Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
पुणेरी ट्रॅफिक्: गुण(?) गाईन आवडी!!! ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » पुणेरी ट्रॅफिक्: गुण(?) गाईन आवडी!!! « Previous Next »

Puru
Monday, June 05, 2006 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, पुणेरी पगडी, पुणेरी मिसळ आणि पुणेरी मस्तानी या कशा युनीक चीजा आहेत ना, त्या खाशा पंक्तीमधे बसण्याचा मान आता ‘जरा हटके’ असलेल्या आपल्या पुणेरी ट्रॅफिक ने पटकावलेला आहे बरे का ! आणि का नसणार हो ?

सांगा बरे, जगातल्या कोणत्या देशात तुम्हाला ट्रॅफिक ची अशी विविधता, आणि विविधतेमधे एकता (पुढे जाण्याची!) दिसुन येईल ? दुचाकी, तीन-चाकी, चार-चाकी, सहा/आठ चाकी (चुक-भुल देणे घेणे ! गणित आणि आमच्यामधे गांगुली आणि च्यापेल गुरुजी यांचा-एवढेच सख्ख्य आहे, असो!) वाहने रस्त्यातुन खड्डे चुकवत (कि, खड्ड्यातुन रस्ता शोधत? मागच्या पावसाळ्यामधील हा जोक या पावसाळ्यामधे ही लागु पडणार असं दिसतंय !) बाजी प्रभुला लाजवत, निग्रहाने ‘गणेश-खिंड’ लढवत असतात, प्रत्येक-जण सापडेल त्या इन्च-इन्च जागेसाठी ‘पळा-पळा-कोण-पुढे-पळे-तो’ करत त्वेषाने घुसत असतो, य समरांगणाला जरा ही न डगमगता, पादचारी नावाचे द्वि-पाद प्राणी मोठ्या शिताफीने वाहतुकीचा हा चक्रव्युव्ह भेदुन पुढे जाण्यचा यत्न करत असतात, तालीबान (म्हणजे ‘फडके’ बांधलेल्या पुणेरी पोरी हो) मुली मागे बसवुन, हीरो-मंडळी ‘धुम’ ईष्टाईल ने ‘मी या गावचाच नाही’ अशा दिमाखात जमिनीवरुन दोन-अन्गुळे वरती आपला बाईक-रथ उडवत असतात, रस्ता-दुभाजक शिताफीने मोडुन दुसर्‍या-बाजुचे बाईक-बंधु (आणि कधी बाईक-भगिनी पण) इकडच्या बाजुला येण्याचा शॉर्ट-कट मारत असतात, एखादा टोयोटा-क्यामरीवाला आपल्या नव्या कोर्‍या गाडीला चुकुन डेंट येइल या आशंकेने तळमळत असतो, एखादी सिक्स-सीटर खचा-खच पाशिंजर कोंबुन, आसमंतात गिरणीच्या धुराड्यागत रॉकेलचा धुर भका-भका निर्विकारपणे सोडत असते, एखादा ट्रक-ड्रायवर बाजुच्या चार-चाकी/दु-चाकीला साईड न देता (अस्तित्वात नसलेल्या) फुटपाथ वर चेपत असतो आणि तो दुचाकी-वाला पण ‘बचेंगे-तो-और-भी-घुसेंगे’ म्हणत आपल्या गाडीचे चाक पुढे घुसडत असतो, ट्रॅफिक -पोलीस मात्र ‘ब्रह्मानंदी टाळी’ (आणि ‘गुटख्याची गोळी’) लावत कोपर्‍यावरच्या पानपट्टीच्या छत्राखाली वरकड पैश्याचा हिशेब जमवत उभा असतो, एखादी रुग्ण-वाहिका केविलवाणा सायरन वाजवत असते, पण तिला साईड देउ इछ्छिणार्‍या मोजक्या सुजाण वाहन-धारकाना पण सरकायला कोठे जागाच नसते मुळी, सिग्नलला या भाऊ-गर्दीत ही विक्रेते मात्र शांतपणे कार-पुसायच्या फडक्या पासुन ते ब्रिटानिका एन्सायक्लोपिडीया पर्यंत आपला यच्चयावत माल या मोबाईल मार्केट्ला खपवत असतात, खोदलेल्या रस्त्याच्या बाजुलाच एखादा भाजीवाला आपले दुकान थाटुन बसलेला असतो, एखादी कायनेटिक-वाली काकु आपल्या दोन-पायांचा landing गियर टाकत ‘चला बाई, सोय झाली’ म्हणत गच्चकरुन ब्रेक लाऊन त्या भाजी-वाल्यापुढे थांबत असते (M-Commerce चे हे अनोखे Indian रुपडे किती आगळे-वेगळे आहे नाही ? M-Commere वर फुका research करणार्‍या Silicon valley मधल्याना येथे हे बघायला बोलावले पहिजे ! महापालिकेचे शिष्टमंडळ या आमंत्रणासठी San Jose ला रातो-रात रवाना होईल काय?), चौका-चौकात पाच-सहा वर्षांची लहानगे भाऊ-बहीण पोटाच्या खळग्यासठी डोंबार्‍याचे खेळ करुन दाखवत हात पुढे करत असतत, तर कधी कडेवर तान्हुलं घेतलेल्या, कुपोषण-ग्रस्त अभागिनी कार-वाल्यांपुढे मदतीची याचना करत असतात.....सिग्नल लागतो …

