Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 12, 2006 « Previous Next »

Meenu
Monday, June 12, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


डायरीत तुझं नाव लिहीलं
अन डायरी माझी भरली
तुझ्याशिवाय काही लिहु म्हणलं तर
आठवणच नाही उरली


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु दिलेल्या चॉकलेटची चांदी
डायरीच्या पानात सापडली
सगळ्यांची नजर चुकवुन
चॉकलेट देण्याची ती तर्‍हा
पुन्हा एकदा आठवली


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कीती केला होता ना
मी हट्टिपणा ..
मलाच फक्त द्यायचं चॉकलेट
नाही इतरा कुणा
हळुच ती चॉकलेटं
तु लपवुन आणली
आणी त्यांच्या चांद्या झाल्या
डायरीतल्या गोड खुणा


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज डायरीच्या पानावर
हळुवार हात फिरवताना
डोळ्यांच्या कडा ओलावतात
भुतकाळ पुन्हा जगताना


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोजच ठरवते मी पुन्हा
नाही करायचा हट्ट तुझ्याकडे
जाउ दे कितीही मनाला तडे
बरे दिसते का असे मागणे तुझ्याकडे
रोजच माझा मोडतो पण
पुन्हा होतात साकार जुनेच क्षण


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी होते एक छोटिशी मुलगी
हट्ट तुझ्याकडे करताना
माहितिये मला होते तारांबळ तुझी
हट्ट एक एक पुरवताना


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जशी प्रिया होते
भगिनी किंवा माता
तसच मी तुझ्यात पाहते
कधी पुत्र कधी पिता

जगाला नाही कळणार
हे अजब नातं
व्याख्या पाठ केल्यावर
हे असच होतं


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डायरी म्हणजे साठवण
भुतकाळातल्या कडु गोड
क्षणांची आठवण


Meenu
Monday, June 12, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाच्या डायरीत होती
एक कविता सजलेली
कुणाच्या डायरीत
आठवण भिजलेली
कुणा एकाची डायरी
नाही कुणीच वाचलेली
ती मनात खोल खोल
तशीच राहिली दबलेली


Meenu
Monday, June 12, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मनाच्या डायरीच्या
शेवटच्या त्या पानावर
एवढच मला लिहायचय
and they lived happily ever after...


Meenu
Monday, June 12, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं झालं आज तु
डायरीबद्दल बोललीस
मनाची माझ्या कितीतरी
गुप्त कवाडं खोललीस


Meenu
Monday, June 12, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांगु नकोस हं कुणाला
माझ गुपित आहे ते ...
डायरीत माझ्या तुझं नाव
मी गुलाबी शाईनी लिहीलय ते


Tusharvjoshi
Monday, June 12, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


डायरी, गहिरा सागर
आठवण थेंबांचा
डायरी एक पिंपळ
क्षण क्षण पारंब्यांचा

तुषार जोशी, नागपूर


Meenu
Monday, June 12, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय तुशार

डायरी
मनाच्या तळघरात
जायची पहिली पायरी


Tusharvjoshi
Monday, June 12, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू डायरीला सांगितलंस
डायरीने मला
मला दिसेल अशी डायरी ठेवायचा
हा खेळ चांगला

तुषार जोशी, नागपूर




Meenu
Monday, June 12, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येकाची आपापली
एक डायरी असते ....
कुणाची कागदावर
तर कुणाची
मनातच असते .....


Meenu
Monday, June 12, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा तुशार क्या बात है .....

नजरेनं तुला सांगायचा
किती प्रयत्न केला ...
पण नाहिच
म्हणुन शेवटी डायरीचा
हा खेळ खेळला ...


Tusharvjoshi
Monday, June 12, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मीनू

डायरी
आठवणींची
न संपणारी शिदोरी

तुषार


Meenu
Monday, June 12, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डायरी बरी वाचता येते
निर्जीव असुनही
माझी नजर नाही
कधी वाचता आली ती ...

अशावेळी मग मला
डायरीच व्हावंस वाटतं
तुझ्याकडुन एकदातरी
स्वत:ला वाचुन घ्यावस वाटतं


Meenu
Monday, June 12, 2006 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डायरी
कधी कधी
तशीच राहते कोरी





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators