सांगतो माझी व्यथा मांडणार्या डायरीची रे मी कथा पहिले पान प्रसवे अश्रु अन चाळणे होई वृथा
|
R_joshi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 12:45 am: |
| 
|
तु जवळ असलास कि बोलणच सुचत नाहि डायरित लिहिते जेव्हा तुझ्याविषयि तेव्हा शब्दच पुरत नाही.
|
रेखिते कुणी कधी ते स्वप्न रेखीव देखणे रोजचे आहे प्रीयेला चांदव्यापरी लेखणे
|
R_joshi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 12:50 am: |
| 
|
सुर तुझ्या अंतरिचा मला आज ऐकु आला शब्दांतुन नव्हे नयनातुन बोलुन गेला प्रिति.
|
R_joshi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 12:56 am: |
| 
|
सुर तु छेडिता साज मी झाले यश तुला मिळता अनोळखी मी का झाले? प्रिति
|
R_joshi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:29 am: |
| 
|
आज माझी व्यथा मी या डायरित मांडली माझ्याऐवजी.... तिच अधिक रडलि प्रिति
|
R_joshi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:40 am: |
| 
|
माझि व्यथा जाणण्यासाठी तुला डायरीचि मदत लागते. माझ्याहुन हि ती तुला अधिक जवळचि का वाटते प्रिति
|
छान ग प्रिती.. वाचली जरी कुणीही माझी डायरी मागे पुढे वाटू नये मी भावनांचे कधी बांधले होते मढे मारले होते मला मी जीवंत डायरीत होते ठेवले जे असावे डोळ्यात ते डायरीत होते सामावले डायरी तशी मलाही फटकून अशी वागते जे उरले माझ्यात नाही ते पुन्हा उगाच मागते होउनी तिचा कधी मी हळूवार तिजला कुरवाळतो भाळते ती मजवरी मग मी ही तिच्यावरी भाळतो
|
Smi_dod
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:57 am: |
| 
|
प्रिती,देव छान.. मस्तच लिहिताय तुम्ही. देव: मला फ़ारसे कळत नाहे.पुढे साठी यमक म्हणुन मढे हा शब्द घेतलाय..पण कानाला रुततोय.. CBDG 
|
Meenu
| |
| Tuesday, June 13, 2006 - 2:04 am: |
| 
|
डायरी सासुरवाशीणीला झटक्यात माहेरी नेऊन आणणारी ...
|
Meenu
| |
| Tuesday, June 13, 2006 - 2:08 am: |
| 
|
देवा पहीली दोन कडवी छान तिसर्या कडव्यात पहिल्या दोन ओळी थोड्या बदल म्हणजे ते पण तालात येईल
|
स्मिता खरं तर मी चारोळी सुचली की लगेच इथे टाकतो.. सुचतांनाच मला ती यमकात सुचते.. मी यमक शोधायला जात नाही.. त्यामुळे बर्याचदा इथे टाकल्यावर वाटतं की अजून चांगल्या शब्दात टाकता आली असति.. इथल्या अनेक जाणकारांकडून मला असाच प्रतिसाद आलाय.. मला खरंच ह्या गोष्टीवर काम करायला पाहिजे.. पण यावेळेस मला ज्याप्रमाणे चारोळी लिहिली गेलीये ती जास्त भावली.. अर्थात प्रत्येकाला ती कशी वाटते हे प्रत्येकाच्या स्वभावावर मुख्यत: मूडवर अवलंबून असते.. प्रतिक्रियेबद्दल खरंच धन्यवाद..
|
Smi_dod
| |
| Tuesday, June 13, 2006 - 2:18 am: |
| 
|
देव चारोळ्या यमकात सुचतात.. बरोबर आहे तुझे.. पण नंतर जरा फ़ेरफ़ार केला कि अजुन सुंदर रुप होउ शकते ना!! मी आधीच सांगीतले मला फ़ारसे कळत नाही.. पण तुला प्रतिक्रिये बद्दल राग नाही आला त्याबद्दल धन्यवाद 
|
Meenu
| |
| Tuesday, June 13, 2006 - 2:30 am: |
| 
|
देवा आता डायरी असं शीर्षक देऊन कविता BB वर टाक ती
|
Jyotip
| |
| Tuesday, June 13, 2006 - 3:14 am: |
| 
|
तुझ्या नकळत मी तुझ्यी डायरी वाचली ईथवरच्या आयुष्याची तिने सहल घडवली
|
Shyamli
| |
| Tuesday, June 13, 2006 - 3:19 am: |
| 
|
ज्यो.. न कळत अशी कुणाची वाचु नये डायरी करु नये अशि कुणाच्या "चुकार" क्षणांची चोरी श्यामली!!!
|
Jyotip
| |
| Tuesday, June 13, 2006 - 3:33 am: |
| 
|
श्यामली!!!! हे क्षण तर पुन्हा आठवणीना उजाळा देतात आपल्याच बागेतली फुले तोडली तर त्याला चोरी थोडीच म्हणतात 
|
Aavli
| |
| Tuesday, June 13, 2006 - 4:33 am: |
| 
|
डायरी............................ मराठीत रोजनिशीच ना.......... एकदा वाचलीस चोरुन, पण पुन्हा नको वाचुस. आपलीच बाग समजुन फ़ुले तोडत नको नाचुस .(फ़ुलपाखरागत...)
|
Krishnag
| |
| Tuesday, June 13, 2006 - 4:51 am: |
| 
|
श्यामली, देवा, प्रीती, ज्योती, सर्वच जण सुरेख लिहतायेत!! 
|
R_joshi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 5:30 am: |
| 
|
देवदत खुपच छान लिहिले आहेस. ज्योति,श्यामली, आवलि फारच छान
|