...आणि या सगळ्यांना सामावुन घेत ट्रॅफिक पुढे सरकत असते..

....जीवन संघर्ष चालु असतो !!!


Chingutai
Monday, June 05, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु
बचेंगे तो और भी घुसेंगे.....सही!!!

-चिंगी


Meenu
Monday, June 05, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय रे पुरु .... जीवन संघर्ष म्हणजे काय ते इकडे येउन पहावं

Limbutimbu
Monday, June 05, 2006 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन पायान्चा लॅन्डिन्ग गियर.... हहपुवा!
पुरू, डोळ्यासमोर चित्र उभ केलस अगदी!


Jyotip
Monday, June 05, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु सही रे



.....


Mrdmahesh
Monday, June 05, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु... मस्त रे.... हहपुवा..
बंद पडलेल्या सिग्नलला traffic चा व्यवस्थित गुंता करण्यात आम्हा पुणेकरांचा हात जगात कोणी धरणार नाही... कित्ती प्रचंड अभिमानाची गोष्ट ही... पुरू येऊदे आणखी...


Gs1
Monday, June 05, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी, अगदी.. मस्त रे!!

Chinnu
Monday, June 05, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

m-commerce ! अगदी टू मच सही पुरु :-)

Dineshvs
Monday, June 05, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे एकदा एक लेख वाचला होता त्यात असे लिहिले होते.
पुण्यात कुणी अपघात होवुन सहसा आडवा पडत नाही, कारण

^&^&^

आडवे पडायला जागाच नसते. !!!!
पुरु मस्त वर्णन.


Puru
Tuesday, June 06, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रहो! ..
रसिक मायबोलीकरांनी ('रसिक' शब्द लिहीला की मला लगेच 'पुणेकर' हा जोडून येणारा शब्द आठवला :-))निखळ कौतुक केल्यामुळे आता आणखीनच 'पांढर्‍यावर काळे' टायपायला हुरुप आला आहे. (..सावधान मंडळी! :-))


Abhayjoshi
Wednesday, June 07, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु

मस्त लिहिलयस

अजून येउदे.


Prajaktad
Wednesday, June 07, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु मस्त लिहलयस!या लेखाच्या निमित्ताने राहुल (फाटक)ने लिहलेल्या याच विषयावरच्या एका मागिल लेखाची आठवण झाली.


Puru
Thursday, June 08, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्:पुर्वक धन्यवाद अभय, प्राजक्ता D !
प्राजक्ता D , त्या लेखाची link मिळेल काय?


Kishork
Thursday, June 08, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जक्कास लिहलय पुरु.

