Milindaa
| |
| Monday, October 23, 2006 - 10:59 am: |
| 
|
मॉडरेटर्स चॉईस - वैशाख लेख भावा बहीणीच्या नात्याबद्दल खूप काही वाचलं असेल, पण दूर कॅनडा मध्ये आपला भाऊ आजारी आहे कळल्यावर तिकडे जाण्यासाठी बहीणीची तयारी, आलेल्या अडचणी आणि अखेरीस त्यांच्यावर केलेली मात, वाचा तिच्याच शब्दांत... मी जिंकले, मी हारले - कुंदा महादेवकर कविता वैशाखात उन्हाच्या झळा येत राहतात आणि मग मन वाट पहाते ते पावसाची, जलवर्षावाची..येथे मात्र होतो आहे हा कवितांचा वर्षाव.. जोश्यांचं भांडण मिटलं हे सांगायला या जोश्यांनी गीताचा आधार घेतलाय विडंबन - Vaibhav_joshee आठवणी तुम्हा - आम्हा सगळ्यांनाच येतात हो, पण अशी नादमय आणि शुभ्रफुलांची पखरण करणारी आठवण शब्दबद्ध करणं हे वैभव ला किती छान जमलंय, पाहा तुझी आठवण - Vaibhav_joshi ही पाहा अजून एक आठवण...यावेळी एकदम वेगळ्या रसात... मन कासावीस - Ashwini इतकं कासावीस होणं हे केवळ 'त्याच्यासाठी' किंवा 'तिच्यासाठी' च असेल असं मात्र नाही बरं का.. एखादा घरमालक असाच काकुळतीला येऊन भाडेकरुला नोटीस देऊ शकतो.. भाडेकरुस नोटीस - Ninavi 'देव दिसतो का' हा प्रश्न बर्याच जणांना पडत असेल, पण 'देवाला जर कधी प्रश्न पडला तर तो कसा असेल? मी दिसलो नाही? - Naadamay परदेशी गेलेल्या मुलाची आठवण येते आणि मग त्या आठवणींवर आपली मायेची भूक भागवणारी आई असं लिहून जाते.. मुलास.. - Rutu_hirwaa एक पूर्ण झालेली अर्धवट कविता अर्धवट कविता - Ajjuka Miss you - Vaibhav_joshi समुद्र - Vaibhav_joshi नाव कुणाचे ओठात - Zaad आरसा - Pkarandikar50 उदास संध्या - shriramb चित्रकला पनघट से घरको चलो री - smi_dod खेड्यामधले घर? - smi_dod शांतता - kashi Hummingbird - Rachana Barve अंधारातून प्रकाशाकडे - Rupesh Talaskar मी काढलेले फोटो वैशाख म्हणजे भाजणारा उन्हाळा असंच डोळ्यासमोर येतं ना? मग किमान बर्फाचे पर्वत बघून तरी थंडावा मिळतो का बघुया.. आल्प्स चा देखावा - Jaaaswand हेच असेल का युरोपचे नंदनवन? - Jaaaswand जलविहाराची आवड आहे म्हणता? मग या ठिकाणी जायला नक्कीच आवडेल तुम्हांला उभारुन शिडे... - Jaaaswand स्विट्झर्लंड ला जाणे नाही जमले तर किमान एखाद्या धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याची कल्पना कशी वाटते? आणि तो पण असा धबधबा असेल तर... धबधबा - Alhad निसर्गाची किमया, रंगांची उधळण वगैरे शब्द आपण नेहमी ऐकतो..आणि खालील चित्रातल्या फुलाचे रंग पाहिले की हीच ती किमया, हीच ती उधळण असे वाटल्यावाचून राहवत नाही.. निसर्गाची किमया - grace उन्हाळ्यात फुलणारं असंच एक छान फूल म्हणजे ट्युलीप..बघा किती ताजं तवानं वाटतं ते.. टुलिप्स - naatyaa
|