बरं नसेल वाटत पळाचं घे मौन पण नको लेखू आयुष्यास इतकं ही गौण
|
हे नाव... हे गाव सारखं सारखं मिळेल? नाव गाव दूरच फ़िरून जन्म तरी मिळेल?
|
केवीलवाणी भाषा अशी ठेऊ नये मनी जसा आवाज मनाचा तसाच प्रतीध्वनी
|
Sparsh
| |
| Friday, June 16, 2006 - 12:10 am: |
| 
|
आजही तुझी आठवण डोळ्यांतुन वाहते आजही मी तुला मिटल्या डोळ्यांनी पाहते...
|
सकाळी आहे ऑफ़ीस झोपावं जरा आता एकच दिवस राहिला की! विकेंडची वाट पहाता!
|
R_joshi
| |
| Friday, June 16, 2006 - 12:17 am: |
| 
|
ऑफिसच्या उन्हात विकेंड म्हणजे पावसाची धार भिजण्यासाठी या धारेत वाट पहावी लागते फार
|
Kshipra
| |
| Friday, June 16, 2006 - 2:29 am: |
| 
|
नभी ओथंबून तू येता पाऊसचिंब होईन मी मऊ मृदुल करांनी तुजला माझ्यात मिटुन घेईन मी
|
मी पाऊस असतो सहसा विक्राळ रुद्र पण असतो जपशील जिवाला बरका आजकाल भरवसा नसतो
|
R_joshi
| |
| Friday, June 16, 2006 - 3:11 am: |
| 
|
आज तुझ पाहण्याचा मोह मला आवरत नाही तुझ्याशिवाय इतर काहिच मला दिसत नाही. प्रिति
|
ही दूरता किती मोहक शब्दांनी अंतर फिटले एकत्र राहूनी सहसा संवाद थांबती इथले
|
R_joshi
| |
| Friday, June 16, 2006 - 3:21 am: |
| 
|
मन साद घाली तुला तु आहेस कोठे... विसरलास तु मला अशी शंका मनात का येते.... प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, June 16, 2006 - 3:26 am: |
| 
|
दूरता असलि मोहक तरी मनाला ती पिळ पाडते तु माझ्यापासुन दुर का हे आज मला जाणवते प्रिति
|
जसा आवाज मनाचा तसाच प्रतीध्वनी अमेय अगदि... हेच होत... बरोबर श्ब्दात पकडलस..., स्पर्श,प्रिती,तुशार,क्षिप्रा..... आवडल्या सगळ्यान्च्या... झुळुका
|
अमेय, तुझ्या चारोळ्यांबद्दल नमुद करावेसे वाटतेय... खुप +ve approach दिसतोय आयुष्याबद्दल.. तो तसाच राहु दे बदलु नको काही झाल तरी.. छान वाटते वाचायला, मला जमत नाही असे लिहायला!!!
|
थॅंक्यू लोप्स... असं उगाचच -ve (किंवा QLC ?) वाचलं कुठे की मनात खुमखुमी छातीत फ़ुरफ़ुरी आणि हातात शिरशिरी येते ते पुसून टाकून त्या जागी आशेचं नवं रोप लावायची... अशा चेहर्यावर आणण्याची
|
स्पर्श, क्षिप्रा, तुषार... छानेत झुळुका...
|
Mruda
| |
| Sunday, June 18, 2006 - 5:11 am: |
| 
|
काय सुखं नि काय दु:खं मी सार्यालाच फ़सले.... तरीही खूप दिवसांनी आज मी मोकळंस हसले... मृ
|
Meenu
| |
| Sunday, June 18, 2006 - 11:54 pm: |
| 
|
वाटलं होतं येशील तु घेऊन सुखदसा गारवा ..... पण तुही झालास फितुर आलास गात त्याच्याच आठवणींचा मारवा ...
|
R_joshi
| |
| Monday, June 19, 2006 - 12:59 am: |
| 
|
आज पावसाचि धार अशी काही बरसली माझि असुन मी माझी नाही उरली प्रिति
|
R_joshi
| |
| Monday, June 19, 2006 - 1:05 am: |
| 
|
शब्द आज माझे वा-यासंगे विहरतात परत येताना ते तुझी आठवण घेऊन येतात प्रिति
|