गोट्या
बाबा बाबा आख्या जगाच सोफ़्टवेर च काम युरोप अमेरिका सुद्धा बाजुला ठेवुन पुण्यात का येतय हो?

बाबा
अरे गोट्या, त्याच काय आहे, तिथ रस्ते सर सपाट आहेतना...

(गोट्या गड्बड्ला)

गोट्या
आहो बाबा काय हे, रस्त्या चा आणी सोफ़्टवेर चा काय सम्बन्ध?

बाबा
त्याच काय आहे गोट्या, सर सपाट रस्त्या वर त्यान्ची गाडी चालवुन चालवुन त्यान्च मेन्दु हलत च नाही रे... जड बधीर जालय... पुण्या च्या खड्यानवर गाडी चालत राहीली की डोक जकास हलत राहत... मेन्दु जोरात चालत राहत रे...

:-)


Prajaktad
Thursday, June 08, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु! अरे admin, किंवा mod तुला लिंक देतिल बघ!
मला सापडण अवघड्च आहे.



Mrinmayee
Thursday, June 08, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु, अगदी जबरजस्त!! शेवटच्या दोन ओळी मात्र लेखाला खरंच पु.ल टच देऊन गेल्या.
या ललितावरून इंदोरला गेले असताना अनुभवलेल्या रहदारीची आठवण झाली. नात्यातली मुलगी कार चालवत होती. (५ km / hr च्या स्पीडनी)! उजव्या हातानं स्टीअरिंग व्हील सांभाळत डावा हात खिडकी बाहेर काढून आमच्या मोटारीवर आदळणार्‍या हातगाडी, सायकलस्वार अन तत्सम पब्लिकला दूर ढकलत होती. पुण्यातही हा प्रकार चालतो का?


Kalandar77
Thursday, June 08, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Puru, Prajaktad, तुम्ही
author name वरुन तो लेख शोधु शकता..

इथे आहे तो लेख :

/hitguj/messages/75/93165.html?1136196414

Puru
Friday, June 09, 2006 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद किशोर, कलंदर, मृण्मयी!
'पु.ल. टच आठवला' असं वाचलं आणि खरा-खुरा आनंद वाटला! त्या दैवताच्या प्रथम नावावरुनच मी माझा ID घेतला आहे.
खुप मागे engineering ला शिकत असताना मी त्याना एक पत्र लिहिलं होतं; जेंव्हा त्यांचं पत्रोत्तर आलं तेंव्हा अगदी gold medal मिळाल्याचा आनंद झाला होता मला! ...त्यांची भेट मात्र राहुन गेली!


Jo_s
Friday, June 09, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु छानच, पु.लं ंई म्हटल होत पुण्यात सयकल चालवणे म्हणजे एखादी चळवळ चालवण्यासार्खे आहे. आता सायकलची जगा इतर गाड्यांनी घेतली इतकच.

Dineshvs
Friday, June 09, 2006 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, अहमदाबाद, वडोदरा मधे मी पायाने सिग्नल देणारे लोक बघितले मी.
आणि पुण्यात हॉर्न चालत नाही, जरा ब्रेक नीट करुन द्या सांगणार्‍या बाया बघितल्यात मी.


Limbutimbu
Friday, June 09, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> उजव्या हातानं स्टीअरिंग व्हील सांभाळत डावा हात खिडकी बाहेर काढून आमच्या मोटारीव
म्रिण्मयी, गाडी इम्पोर्टेड लेफ्ट साईड स्टिअरिन्गवाली होती का? :-)
दिनेश, अगदी अगदी! मी पण बघितल हे पण कुठ ते आठवत नाही!
एक पुसटस आठवत हे की मराठवाड्यात कोणत्या तरी गावात सायकलरिक्षावाल्याला पायाने सिग्नल देताना बघितल हे!


Mrinmayee
Saturday, June 10, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुभाव, बराबर हा बराबर. गाडी देशीच. तेव्हा तेव्हडं 'हात बदलून' वाचा




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators