|
( माझ्या बहिणीने ही गोष्ट काही दिवसांपूर्वी लिहिली होती. तिच्या वतिने मी पोस्ट करत आहे. ) एक दिवशी भर दुपारी मी स्टेशन वर उतरले. कुठुन आले होते बरे आठवत नाही पण उतरले आणि धक्क्यांमधुन सावरत, ट्रेन मधुन उतरणार्र्या आणि चढणार्या गर्दीतुन कुठल्या दिशेने चालायला सुरूवात करायची आहे हे ठरवण्यासाठी आधी स्वतला एका जागेवर उभे केले आणि मझे लक्ष एका आकर्क्षक व्यक्ती कडे गेले. ...खादीचा लांब कुडता, पांढरी पडलेली निळ्या रंगाची जीन्स, खांद्याला लटकवलेली एक पिशवी की शबनम की असेच कहीतरि लटकत होते ज्यात बरेच जास्त सामान कोंबले होते. कुडत्याला बटनपट्टीपाशी एक गाॅगल लटकत होता. डोक्यावरचे केस जवळ जवळ सगळे पांढरे झाले होते आणि लहानपणी घामोळ्या येउ नयेत म्हणुन कापतात तसे बारीक कापले होते. म्हणजे नवरात्रात सहाव्या- सातव्या माळेला गहु जितपत वाढतात तेव्हढे. मला वाटते ह्या सगळ्यात आधी दिसली ती हातातली इगारेट. ग़ुरुदत्त स्टाईल मधे कपाळावर आठ्या घालुन झोकात इगारेट ओढत ट्रेन ची वाट न बघत स्टेशन वर उभं असलेल ते सुंदर ध्यान मला बघत रहावसे वाटले. मी एकटक बघत आहे हे लक्षात येउनही माझ्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष करुन थंडपणे उभ्या असलेल्या त्या व्यक्तिकडे मी दुर्लक्ष करुन निघुन जाउच शकत नव्हते. आमचं मन तेव्हढ्यात पचकले, "जाउन बोल तरी नाहीतर चल घरी. उगाच आपलं उन्हातान्हात, गर्दीत इथे येड्यासरखं उभं रहायचं." पण जाउन काय बोलु ओळख नाही पाळख नाही. बर ज्यांच्यासमोर मी ट्रेन मधुन उतरले त्यांना विचारता पण येणार नाही, "कल्याण गेली ?". मी विचारात सतानाच पावलांनी 'ध्यानाच्या' दिशेने चालायला सुरुवात केली आणि अर्ध्या मिनीटात मी ध्यानाच्या एकदम समोर. आमच्या थोबाडाचा टाइम सेन्स एकदम भारी, ताबडतोप प्रश्न बाहेर आला, " मी तुम्हाला कुठेतरी पाहीलयं असं वाटतं आहे, नाव काय आपले?" ध्यान उत्तरलं, "ग़ौरी देश्पांडे". मी डोळे विस्फारुन, तोंड बंद करयचं विसरुन बघतच राहीले. बकग्राउंड ला बाजुने येणार्या जाणार्या ट्रेन्स ची धाडधाड धाडधाड, एकदम फ़िल्मी स्टाईल. तेव्हढ्यात कोणीतरी ट्रेन पकडण्यासाठी धावत आले आणि मला धक्का मारुन गेले. त्या धक्क्यसरशी मी जरा शुद्धीवर आले. डोळे नाॅर्मल शेप मधे आले, तोंडही बंद झाले. बघीतले तर आजुबाजुचे लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. गर्दीतल्याच एक बाई माझ्याजवळ येउन म्हणाल्या, "बरं वाटत नाहीये का तुला ?" मी नकारार्थी मान हलवुन त्यांना म्हंटलं, "मी ह्यांच्याशी बोलायला थांबले आहे." ह्या वाक्यावर बाई घाबरल्यासारख्या मागे सरकुन निघुन गेल्या. देश्पांडे बाई म्हणाल्या, "चल आपण तुझ्या घरी जाता जाता बोलु. एक गोष्ट सांगते तुला." आम्ही रिक्षाने गेलो. बाईंची चालत जाण्याची तयारी होती पण मला चालणं शक्यच नव्हतं. रिक्षात त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. एक दोनदा मी फ़क्त ऐकता ऐकता हं म्हणाले तर रिक्षावाल्याने चमत्कारीक नजरेने मागे वळुन पाहीले. घर येइपर्यन्त त्यांची गोष्टही संपली. बाई जरा विचीत्रच वाटल्या. घरापर्यंत आल्या आणि म्हणे, "आता वर नही येत, उशीर होईल. रात्री प्रियाकडे जेवायला जायचयं". माझ्या डोक्यात त्यानंतर बराच वेळ फक्त मुंग्या....................
|
ता. क. प्रिया म्हणजे प्रिया तेंडुलकर
|
Bee
| |
| Monday, September 18, 2006 - 1:21 am: |
| 
|
गोष्ट झाली का पुर्ण.. वाटत तरी नाही.. तुझ्या बहिणेने कथेत दोन गाजलेली पात्र घेतली आहे. पण ही गोष्ट खरी आहे की काल्पनिक? मला दुसरा परिच्छेद प्रचंड आवडला.
|
हो पुर्ण झाली..इथे तसे सांगायचे असते हे मला माहीत नव्हते.. प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद :-)
|
ही कथा तिने लिहिली तेव्हा गौरी आणि प्रिया दोघी हयात नव्हत्या...लेखिकेला गौरी भेटल्याचा फक्त भास झाला. म्हणुनच "मदतीला आलेल्या स्टेशन वरील बाई घाबरुन मागे झाल्या इ. उल्लेख आले आहेत."
|
Gs1
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:23 am: |
| 
|
सिंड्रेला, गौरी आणि प्रिया तेंव्हा 'नव्हत्या' हे कथेतून अगदी व्यवस्थित लक्षात येत आहे. चांगला आणि वेगळा प्रयत्न. सुरूवातीची उत्सुकता ते 'ती' व्यक्ती गौरी देशपंडे निघते ही उकल, आणि शेवटी त्या हयातच नसतात ही कलाटणी अशाप्रकारची मांडणीही विशेष आवडली. बहिणीला अजून लिहायला सांग. 
|
Bee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 4:04 am: |
| 
|
मला तरी लक्षात नाही आलं की तुझी बहिणी गौरी भेटल्याचे imagine करत आहे. train station वर असे घडू शकते म्हणून तो भाग पुर्णपणे खरा वाटला. शेवट खूप abrupt होता म्हणून कळला नाही की हा इथे शेवट होतो आहे कथेचा.. सिंड्रेला, लेखिकेला म्हणजे कुणाला तुझ्या बहिणीला? आधीच दोन लेखिकांची नावे घेतल्यानंतर तिसरी लेखिका कुणाला समजाव म्हणून विचारत आहे. लेखक वाचून लेखक कसा दिसतो हे सहसा डोळ्यासमोर येत नाही जोवर आपण त्यांना छायाचित्रात वा प्रत्यक्षात बघतो. तुझ्या बाहिणीने पुर्वी गौरीबाईंना बघितले होते का? ती गौरीची वाचक आहे का?
|
बी, तुमचे वय झाले आहे का ? तसे असेल तर पोरी-बाळींच्या गोष्टी वाचायचे सोडुन भजन-किर्तनाचे बघा... Gs1, प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
|
Maitreyee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 9:21 am: |
| 
|
मला पण कल्पना आवडली, लिखाणाची पद्धत पण छान. फ़क्त एक वाटून गेलं की गौरी बरोबरचं संभाषण जरा जास्त डीटेल मधे आलं असतं तर शेवटची कलाटणी जास्त परिणामकारक झाली असती का..?
|
Chinnu
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:55 pm: |
| 
|
बरोबर. MT ला अनुमोदक!
|
Bee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 10:28 pm: |
| 
|
सिन्ड्रेला, मला वाटतं तुझे वय जरी झाले असेल तरी बोलण्याची अक्कल काही तुला आलेली नाही. मी प्रतिक्रिया लिहिली ती तुला कळली नाहीच वर अशी उद्दामपणाची भाषा. पोरी बाळींच्या गोष्टी म्हणजे नेमके काय.. आम्ही असे profile मध्ये जावून कुणाचे लिंग काय आहे ते चेक करुन गोष्टी वाचायच्या का? की वाचकानी वयानुसार आपले लेखक लेखिका निवडायच्या असतात. बावळट पणाचा कहर आहे अगदी.
|
Vadini
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:02 am: |
| 
|
'goodhaktha' ya prakarat modnaree hee katha changali jamalee aahe!
|
|
|