|
Jo_s
| |
| Wednesday, June 07, 2006 - 1:57 am: |
| 
|
पुणे शहराजवळ कोथेरूड जवळ एक टेकड्यान्ची रांग आहे. त्यातल्या एम.आय.टी. मागच्या टेकडीला वेताळ टेकडी म्हणतात. ही माझी आवडती जागा. तिथे गेलं की कसं प्रसन्न वाटत. दर गुरुवार प्रमाणे गेल्यागुरुवारीही वेताळ टेकडीवर जायला निघालो. जरा उशीरच झाला होता. दोन दिवसापासून पाउस पडू लागला होता. त्या मूळे टेकडीवर एरवी असणार्या शेकडो गाडयांपैकी आज एकही गाडी तिथे नव्हती. या टेकडीवर ए.आर.ए.आय. मूळे गाडीनी वर जायला चंगला रस्ता आहे. त्यामूळे बरेचजण गाडीनीच वरपर्यन्त जातात. अर्थात ठरावीक ठिकाणा पर्यंतच. मी पायीच जाणं पसन्त करतो. असो, तर त्या दिवशी पावसामूळे काही हौशी मुलं सोडली तर बाकी सगळा शुकशुकाट होता. मी जमेल तसं चिखल चुकवत चालत होतो. निसर्गाच्या सानीध्यात राहून माणसाची उंची वाढते असं ऐकलं होतं. पण त्याचा इतका लगेच प्रत्यय येईल असं वाटलं नव्हतं. काही वेळातच माझी उंची एक ते दिड इंच वाढली. मधे मधे दगडांवर बुटाचे तळवे घासून मी ती कमी करत होतो. निसर्ग किती तत्पर असतो, दोन दिवस पाणी मिळाल्या बरोबर सगळी कडे पसरलेली बीजं जीव धरु लागली होती. सगळी कडे हिरवं गार झालं होतं. मला निरनीराळ्या किड्यांच निरीक्षण करायलाही आवडतं. आत्ता तर तिथे असंख्य प्रकारचे किडे प्रकट झाले होते. निरनिराळ्या गोगल गायी होत्या. एका लालचुटूक मखमली किड्याने माझं लक्ष वेधून घेतलं. त्याला मी मोबाइलच्या कॅमेरात बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या अपेक्षेसारखा नाही जमला. या सगळ्यांच शेड्यूल इतकं अचूक कसं असतं आणि तेही कुठल्याही रिमाईंडर शिवाय, हे एक गुढच आहे. जरा पाउस पडायचा अवकाश की हजर. या टेकडीवर झाडंही अनेक प्रकारची आहेत व निरनीराळ्या भागात दाट जंगल म्हणावं इतकी घनदाट आहेत. काही ठिकाणीतर दिवसाही रातकिड्यांची किर किर चालू असते. पावसाळ्यात २,३ फूट उंच गवत वाढतं, काही ठिकाणी तर ४,५ फूट उंच असतं. पुर्वी मोर पहाण्यासाठी मी २,३ फुटी गवतात दाट झाडांत जात असे पण आता हिम्मत होत नाही. पावसाळ्यात उगवणार्या काही छोट्या झाडांना साबणाच्या फेसासारख्या फेसाचे गोळे लागलेले दिसतात. ते पाहून माझ्या मुलाने एकदम म्हटंल की झाडं दाढी करतायत. असच एकदा टेकडी उतरता उतरता एका झाडाला अनेक दिवे लागल्यासारखे दिसले. म्हणून मी त्या झाडापर्यंत गेलो. फळ, शेंग असा काहीतरी तो प्रकार होता. त्याचा आकार बदामासारखा व एक दिड से.मी. एवढा होता, त्याच्या कडाना व मध्यभागी जाड शिरा होत्या व त्यामधे पातळ दुधी पडदा होता. त्यामूळे त्याच्या पलीकडून कुठूनही प्रकाश आला की तो पडदा प्रकाशीत होउन लांबून दिवे लावल्यासारखे वाटत होते. असच एकदा एका फळाचं कवच मिळाल. त्याच्या आतल्याबाजूला खवल्यांसारख मुद्दामूनही करता येणार नाही इतकी सुंदर नक्षी होती. ते बाहेरून बघीतलं की नारळासारख वाटे, आडव ठेवलं की पणती दिव्यासारख वाटे. असे अनेक खजीने इथे पहायला मिळतात. क्रमश:
|
Maudee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:19 am: |
| 
|
छानच लिहिलय जो. पुर्वी आम्ही शाळेत जायचो तेव्हा असच माळरानातून जायचो चालत चालत. पावसाळ्यात ख़रच इतकं छान वाटायचं. पण तो चिख़ल मात्र मी आवडीन तुडवायची. मला असा मऊ मऊ चिख़ल तुडवायला फ़ार आवडायचा त्यावेळी.
|
Jo_s
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:21 am: |
| 
|
काही महीन्यां पुर्वी पावसाळ्याच्या शेवटी आणि हिवाळ्याच्या सुरुवातीच्या सुमारास असाच टेकडीवर गेलो होतो, तेव्हां तिथलं वातावरण.... अगदी दाट धुकं होतं. थंड्गार हवाहोती, त्यातच धुक्याचा ओलावाही जाणवत होता. मधूनच वार्याची मंद झुळूक येत होती. वनस्पतींचा विशीष्ट वास तर मधूनच एखादा सुगंध वातावरणात भरून राहीला होता. रोजची पक्षाची किलबील मंदावली होती, मधूनच एखाद्या मोराची साद ऐकू येत होती. एकूण वातावरण अवर्णनीय होतं. निसर्गानी इतका सुंदर स्क्रीन सेव्हर लावून ठेवला आहे की त्याची तुलनाच होउ शकत नाही. त्याचवेळेला अजून एक गोष्ट बघायला मिळाली. झाडा झाडात कोळ्यांची असंख्य जाळि लागली होती आणि जाळ्यांच्या मध्यभागी वेगवेगळ्या प्रकारचे कोळी. अगदी पाउल वाटेत गुरांच्या पावलांमूळे झालेल्या खळग्यांमधेही छोटी छोटी जाळी होती. यासगळ्या जाळ्यांच्या धाग्यांवर दवाचे थेंब रांगेत जमा होउन सगळी कडे असंख्य मोत्याच्या माळाच माळा दिसत होत्या. मधूनच झुळूक आली की धुक्याची हालचाल होई आणि सुर्याच्या किरणांचे कवडसे येत. त्यात सगळ्या माळा उजळून निघत. अशी चित्र फक्त मेलमधेच बघितली होती. प्रत्यक्षात प्रथमच पाहीली. आसच एकदा गेलो असताना एका वाळक्या काडीच्या टोकावर एक मोठा भूंगा पंख पसरून सुर्याकडे पाठ करून उन खात बसला होता. ते बघून एकदम माझ्या मनात आलं की हा नक्की पुणेरीच असणार मुंबईच्या भुंग्याला कुठ्ये इतका वेळ. गमतीचा भाग सोडला तरी तो इतका निवांत बसला होता की मी त्याच्या पासून ४,५ इंचावर होतो तरी हलेना, शेवटी काही वेळानी उडाला. क्रमश:
|
Gs1
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:33 am: |
| 
|
छान लिहिले आहेस रे सुधीर. पुर्वी खूप वेळा जायचो तिकडे आता कधी तरी दोन तीन महिन्यातून एकदा..
