Puru
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:34 am: |
| 
|
लिंबु, एक प्रयत्न केलाय. Just TP म्हणुन. Take it lightly! -- साथ होती पाउलखुणांची दुभंगली अचानक वाट कळेना ओळखीच्या पाउलखुणा, बिकट वाटे ही वाट
|
वा रे वा पुरू! मी सुमती यान्च्या पाऊलखुणा उचलल्या, तू माझ्या! एकातुन एक साखळी....! शेवटच्या ओळीत "बिकट वाटे ही वहीवाट" अस केल तर गेयता जास्त येवु शकेल असे वाटते शिवाय वहिवात असुनही बिकट वाटु शकते असा अर्थ निघतो तो वेगळाच! बघ हं, मी पण जस्ट टीपी म्हणुन सुधारणा सुचवतो हे! टेक इट लाईटली! अन बिनधास्त कर रे चारोळ्या, हव तर एखाद दिवशी आपण एखाद्या सिटीच्या बीबीवर फक्त पद्द्यातच सन्वाद करू! कशी हे आयडीया? पण थाम्ब, मीच कधीतरी कुठतरी आधी प्रयत्न करतो! बहुदा सातार्यात!
|
Shyamli
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:49 am: |
| 
|
भले..देवा....मीनु.. लिंबुभाऊ सकाळची जास्त छान होती सुधीर एकच चारोळी टाकुन नीघुन जाता हे काही बरं नाही हां पुरु वा!!!!! मृदा छानच लिहितेस ग!!
|
Maudee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 8:20 am: |
| 
|
पाऊलख़ुणा या वाटेवरच्या ओळख़िच्या की अनोळख़ी काही समजेना झालय जिवाभावाची माणसच आज झालीयत अनोळख़ी काही समजेना झालय हा माझा पहीलाच प्रय्त्न आहे. चांगले नसल्यास हसू नये.
|
Jyotip
| |
| Wednesday, May 31, 2006 - 8:25 am: |
| 
|
हल्ली सगळी कडे मला तुझे भास होतात, त्याच्यावरच तर वेड्या माझे श्वास चालतात
|
Soultrip
| |
| Wednesday, May 31, 2006 - 8:38 am: |
| 
|
सही ज्योती! -- हसु नका कोणी हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, अंतरीच्या ठसठसत्या वेदनेला शब्दांचे अपुरे वसन आहे. --
|
Maudee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 8:48 am: |
| 
|
छानच दाद दिली आहेस माझ्या कल्पनेला त्या आधारेच मी घेऊ शकेल कवेत(कि कवितेत) गगनाला
|
Meenu
| |
| Thursday, June 01, 2006 - 12:18 am: |
| 
|
दोनच शब्द " थांब " ऐकायचे होते रे मला मी निघुन गेले तरी ईतकही नाही म्हणलास मला
|
तुझ्या बाबतीत माझ्याकडून फक्त एवढंच चुकलं होतं... नकळत माझ्या हातून तुझ्या पदराचं टोक सुटलं होतं. तू दिसलीस अवचित अन जखम ओली झाली सुकत चाललेली पापणी आज पुन्हा ओली झाली.
|
माऊडी, ज्योती, साऊल, मिनू, सुमती..... मस्तच झकास महफील!
|
Meenu
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:22 am: |
| 
|
चुक तु केलीस शिक्षा मात्र मी भोगली कैकेयीनी मागीतला वर अन अग्निपरिक्षा सीतेनी दिली चुकतं रे सगळ्यांकडुन त्याचं एवढं काही नाही सुधारायचं का राहुन गेलं ? तेवढं मात्र कळलं नाही
|
Maudee
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:28 am: |
| 
|
चुका ही सुधारतील हा आशावाद ठेवुयात धरणी माय पोटात घेण्याआधी रामायणाची दिशा बदलुयात
|
Meenu
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:39 am: |
| 
|
ओली व्हायला पापणी थेंबही आता शिल्लक नाही अशी रात्र गेली नाही ज्यात तुझ्या आठवणींचा उल्लेख नाही
|
Shyamli
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:57 am: |
| 
|
तुच चुकावं आणि तुच रुसावं प्रेमाचं गणित कधीरे तुला कळावं? श्यामली!!!
|
Jyotip
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:17 am: |
| 
|
हल्ली असच होत ज़ुन सगळच चुकीच वाटत नविन काही कराव म्हणल तर पुन्हा चुकायच भय वाटत
|
Maudee
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:21 am: |
| 
|
बाहेर पाऊस कोसळतो आहे सगळीकडे गारवा भरून राहीला आहे. हातात cofee चा मग आहे आणि डोक्यात?? डोक्यात जुन्याच चुकांचा हिशोब आहे!!
|
Jyotip
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:26 am: |
| 
|
चुकत चुकत सुधारण ही तर जन रीत आहे पण प्रेमात पडलेल माणुस सगळ्याला अपवाद आहे
|
Maudee
| |
| Thursday, June 01, 2006 - 7:29 am: |
| 
|
प्रेमात पडलेलं माणुस का कधी चुका करते तसं असेल तर जगात कोण बरं बरोबर असते
|
Puru
| |
| Thursday, June 01, 2006 - 7:56 am: |
| 
|
चुक आणि बरोबर ची गणितं काही वेगळीच असतात प्रेमात दु:खाचा भागाकार अन सुखांचा गुणाकार जीवनाच्या पाटीवर करायचा असतो चुकून ही जिंकायचं असतं, बरोबर असुनही हरायचं असतं हसता-हसता कधी रडायचं असतं, रडता-रडता हळुच हसायचं असतं अन डोळ्यांतलं प्रतिबिंब न्याहाळत पुढे मात्र जात राहायचं असतं!
|
Poojas
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:31 pm: |
| 
|
झक्कास बरं का मंडळी..!! काय.. आज फक्त चुकांचीच झुळुक वाटतं.. ? मग माझी एक कविता पोस्ट करते इथे.. चुकांवरच आहे ती.. !! नाही म्हटलं झूळुक वर कविता पोस्टतेय म्हणून संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं.
|