असेल तर हे फक्त ५ - १०% आहे, आमचा खरा सण गणपती दिनेश, तलवारबाजी बघुन मला आता किमान १३ - १४ वर्ष झाली. चित्तथरारक असतं ते प्रकरण.
|
|
|