|
डोळ्यात व्यथेचे थेंब रणरणता रस्ता लांब मी हळवा पाऊस होईन तू भिजण्यासाठी थांब तुषार जोशी, नागपूर
|
मी हळवा पाऊस होईन तू भिजण्यासाठी थांब>>>... khup sundar.. tushaar..!!!
|
सुपर्ब तुषार, अगदी मनाला भिडलं... लोपा, तु पण लिहि ग...
|
Shyamli
| |
| Sunday, October 29, 2006 - 3:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वाह! .. .. .. .. छानच...
|
Jo_s
| |
| Tuesday, October 31, 2006 - 3:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आयुषात चाललो, साथ देत एकमेका झालो एकरुप जणू, ह्रुदयांचाही एकच ठोका सांग सखे असे कसे, सोसतेस तू हे सारे आनंद दु़ :खांचे ग माझ्या, तुच वाहतेस भारे सारख्याच जणू आता, भाग्यरेखा आपल्या भाळा लागे ठेच माझ्या पायी, आणि पाणी तुझ्या डोळा सुधीर
|
मनात नभ साचले.. सांग सखी अवचीत आज डोळ्यात पाणी का साठले.. ज्या लोचनात सप्तरंगी.. भविष्य मी पाहिले.. का ग ते स्वप्न असे गोठले.. दे सोडुन जगाचे आरोप जर नाही पटले... काय बिघडले कुणी स्वप्नास आपल्या हसले? थोडी वाजली.. दुख्:ची पाउले का झालीस उदास माझ्या छकुले.. कोसळुनही सर मनमोर.. वसंतात का नाही नाचले.. बेधडक झुंजीत.. दोन घाव वर्मी लागले.. का लगेच अनमोल हे थेंब नयनी तुझ्या पाझरले...!!!
|
तुषार .. मस्त रे सुधीर ... सांग सखे असे कसे सोसतेस तू हे सारे ही ओळ फार आवडली आणि शेवट एSSSSSSSSSSकदम खास लोपा .. दे सोडून जगाचे आरोप ... सही
|
Jo_s
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव धन्यवाद लोपा मस्त.... सुधीर
|
Chinnu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुषार, लोपा, सुधीर खुप खुप छान.. लोपा, कोसळुनही सर मनमोर का न नाचले अस हवं होत का? सुधीर भारे शब्द खटकला थोडा, बाकी छोटेखानी कविता मस्त! तुषार, एकदा ती थांबली म्हणजे भिजलीच समजा! Just Kidding! हळवा पाउस छान आहे.
|
Shyamli
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:25 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आहा..... तुशार काय छान >>> मी हळवा पाऊस होईन तू भिजण्यासाठी थांब > सुधीर क्या बात है.... ह्म्म वैशाली सहिच आवडल ग
|
डोळ्यातला हा थेंब पाहुन माझीच एक जुनी कविता आठवली… पाऊल वाट ती भरली होती स्पर्श आंधळ्या काट्यांनी क्षणात केली पापणी ओली शब्द कोंडल्या ओठांनी जिवास वाटे तिची काळजी ते काटे तिजला टोचु नये पापणी ओली, मी घट्ट मिटतसे ती वेदना नयनी साचु नये मिटुनी नयनी तिजला घेता ते काटे मजला पाकळ्या वाटे फ़िरुन पहावे वाटेवर तर फ़ुलही नव्हते नव्हते काटे मला न दिसले काटे कारण रक्तात भिजुन ते वाहुन गेले मज पायांन स्पर्श न करता तिच्या हातांवर राहुन गेले धुंद रवी
|
Dineshvs
| |
| Thursday, November 02, 2006 - 11:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लोपाताई, आजकालच्या जगात ईतके हळवे होवुन चालत नाही. दोन घेतले दोन दिले, असे धोरण ठेवावे. आणि श्यामली, हल्ली फक्त प्रतिक्रियाच का ?
|
दिनेश्दा.. thank you.. !!! सुधिर,वैभव,श्यमली,चिनु... धन्यवाद.. धुंद रवी खुप छान.. मस्त..!!! क्षणात केली पापणी ओली शब्द कोंडल्या ओठांनी....
|
Jo_s
| |
| Friday, November 03, 2006 - 10:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चिनू, श्यामली, धन्यवाद Dhund_ravi छानच आहे ..... सुधीर
|
Jayavi
| |
| Saturday, November 04, 2006 - 11:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुषार...... हे तुझ्या हळव्या पावसाला उत्तर भिजण्यासाठीच थांबलेय रे तू कोसळणार कधी.... वाट पहातेय केव्हाची तू बरसणार कधी?
|
Kiru
| |
| Thursday, November 16, 2006 - 5:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुषार..! क्या बात है! बर्याच दिवसांनी आलास. मस्त वाटलं सुधीर, लोपा, रवी.. खूप छान..
|
|
|