Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
वळीव

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » कथा कादंबरी » वळीव « Previous Next »

Shreeya
Friday, May 19, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्डळी मी इथे नवीन आहे तेव्हा साम्भाळुन घ्या

वैशाख वणवा सगळीकडे चान्गलाच जाणवत होता.पण थोडेफ़ार ढगही दाटुन यायला लागले होते. मनु आपल्या खोलीच्या खिडकितुन रस्त्यावरची वर्दळ निरखत होती. डोक खूप विचार करुन दुखायला लागले वा कधी कोणत्या गोश्तीवर मार्ग सुचत नसला की खिडकितुन बाहेरच्या जगात डोकावणे हा मनुचा आवडता छन्द होता.
चारचौघीत सहज उठुन दिसेल अशी मनु अतिशय हुशार,बोलकी,मनमिळावु व सतत दुसर्‍याला मदत करायला तयार असायची पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती अतिशय हळवी,सन्वेदनाक्शम होती. कदाचित आईवडीलान्ची एकुलती एक होती म्हणा किन्वा घरची परिस्थिती अतिशय उत्तम होती म्हणुन म्हणा पण दु:ख मग कोणाचेही तिला सहन होत नसे.
तिच्या आजोबान्चे देवाघरी जाणे एवढेच फार फार मोठे आणी कदाचित न सम्पणारे दु:ख होते. पण काळ हा सर्वात मोठा वैद्य असतो म्हणतात. हळुहळु त्या दु:खाची ही धार कमी झाली होती. पण आजचे तीच्या मनात घोन्घावणारे वादळ काही शमत नव्हते. या द्वन्द्वावर काय उपाय शोधावा तिला सुचत नव्हते.
डम डम डम डम.... अचानक मोठ्या आवाजाने मनु भानावर आली खाली रस्त्यावर माकडवाला अन माकड यान्चा खेळ रन्गात आला होत. मे महीन्याची सुट्टी असल्याने बालप्रेक्षक बरेच जमले होते.क्षणभर तिला वाटले ती माकड आणि पल्लु माकडवाला आहेत व पल्लु तिला नाचवतेय.पल्लु म्हणजे तिचि जीवश्चकन्ठाश्च एकमेव मैत्रीण. तीला आपल्याच कल्पनेच हसू आल. पण दुसयाच क्षणी ती गम्भीर झाली.काहीझाल तरी पल्लु म्हणजे तिचि जीवश्चकन्ठाश्च एकमेव मैत्रीण होती. तिला दुखवण्याची मनुला कल्पनाही सहन होत नव्हती.
सगळ कस व्यवस्थित चालु होत.तिच कॉलेज,प्रोजेक्ट,ग्रुपबरोबरची मस्ती,मम्मी-पप्पान्शी दिवसभर घडलेल्या गोश्तीन्वर चर्चा करीत छानपैकी जेवण आणि तिचा पेन्टिन्गचा क्लास.
खरे तर मनापासुन आवडत असलेल्या गोश्टीत फ़क्त पेन्टिन्गचा क्लास व पल्लुशी मनसोक्त गप्पा एवढेच होते. हो तिला खर तर आर्टसची खूप आवड पण पप्पान्च्या आग्रहाखातर ती कॉम्प्युटर सायन्सला गेली होती. त्याचेही खरे कारण ऐकुन ती वैतागलीच होती. काय तर म्हणे त्याना आय.टी तला जावई हवा होता!
हल्ली हल्ली मम्मी-पप्पान्शीही मनुचे फार वाद व्हायला लागले होते लग्नावरुन. तिला लग्न करायचे नव्हते असे नव्हते पण तिच्याही काही अपेक्षा होत्या.पण सर्वात महत्वाची अपेक्षा म्हणजे तिला, तिच्या घरच्याना समजुन घेणारा व पाठिम्बा देणारा असावा असे तिला वाटे. तसा मम्मी-पप्पान्चा आर्थिक प्रश्न नव्हता पण मनुसारख्या हळव्या मुलीला भावनिक,विश्वासु,प्रेमळ आधार महत्वाचा वाटत होता. ट्रकच्या मोठ्या हॉर्नने ती दचकली. मन किती वेगात धावत नाही?तिला वाटुन गेले.
ती आपल्या खोलीतल्या रॉकिन्ग चेअरवर बसली. आजोबान्ची आठवण म्हणुन तिने ही खुर्ची हट्टाने आपल्या खोलीत आणली होती.तिच्यावर बसल्यावर आजोबान्च्या आशिर्वादाने सर्व गुन्ते अलगद सुटतात असा तिचा विश्वास होता.
दोन महिन्यांपुर्वीचीच गोष्ट. प्रक्टिकल संपल्यावर मनु आणि पल्लु प्रोजेक्टबद्दल चर्चा करण्यासाठी मनुच्या घरी निघाल्या होत्या. फ़ायनल वर्षाच्या फ़ायनल परीक्षेची जोरात तयारी चालु होती.


