Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:07 am: |
| 
|
तुला नाही म्हणवत नाही.. म्हणून मी तुझे शब्द झेलते.. खरंतर.. असंख्य नजरांचे तीक्ष्णं बाण मी आपल्या मैत्रीखातर पेलते..!!
|
मिथ्य आभासातही त्या तुझा प्रेमळ सहवास या मनाने घेतलाय तुझ्याच प्रेमाचा ध्यास… रुप…
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:10 am: |
| 
|
रुप्स.. लोपा.. तुझ्या प्रेमाचं अत्तर माझ्या ह्रदयाच्या कुपीत लपलं आहे.. तू नसल्यावर त्याचा दरवळ.. यातच तुझं असणं मी जपलं आहे..
|
तु समोर आलास की शब्द गळ्यातच अडकतात.. नजरही मला सोडुन पळते... आणि मी वेडी कोणाची तरी सोबत मिळेल का म्हणुन.. बावरी कळी होते...!!!
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:12 am: |
| 
|
तू समोर असलास की मला काहीच स्मरत नाही... पण तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी शाईच पुरत नाही..!!
|
तु समोर आल्यावर माझं मला अस्तीत्वच जाणवत नाही.. एक शिल्प भान विसरलेले एव्हढीच माझी ओळख उरते...!!!
|
तु समोर आल्यावर. ओळखीचे शब्दही आठवत नाहित.. तुला आठवतांना... कवितेला शब्द उरत नाहीत...!!!
|
आईशप्पथ तुस्सि ग्रेट हो, लोपा, पुजा......  
|
एकदा मागे पोस्टलेली.. अबोलच शब्द माझे, अबोलीच माझी कहाणी, अव्यक्त राहिल्या भावना, मुकिच राहिली वाणी... रुप...
|
तु समोर तरी कागदावर तुझेच नाव गिरवणे तुझ्या नजरेचे उखाणे.. झाले माझ्या जगण्याचे बहाणे...!!!
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:24 am: |
| 
|
तुझ्या इतकंच माझं मन तुझ्यासाठी वेडं आहे.. तरी सुद्धा तुझं मन माझ्या साठी कोडं आहे..!!
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:26 am: |
| 
|
तू अबोला धरलास की माझ्या रात्री जागतात.. माझे श्वासच माझ्याशी अनोळखीपणे वागतात..!!
|
तुझ्या मनाची कोडी, माझ्या मनातच सुटतातं, त्या कोड्यांचे भावार्थ, माझ्या मनात उमटतातं... रुप...
|
बोलणे तिचे मुक्याने अन काळजाचा ठोका चुके बोलतांना अमुचे अताशा शब्दही होती मुके
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:32 am: |
| 
|
माझ्या असंख्य भावनांनी तुझ्या अस्तित्वाला वेढलं आहे.. कारण.. तुझ्या आठवणींचं पिंपळपान माझ्या मनाच्या पुस्तकात दडलं आहे..!!
|
ते तुझे शब्दांनी मला कोडी घालणे अन मग हळूच डोळ्यांनी त्यांचे उत्तर सांगणे
|
मुके मुके राहुन माझे, तुला पहात रहाणे, क्षणभंगुर भेटित त्या, माझ्या मनात सामावुन घेणे... रुप...
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:34 am: |
| 
|
तुझा मुका संवाद मला मनापासून जाणायचाय.. तुझा श्वास डोळ्यात साठवून माझ्या मनात आणायचाय..!!
|
बोलणे माझे असे का सांग कुणीही जाणले मग माझ्याही जाणीवेने व्रत मुक्याचे बाणले
|
Poojas
| |
| Tuesday, June 06, 2006 - 3:40 am: |
| 
|
जरी आपल्या दोघांमध्ये संवादाचा अभाव असेल.. तरी आपल्या श्वासांमध्ये सहवासाचा भाव असेल.. हाच भाव जगण्यासाठी श्वास देत जाईल.. अन.. आपल्या संवादाची नौका पुढे नेत राहील..!!
|