|
Jo_s
| |
| Wednesday, June 07, 2006 - 2:58 am: |
| 
|
या टेकडीचा विस्तारही बराच मोठा आहे. एखादं गाव वसूशकेल एवढा. चतू:श्रूंगी ते पौड फाटा, व पाषाण, बावधन, चांदणी चौक ते सिम्बायोसिस असा साधारण तिचा विस्तार आहे. या टेकडीवर काही ठीकाणी जुन्या दगडाच्या खाणी आहेत. त्यातली ए.आर. डी.ई. च्या बाजूच्या टेकडीवरची खाण जरा मोठी आहे. पावसाळ्यात या खणींमधे थोडं पाणी साठतं व ते पुढे बरेच महीने असतं. या खाणीच्या उभ्या उंच ओबडधोबड भिंती पक्षांना घरटी करण्यासाठी सुरक्षीत ठीकाण ठरल्या आहेत. खाणीमूळे सगळीकडे स्फटीकासारखे निरनिराळे खडे इथे मिळतात. माझ्या मुलीनी असे बरेच खडे गोळा केले आहेत. इथे मारुती, गजानन महाराज, दत्त इ. ची अनेक ठीकाणी छोटी छोटी देवळं आहेत. ए. आर. ए. आय. च्या मागे जो उंच भाग आहे तिथे वेताबाबाचे देउळ आहे. मलावाटत हे याभागातलसगळ्यात उंच ठिकाण असावं. तिथे गेल्यावर इतका वारा असतो की तिथून हलूच नये अस वाटतं. याठिकाणाहून चहू बाजूचा लंब पर्यंतचा व्ह्यू मिळतो. क्रमश:
|
Jo_s
| |
| Wednesday, June 07, 2006 - 3:02 am: |
| 
|
निरनिराळ्या वेळी निरनिराळी वाटते ही टेकडी. उन्हाळ्यात जवळ जवळ सर्वच झाडांचे खराटे झालेले असतात. तरीही यावर्षी तिथे २५ ते ३० प्रकारचे पक्षि आलेले होते. सगळ्या प्रकारांची नावं काही मला माहीत नाहित. पण त्यांच निरीक्षण करण्यातही आनंद मिळतो. दिड इंचा एवढ्या लहान पक्ष्यां पासून ते मोरां पर्यंत, अनेक प्रकार आहेत. ६०, ७० मोर आहेत. मुक्त वातावरणातले प्राणी पक्षी बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. मोरासारखा मोठा पक्षीही निसर्गात इतका सामावून जातो की झाड आणि काट्क्यां मधे अगदी ५,६ फुटांवर असला तरी पटकन दिसत नाही. तिथे ससेही बर्या संख्येने आहेत. हरणं व तरसं आहेत अस ऐकलं आहे पण प्रत्यक्षात पाहीलं नाही. साप, विंचू, मुंगूस असेही बरेच प्रकार आहेत. एकूणच इथलं वनस्पती आणि प्राणी जिवन एकमेकांच्या साथिनी छान चालू आहे. आर्थात त्याला काही धोके आहेतच. जसं गवताला आगी लागणे; गावठी कुत्र्यां पासून मोर, ससे यांना असलेला धोका; तिथे येउन शांतता न पाळता आरडा ओरडा करणार्यांमूळेही हे प्राणी डिस्टर्ब होत असतीलच. तसेच फिरताना काही ठिकाणी फुटलेल्या बाटल्या दिसतात त्यावरून घडणारे गैर प्रकार लक्षात येतात. आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे डेव्हलपमेन्टच्या नावाखाली पसरत असलेला अजगर चहूबाजूनी ही टेकडी गिळंकृत करेल की काय अशी भिती वाटते. पण या टेकडीवर फिरून आलकी एकदम ताजतवान वाटत. मी आठवड्या साठिचि एनर्जी साठवून घेतो तिथे जाऊन. दाट झाडी, लाल नसले तरी मातीचे रस्ते, व स्वयंचलीत वहानांपासून मूक्त, ही टेकडी म्हणजे गरीबांचं माथेरानच आहे. सुधीर
|
सुधिर अगदी तुझ्याचसारखे अनुभव मला माथेरानला आले आहेत. तिथे कोळ्याची जाळी तर कित्येक आहेत. कधी कधी तर असे वाटते की त्या पुर्ण जंगलत त्यंअचेच राज्य आहे. माथेरान हे माझ्या आईचे माहेर. तिचे बालपण तिथेच गेले. म्हणुन गेल्यवर्षी मे महिन्यात तिथे गेले होते. आतिशय ःआन, शांत, थंड आहे ते. वडिलांच्या हट्टामुळे आम्ही एका दिवसात माथेरान पायी चालुन बघितल पण मग त्यांचे म्हणण खरच पटल की जर "कोणतेही गाव बघायचे तर ते पायी चालुनच समजते." खुप काही आथवणि घेउन आले मी त्या दोन दिवसात..
