देवदत्त सहीच प्रिती, ज्योती छान
|
प्रत्येक पानवर थांबते मी नवा स्पर्श.. अनुभवते मी नवे मोहरणे अंगभर लेउन पुन्हा नव्याने क्षण जगते ते मी..!!!
|
जुन्या त्या डायरिने तुझ गंध सोडलेला नाही सोबत माझ्या नसलीस तरिही रेशमी बंध तोडलेला नाही... रुप...
|
R_joshi
| |
| Monday, June 12, 2006 - 6:43 am: |
| 
|
ज्योति,लोपा,रुप फारच छान तुझे रुप पाहण्यासाठी तुझी डायरी मी वाचलि खरे सांगते मी आज तुला तुझ्यापेशा मी तिच्यावरच अधिक भाळली.
|
माझ्या डायरीत तु मज जास्त उलगडतोस.. जसे मनीचे स्वप्न सत्यात उतरते.. पान पान सुंगधी तुझा भास देते.. मी दिवाणी... तुझ्यासोबत राहण्याचा तो बहाणा समजते...!!!
|
Jyotip
| |
| Monday, June 12, 2006 - 6:54 am: |
| 
|
सकाळ संध्याकाळ फक्त तुझी आठवण काढायची समोर आलास कि मग मात्र, कस काय? ठिक.. चौकशी करायची 
|
जर तु सोबतीला असता तर.. जखमा पानापानावर राहिल्या नसत्या... खुणा त्या हळ्व्या पुन्हा पुन्हा कुरवाळल्या नसत्या..!!!
|
प्रत्येक पानावर हळवी नक्षी कोरलेली प्रत्येक पानावर नवी जखम लिहिलेली.. प्रत्येक पानागणीक पुन्हा पुन्हा हळवे होणे..., पुन्हा पुन्हा जखमी होउन वर फ़ुंकर घालणे...!!!
|
डायरीवर असतो हिशोब फ़क्त.. किती जमा किती बाकी.., जास्त घेतले की दिले... आणि एकुणात किती मिळाले...!!! तरी का जिवापाड जपतो हे आयुष्याचे देणे घेणे.. जरी... नाही फ़िटणे कधी क्षणांचे हे रूण सारे...!!!
|
अहाहा लोपा दोन्हिही मस्तच... या जख़मा झाल्या परत कधी न भरण्यासाठी मीही त्या भरु देत नाही आयुष्यभर कुरवाळण्यासाठी... रुप...
|
मिटलेल्या क्षणांना जागवुन देते परत माझे.. मन हरखुन जाते.. जेव्हा डायरीतले तुझे पान मी न वाचताच उलटवते...!!!
|
एका पानवर माहितिये.. सुकलेली जाई... विसावलीये.. दुसर्या पानावर... मोगर्याची कळी. तीसर्या पानावर... तो क्षण... ज्यात अजुनही अडकलेय माझे मन..!!!
|
त्या डायरीची पाने चाळताना पुन्ह ते सुखद क्षण मी जगले तुझ्या सर्व आठवणी अनुभवतांना परत एकदा मी जगले त्या सुंदर आठवणींच्या संगतीने अजुनही मी जगत आहे प्रत्येक दिवसंगणिक मी तिळ तिळ मरत आहे चुक तुझी कधीच नव्हती हे मजला उमगले आहे अव्यक्त प्रेमाचीच एक खंत बाकी मी सुखी आहे… बाकी मी सुखी आहे… रुप…
|
Sania
| |
| Monday, June 12, 2006 - 8:20 am: |
| 
|
रूप खूपच सुंदर डायरीच्या प्रत्येक पानावर आठवते आहे तुझा वावर कुरवाळून प्रत्येक ओळीला शोधते आहे तुझ्य अस्तित्वाला
|
अहाहा.. सगळ्याच झुळूका एकदम उच्च !!!! चिंब चिंब डायरीचे रकानेही झिजले शब्द सोडून तीने सगळेच होते जपले जास्वन्द...
|
तूच शब्द तूच सूर तूच विणा हातातली जन्मदाता मी जरीही तू ज्योत गर्भातली
|
काव्य रूप तूच आता तू भावना शब्दातली पूर्त मी झालो अखेरी तू पूर्तता माझ्यातली
|
रुप्स, लोप्स, जास, देव्स... झक्कास. अगदी डायरीत संग्रही करण्याजोग्या झुळुका
|
देवा... १ नंबर रे पूर्ततेची लाभून क्षुधा भोगलेला मृत्यू खरा ? का मोक्ष त्यागून मेलेला अपूर्ततेचा प्याला बरा ? जास्वन्द...
|
ओळींमधले अर्थ मला कडकडून भेटले किती उशीर केलास रे हळहळून म्हटले तुषार जोशी, नागपूर
|