Mruda
| |
| Tuesday, May 30, 2006 - 1:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी इथे नविन अहे. वैभव तू थाम्बवलं आहेस तरी काही सुचलं म्हणून लिहितेय. . . I hope you won't mind.... असा मागता आशिष प्रसन्नला पांडुरंग मग तथास्तू म्हणंत पून्हा स्वरूपी तो दंग म्रुदा
|
मृदा ... तू छानच लिहीतेस ... कालची चारोळी पण मस्त होती ...
|
Jo_s
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
स्वरूपी तो दंग खरा त्याच्या ठायी वसतो नित्यच भक्तासाठी प्रेम झरा कुणी सांगारे मजला आता त्याची इथे रुपे किती कणा कणात वसती येथे त्याच्याच चैतन्याच्या ज्योती
|
Zaad
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मस्तच गं...!!! असा मिळता वरद झाला प्रकट अभंग विसरूनि वर सारे संत अभंगात दंग
|
धावतो तुझ्याकडे मी ना उरति ह्या पायखुणा मजही सामावूनी घे रे मीच माझ्यात आहे उणा
|
Mruda
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद. . . . तुझ्याकडुन अभिप्राय म्हणजे मोठं सर्टिफ़िकेट...! कारण.... कसं काय सुचतं ह्याचं आश्चर्य वाटावं इतकं सुदंर लिहीतोस तू...! आणि श्यामली.. तू ही झकास लिहिलं आहेस...! अभिनंदन....!
|
Jo_s
| |
| Tuesday, May 30, 2006 - 3:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मृदा, छानच, काल पासून जोरात चाललय. वैभव, श्यामली सांभाळारे बाबानो
|
अरे आत्ता वैशाख़ वाचला.. वैभव, श्यामलिताइ एकदम जोरात.. तरीच मी विचार करत होतो मला झोपेतुन कोण उठवतय.. मृदा, सुधीर, मृण्मयी छान
|
Sania
| |
| Tuesday, May 30, 2006 - 6:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
देव नाही देव्हार्यात तो आपल्याच मनात घ्यावी त्याची प्रचीती प्रत्यक्ष अनुभवात
|
Badbadi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 7:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव ने सुचवले म्हणून इथे टाकते आहे.. ही अधी कोठरुड बीबी वर टाकली आहे.. निदान तुझ्याशी तरी खरं बोलायचं हा एक नियम मी हमखास पाळते म्हणूनच कि काय कोणास ठाऊक आजकाल मी तुझ्याशी बोलायचं टाळते
|
हो मीच सांगितलं .. इथे कुणीही सांगावं ही चारोळी सुंदर नाहिये ...
|
R_joshi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 7:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
म्रुदा, ज़ाद,देवदत फारच छान लिहिलय तुम्ही सगळ्यानी. अशाच चारोळ्या सारख्या वाचायला मिळतील यात शंका नाही. बडबडी तु हि छान चारोळी लिहितेस.
|
Ninavi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 11:07 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>>>> इथे कुणीही सांगावं ही चारोळी सुंदर नाहीये. मी सांगते.. ही चारोळी सुंदर नाहीये. अप्रतीम आहे. काल इथे भक्तीचा मळा फुलला होता वाटतं? छान आहेत वैभव, श्यामली, मृदा आणि मृण्मयी तुमच्या सगळ्याच झुळुका.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 30, 2006 - 1:27 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्यामलि, आज तुझे अहो भेटले होते. पण फार पाऊस पडत होता, त्यामुळे फारवेळ गप्पा मारता आल्या नाहित. बाकि चारोळ्या छानच आहेत. तुझ्या आणि सगळ्यांच्याहि.
|
Sakhii
| |
| Wednesday, May 31, 2006 - 12:28 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सगळ्यांच्याच चरोळ्या सुंदर आहेत.... माझीही एक.... शब्द अमृतासारखा माणुस देवदुतासारखा तु येताना वाटे रेशीम प्रत्येक धागा सुतासारखा
|
सही चालु आहे मृदा, सुरूवात केलीस तर अखेर इकडे यायला keep it up
|
कशास जपतोस वृथा घाव घडलं जे... जाऊ दे मीच जखम... मीच मलम आहे तशीच... राहू दे.
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:09 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झाडांचा हिरवा रंग नवा हवेत गोड गारवा प्रसन्न हा दिन नवा फक्त तु समीप हवा
|
आधीच्या सुमती यान्च्या चारोळीतील एक दोन शब्द उचलुन... घडले जे, मागे पडले घाव उराशी परी मी जपले नेईल कसे हिरावून कोणी
माझे दुःख मीच सजविले! दुःखही माझे, मीच सजविले! ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Meenu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 1:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चुटपुटती ती आपली भेट संपुनहि गेली कि मिळण्याआधी नजर थेट.....
|