|
Jo_s
| |
| Wednesday, June 07, 2006 - 6:59 am: |
| 
|
maudee, gs, rupaali thanks Sudhir
|
vaa.. vaa ..su.ndar...varnan.. pahaave laagel aataa...!!!
|
Shyamli
| |
| Wednesday, June 07, 2006 - 7:51 am: |
| 
|
सुधीर मी नाही हो बघितली ही टेकडी.. आता बघायला हवी.... एवढ छान वर्णन वाचल्यावर
|
Moodi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 8:19 am: |
| 
|
सुधीर एकदम मस्त!! पुण्यात हनुमान टेकडी अन पर्वतीवर फिरायला मला फार आवडते. आता वेळच होत नाही. सिमेंटच्या जंगलापासुन दूर जावेसे वाटतेय. चिंचवडकडुन मधल्या मार्गाने हिंजवडीला वळसा घालुन येताना ती पुण्याबाहेरची हिरवाई दिसते अन मन खुप प्रसन्न होते. तो मखमली लाल किडा मृगाचा किडा आहे. त्याला दुसरे नावही आहे. हा लेख बघा लोकसत्तामधला अन हा मृगाचा किडा. पावसाळ्यात सुरुवातीला हे किडे खुप असतात. निसर्गाजवळ जावे लागते हो. http://www.loksatta.com/daily/20060606/mv05.htm 
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, June 07, 2006 - 8:44 am: |
| 
|
छान वर्णन आहे टेकडीचे... मी ARAI पर्यंत जाऊन आलो आहे पण तेव्हा कळालेच नाही की हा असा समृद्ध परिसर आहे म्हणून... आता मला परत जावेसे वाटते... सुढीर, अजून काय काय पाहिले ते लिही...
|
Ninavi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 9:45 am: |
| 
|
छान लिहीलंय सुधीर. जायला हवं एकदा असं वाटतंय. >>>> काही वेळातच माझी उंची एक ते दिड इंच वाढली.

|
jo_s मस्तच लिहिल आहे. जुन्या आठवणी बरेचदा फ़िरलो आहोत आम्ही त्या वेताळ टेकडीवर..
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 07, 2006 - 9:07 pm: |
| 
|
सुधीर छान आहे वर्णन. मी खुप वर्षांपुर्वी गेलो होतो तिथे. आता जायला मिळाले तर वर्णन केलेल्या सगळ्या मंडळींचे फोटो काढता येतील. मूडि, तो मृगाचा किडा ईथे पण दिसतो. पण यावर्षी मृगाच्या आधीच पाऊस पडल्याने, हे किडे पण आधीच दिसले.
|
Jo_s
| |
| Friday, June 09, 2006 - 1:27 am: |
| 
|
लोपा, श्यमली, मुडी, महेश,निनावी, रचना, दिनेश मनापासून धंन्यवाद मुडी, किड्याच्या माहीती बद्द्ल आभारी आहे. मला बरेच किडे माहीती आहेत त्यांच्या स्टाइल्स, सवयी माहीती आहेत पण नावं माहीत नाहीत. सुधीर
|
Nvgole
| |
| Friday, June 23, 2006 - 1:50 am: |
| 
|
सुधीर तू खरेच किती छान लिहीतोस. सुरेखच. मूडी, तू दाखवत आहेस त्या किड्याला 'गोसावी' म्हणतात. लहानपणी आम्ही त्याच्या मखमलीशी कित्ती खेळलो असू. सुधीर तू काढलेले ह्या मंडळींचे फोटोही टाक ना! मजा येईल. आणि हो, मुळी मधला मु र्हस्व असतो.
|
सुधीर,मस्तच लिहीलयस रे. तिथे जाऊन फ़िरून आल्यासारखं वाटतय एकदम.
|
Jo_s
| |
| Saturday, June 24, 2006 - 1:35 am: |
| 
|
nvgole, Mauresh अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद
|
Abhi9
| |
| Saturday, June 24, 2006 - 7:19 am: |
| 
|
वा सुधीर, मजा आ गया.
|
|
|