Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
माझे पुल

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » ललित » माझे पुल « Previous Next »

Srk
Wednesday, November 08, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे पुल

आठ नोव्हेंबर पुलंचा जन्मदिवस. सगळच शब्दात सांगता येत नाही. सूर्यास्ताच्या वेळी दाटुन येणार मन, बंद डोळ्यांनी ऐकलेली समुद्राची गाज, खुप दिवसानंतर जिवलग मित्र मैत्रिण भेट्ल्यावर होणारा आनंद कुठे शब्दात सांगता येतो? मला जमल तस लिहीलय.

"अग खुप छान पुस्तक आहे. तुला खुप आवडेल." अस म्हणत आईन 'व्यक्ती आणि वल्ली' माझ्या हातात दिल. ते मी वाचलेल पुलंच पहील पुस्तक.घरात सगळेच वेळ मिळेल तेव्हा वाचत असत, त्यामुळे आम्हा भावंडाना वाचनाची आवड आपोआपच आली.
'व्यक्ती आणि वल्ली' नंतर 'पुर्वरंग','अपुर्वाई','गणगोत' इतर पुस्तक लायब्ररीत आमच्या खाती जमा झाली. सुरवातीला गंमत करणारी ही पुस्तक प्रत्येक आवर्तनात आणखी नविन काहीतरी दाखवायला लागली. पुल घरातलेच अगदी आजोबांसारखे वाटायला लागले. त्यांच सगळच आवडायला लागल. त्यांचा साधा पोषाख, गोड हसु, सशासारखे दोन दात या सगळ्याच कौतुक अजुनही संपत नाही.
त्यांनी मला त्यांच्यासोबत जगभर हिंडवल. माणस पहायला शिकवल. उघड्या डोळ्यांनी आणि मनान जगाकडे बघायची द्रुष्टी दिली. माणसाला त्याच्या गुणदोषांसकट स्विकारायला शिकवल. नविन काही शिकण्यासाठी वय, समाजातल स्थान आडव येउ नये,जीवन सगळ्या दिशानी वाहात असाव, अडचणी, नैराश्य पचवुनही विचारात किंवा स्वभावात कडवटपणा नसावा अस खुप काही.
त्यांच्या विनोदान नेहमीच भरपूर हसवल पण त्याचबरोबर विचारही करायला भाग पाडल. आसामी असामी च्या शेवटी ते सांगतात, "घड्याळाच काय आणि माणसाच काय, आतल तोल सांभाळणार चाक नीट राहील की फार पुढही जाण्याची भिती नाही नि फार मागही पडण्याची नाही!"(आधीच संदर्भ दिला. नाहीतर माझा सखाराम गटणे व्हायचा.) अशी कितीतरी वाक्य आवडतात, पटतात आणि खुप खुप शिकवून जातात.
मोठ होता होता आलेले अनेक चंगले वाईट अनुभव, यश, अपयश, अडचणी, सुखदुःखाचे क्षण, आपल्याच जवळच्या माणसांनी दुखावल्यावर येणार एकटेपण या सगळ्यात पुल त्यांच्या पुस्तकांच्या रुपान सतत माझ्या सोबत होते, आहेत. एक एक करुन त्यांची पुस्तक विकत घेतांना एक एक दागिना घेतल्यासारखा आनंद ओसंडुन वहात असे. ईथे भेटलेल्या ग्रुपला हा सेट दाखवतांना खजिना दाखवल्यासारखा मी दाखवला.(आणि त्यांनी शक्य तितका लुटुन नेला!)

कितीही वेळा वाचल तरी बटाट्याच्या चाळीतल 'एक चिंतन' आजही जीवाला त्रास देत. अन्तु बर्वा हसवता हसवता डोळे भिजवुन जातो. अजुनही नंदासाठी जीव तुटतो. पुल खरच खुप दिलत तुम्ही. पण तुम्हाला प्रत्यक्ष पहायच होत ते मात्र राहुनच गेल……


Princess
Wednesday, November 08, 2006 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान लिहिलय श्रुती. पुल माझेही खुप आवडते लेखक. तु एस एस व्ही पी एस ची आहेस ना? मला वाटते मी तुला ओळखते. पटकन रिप्लाय कर.

Deemdu
Wednesday, November 08, 2006 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आय स्वेअर, पुलं गेले त्या दिवशीचं तर चिंटूही माझ्या चांगलं लक्षात आहे.

चिंटू खिडकीत अतिशय उदास बसला आहे आणि शेजारी रॅक वर सगळी पुलंची पुस्तकं लावली आहेत. :-(


Zakasrao
Wednesday, November 08, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे एकदा लोकसत्तामधे लेख आला होता.त्यामधे लेखकाने लिहिले होते कि पु. ल. नी चाळीतल्या गणेशोत्सवासाठी परत यावे.
मी तर म्हणतो कि अशा बर्‍याच गोष्टीवर लिहिन्यासाठी
पु.ल. नी परत याव. खरच पु. ल. तुम्ही परत या. आम्हला हसवण्यासाठी या. तुमची असल्या life मधे गरज आहे.
WE LOVE YOU पु.ल.


Swaatee_ambole
Wednesday, November 08, 2006 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी मनातलं लिहीलंयस श्रुती.

Chinnu
Wednesday, November 08, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातीला अनुमोदन.
पु. ल. ही एक व्यक्ती नव्हती, ते म्हणजे जीवन जगण्याचे गाईड होते.. वेल.. आहेत, अजुनही..


Chafa
Wednesday, November 08, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचताना गलबलायला झालं. पुलं आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाही. नुकतंच मंगला गोडबोलेंचं 'पुरुषोत्तमाय नमः' वाचलंय, आणि सध्या 'एक शून्य मी' पुन्हा वाचतोय.
त्यांना कधी भेटण्याचा योग आला नाही तरी ते होते तोपर्यंत दर ८ नोव्हेंबरला न चुकता त्यांना पाठवलेल्या शुभेच्छा आणि त्यावर त्यांचं आवर्जून येणारं उत्तर हा ठेवा काय कमी आहे?


Srk
Thursday, November 09, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी! त्यांच आपल्यात नसणं खरच वाटत नाही. पण ते मान्य करुन पुढे जायलाही त्यांच्याचकडुन शिकावं. 'मैत्र', 'गणगोत', 'गुण गाईनं आवडी' वाचल्यावर त्यांनी त्यांच्या जिवलग माणसांच नसणं कसं स्विकारल हे समजतं. विसरणं शक्य नसतं पण त्यांनी दाखवलेल्या मार्गानी जाणं आपल्याला नक्कीच जमावं.

Hems
Thursday, November 09, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


श्रुती खरंच ग !
पुलं नाहीत असं नाहीच ! मराठी माणसं जमली की तर ते हटकून असतातच -- त्यांची एकेक वाक्य,त्यांचे विनोद पुन्हा पुन्हा ऐकण्या - ऐकवण्यातही केवढा आनंद असतो !

1990 च्या रत्नागिरीत भरलेल्या साहित्य संमेलनात पुस्तकांच्या stalls जवळून फिरताना मला पुलं दिसले अचानक ... मग ते
तिथे होते तेवढा वेळ मी नुसती त्यांच्या मागून जात राहीले. मुद्दाम ओळख करून घेतली नाही , स्वाक्षरी मागायचंही सुचलं नाही(नशिब ! नाहीतर माझाही सखाराम गटणे झाला असता !)... पण नंतर बरेच दिवस आमचं विमान आकाशात होतं !


Seema_
Thursday, November 09, 2006 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांनी मला त्यांच्यासोबत जगभर हिंडवल. माणस पहायला शिकवल. उघड्या डोळ्यांनी आणि मनान जगाकडे बघायची द्रुष्टी दिली. माणसाला त्याच्या गुणदोषांसकट स्विकारायला शिकवल. नविन काही शिकण्यासाठी वय, समाजातल स्थान आडव येउ नये,जीवन सगळ्या दिशानी वाहात असाव, अडचणी, नैराश्य पचवुनही विचारात किंवा स्वभावात कडवटपणा नसावा अस खुप काही.
>>>

अगदी खर .
छान लिहिलय . मी ऐकलेल कि पुल ज्या वेळी hospital मध्ये होते तेव्हा त्याना पहाण्यासाठी जाणार्या चाहत्यांकडुन बर्‍याच रिक्षावाल्यानी पैसे घेतले नव्हते .


Jo_s
Thursday, November 09, 2006 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी ज्यांनी ही माझी पुलंना वाहीलेली काव्य श्रध्दांजली वाचली नसेल त्यांच्यासाठी . . .
ही लिंक

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=815421#POST815421


Aditih
Sunday, November 12, 2006 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला त्यांच्या "पुरचुंडी" नेही खुप काही दिलं.त्यातील त्यांचे लेख वाचले की मनावरची मरगळ कशी आपोआप झटकली जाते. "कशासाठी पोटासाठी ...","प्रत्येक चिंधीने मला खुप काही दिलं" आणि घरावरचा लेख अप्रतिम आहेत. कधीही उठावं आणि पुलं वाचावेत.
.....
सुंदर लिहिलं आहेस श्रुती.एकदम मनातलं.





Abcd
Monday, November 13, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My first meeting with PU.La was when I was in school and wanted to take his interview for our masik….it continued till I was to be married to my husband who used to be in US.I wanted to be in Pune and I told him so…his answer….” Julavaleli mana goegorphy ni dur jauch shakat nahit…go explore the world.
After 2 years in … I was fortunate to meet him for his very last B’day. We used to go for his every B’day at his home.He was suffering from paralysis ….but even in wheel chair he was not sad or given up on life …but content and happy.


}अजुनही त्यान्चा हात गालावरुन फ़ीरतोय अस वाटत.एकच वाक्य अठवत....जे कर्शील ते मनापासुन कर.

He is a god for me!!!!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators