Meenu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:11 am: |
| 
|
मी तीथेच आहे अजुन त्याच वेड्या वळणाशी मधुर तुझ्या आठवणी धीर द्यायला माझ्यापाशी
|
Maharaj
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:24 am: |
| 
|
आठवण तुझी मृगेची धार वाहू दे त्यात जीवणाचा सार तो आला काय नी गेला काय कर त्याला बाय.....बाय
|
मृगाच्या पावसासारख तुझं अवचित येउन जाणं तु जाउनही माझं बेहोशीतच रहाणं त्या धुंदितच कैक वेळा मला जगाचा विसर पडतो तिथे हजर असुनसुद्धा माझा मी कधीच नसतो त्यावेळी माझे प्रतिबिंब कधीच स्वतःचे नसते त्यातसुद्धा नेहमीच मला तुझीचं हसरी छबी दिसते... रुप...
|
Swaroop
| |
| Thursday, June 22, 2006 - 10:57 am: |
| 
|
तुझ्याशी भांडण झाल्यावर, त्या दिवशीच्या पानावर मी काहीच नाही लिहित...... उगाच कशाला खाडाखोड, उद्या मिटणार असते भांडण, मला आधीच असते माहित......
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 12:20 am: |
| 
|
ओ असं आहे तर ! तरीच तुझ्या रोजनिशीतली , शेवटची काही पानं कोरी आहेत ... आपलं अखेरच भांडण मिटण्याच्या प्रतिक्षेत !!!
|
Jo_s
| |
| Friday, June 23, 2006 - 2:40 am: |
| 
|
तूच आपल्या प्रेमाची आठवण कुठेतरी सांडली होतीस मी कुठे भांडलो तुझ्याशी तूच माझ्याशी भांडली होतीस
|
भांडणातसुद्धा चुकुन तु गोडं हसतेस तुझ्या गालावरची खळी तेव्हा माझ्या मनात उतरते... रुप...
|
Jyotip
| |
| Friday, June 23, 2006 - 7:01 am: |
| 
|
आपल भांडण म्हणजे श्रावण सर आहे.. ऊन वाढायच्या आधीच सरींची बरसात आहे
|
Krishnag
| |
| Friday, June 23, 2006 - 7:38 am: |
| 
|
आपलं भांडण म्हणजे मिष्टान्नातील डावं उजवं तोंडी लावणं आहे गोजिरवाण्या बाळाच्या भाळीचं गालबोटाचं लेणं आहे
|
Sarivina
| |
| Friday, June 23, 2006 - 8:40 am: |
| 
|
अबोला, भांडण खरं तर एक बहाणा असतो तुझ्याशी न बोलता....... तुझ्या आठवणीत रमण्याचा माझा इरादा असतो
|
Swaroop
| |
| Friday, June 23, 2006 - 10:43 am: |
| 
|
मीनु..... मस्तच! राहु देत काही पाने कोरी, त्याच फारसं काही नाही.... पण मिटल पाहिजे भांडण, संपण्याआधी वही....
|
Shyamli
| |
| Friday, June 23, 2006 - 10:49 am: |
| 
|
अहा स्वरूप..... वहीतल भांडण वहीतच रहाव उगाचच आपण खरंखरं का भांडाव श्यामली!!!
|
Shyamli
| |
| Friday, June 23, 2006 - 10:51 am: |
| 
|
भांडु या खोटंखोटं म्हणुन खेळ सुरु केला मिटणार कस आता हा तर भलताच घोळ झाला श्यामली!!!
|
Shyamli
| |
| Friday, June 23, 2006 - 10:53 am: |
| 
|
कुणितरी यावं चार शब्द बोलाव आपल हे भांडण वाट्तय आता संपाव श्यामली!!!
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 11:20 am: |
| 
|
असतं एखादं भांडणं कधी न मिटणारं , संपली वही तरी शब्दही न उठणारं , काळीज मात्र त्याच्यासाठिच आत तीळ तीळ तुटणारं ...
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 11:25 am: |
| 
|
असलं भांडण तुला सांगते जीवाला चटका लावुन जातं ... कधीही न भरणारी एक जखम ठेवुन जातं .... वाहुन संपल पाणी तरीही कोरडा हुंदका ठेवुन जातं ...
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 11:33 am: |
| 
|
बोलेलही येऊन कुणी चार शब्द तुझ्यासाठी .... पण खर सांग तेवढ्यावरच थांबलय का हे कधी ...? चार शब्दांचे न कळतच आठ शब्द होऊन जातील ... कळण्याआधी तुलाही सीमारेषा पुसट होतील ... मखमली पायघड्या विस्कटुन तु जाऊ नको ... आपल्या पायी स्वत:हुन काटे पसरुन जाऊ नको ... मृगजळामागे वेडे फुका अशी धाउ नको
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 11:48 am: |
| 
|
तुम्ही तरी सांगा ना एवढचं एकदा तेवढाच दिलासा वेड्या मनाला माझ्या की वाटतं त्यालाही माझ्याबद्दल प्रेम तोही आहे आतुर भेटीला माझ्या रात्रभर त्यालाही लागत नाही झोप येतात डोळे भरुन त्याचे काळजीने माझ्या शेवटी फक्त एवढचं सांगा की येणार आहे लवकरच तो भेटीला माझ्या
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 11:52 am: |
| 
|
कोरडा हुंदका वाटत नाही का तितकासा प्रभावी .....? डोळ्यातुन वाहणार्या पाण्याच्या अभावी ...
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 11:54 am: |
| 
|
अपार दु:खाला एकच उतारा आईच्या कुशीचाच फक्त निवारा
|