R_joshi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 5:39 am: |
| 
|
देवदत शब्द म्हणजे माझ्या भावनांचे गुढ शब्द म्हणजे माझ्या अस्तित्वाचे मुळ मी बनले शब्दांमुळे शब्द माझ्यामुळे बनले नाहित जीवनाच्या वाटेत ते मला कधिच एकटे टाकून गेले नाहित. प्रिति
|
Aavli
| |
| Tuesday, June 13, 2006 - 8:46 am: |
| 
|
शब्दाच्या दुनियेत एवढी कशी रमते, शब्दाच्या संगतीने शब्दाचीच होते.
|
Aavli
| |
| Tuesday, June 13, 2006 - 8:52 am: |
| 
|
शब्दाच्या दुनियेत एवढी कशी रमते, शब्दाच्या संगतीने शब्दाचीच होते.
|
Meenu
| |
| Tuesday, June 13, 2006 - 11:42 pm: |
| 
|
भावनांपेक्षा का शब्द मोठे ? करायला व्यक्त भावना शब्द थोटे किती तरी वेळा गोंधळ करुन ठेवतात मला म्हणायच असतं एक शब्द तिसरच सांगतात
|
Meenu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 12:14 am: |
| 
|
शब्द नुसते पोकळ संवादाचे माध्यम केवळ आवाजाच्या पट्टीनीही हलतात जे पट्टीबरोबर अर्थही बदलतात ते
|
शब्द कधी सहवास कधी नुसताच भास शब्द सुटकेचा निःश्वास कधी शब्द कारावास.
|
शब्दांचेच खेळ सारे शब्दांचीच सारी माया शब्द शब्दालाच देती नवा जीव नवी काया
|
Shyamli
| |
| Wednesday, June 14, 2006 - 12:42 am: |
| 
|
कधी शब्द कारावास.>>> व्वा!!! फारच छान... आवडला हा शब्द
|
Meenu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 1:03 am: |
| 
|
नको गुंतुस फार शब्दांमधे मौनाला नको समजुस तु साधे म्हणुनच शब्द चांदी अन मौन सोने म्हणुन गेले मोठे
|
Meenu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 1:04 am: |
| 
|
शब्दांच्या पलिकडचा शोध तु अर्थ .. त्याची होईल मदत करायला जीवन सार्थ
|
Meenu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 1:09 am: |
| 
|
' ध ' चा ' मा ' झाला आणी झाला केवढा अनर्थ फक्त शब्दांवर विसंबल्याचा हा झाला परीणाम म्हणुन सांगते शब्द हे नाही केवळ परिमाण
|
Kanishka
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:02 am: |
| 
|
राम राम मी नविन मायबोलि कर
|
R_joshi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:39 am: |
| 
|
कनिशका मायबोलिवर आपले स्वागत आहे. शब्द सांगतात जरी दुहेरी अर्थ तशाच भावना हि करतात व्यक्त मौन आहे सोने हे मी नाकारत नाही पण प्रत्येक वेळाच त्याचि जादु चालत नाही मन मोकळे करायचे असेल तर शब्दच लागतात मांणसातील नात्यांचा ते एक अस्पष्ट दुवा असतात प्रिति
|
शब्दांना कुठले कुंपण, शब्दांना कसले बंधन शब्दांचे चहू दिशांनी.... पसरलेले अंगण शब्दांचा अमोल ठेवा.. जणू श्रीकृष्णाचा पावा शब्द.. गंगा, भगिरथ अन शब्द राधेचे मन!
|
Aavli
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:48 am: |
| 
|
शब्दावाचुन कसे कळले शब्दाच्या पलिकडले.... मराठी भावगीत.......
|
थकतात नेत्र जेथे तेथेच भेटशी तू सरतात अर्थ जेव्हा तेव्हाच बोलशी तू.
|
वाह !!! मस्तच एकदम
|
'शब्द' पासून थोडी फारकत घेऊन.... क्षण हाच सादावलेला क्षण हाच नादावलेला क्षण हाच ओढावलेला क्षण हाच निर्ढावलेला. अर्चना.
|
R_joshi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 5:59 am: |
| 
|
अर्चना उ त्त म तुझ्या नेत्रात माझि स्वप्ने बहरताना मी पाहिली आणि अश्रुंच्या धारेतुन वाहुन जाताना हि मीच पाहिली
|
वा वा जोशी... अजून काही... काही क्षण भाळायचे, काही सांभाळायचे काही क्षण गाळायचे, काही उगाळायचे. अर्चना.
|