Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:17 am: |
| 
|
आता नाहि वाटत विचारावसं " कधी भेटशील ?" वाटतं फक्त ईतकच आता तरी तु स्वत: येशील
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:26 am: |
| 
|
तु दिलेला घाव म्हणुन रे मी जपलाय खरं सांगते कधीच मला तो नाही खुपलाय
|
Mruda
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:45 am: |
| 
|
हो...मयूरेश फ़ायनली आलेच मी इथे...! काही "ओल्या चारोळ्या" . . रानात पाऊस मनात पाऊस वेड्या कोकिळा नको ना गाऊस.... पावसापासून तूझी आठवण वेगळीच करुन टाकावी नाहीतरी माझी वेदना पावसानं का बरं सोसावी....? केव्हा पासून धडपड्तेय मी तूला चिंब भिजवण्यासाठी पण मला माहितीच न्हवतं तू तर अळवाचं पान आहेस
|
Mruda
| |
| Wednesday, May 31, 2006 - 2:06 am: |
| 
|
मीनू चौथी ओळ सूचवु कां..? चुटपुटती ती आपली भेट संपुनहि गेली कि मिळण्याआधी नजर थेट एक कविता झाली कि...!
|
Jyotip
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:27 am: |
| 
|
येताना पाऊस तुला, बरोबर घेऊन येतो... जाताना माझ्या ओंजळीत, तुझे आठवण थेंब ठेवतो..
|
Smi_dod
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:33 am: |
| 
|
दु:ख सजवुन मढवुन ते का कमी होतं दिलेले घाव तेच असतात वेळे प्रमाणे संदर्भ बदलतात दु:खाच्या व्याख्या बदलतात घावांची तिव्रता कमी होते पण.... शेवटी दु:खाचे सुख होत नाही घाव बुजले तरी व्रण जात नाही
|
तू निघून गेलीस... उरल्या केवळ पाऊलखुणा मागोवा घेत घेत... एकटाच मी... तुझ्याविना.
|
R_joshi
| |
| Wednesday, May 31, 2006 - 6:11 am: |
| 
|
मीनु,म्रुदा, ज्योती फारच छान लिहिल्यात चारोळ्या. तु आलास पावसाच्या धारेसारखा आणि मला भिजवुन गेलास जीवनाच्या प्रवाहात मात्र अश्रुसारखा वाहुन गेलास
|
Puru
| |
| Wednesday, May 31, 2006 - 6:54 am: |
| 
|
मिट्ट काळोख, किर्र रातकिडे, तप्त हुंदका, पाऊस कोसळतोय.
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:02 am: |
| 
|
गेलं तुला सोडुन ते फक्त शरीर होतं तुझ्यविना माझ्याकडे तेवढचं उरलं होतं
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:08 am: |
| 
|
आता तुला सोडुन जाताना रडुही येत नाही अश्रु संपलेत की भावनाही उरल्या नाहीत
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:10 am: |
| 
|
कधी कळेल तुला वाट पाहणं काय असतं पाण्याबाहेर काढलेल्या माशाचं तळमळणं काय असतं
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:12 am: |
| 
|
दिवस रात्र नुसती तडफड आणी ती लपवायला केलेली बाष्फळ बडबड
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:16 am: |
| 
|
श्वास झाला बेईमान येता जाता तुझाचं विचार तोच थांबवुन टाकते म्हणलं तर त्याला मात्र तुझा नकार
|
पाऊलखुणान्ची साथ होती कधीतरी दुभन्गली वाट एकट्याच्या पाउलखूणा कोण चोखाळेल ही वाट? (एक फसलेला प्रयत्न!)
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:22 am: |
| 
|
तुझा ध्यास आहे खरा तरीही वाटलं नव्हतं की तुच दिसशील आरशातही पाहिलं तेव्हा
|
मीनु.. छान चालु आहे गं
|
Jo_s
| |
| Wednesday, May 31, 2006 - 7:27 am: |
| 
|
एका मागे एक रुतू असाच येणार जाणार सखी त्याची मिळे पर्यंत वेडा कोकीळ गाणार
|