|
काठी टेकत चालणारी म्हातारी... ह.. आपल्याला सुध्दा काठी लागते आता. रस्त्यावरच्या रहदारीतून तो अचानक स्वतःचा विचार करू लागला. एक निःश्वास टाकत ,रस्त्याला उघडणाऱ्या खिडकीवरून नजर हटवत सदानंदने खोलीच्या दुसऱ्या खिडकीतून बाहेर नजर टाकली. देशपांड्यांच्या घरात छोटा दिवा होता. "आनंद आला असेल, आज बहुधा दुसरी शिफ्ट असावी." देशपांड्यांचा आनंद व त्याची नवविवाहित पत्नी दोघेही एका कॉल सेंटरमध्ये काम करीत. एका कर्कश हॉर्नने त्याचे लक्ष पुन्हा रस्त्याकडे गेले. जोडीने शर्यत लावणाऱ्या अनेक गाड्या रस्त्यावरून जात होत्या. त्यांचे लाल, पिवळे आणि शेंदरी लुकलुकणारे दिवे अंधाऱ्या रात्री मनाला उभारी देत होते. मध्येच एखादा निळा लाल दिवा प्रकाशत होता. सदानंदसमोरील आडव्या रस्त्यावर गाड्या एकमेकांना हुलकावणी देत, एकमेकांच्या जवळ येऊन एकापाठीमागे दुसरी गाडी लपे आणि मग एकमेकींपासून विलग होत पुन्हा आपल्या वाटेने धावू लागे. देशपांड्यांच्या घरात अशाच दोन सावल्या हळूहळू एकमेकींमध्ये सामवत होत्या आणि विलग होत होत्या...
|
अशावेळी त्याला आर्ततेने सुनिताची, आपल्या पत्निची आठवण झाली. तिला जावून दहा वर्षे होतील आता. तो स्वतःशीच पुटपुटला. हळदीच्या पावलांनी गुलाबासारखी सुनिता आपल्या घरी आली होती. सदानंदने खिडकीतून दिसणाऱ्या इतर चार घरांवरही ओझरता कटाक्ष टाकला, सगळीकडे सामसूम होती. त्याने पुन्हा हायवेवर लक्ष केंद्रित केले. खिडकीतून तो समोरच्या हायवेपलिकडील डोंगरावर हालचाल दिसते का ते पाहू लागला. डोंगर व त्यावरची काही खुरटी झाडे, काटेकुटे, सभोवतीचे तारांचे कुंपण आणि समोरचा वाहणारा हायवे अशा क्रमाने आपली नजर वळवण्याचा खेळ सदानंद कितीतरी वेळा खेळी.
|
Princess
| |
| Monday, June 19, 2006 - 11:16 am: |
| 
|
छान लिहिलेय. पटकन नवा भाग टाका
|
Zee
| |
| Monday, June 19, 2006 - 3:29 pm: |
| 
|
Muktchanda, पुढ्च्या भाग कधी येणार? छान लिहिलेस. वाट पाहातेय. लवकर येवु दे पुढचा भाग.
|
ho g, lihi lavakar... !!!.. .. .. .. .. ..
|
Malavika
| |
| Monday, June 19, 2006 - 7:37 pm: |
| 
|
hya boxes na ghalavayala kaay karayache? please kunitari sanga. Vaachata yet nahi
|
Milindaa
| |
| Tuesday, June 20, 2006 - 4:11 am: |
| 
|
/hitguj/messages/1/91607.html?1150115911 वरच्या ठिकाणी बरीच उपयुक्त माहिती आहे, ती वाचा, उत्तर मिळेल
|
|
|