|
तुम्हा दिग्गजांमधे हे माझे पहीले पुष्प अर्पण करीत आहे. काल पुण्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. संध्याकाळी घरी जाण्यासाठी अर्ध्या भिजलेल्या अवस्थेत बसमधे चढलो. बस स्वारगेटच्या सिग्नलला उभी राहीली. सहज खिडकीतुन बाहेर डोकवले तर रस्त्याच्या कडेला एक माउली उभी. कडेवर एक लहान बाळ, बाजुला ३-४ वर्षाचा एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार. कुठल्याच मुलाच्या अंगावर एकही वस्त्र नाही. ते सर्व उघड्या अंगाने पाऊस झेलत होते आणि बसमधेहि माझ्या अंगावर रेनकोट होता. एक अपराधीपणाची भावना जाणवु लागली. नकळत एक विचार आला की, यांच्या रोमारोमात लागलेली दारिद्र्याची आग विझवण्याचा एक दुबळा प्रयत्न तर देव या पावसाच्या रुपाने करत नसेल. अमोल
|
Diiptie
| |
| Sunday, June 25, 2006 - 5:48 am: |
| 
|
निनावीची शाश्वत कविता खूप दिवस मनात रहिली. निनावि आणि तिच्या या कवितेवरुन गाण्यांचा एक कार्यक्रम करता आला. त्यावर बोलायचं ठरवलं पण वेगळं काही लिहिलं. पण श्रेय निनावि तुलाच अगदी कालचाच पावसाची वाट पाहून क्षितीजावर टेकलेला आणखि एक दिवस. वाटलं... रात्रही अशीच कंटाळणार पावसाला विनवून. पण झालं मात्र वेगळंच. पांढुरक्या, फेसाळ ढगांनी गर्दी केली आणि उधळून लावले प्रकाशाचे सुवर्णकिरण. पाऊस आला. पानांवर, मातीवर, छपरांवर. रात्रभर गुणगुणत राहिला मनात, आवडणार्या गीताच्या एखाद्या ओळीसारखा --------- अबोल वाळुच्या वनाला मिठीत घेउन गजबजणारा, उसळता सागर किनारा अजुनही फुलवतो आहे आपल्यासारखंच आणखि एक अव्यक्त प्रेम. किनार्याची बंधन मानून झुलणारं. स्वातंत्र्याच्या मर्यादा चंद्र्किरणांनी गोंजारल्यावर उसळणारं आणि तितक्याच समंजसपणे मागं फिरणारं ------------- निशब्दतेतहि तिच्याद्रुश्टिनं शब्द महत्वाचे, अर्थाच्या, आशयाच्या तोडीस तोड, अगदी नेमके, जेवढ्यास तेवढे. तरिही भावनेचा तोल सांभाळणारे. तिनं तिची कविता ऐकवली. तो म्हणाला, सूर महत्वाचा. शब्द असतात फसवे, मुखवटे चढवलेले. एक नव्हे अनेक अर्थाच्या मागे लपणारे. सूर अस्तो सच्चा, अगदी प्रामाणिक... आहत असो अनाहत, ह्रिदयातून मनाच्या तळातून उमटतो सुर. शब्द म्हणजे केवळ अलंकार मुळच्या सौदर्यावर विसावून आपली शोभा दाखवणारे. त्याचि सुंदर, सहज लकेर... दोघही दिग्मुढ, मनातल्या भावनांची सम शोधण्यात. ती त्यानं गायलेल्या स्वरांमधे आणि तो तिच्या शब्दात. -------- आता तिलाही वाटतं जीवनाचं सगळं छोटं मोठं तत्वग़्ह्यान लयीत गुंफलं तर संगीत कुठे नाही असं नाहीच. एकटं अस्ताना कींवा अनेकात एकटं वाटताना, जगण्याच्या घाईत किंवा अगदी निवांत असताना.. वार्याच्या झुळकीत, गळणार्या पानांत, आणि पावसाच्या प्रसन्न शिंपणात किंवा न बोलता मिट्ट अंधारात, उघड्या दोळ्यांनी पहुडलेल्या, गार रत्रिच्या शांततेतही जिवनाचं सन्गीत झंकारत राहतं ----- आणि त्याला वाटतं सुरात लपलेलं अव्यक्ताचं वेड शब्दांची सोबत घेतं तेव्हाच गाणं उमलतं ना? ------------
|
Ninavi
| |
| Monday, June 26, 2006 - 10:30 am: |
| 
|
दीप्ती, छान लिहीलंयस गं. गद्यकाव्यच. आणि माझं कसलं श्रेय!! हे म्हणजे नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडला म्हणण्यासारखं आहे!! 
|
|
|