|
Sarang23
| |
| Wednesday, November 01, 2006 - 8:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा! वैभवा... एक एक शेर म्हणजे कहर आहे! अगदीच क्रम लावायचा झाला तर गोषवारा या शेराला मी पहिला क्रमांक देईन आणि पुरावा कहर आहे याला दुसरा...
|
Sarang23
| |
| Wednesday, November 01, 2006 - 8:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ओढ लागे चित्त न हे, सखा परतला नाही अजूनी घरी संध्याकाळ सरे, उरी खळबळे, आतूरली अस्तुरी बोले, "बाळ बसा, जरा फिरकते, चाहूल घेते तरी...' जाणे काय असा प्रसंग घडला; का दाटु येते उरी?" शंकेने मन ग्रासता तडकशी बाहेर ती धावली शोधाला मग धाव घे चपलिनी काटेच पायातळी जाणे कोठुन ये अशक्य दृढता; पायात काटे जरी आता लक्ष तिचे सदा लागले त्याच्याच वाटेवरी... ...येई तो घरला पुन्हा परतुनी, त्या किर्र रानातुनी "सांगा माय कुठे?", मुलां पुसतसे नाही सखी पाहुनी "गेली माय तुम्हास हो हुडकण्या त्या दाट रानाकडे" धावे तोहि तसाच थेट तिकडे; पाऊस त्याच्यापुढे! हा पाऊस वरी, तरी जळतसे आतून कोणीतरी का त्याला न कळे, कुठे हरवली त्याची प्रिया बावरी? शोधे तो तिजला जगी, तुडवुनी राने वने वा गिरी आक्रोशे परि स्फुंदती चिमुकली त्याची पिले ही घरी येई तोच तया तिची करुणशी केवीलवाणी हळी घेता चाहुल जाणवे अडकली काट्यांत त्याची कळी! निमिषार्धात तिला कवेत भरुनी बोले, "सखे लाडके...' - वेडे का असले करून बसली धाडस खुळ्यासारखे" बोले ती, "तुज वाचूनी जीव हा जाईल रे साजणा' माझी प्रीत अशी खुळी, नवल का व्हावे तुला सांगना?" बोले तो, "सखये न हे नवल गे वाटे अभीमान हा...' या वेड्यास तुझ्यामुळेच जगण्या लाभे नवा अर्थ हा..." ( जाती : शार्दुलविक्रिडीत ) सारंग
|
वैभव, गोषवारा अ प्र ति म!!! अप्रतिम!! सारंगा, धाडसी आहेस बाबा. एकदम शार्दूलाच्या दाढेला हात? मस्त जमलंय. फक्त शेवटच्या कडव्यात ' तुजवाचुनी जीव हा' आणि ' अभीमान' मधे जरा गडबड झाली का? ' अभिमान वाटे मला' असं चाललं असतं का?
|
Chinnu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:26 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बापरे, सारंग अगदी शार्दुल विक्रीडिता मध्ये, तेही इतके छान लिहीणे, धन्य आहेस बाबा तु! एक फ़क्त वृत्तासाठी म्हणुनच नाही, पण काही काही शब्द फ़ार गोड वाटलेत, जसं माय, रान, गिरी, निमिषार्ध, प्रिया-बावरी.. निरुकुल, खरच कधी कधी स्वत:ला ओळखणे पण किती कठीण ना? MG अगदी अगदी! वैभवा, खिंडीमध्ये गाठलेस देवाला! छान आहे. शलाका, गुलमोहोर कुणाची संध्याकाळच नाही तर पुर्ण दिवस बहरण्याचं कारण आहे!
|
Ashwini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव, ' तुझ्यावाचून सरलेल्या ऋतुंचा गोषवारा... ' फार सुरेख रे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 01, 2006 - 12:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव, छान आहे गझल.
|
सारंगा.... धन्य आहेस बाबा..... झकास जमलंय.... वृत्तही आणि कविताही...
|
Dhund_ravi
| |
| Thursday, November 02, 2006 - 12:48 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शब्द तुझ्या डोळ्यातले, सुर तुझ्या ओठांवरचे ह्या कवितेत हात न माझा .......... हे इशारे तुझ्या बोटांवरचे पावलात जीवही नव्हता, आत उमेद ही मिळाली दिसले तुझ्या पावलांचे ......... ठसे ओसाड वाटांवरचे आयुष्य खोल पाणी, आहेस तु किनारा आवडे आता मलाही ........ते जगणे काठांवरचे स्पर्शुन तुला जावी, ती लाट सागराची मी झोकवे शोधाया ..........ते मोती लाटांवरचे होऊन सायली तु, गंध तुझा उधळावा जगणे मझे असावे ........कोवळ्या देठांवरचे ........ हे इशारे तुझ्या बोटांवरचे धुंद रवी
|
Meenu
| |
| Thursday, November 02, 2006 - 12:58 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नावच सुचलं नाही या कवितेला .. कुणाला सुचलं तर सांगा ... त्या दिवशी ईथेच उभे होतो आपण हो ! याच खिडकीपाशी त्याच पलिकडच्या झाडाकडे पहात , जणु बोलल्याप्रमाणे त्याच्याशीच ... तु म्हणाला होतास ठामपणे " माझं अजिबात प्रेम नाहीये तुझ्यावर ...." अन मीही मग आकाशात स्वच्छंदपणे उडणार्या , एकाकी पक्षाला सांगीतलं .... " मलाही तु आवडत नाहिस अजिबात अन प्रेम मी तुझ्यावर मुळीच नाही करत ....." मग किती हलकं वाटलं होतं दोघांनाही एक प्रश्न सहज सुटला म्हणुन ... याच खिडकीपाशी नाही का ..?
|
छाअनच धुनंद,मीनू.. वैभव,तुला मझ्या काही हिन्दी गझल mail केल्यात..
|
वा वा.. फ़ारच सुंदर कुणा कुणाचे नाव घेउ..!!! सरंग छान.. वैभव गझल great फ़ार आवडली.. मृ This is not फ़ेअर मला पण हव्या तुझ्या गझल.. वाचायला.!!!
|
Zaad
| |
| Thursday, November 02, 2006 - 4:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव, सारंग, रवी, मीनू खूपच छान! मृद्गंधा, मला पण हव्यात तुझ्या गझला.
|
लोपा.. its my pleasure dear ,झाड तुम्हालही करते mail
|
Asmaani
| |
| Thursday, November 02, 2006 - 8:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मृ, अशी "पार्शिलिटी" करायची नाही!
|
Asmaani
| |
| Thursday, November 02, 2006 - 8:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव, "दुरावा सोसला नाही, पुरावा ओघळे खाली" केवळ उच्च! सारंग, खूप सुन्दर! actually सगळेच इतक्या लेव्हल चं लिहितात ना! पण दाद द्यायलाही त्याच उंचीचे शब्द सुचायला हवेत. आणि नेमकी तिथेच गोची आहे!
|
मृद्गंधा, मला पण!! मीनू, ' सहज' नाव कसं आहे?
|
धन्यवाद मित्रांनो सारंग ... अप्रतिम ! स्वातीने सुचवलेला बदल योग्य वाटतोय ... मीनू ... झकास कविता
|
Niru_kul
| |
| Thursday, November 02, 2006 - 10:28 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुझा नकार मिळाल्यापासून.... झालोय मी वेडा, तुझा नकार मिळाल्यापासून.... जगलोय मी वेदना, तुझा नकार मिळाल्यापासुन.... आता ठरवलंय मी, पुन्हा स्वप्नं बघायचीच नाहीत; पुन्हा कोणात गुंतायचं नाही, तुझा नकार मिळाल्यापासून.... प्रेमाच्या मुक्त अवकाशात, विहरणारा पक्षी होतो मी; ढगातून आलोय जमीनीवर, तुझा नकार मिळाल्यापासून.... नशिबात माझ्या अजून, किती दुःख्ख आहेत कोणास ठाऊक? ती भोगण्यास तयार होतो आहे, तुझा नकार मिळाल्यापासून....
|
Sarang23
| |
| Thursday, November 02, 2006 - 10:39 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मित्रांनो आभारी आहे... स्वाती, ते वाचुनी असच पाहिजे होतं. तुझं बरोबर आहे... चूक लक्षात आणल्याबद्दल धन्यवाद! आणि अभीमान ही वृत्तासाठी घेतलेली सुट आहे चालेल ना? मीनू, 'सहज' छान आहे! रवी इशारा छान...! मृ, आम्हालाही पाठव की...
|
Smi_dod
| |
| Thursday, November 02, 2006 - 11:10 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शब्द!!!!! शब्दफ़ुलोरा.... प्रसन्न,रंगीत मनोहारी,सुखद शिडकाव्याने बहरणारा भुलभुलैय्या शब्दांचा चमकदार शब्द,सच्चे शब्द कृतीशुन्य शब्द,पोकळ शब्द आश्वासक शब्द,धारदार शब्द शब्द्ब.... शब्द नव्हे हे... ही तर माणसेच शब्दांमधुन व्यक्त होणारी शब्दांच्या आड असलेली जपायला हवे शब्दांपासुन ओळखायला हवे शब्दांना पण माणसे ओळखताना केलेल्या चुका टाळायला हव्यात शब्दांना ओळखताना स्मि
|
|
|