Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मदतनीस नव्हे मैत्रिणी ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » मदतनीस नव्हे मैत्रिणी « Previous Next »

Shreeya
Monday, June 05, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुपारचे १२ वाजुन गेले होते.किचनमधील खरकट्या भांड्याचा ढीग पाहुन रडु कोसळत होते.कितिही धुतली तरी भांडी कमीच होत नव्हती. झाले असे होते की माझी कामाची बाई तिच्या नवर्‍याची बदली झाली म्हणुन मुम्बईला गेली होती आणि तिने बदली म्हणुन दिलेली बाई महिन्याचा पगार घेउन गायब झालेल्याला आता २ दिवस झाले होते.काही फोन नाही काही निरोप नाही. शेजारच्या मैत्रीणीचीही तीच गत. वॉचमनने पाठवलेल्या बायका नाही आवडल्या मला.(स्वच्छ वगैरे नाही वाटल्या) काय करावे सुचत नव्हते.लग्नापुर्वी किती सुखी होतो आपण असे वाटुन गेले. नवरा अशावेळी कधीही आपल्याबरोबर नसतो याची एव्हाना सवय झाली होती(लग्नाला ६ महिने झाले होते न!)
शेवटी खालुन काहीतरी खायला घेउन यावे असे ठरवले आणि एखादि चक्कर मारुन यावी म्हणजे तरी हा प्रश्न थोडा वेळ विसरु असे वाटले. नाहीतरी घरात थांबावेसे वाटेना. खाली आले तर कचरा नेणार्‍या मावशी दिसल्या.त्याना सर्व सांगितले व एक बाई बघा म्हंटले माझ्यासाठी. माझ्या चेहेर्‍यावरुन एकन्दर त्याना कल्पना आली असावी. किंवा मी त्यांची आवडती होति म्हणा(दिवाळीला पगाराएवढाच बोनस देणारी मी एकटीच होते सोसयटीत) त्या १५ मिनिटात घेउन येते म्हणाल्या. मी हवेत तरंगतच घरी आले अन संगीता पहील्यांदा घरी आली.२०-२१ वर्षाची संगीता मला भावली. पुढच्या २ तासात घर माझे परत हसू लागले,लखलखु लागले.
माझ्या ऑफ़िस व कोर्सच्या वेळा सांभाळत दिवसातुन दोन वेळा अगदी न चुकता संगीता येवु लागली.किल्ली मात्र ती घेत नसे.ताई तुम्ही सांगा मी त्या वेळी येईन असे म्हणायची.यायची मात्र अगदी वेळेत.त्यामुळे मी खूश!सुरुवातीला धुणे-भांडी,झाडु-पोछा करणारी पुढे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये पाणि उकळवणे,कुकर लावणे,नाश्ताची तयारी करून देणे,पोळ्या करणे,भाजीची तयारी करून देणे,कपड्यांच्या घड्या घालुन ठेवणे इतपत हातभार लावायला लागली. माझी आई,मावशी इतर नातेवाईक म्हणायचे श्रीया बायकांच्या बाबतीत एकदम सुदैवी हं!
पुढे मी बाळंतपणाला माहेरी आले अन नवरा अमेरिकेला आला. त्यामुळे तिला ६ महीने सुट्टी मिळाली. मीही तिला दोन महीन्याचा पगार देउन आले होते. पण दर १५ दिवसानी मम्माकडे ती न चुकता फोन करायची. परत पुण्याला आल्यावर आमच्या आधी ती पार्कींग लॉट्मध्ये वाट पाहत होती. लेकाला माझ्या सोन्याची अंगठी आणली होती तिने. मला तो अनपेक्षित धक्का होता.मी तिला रागावल्यावर हसत म्हणाली की बाळासाठी आहे हे!
एका महीन्याने आम्ही स्वत्:च्या फ़्लट्मध्ये रहायला गेलो तेव्हाही तिची फ़ारच मदत झाली. नवीन घरात पूजा झाल्यावर मात्र रडली खूप.मलाही वाईट वाटले. पण फ़्लट लांब असल्याने आली नाही ती.
आता परत मला तेच टेंशन की पुढे काय? शिवाय आता ४-५ महीन्याचा लेकही बरोबर. पण तिथेही मला वनीता मिळाली.तिने कधीच संगीताची उणीव भासु दिली नाही. माझ्या लेकाच्या दुपट्यांपासुन ते सर्व काही तिने मनापासुन केले. मी कधी म्हंटले की राहु दे ग तर म्हणायची का माझ्या मुलांचे नाही का मी केले. बाळुही मला तसाच.(माझ्या लेकाला बाळुच म्हणायची कायम)
दिवाळीची साफ़्-सफ़ाई ते सत्यनारायण पूजेचा स्वयंपाक (प्रसादापुरती मला करायला लावायची)सर्व तिने मनापासुन केले.
दिड्-दोन वर्षानी अमेरिकेला आलो पण अजुनही तिचा मम्माला ६ महीन्यातुन फोन असतो. आणि मला तर पदोपदी त्या दोघींची आठवण येते(घरी काम करायची सवय गेली होती माझी यांच्यामुळे).माझ्या मदतनीस नाही काही तर जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या या दोघी. अडचणींच्यावेळी धाउन येणार्‍या. कधीतरी वाटते की कशी मी या रुणातुन उतराई होउ. पण काही रुण उगीचच तशीच ठेवायला आवडतात.
अर्थात आमच्या भारतवारीमध्ये इकडुन वस्तु घेउन जाताना त्या दोघींचा नंबर वरच असतो माझ्या शॉपिंग लिस्ट्मध्ये!
















Manuswini
Monday, June 05, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shreeya lucky आहेस बाकी

मुंबईत बाईचा एवढा त्रास आहे ना

कीतीही काही करुन सुद्धा,प्रेम लावुन सुद्धा ह्या बायका आपले 'गुण' दाखवायच्या.

सध्या तर एकले की हा त्रास खुप वाधला आहे मुन्बईत तरी


Bee
Monday, June 05, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया, तुझा हा अनुभव खूपच सुंदर वाटला आणि तू लिहितेस पण छान. मला तुझे कौतुक वाटले की तू अगदी भरभरुन कामाची मिळकत ह्या दोघींना दिलीस आणि त्या बदल्यात त्या दोघींनी तुला वेळेवर हवी तितकी मदत केली.

Shyamli
Wednesday, June 07, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय ग श्रिया...

शेवटी काये ना लावाव लागतं आणि लाऊन घ्यावं लागतं..

काही काही बायका खरचच चंगल्या असतात...
पण काहि मात्र अगदी बारा गावच पाणि....


Smi_dod
Wednesday, June 07, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मैत्रिणीनो, काही नाही ग श्यामली, कितीहि करा या बायकांचे कोणी धड नसतात. अगदी चांगले वागले तरी या शेवटी वागायचे तसेच वागतात..

Megha16
Wednesday, June 07, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया,
पहिल्यादा तुला नशिबवान म्हटल पाहिजे, कारन तुला इतक्या छान मुली काम करण्यासाठी मिळाल्या. कारण आत सध्या अश्या बायका मिळन अशक्य. आणी त्यातुन तु जस म्हटल की त्या तुझ्या छान मैत्रीणी झाल्या. मग तर एकदम मस्त. खुप छान लिहल आहेस तु.
कारण माझा तर कामवाल्या बाई सोबत चे सगळे अनुभव खराब च आलेत. म्हणुन तुझा लेख वाचुन छान वाटल. अजुन अश्या बायका मिळ्तात ज्या की आपल्या घरच्या होऊन जातात हे फार कमी घडत. कारण जुन्या काळात बराच दा मुलींना त्याच्या लग्नात हुंड्या सोबत एक गडी पण दिला जायचा हे मी एकल होत पन विश्वास बसत नव्हता. जेव्हा माझी लहान जाऊ म्हणाली की तिच्या आई ला असाच एक गडी मिळाला आहे. जो की आता त्याच्या घरातल्या पैकी च एक होऊन गेला आहे. तेव्हा खर वाटल.


Shreeya
Wednesday, June 07, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदि खरय ग श्यामली, माझ्या मैत्रीणींच्या बायकांचे नमुने बघितले आहेत मी. पण काय न काही काही जण ५०-१०० रुपयांसाठी (पगाराच्या बाबतीत) घासाघीस करतात.(खरेदि मात्र हजारोंची असते) मग कामवाल्याही तशाच वागतात.(अपवाद असतात ही)
माझ्या बाबतीत म्हणायचे तर माझ्या लेकाच्या आजारपणात म्हण किंवा अडी-अडचणीत म्हण दोघीनी खूपच मदत केली(जवळच्या लोकानीही त्यावेळी हात आखडता घेतला होता ) आणि अडचणींच्याच वेळी माणसे ओळखता येतात ग! म्हणुन लिहावेसे वाटले.
शेवटी काय तर टाळी एका हाताने वाजत नाही
...........

Mrinmayee
Wednesday, June 07, 2006 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया, अगदी बरोबर बोललीस!
बंगलोरला माझ्या सासरी आमची कामवाली अम्मा गेल्या २५ वर्षांपासून काम करायची. सकाळच्या चहापासून दुपारी जेवण वगैरे आटपून जायची. आता म्हातारपणानी थकलीय. मला सांगायला खूप अभिमान वाटतो, माझे सासरे तिला दर महिन्याची पेन्शन देतात. अन तिच्या डॉक्टरची बिलं पण भरतात.


Supermom
Wednesday, June 07, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण कामवाल्या बायांचा खूपच छान अनुभव आहे.
मी दोन वर्षे भारतात जाऊन राहिले होते.जुळी मुले,त्यात जिवावरच्या बाळंतपणा मुळे सतत बिघडणारी तब्येत. नवरा कितीही समजूतदार असला तरी तो ऑफ़िस बघणार की घरचे प्रॉब्लेम्स?

अशा परिस्थितीत मला स्वैपाक व धुणीभांड्याला ठेवलेल्या बायांनी खूपच सांभाळून घेतले.स्वैपाकाच्या बाई तर अगदी गरम पोळ्या करून वाढत.मला वेळ झाला नाही तर घरून येताना सकाळी ताजी भाजी पण बाजारातून आणत.त्यांचे म्हणणे,--ताई,आधी तुम्ही छान बर्‍या व्हा
पैसे पण रिझनेबल घेत. अन कधी घरची एकही वस्तू चोरीला गेली नाही.मी आजारी असल्याने खरेतर माझे म्हणावे तेव्हढे लक्ष नसायचे.पण फ़ारच प्रामाणिक होत्या.
त्या दोघी बायांचीच आठवण आली मला हा लेख वाचून.


खरेच,कामवाल्या बायांशी कुंडलीच जुळावी लागते.


Shreeya
Wednesday, June 07, 2006 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, खरच ग्रेट आहेत ग तुझे सासरे! महीन्याला पेंशन तेही कामवालीला हे मी प्रथमच ऐकले. पण एखाद्याला घरातलेच मानले की असेही घडते. खरेच खूप अभिमानाचीच गोष्ट आहे ही अन आदर्शाचीही!

Lopamudraa
Thursday, June 08, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrinmayii, kharach ashii kalpanaa yene aani tee rabaavane... hee pan ek samaajsevaach hoy..

Bee
Thursday, June 08, 2006 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रि, खरच उदार आहेत तुझे सासरे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators