Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मरिना बीचवरची ती रम्य संध्याकाळ ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » मरिना बीचवरची ती रम्य संध्याकाळ « Previous Next »

Mrdmahesh
Monday, June 05, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्थळ्: मरिना बीच (चेन्नई)
वेळ्: संध्याकाळची
साल्: १९८८
पात्रे: २५ मर्द मराठा..

... तर त्याचं असं झालं की आम्ही " educational tour " (ह्यात काय करतात हे सगळ्यांना माहित आहे..) वर "साऊथ" ला गेलो होतो.. बस आमच्याच college ची होती..
तिरुपतीच्या बालाजी चे दर्शन घेऊन (इथुन पुढे beautiful "दर्शने" होऊ दे असे मागणं मागून) आम्ही चेन्नई (तेव्हाचे मद्रास) कडे कूच केले.
तिथल्या agriculture college च्या कुठल्याश्या hostel वर आमची व्यवस्था (कशीबशी) "लावून" दिली होती... (रात्री डासांनी आमची "अवस्था" केली होती.) असो..
दुसर्‍यादिवशी सकाळचे सगळे कार्यक्रम "व्यवस्थित" आटोपून.. (हो व्यवस्थितच... प्रवासात सकाळी व्यवस्थित "होत" नसते...) महाबलीपुरम, सर्पोद्यान आणि इतर काही ठिकाणे पाहून आम्ही मरिना बीचवर संध्याकळी सहाच्या सुमाराला दाखल झालो... बस तिथल्या वाळूतच पार्क करून ठेवली... एव्हाना आमच्यातल्या बर्‍याच जणांचा उत्साह वाढला होता.. त्यातून ( I mean त्यांच्या चाळ्यांतून) ते नक्कीच माकडाचे वंशज आहेत हे प्रकर्षाने जाणवत होते... (अशा लोकांची खरी गरज इथेच असते.. तेवढीच गम्मत..). आम्ही तिकीट काढून आत गेलो.. आत गेल्यावर आधी डोसा, ईडली इ. जे काही समोर येईल ते हादडले.. आता पोटात गेले होते... "कुछ खत्रा (इकडच्या भाषेत "जबरी") करके दिखाने का" चा किडा डोक्यात वळवळायला लागला... तसेच इकडे तिकडे भटकत राहिलो... कुठेच काही " beautiful " दिसले नाही... शेवटी एके ठिकाणी थबकलो.. तिथे फर्माईशी orchestraa चालू होता. थोडावेळ थांबलो.. म्हणलो सुनेंगे कुछ.. (इथे मात्र " beautiful " होते..).. सगळ्या फर्माईशी "यन्गडतु" गाण्यांच्या... ओ की ठो कळत नव्हते... आमच्यातला एक जण हिम्मत करून stage वर गेला अन् विचारले " will u sing hindi songs? " "येस" असे उत्तर आले... लग्गेच "एक दो तीन" ची फर्माईश केली गेली (त्यावेळी आपल्या दिक्षितबाई भलत्याच जोरात होत्या). त्यांनी मान्य केली.. आम्हाला भलताच आनंद झाला..
आम्ही वाट पाहू लागलो.. हे आता म्हणतील.. मग म्हणतील.. आमच्या समोर इतरांची पसंती स्वीकरली जाऊन त्यांची गाणी (यंगडतु..) म्हणली जात होती पण "एक दो तीन" चा काही "नंबर" लागत नव्हता.. आमच्यातला एक जण परत त्यांना विनंती करून आला... ते पण "लग्गेच" म्हणतो असे म्हणाले... आम्ही खुश... परत एक नवीन यंगडतु फर्माईश... ती पण स्वीकारली गेली... आम्ही संतप्त... त्यातच गर्दीतल्या एकाने सुनावले "तुमारा गाना वो नई गाता... हमारा तमील गाना ही वो गायेगा.. हम सब इतने लोग है हमारा उसको सुनना पडेगा.. तुम्हारा कौन सुनेगा?"... त्यातच त्यानी आम्हाला खिजवण्यासाठी परत एक नवी फर्माईश केली... ती स्वीकारली गेली सुद्धा... झाले आमची टाळकी फिरली ३०० च्या जमावा समोर आम्ही २५ जण "तेजाब", "तेजाब", "मोहिनी", "मोहिनी" ओरडू लागलो अन् एकच गोंधळ सुरु झाला त्यांना त्यांची गाणी ऐकता येईनात.. शेवटी.. "ओ तुम चुप बैठो.. तुमारा गाना वो गानेवाला है" असे कुणी तरी सांगितले. आम्ही ऐकले तो खरंच त्याने एक दो तीन चालू केले... मग आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मग जो नाच चालू झाला... २५ लोक "तुमच्यावर आम्ही तुमच्या गल्लीत विजय मिळवला आहे" याच भावनेने नाचत होते.. ते गाणे बाजूलाच राहिले... शेवटी ते गाणे संपले अन् बीच ची वेळ संपली आम्ही सगळे बाहेर आलो. बाहेर पडत असताना एका तामिळी टोळक्याने आम्हाला विचारले "तुम्ही कुठचे?" आम्ही, "महाराष्ट्र" असे ठणकावून सांगितले. "तुम लोग ग्रेट हो यार" त्यांच्यातला एक जण.. आम्ही बाहेर आलो रात्रीचे ८ वाजले होते... जाम भूक लागली होती.. आम्ही सर्वजण घामाने निथळत होतो अन् त्यातच एक शुभ वार्ता कळाली... बस वाळूत फसली आहे.. डोक्याच्याही वर असलेली मागची खिडकी ("आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग") आता छातीच्याही खाली गेली होती. पोटात भीतीचे गोळे आले..
बाहेर आलेले "ते" लोक म्हणत होते "आत फार माज आला होता ना तुम्हाला? घ्या आता..." आम्हाला हसत होते... त्यातला एकहि जण आम्हाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हता... अगदी १०० / २०० चा जमाव जमला होता आमच्या भोवती. आमची कशी जिरली याचा आनंद घेत होता..
आम्ही सुरुवातीला बसला धक्का मारण्याचा प्रयत्न केला...बस ढिम्मच...तिकडे ड्रायव्हर गिअर वर गिअर बदलत होता...
मागची दोन्ही चाके जागीच गरारा फिरत होती... वाळू बकाबका नाकातोंडात जात होती... पण बस काही हलत नव्हती..
एकाने सांगितले... चेन्नईला जा. तिथून क्रेन आणा अन् बस काढा.
शेवटी सगळ्यांनी ठरवले... आपणच बस काढायची...सगळे बसच्या मागे आले..."हर हर महादेव..." "जय भवानी जय शिवाजी.." च्या घोषणांनी तो परिसर परत दणाणला..आता चार पाचशे लोक तरी जमले होते...एक बाप्या मदतीला येईल तर शपथ...आमच्या घोषणा चालूच होत्या... आता बस जागीच हलत होती... आम्ही धक्के देऊन बसला जोरजोरात हलवत होतो.. डोक्यात, कानात नुसती वाळूच वाळू झाली होती...वाळू थुंकून थुंकून बेजार झालो होतो...शर्टात वाळू गुदगुल्या करत होती..आता बस बरीच मोकळी झाली होती...आता एक शेवटचा भीमटोला द्यायचे ठरले.. परत एकदा "हर हर महादेव" ने परिसर दणाणला...जोरदार धक्का दिला गेला अन् बस दुसर्‍या क्षणी बाहेर आली
आमचा आनंद गगनात मावत नव्हता... नुसत्या उड्या मारत होतो...एकमेकांना मिठ्या मारत होतो... हेच दाखवून देत होतो की आम्ही मर्द मराठा आहोत...कुणावाचून आमचे अडत नाही...जमलं तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय असा आमचा बाणा असतो...जिथे जाऊ तिथे स्वत:चे स्थान निर्माण करतो...
तिथल्या एका टोळक्याने चक्क हात जोडले (मगाशी तुम्ही कुठचे असे विचारणारे हेच ते टोळके..)
शेवटी त्याच गर्दीतल्या तिघाचौघांना घेऊन आम्ही चेन्नई ला प्रयाण केले...
फ्रेश होऊन जेवून झोपलो... पण झोप येत नव्हती...
त्यांच्या नाकावर टिच्चून केलेला एक दो तीन चा नाच डोक्यातून जात नव्हता..


Maudee
Monday, June 05, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलय महेश.

तमीळ लोकाना ख़रच त्यान्च्या मात्रुभाषेबद्दल भयंकर अभिमान आहे. पण कित्येक वेळेला ते अति होतं.
अर्थात त्याचा उपयोगही होतो बर्‍याच वेळेला:-)


Chinnu
Monday, June 05, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश! वाचुन मज्जा आली!! :-)

Rupali_rahul
Monday, June 05, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश फ़ारच छान..
हो ते लोक मुंबईला आल्यावर चुपचाप हिंदी बोलतात. पण त्यांच्या राज्यात गेल्यावर हिंदी येत असुनही बोलणार नाहीत...


Limbutimbu
Monday, June 05, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कास रे महेशा! बहोत खूब!
च्यामारी वाचताना माझ पण रक्त सळसळल नुस्त! "आपुन भी मन्गता था उधर धक्का मारनेको! क्या?" अस तीव्रतेने वाटल
ये हुईना बात!
:-)

Dineshvs
Monday, June 05, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोरल्या महाराजांच्या सावत्र बंधुनंतर तुम्हीच " हर हर महादेव " केले असणार तिथे.
आता म्हणजे २६ / १२ नंतर काय अवस्था असेल त्या बीचची ? भारतातला सगळ्यात जास्त लांबीचा बीच आहे तो.


Lopamudraa
Monday, June 05, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majaa aali vaachun mahesh..!!!.. .. .. .. ..

Dhani
Tuesday, June 06, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majja aali vachun... mastch prasang hota.. tyaveli tumhala tar farach jast majja aali asel..

Kmayuresh2002
Wednesday, June 07, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे महेशा... मजा आ गया वाचके:-)

Meenu
Wednesday, June 07, 2006 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हर हर महादेव .... :-)

Chingutai
Wednesday, June 07, 2006 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश.........भले शाब्बास!!!
गिरी, तू गाव बक्षिस देतोस का मी देवु?

-चिन्गी


Pha
Wednesday, June 21, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान अनुभवकथन!
>>त्यांच्या नाकावर टिच्चून केलेला एक दो तीन चा नाच डोक्यातून जात नव्हता..
बीचवर रुतलेली बस स्थानिक लोकांची मदत नसताना काढलीत हे निश्चित अभिमानास्पद आहे; पण एका बॉलीवूड / हिंदी गाण्याचा आग्रह धरून 'त्यांच्या'(!) नाकावर टिच्चून नाच करण्याने मर्द मराठी बाणा सुखावला जाणं हे नाही म्हटलं तरी विचित्र वाटलं. असो.

Mrdmahesh
Wednesday, June 21, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याना मराठी गाणी येत असली असती तर तेही केलं असतं... मर्द मराठी बाणा बस बाहेर काढण्याशी संबंधित आहे. नाचाशी नाही.
आणि प्रश्न बॉलिवुड च्या नाचाचाही नाहीये... आमची फर्माईश मुद्दामहून डावलली जात असताना त्याना वारंवार आग्रह करून "आमचे" गाणे गायला लावले याचा आहे... शेवटी अहो ३०० लोकांपुढे आमची डाळ शिजली याला महत्व आहे की नाही?
याउप्परही तुम्हाला "विचित्र" वाटत असेल तर असो.


Psg
Thursday, June 22, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, मस्त लिहिलं आहे! बस वाळूतून काढणं.. सहीच! :-)

Aj_onnet
Friday, June 23, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश! छान वर्णन आहे!
मराठी माणसांनी महाराष्ट्राबाहेर दाखवलेली ही एकी कौतुकास्पद आहे!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators