Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 12:14 pm: |
| 
|
बरेच दिवस झाले एक विषय फिरुन फिरुन डोक्यात घोळतोय. खरं म्हणजे मी कविताच लिहीली असती कदाचीत माझ्या सवयीप्रमाणे पण म्हणलं बघावं जरा सविस्तर लिहुन शाळेत असताना मला एक खुपच गंमतीशीर सवय होती .. मला गंमतीशीर अशी नाही वाटली पण ईतरांना particularly माझ्या शेजारी बसणार्या अपर्णाला मात्र ती फारच गंमतीशीर वाटायची. वहीत खुप खाडाखोड अथवा चुका झाल्या ना की मला फारच अस्वस्थ वाटायचं. अर्थातच प्रत्येक वेळी वहीत चुकलं म्हणुन नवीन वही घेऊन सगळं परत लिहुन काढणं शक्यच नसायचं. माझ्या परीनी मी यावर एक तोडगा काढला होता. मी सगळी खाडाखोड एखाद्या नक्षीने झाकायचे. शेवटि त्याला नक्षीदार कुंपण घालायचे. ईतकच नव्हे तर तीथे एक छोटीशी पाटीही लावायचे " घाण विभाग संपला स्वच्छ विभाग सुरु " म्हणजे आता कोणी ते बघीतलं तरी त्याला ते घाण न वाटता व्यवस्थीत पणे खोडलेलं वाटायचं आणी वहीचं overall presentation काही प्रमाणात अबाधीत रहायचं. त्याहुन महत्वाचं म्हणजे माझ्या मनाला लागलेली चुटपुट संपायची. आता तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की बाई त्याचं आत्ता काय ? (क्रमश: )
|
Smi_dod
| |
| Saturday, June 24, 2006 - 1:30 am: |
| 
|
मीनु उत्सुकता वाढली...येउ दे... छान लिहितेस
|
Dineshvs
| |
| Saturday, June 24, 2006 - 12:05 pm: |
| 
|
वा मीनु. मस्त कल्पना आहे.
|
Meenu
| |
| Monday, June 26, 2006 - 12:31 am: |
| 
|
आज या सवयीचा मी जेव्हा जेव्हा विचार करते तेव्हा मला त्या गाण्याच्या दोन ओळी आठवतात ... वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुम्कीन उसे एक खुबसुरत मोड देके छोडना अच्छा असाच नव्हता का तो प्रयत्न जे मला पुर्णपणे दुरुस्त करता येणार नाहिये ते शक्य होईल तितक्या चांगल्या स्वरुपात नेऊन ठेवण्याचा .. पण प्रत्यक्ष आयुष्यात घडलेल्या काही घटना काही तुटलेली नाती यांना असं योग्य ते स्वरूप देता आलं नाही तर मात्र चुटपुट लागुन राहते. ही सवय घातक ठरते. काही गोष्टी दुरुस्त करता नाही येणार हे मान्य करणं अवघड होऊन बसतं. जे दुरुस्त करता येतं आणी येत नाही यातला फरक कळत असला तरी वळेनासा होतो. लहानपणी आपल्याला असलेल्या सवयींचा असा कुठेतरी खोलवर परीणाम असु शकतो हे आज मला कळतय ईतक्या वर्षांनी ... तुम्हालाही दिसतात का लहानपणीच्या सवयींचे असे काही वेगळे अर्थ ...? (समाप्त)
|
Maudee
| |
| Monday, June 26, 2006 - 7:28 am: |
| 
|
छान लिहिल आहेस मीनु. म्हटलं तर ख़ूप साधा विषय म्हटला तर ख़ूप गहन.....
|
मीनु तु छान लिहलस. त्या गाण्याच्या ओळी मला फ़ार आवडतात.
|
Ninavi
| |
| Monday, June 26, 2006 - 10:28 am: |
| 
|
हं.. विचारात पाडलंस मीनू. मला तशी कायम पानातले नावडते पदार्थ आधी संपवायची सवय आहे लहानपणापासून. म्हणजे मग आवडते पदार्थ सावकाश चवीचवीने खाऊ अशी काहीतरी कल्पना. आता वाटतं मी Day to day आयुष्यातही सगळ्याच गोष्टींबद्दल तसं करते. नावडतं, boring ते आधी हातात घेऊन संपवायचा प्रयत्न करते. पण मजा म्हणजे मग असं केलं की कधी कधी आवडतं ते करायला वेळ वा मूड रहात नाही. 
|
Badbadi
| |
| Monday, June 26, 2006 - 11:19 pm: |
| 
|
मीनू... छान ग... निनावी... same here
|
Meenu
| |
| Tuesday, June 27, 2006 - 12:11 am: |
| 
|
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद . .. ..
|
मीनु.. खरय.. मलाहि मध्ये एक सवय जडलेली.. काहि चुकीच लिहिलं किंवा खाडाखोड झाली की त्याच पानावर वरती सही करायची.. आत्ता विचार केल्यावर वाटतय ती सवय रोजच्या जीवनातपण यायला पाहिजे होती.. स्वत: केलेल्या चुका कळायला आणि त्या मान्य करता आल्या पाहिजेत
|
निनावी अगदि सेम सवय माझीसुद्धा...
|