Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
खो खो..

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » विनोदी साहित्य » खो खो.. « Previous Next »

Yog
Sunday, October 29, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खो खो...
(मोहाली, Oct 29, 06 )

आज सच्या, रावल्या, विर्‍या अन अशा बर्‍याच "याया" खेळाडून्साठी एक महत्वपूर्ण दिवस होता.
करो या मरो लढाई असल्याने सर्वानी आपापली कम्बर कसली होती, म्हणजे practice session मधे.
दुर्दैवाने युव्याची कम्बर कसलेली नसल्याने सरावादरम्यान त्याने खेळाडूऐवेजी चुकून जमिनीला खो दिला अन मग तो सामन्यात खेळण्या आधीच आऊट झाला. तर गेल्या सामन्यात पाठीत खो म्हणून जोरात गुद्दा मारताना अज्या च्या अन्गठ्याचे हाड मोडले अन आप्तकालीन परिस्थितीत त्याला परतावे लागले.

खो खो सन्घाला असे दुखापतीनी ग्रासलेले असताना सामन्यापूर्वी इतरही अनेक चिन्ताजनक बाबी होत्याच जसे -

हाताला दुखापत झाल्यापासून सच्या पूर्वीसारखा खो देत नाही.
विर्‍या च्या घरी दूध घालणार्‍या भैयाच्या म्हशीला जुलाब होत असल्याने सध्ध्या विर्‍याचा जोर कमी पडत होता.
कप्तान म्हणून खेळू की खेळाडु म्हणून या गुत्तीत अडकलेला रावल्या आजकाल खो म्हणायचेच विसरून गेला होता.

पण या सर्वापेक्षा आज सन्घाचे प्रशिक्षक गुरू चपळ यान्च्यावर सर्व राष्ट्राचे लक्ष लागून होते. गुरू चपळ हे खेळात अती चपल
अन वाडीतील एकमेव "foreign returned" प्रशिक्षक असल्याने खो खो च्या सर्व देवता त्यान्च्या घरी पाणी भरत होत्या असे मानले जायचे. त्यान्चा धबधबा असा मोठा असल्याने गुरूनी या सन्घासाठी त्यान्चा मोठाच plan बनवला होता.

खो खो सोडून सन्घाला इतर सर्व प्रशिक्षणाची गरज आहे यावर त्यान्चा ठाम विश्वास होता. त्यान्च्या या मोठ्या प्लॅन मधे अलिकडे खालील सर्व
प्रकारचे प्रशीक्षण दिले गेले होते :
खेळाडूना माकड उड्या, दोरीउड्या, कोलान्ट्याउड्या यासाठी खास सैनिकी प्रशिक्षण.
उड्या मारून झाल्यावर चित्तप्रवृत्ती शान्त व्हाव्यात त्यावर नियन्त्रण असावे म्हणून योगाभ्यास.
रामदेव बाबान्चे fan बनल्यापासुन तर खेळाडुन्ना भृकुटीचक्रावरील concentration चे महत्व पटल्याने खेळाडुना घोड्यासरखे नाकासमोर थेट सरळ रेषेत पळता यावे म्हणून चमचा लिम्बू शर्यत.
पायात जोर यावा म्हणून पोत्याची शर्यत, तीन पायाची शर्यत.
flood lights मधे कधी कधी नीट दिसत नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बान्धून गाढवाला शेपूट काढण्याची शर्यत.
बौध्धीक चालनेसाठी treasure hunt खेळ.
झडप घालून तर प्रसन्गी लोळन घेवून विरुध्द खेळाडूला पकडता यावे म्हणून कब्बडी, कुस्तीचे प्रशीक्षण.
सन्घभावना जागृत होण्यासाठी जोडीची सोनसाखळी.
अन शेवटी कर्ता करविता तोच एक अदृष्य आहे त्याच्या "पावर" मुळे कधी कुणाचा नम्बर लागेल हे सान्गता येत नाही हे ध्यानात असू द्यावे साठी bingo या खेळाचे आयोजन.

सन्घाला अशा अनेक सराव परिक्षा, स्पर्धातून तावून सुलाखून घेवून गुरू चपळ यानी "तुका म्हणे अशा नरा मोजून माराव्या पैजारा" असा एक कानमन्त्र सन्घाला देवू केला होता. जवळ जवळ अर्ध आयुष्य स्वदेशाबाहेर राहून सुध्दा गुरु चपळ यानी देशातील इतर सर्व दिग्गज खो खो पटूना खो देवून सन्घाचा प्रशिक्षक म्हणून आपले स्थान पक्के केले होते. त्यामूळे गुरुन्च्या मगाशी म्हटल्या त्या धबधब्या पुढे नाकात तोन्डात पाणि गेल्यागत सन्घातील सर्वजण कसे चिडीचूप होवून काम करत होते. चला अनेक वर्षानी आता वाडीतल्या खो खो सन्घाला कडी शिस्त लागली आहे अन गुरू चपळ यान्च्या मोठ्या खडतर प्रशीक्षणामूळे सन्घाला चान्गल्याच उठा बशा काढता येवू लागल्या आहेत तेव्हा उद्याच्या करो या मरो सामन्यात गुरून्चा हा सन्घ चमत्कार घडवणार या "नेहेमीच्याच" आशेने सारा देश डोळे लावून बसला होता. इतक्या लोकानी एकाच वेळी डोळे फ़ाडून बघितल्याने सन्घाला "नजर" लागू शकते हे मात्र सर्वजण सोयीस्कर विसरले होते.
पण खो खो हा राष्ट्रीय खेळ असल्याने सोम्या गोम्यान्पासून ते सर्व आजी माजी प्रशिक्षक, खेळाडूनी आपापली मते नोन्दवली होती. ज्याना प्रत्त्यक्ष बोलायची सन्धी मिळाली नाही त्यानी sms केले, काहिनी "अल्ला के बन्दे" असे टीपेच्या स्वरात ओरडून झोपल्या बन्द्याना साकडे घातले, असे एक ना अनेक तप ताप करून अक्खा देश या काटे की टक्कर साठी सिध्द झाला.

flood lights च्या साक्षीने सन्घाने "दिवे लावले" तेव्हा त्या रोषणाईने डोळे दिपून जावून एक अध्यात्मिक अन्धकार देशात पसरला अन त्याच बरोबर वाडीतील अनेक दिग्गज खो खो पटून्चे भवितव्य अन्धारात लोटले गेले.
आता अध्यात्मिक अशा अर्थाने की गेले अनेक वर्षे या खेळाडून्च्या लन्गड्या सर्वानी खपवून घेतल्या.. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या न्यायाने विर्‍या कधितरी खो खो मधे धावेल असा त्यान्चा विश्वास. विर्‍या मात्र पोटापासून खालील सर्व अवयवान्ची हालचाल आणि खो खो त लागणारे फ़ूटवर्क विसरल्यापासून लवन्गी फ़टाक्यागत कधी वाजायचा तर कधी फ़ुस्स.
ज्या सच्याला सर्वानी जगातील सर्वात श्रेष्ट खो खो पटू म्हणून डोक्यावर चढवले होते तेच आता याला तर खो ही देता येत नाही, नव्हे सन्घाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा सच्या कधीही खोकलेला नाही नुसतीच खर्खर करून गेला असे मत मान्डणे चालू केले.
रावल्या नुसताच बसून असतो, आपल्या सन्घातील इतर खेळाडून्वर त्याचे लक्ष नाही, "Running from the front" असे उदाहरण त्याने घालून दिलेले नाही मग तोच या पराभवाला जबाबदार आहे.
धुण्या, पठ्ठ्या, रैन्या हे फ़क्त जाहीरात बाजीमधेच खो खो हसून दाखवतात, सन्घात नेमकी ते कशासाठी आहेत? पठ्ठ्याचा तर अताशा वेगही मन्दावलाय आता पूर्वीसारखा दम राहिला नाही, मुन्गीया चे तळ्यात मळ्यात कधी सम्पणार? अशा अनेक आत्मचिन्तनात्मक प्रश्णानी सर्वाना भन्डावून सोडले.

मग या सर्व खो खो का महाभारत मधे "आज तक" पैदा झालेल्या सर्व वाटाण्या फ़ुटाण्यानी ज्यान्च्या पायाशी आम्ही लोळतो ती खो खो ची दैवते म्हणजे दगड आहेत,एकदा काय तो निकाल लावा, या दैवताना किती किती म्हणून देणगी मिळते, हार तुरे, "अनन्तकोटी" ब्रह्मान्डनायक पदवी, वगैरे मिळते मग इतके असून ज्या वाडीत ते जन्मले त्या वाडीच्या डागडूजीबद्दल अन पर्यायाने खो खो चा दर्जा सुधारण्याबद्दल काहीही करत नाहीत म्हणून बोम्ब चालवली.

आता दैवतेही यानीच एका रात्रीत निर्माण केलेली अन पूजलेली मग दैवत की दगड या वादापर्यन्त पोचले म्हणजे अध्यात्मिक साक्षात्कारच नाही का..?

या सर्वात सौर्‍या मात्र अगदी कसा खो खो हसत होता. सौर्‍याची "दादागिरी" अनेक जणाना अन विशेष करून गुरु चपळ ना न रुचल्याने त्याला तान्दुळ्यातील खड्यागत "निवडून" बाहेर काढला होता. त्यानन्तर आजतागायतची रावल्याची आकडेवारी, एकन्दरीत सन्घाचे ढासळलेले पायबळ, australia च्या McGrath ला पळत येताना पाहून सच्या ला अन सन्घाला पुन्हा एकदा झालेला खोकला हे सर्व पाहून एकन्दरीत या खो खो च्या दुर्गतीमागे खेळाडून्मधील कफ़, पित्ता, वात यान्चे सन्तुलन बिघडल्याने आता सन्घाला रामादेव बाबा सारख्या थोर गुरूची गरज आहे तेव्हा गुरू चपळ याना आता मुक्ती द्यावी असे "अभिष्टचिन्तनात्मक" ईमेल करायची तो तयारी करत आहे.

इकडे सध्द्या कुणाला "बसवावे", कुणाला "ऊठवावे", कुणाला पाठीत खो द्यावा अन पुढच्या खो खो सामन्यासाठी कुणाकुणाला सन्घात घ्यावे या "प्रश्ण तत्वाचा आहे" या चिन्तेने वाडीतील सन्घ निवड समितीवर दबाव आला आहे. शेवटी प्रश्ण "करोडो" चा आहे.

खो खो ची मैदाने, खो खो पेक्षा मोठे बनवलेले खेळाडू, गुणवत्ता की खोके, असे अनेक खोखोधिष्टीत प्रश्ण सध्या अखिल वाडीला, देशाला सतावत आहेत. शेवटी आपला तो बाळा दुसर्‍याचे ते कार्टे म्हणून बहुदा foreign returned गुरू चपळ याना या अमृतमन्थनातील हलाहल "पाजले" जावून त्यान्ची रवानगी कैलासावर करण्यात येईल अन पुन्हा एकदा या दगडान्तील देवाना जागे करायला अजून एका "गुरू" ची निवड होईल.

निदान पुढील खेपेस तरी मूळ खो खो चेच प्रशीक्षण द्यावे अन "खो" म्हणून या दगडाना "हलवावे" इतकीच विनन्ती.

जमाना remix चा आहे तेव्हा..
"कुठे शोधीशी sponsorship अन कुठे शोधीशी नशीबाशी
हृदयातील खो-कला सम्पली कुठे शिन्कली माशी ?"

खो.

- योगेश जोशी, मु.पो. सॅन डिएगो, फ़ळान्चा राजा, अमेरिका


Zakki
Sunday, October 29, 2006 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ही विनोदी कहाणी, की भारतातील अत्यंत लोकप्रिय अश्या एका अभारतीय खेळाच्या सध्याच्या अवस्थेवर प्रच्छनपणे केलेले भाष्य! पण मस्त जमले आहे.

तसा रवल्या बरा खेळतो आहे, पण सच्या खात्रीचा वाटत नाही. रैन्या तर लहानच आहे. जरा म्हमद्या नि युव्याच्या मागे लागा, खेळ सुधारा म्हणून. उगाच 'चपळ' च्या नादी लागले. भारतात सुद्धा कितीतरी प्रशिक्षक आहेत. त्यातल्या काहींना तर परदेशात सुद्धा घेऊन जातात प्रशिक्षक म्हणून, मग भारतातच त्यांना का संधी देत नाही?


Kmayuresh2002
Sunday, October 29, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग सही रे... मस्त लिहिलयस..

Himscool
Sunday, October 29, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग मस्त लिहिले आहे...
ह्या खो खो च्या पायीच... Champion Trophy च्य पुढच्या सामन्यात न खेळण्याचा खो ऑस्ट्रेलिया संघाने घातल्यामुळे आता सगळे जण घरी बसुन गल्लीतल्या पोरांबरोबर खो खो खेळणार आहेत...


Gs1
Monday, October 30, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मस्त रे योग ! आता या सगळ्यांना खो देऊन दादाला परत आणणार काय ?


Psg
Monday, October 30, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे योग, सही लिहिले आहेस!

Proffspider
Monday, October 30, 2006 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग जबरी लिहिला आहे :-)

Farend
Monday, October 30, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yog लेख एकदम मस्त जमला आहे. लक्ष्मण आणि कुम्बळे दिसले नाहीत? त्यांना बसलेल्या खेळाडूंच्या अधूनमधून पळता येत नाही म्हणून घेत नाहीत म्हणून घेत नाहीत का? :-)

लक्ष्मण आणि रैना मधे एकाला फिल्डिन्ग करता येत नाही आणि दुसर्‍याला फलंदाजी जमत नाही हे पेच कसा सोडवायचा तेही एक कळत नाही.


Dineshvs
Monday, October 30, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, मस्तच जमला आहे लेख.

Chinnu
Tuesday, October 31, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, याया खेळाडु आणि धबधबा मस्त! सुरुवातीस कोपरखळ्या दिसल्या तरी दगडांना हलविण्याची कळकळ टच करुन गेली. लवकरच दगडांना हलण्याची संधी मिळो!

Raina
Wednesday, November 01, 2006 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग. ह ह पु वा.
आमच्या हापिसात विंग्रज, साउथाअफ्रिकन,आॅसी,न्यूझीलंड आणि भारत अशा सर्व खोखोप्रेमी देशांचे लोकं आहेत. रोज भारतीय संघाच्या नावानी बोटं मोडत असतात.
दुर्दैवाने त्यांना मराठी येत नाही- नाहीतर तुझ्या लेखाचा printout दिला असता.

BTW- Disclaimer वर ज्या रैन्याच्या नावानी बोंब मराताहेत "तो मी नव्हेच".


Meggi
Tuesday, November 07, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, एकदम उच्च लिहिलयस :-)

Ramani
Sunday, November 12, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग मस्तच जमला आहे लेख. मजा आली वाचुन. ह ह पु वा.

Prajaktad
Monday, November 13, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग! मार्मिक आणी उत्तम लिखाण..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators