Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 31, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through October 31, 2006 « Previous Next »

Tusharvjoshi
Sunday, October 29, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


स्वाती,
समिक्षा अप्रतीम!
तुषार जोशी, नागपूर


Sarang23
Sunday, October 29, 2006 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुजा, खास आहेत दोन्ही... पण ती ची थोडी मानसिक अवस्था गडबडलेली वाटली...
समिक्षा छान आहे...
अलिप्तता आवडली...


Mrudgandha6
Monday, October 30, 2006 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


छानच.
पुजा,..खासच आहेत दोन्ही..

स्वाती,.."समिक्षा".. आशय खूप आवडला.

bee ..
अलिपतत..केवळ अप्रतिम.
"उमज"ही दुसरी अप्रतिम..पण करवादलेला म्हणजे काय ते "उमज[ले]" नाही.


Bee
Monday, October 30, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Daad- 'umaj' hee kawita khoopashee swakendreet aahe. fakt mazyapuratee mhantalee taree chaalel. nawakawee ekamekaanchya kawitanwar kadheekadhee taasheree oDhataat. jase mee nehamee kawiteteel wishay waiwidhatakade baghato shabdankade baghato. mala jar hyaa don goshtee disalya nahit tar tee kawita mazyasathi taakaawoo hote. mag tyala mee kawita paaDalee ase naaw Thewato. mee, jo ek kawitaa kharaDaNyaachee dhaDapaD karaNaaree wyaktee aahe, tyachya aapalyaa kawita taree kuthe chhaan asataat. hee jaaNiw malaa Gres, Kusumagraj, Arati Prabhu hyanna wachun hote. mag mala jya wyakteewar mee taasheree oDhale, jyaachyaa kawitelaa mee naawe Thewalee, tyaachya kawitepramaaNe maajhyaahee kawitet malaa kaahee "raam" aaDhaLat naahee. baryachaweLaa ekach ek bhawanaa asate fakt kawita dusaree lihilee jaate. hee 'umaj' malaa ithe hyaa kawitet apekShit aahe. kaLale? sorry malaa maazyaach kawitaanchaa arth saangata yeNe mahaakaTheeN kaam aahe.

Mrudagandha6 - ithe hya shabdacha arth irritate zalelaa.. waitagalela jeew asa ghe! karawaadane mhaNaje oraDaNe, aawaaj karaNe, dhusapus karaNe, chiDaNe asaa khoop kaahee arth hoto tyaachaa..

Mrudgandha6
Monday, October 30, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


छंद

हा असा कसा जीवघेणा छंद जीवास लागे
मन दुःखाच्याच वाटेवरी पुन्हा पुन्हा धावे
दुःखे लपविण्याची माझी जुनीच खोड आहे
पण,हास्यामागले अश्रू तुलाही न उमगावे?
हा खेळही जुनाच अन डावपेचही जुनेच
जिंकतानाही तुजसाठी मी मुद्दाम हरावे
हा प्रस्ताव फ़ेकला "त्यांनी"पुढ्यात माझ्या
तुला विसरावे किंवा जगणेच सोडून द्यावे.
तूच सांग देवा आता मी काय बरे करावे?
केवळ राखच उरता माझी हाती,आता काय जाळावे?






Bairagee
Monday, October 30, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तुमची समीक्षा ही छोटेखानी कविता मोठी उत्तम आहे.


Daad
Monday, October 30, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, thanks . आता बरीचशी कळली असं वाटतय.
मृ.. - छंद 'केवळ राखच उरता माझी हाती,आता काय जाळावे? ' - कल्पना छानच!!


Vaibhav_joshi
Monday, October 30, 2006 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्भर .....

कितीतरी दिवसांनी
आज पूर ओसरला तेव्हा ....
गावात हिंडू लागलो
उध्वस्त घरं मोजू लागलो
पण काहीतरी चुकत होतं
ओळखीचं एक घर कमी पडत होतं
काळजाचा थरकाप झाला
लोकांची कुजबुज ऐकून
ते घर ...
ते तुझं तर नसेल ना
जे म्हणे गेलं वाहून ?
खरंच सगळं कसं
मन मोठ्ठं करण्यावर निर्भर असतं
अमानुष प्रवाहाला का कळू नये
सुरुंग लावणार्‍यालाही घर असतं


Me_anand
Monday, October 30, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावण-मैफिल

हिरव्या वनराईतूनी सांडली शामनिळ्याची धून
छेडी तराणा हिरवे पाते हिरव्या धिक्तालातून
भिरभिरत्या वायूवर झुलते लक्ष फुलांचे बेट
उधाणास ये हिरवा सागर, फुटे कोवळी लाट

इंद्रधनुचे बांधून तोरण निळ्या स्वर्गद्वारी
दिमाखात ये मैफिलीस या सूर्यकिरणस्वारी
इंद्रधनुचे रंग पांघरून रंगतात ही शेते
पर्जन्याचे थेंब मिरवीते उन्हांत भिजले पाते

सचैल न्हाऊन गोड उमटली वेळूंची बासरी
चिवचिव करिते मंजूळ गायन चिमणी ही लाजरी
घेते सुंदर तान कोकिळा गीत धरेचे गाता
भान विसरलो श्रावण-मैफिल अशी रंगूनी जाता


Poojas
Monday, October 30, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लोक्स...

सगळेच जण बेस्ट... !!!!
स्वाती आणि वैभवजी ....'' दंडवत ".... !!!!!!!!!!!!!!!!!!!
खूप खूप खूप खूप खूप आवडली कविता.. short.. sweet & meaningful

मृ... हा छंद जीवाला लावी पिसे

बी.... ''अलिप्तता''... जास्त आवडली... छान

आनंद... तुमची काव्य-मैफल अशीच रंगू दे...श्रावणासारखी !!!


Zaad
Monday, October 30, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अलिप्तता छानच. दुसरी कविता खरंच नाही कळली नीट.
मृद्गंधा, छंद मस्तच!
श्रावण मैफ़िल खासच...
वैभव, तुझ्या कवितेवर विचार करतोय...
स्वाती, समीक्षा खूपच सही. ती वाचून माझी एक कविता आठवली


ज्ञानेश्वरा,
आज आमचा समाज
संजीवन समाधीच्या दगडापर्यंत येऊन पोचला आहे.
दह्या दुधाचे अभिषेक घालण्यात,
उन्हा पावसात पंढरीची वाट तुडवण्यात,
तुझ्या अमृत बोलांची विक्रमी पारायणे करण्यात,
तुझी पताका दाही दिशांना फडकवण्यात,
थोडक्यात
तू केंद्र असलेल्या सर्व वर्तुळांवरून प्रदक्षिणा घालण्यात
स्वत:ला धन्य समजत आहे.
हे सर्व ठीकच,
पण गंमत अशी आहे की,
कुणालाही हा दगड बाजूला सारून
तुझ्यापर्यंत पोचावसं वाटत नाहीये
आणि कुणाला तसं वाटायच्या आतच
बडवे चोख़ ओरडतात,
"चला,समाधीवर डोकं टेकवून पुढे चला!!!"


Mi_anandyatri
Monday, October 30, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुक्यात जाती हरवून वाटा
चिंब चमकती नवथर पाने
झाकून घेई धरा स्वत:ला
गर्द नव्या हिरव्या गर्दीने

गर्दी नेई अवखळ पाणी
शेते गाती निर्झर गाणी
गंधित सुमने हर्षित सु-मने
वेचित जाती कुणी मैत्रिणी

मैत्रिणी त्या पाहून वाटे
हे तर देवाघरचे नाते
तप्त कोरड्या मार्गावरती
सुखसम शीतल छाया वाटे

या वाटेने चालत असता
आठव येई तुझ निरंतर
ऐक हाक ही तुझ्या मनाची
हट्ट सोड बघ वाढे अंतर

अंतर मिटुनी गवसावी ती
वाट धुक्यातील कुणी अनामी
सहवासाची आस प्रवासा
परतुन ये तू.…उभा इथे मी…


Swaatee_ambole
Monday, October 30, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स.

वैभव, तरीही ' ओळखीचं घर' ना? आपलं मन नाही बाबा इतकं मोठं!!

झाड, ' पुढे चला..!!' अप्रतिम!

>>> थोडक्यात, तू केंद्र असलेल्या सर्व वर्तुळांवरून प्रदक्षिणा घालण्यात
स्वत:ला धन्य समजत आहे.
वा! व्वा!!

मृद्गंधा, मूळ गज़ल वाचायला आवडेल. पाठवशील का? मक्ता सही आहे!


Mrudgandha6
Monday, October 30, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद.. दाद,पुजा,झाड,स्वाती.
स्वाती,ही गझल्सादृश्य[व्याकरणात बसत माही म्हणून गझल नाही हे तुला सांगणे न लगे.] कविता मूळचीच अशीच आहे..

वैभव..
अनोळखी प्रवाहाला का कळू नये?? वा!!

झाड,
खूपच मर्म आहे कवितेत.. आवडली म्हणण्यापेक्षा रुजली आत हृदयात.

अनंन्द,.. छानच.

आनंदयात्री.. सुरेख!!!


Swaatee_ambole
Monday, October 30, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या! हो का? मला वाटलं तू हिंदी / उर्दू गज़ल आधी लिहून भाषांतर केलंयस. करतेस ना तसं बरेचदा? ही version गज़ल नाही हे खरं, पण आता हिचं उलट भाषांतर करून बघ, नक्की छान गज़ल होईल.

Daad
Monday, October 30, 2006 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, 'खरंच सगळं कसं मन मोठ्ठं करण्यावर निर्भर असतं अमानुष....' - छानच
आनंद श्रावण्-मैफिल मस्तच जमलीये
झाड, खरंय!! कर्म आणि कर्मकांड यातली सूक्ष्म रेषा ओळखू येणं सोप्पं नाही... कविता अगदी सुबोध तरीही, खूप विचार करायला लावणारी.

आनंदयात्री, कडव्याचा शेवटचा शब्द घेऊन पुढले कडवे चालवण्याची लकब छान आहे. मला तुमच्याकडून शेवटच्या दोन कडव्यांबद्दल ऐकायला आवडेल.




Sarang23
Monday, October 30, 2006 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदयात्री, सुरेख कविता!    

Mi_anandyatri
Tuesday, October 31, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दाद...शेवटच्या दोन कडव्यांबद्दल काहीच विशेष नाही...

Mi_anandyatri
Tuesday, October 31, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सान्जवेळी, दूर रानी, साद घातली मला कुणी?
हिरव्या देठी, चिमण्या ओठी, शीळ घातली खुळी कुणी? १
नभांगणाच्या हमरस्त्याने पक्षी चालले माघारी
कि संध्येच्या नयनी रेखिले काजळ ते आतुर कुणी? २
दिवेलागणी होता उमटे बालसूर तो श्लोकांचा
गोशाळेतुन जणू किणकिणे मंजुळसी गोमाय कुणी! ३
कडे-कपारी न्हाऊन निघती संधिकाली त्या किरणांनी
समर्पणाचे तेज हे दिधले जाता जाता मला कुणी? ४
मनामनाला करते कातर वेळ ही हळवी क्षणोक्षणी
की चित्ताला शान्तवाया निर्मिली ही सांज कुणी? ५
मला न ठावे कोण असे तो सूत्रधार या खेळाचा
खेळगडी तो असेल माझा की खेळाचा जनक कुणी? ६


Sarang23
Tuesday, October 31, 2006 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! बालकविंची आठवण झाली... सुरेख रे आनंदयात्री!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators