कोण हा गेला निघूनी आज रात्री येथूनी ? कोण हा उरला इथे जो मागतो ओळख जुनी ?
|
एक मी अन एक तो करतो असे कित्येकदा वेस देहाची अशी ओलांडतो कित्येकदा
|
अस्तित्व मिसळले रातीला.. चांदण्यांच्या साथीला.. तोडुन बंध सारे काल मुक्त वाहिले वारे..!!!
|
रातीस त्या प्रीया उन्मुक्त होती वागली पौर्णिमेची चांदणी सारी रात होती जागली
|
अधीर धीर जाहला... उष्ण श्वास वाहीला... अलवार ओठ स्पर्शीला.. कायेस मधुर सुर आला. देहाने देहाला.. सुंगंधी स्पर्श केला..!!!
|
रातीस त्या प्रीयेशी मी मजला हारलो पौर्णिमेच्या चांदण्याने मीच होतो भारलो
|
R_joshi
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:33 am: |
| 
|
आज माझि ओळख मला माझ्या सावलिने सांगितलि सुखदु:खाच्या वाटेवर ती एकटीच माझ्यासोबत राहिली
|
रातीस त्या प्रीयेने मौन होते पाळले पौर्णिमेच्या चांदण्याने रान होते जाळले
|
तुला असे.. बघताच.. गंध.. नजरेनच.स्पर्शीला.. ओलेत्या.. गालावरचा. भिजलेल्या मनातला एक दवबिंदु.. ओठानी टीपला..!!!
|
रातीस त्या प्रीयेने मरुतास होते माळले पौर्णिमेचे चांदणेही अनलावर होते भाळले
|
अवखळ चंद्राला... रातीला.. चांदणीशी लगट करतांना बघावा.. न लागता सुगावा तु माझ्या समोर उभा रहावा..!!!
|
अनिलास ना ठाव ना ठिकाणा.. हा प्रेमवीर असे सदा वाहता दिवाणा.. रातीस त्या काय ठाव.. ह्याचा निरळ्लाच बहाणा..!!!
|
हे पहा हे लोक आले आज माझ्या अंगणी बैसलो जाऊन जेव्हा हाय मी तारांगणी
|
टाळले ज्यांनी सदा अस्पृश्य मजला मानुनी तेच ते डोळे अता मज स्पर्शिती भारावुनी
|
बेरकी डोळ्यांतले पाणी पुसा आता तरी विश्व तुमचे सोडले मी बाळगा ही खातरी
|
ठेविली ज्याची क्षुधा मी शमावा एकदातरी शेवटी देहास माझ्या ठेविले त्याच्यावरी
|
पौर्णिमा माझी अता माझेच हे आभाळ आहे गुंफली शब्दातुनी मी तारकांची माळ आहे
|
जाहले ऐसे नव्हे की मुक्त आम्ही जाहलो संपलो आधीच होतो गेलो आज दाहलो
|
जन्मभर मी अस्तनीतील वाटलो होतो निखारा मीच आता वाट दावी मीच तुमचा शुक्रतारा
|
वाह ... मज़ा आ गया दोस्त
|