Kmayuresh2002
Friday, May 19, 2006 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया,सुरूवात चांगली आहे.. आता पुढची कथा लवकर आणि सलग पूर्ण कर..

Shreeya
Friday, May 19, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पल्लु आज सकाळपासुनच गम्भीर होति. काहितरी बिनसले होते हे नक्की!एरवी तिची बडबड काही केल्या
थाम्बत नसे.तिच्या बोलण्यापायी कित्येकदा सरान्ची बोलणी खाल्ली होती दोघीनी! एक्-दोनदा तर
वर्गाबाहेरही काढले होते त्याना.
घरी पोहोचल्यावरदेखील नेहेमीप्रमाणे सीतामावशीना चहा-पोहे किन्वा सरबत्-उपम्याची ऑर्डर तिने सोडली नव्हती.मनुचे मम्मी-पप्पा एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते.ते दुसर्‍या दिवशी येणार होते.त्यामुळे पल्लु रात्रभर राहणार होती.तशा सीतामावशी होत्याच!पण पल्लु असल्यामुळे प्रोजेक्टचा शेवटचा टप्पा पुर्ण करायचा असे
मनुने ठरवले होते.पण तिचे काहीतरी बिनसले होते त्यामुळे काय करावे हे मनुला सुचेना!पल्लुला पटकन बोलते करणे
मनुला तसे अवघड नव्हते.
तिने सीतामावशीन पन्हे करायला सान्गितले व ती फ़्रेश होउन आली. तोपर्यन्त पल्लु मनुच्या खिडकीतुन बाहेर एकटक
बघत बसली होती.सीतामावशीनी पन्हे आणुन दिले व त्या काही कामासाठी बाजारात गेल्या.मनुने ग्लास उचलुन
पल्लुच्या हातात दिला व म्हणली,"काही सान्गायचे आहे का मला?"
पल्लुने घटाघट पन्हे सम्पवले.मनु आपल्याला कण न कण ओळखते असे तिला वाटुन गेले,म्हणाली एवढेच की तुला
नाही तर कुणाला सान्गणार?आईवडीलानी मुलग शोधलाय लग्नासाठी!सध्या युएसलाच आहे पण तीन महीन्यानी
येणार आहे भारतात.तर आई-बाबान्चे म्हणणे की सध्या इ-मेल,चाटीन्ग करुन एकमेकान्ची मते जाणुन घ्या.
"मग तुला लग्न करायचे नाही का?यात एवढे सकाळपासुन सिरियस होण्यासारखे काय आहे?"मनु तिच्या डोळ्यात डोळे
घालुन म्हणाली.
हीचे डोळे खूपच छान आहेत हे पल्लुला परत एकदा जाणवले.
"तसे नाही ग पण अनोळखी माणसाशी मी पटकन कम्युनिकेट नाही करू शकत.माझा प्रॉब्लेम माहीत आहे न तुला?"
पल्लु उत्तरली.
मनु: पण ट्राय करायला काय हरकत आहे? हळुहळु सवय होईलच.
पल्लु: पण मला एकदम छान लिहिता येत नाही.तुझ्यासारखे छान विचार नाहीत माझे.मान्डताही येत नाहीत नीट.
मनु: समजुन घेइल ग तो!
पल्लु: खूप हुशार आहे म्हणे तो.फ़क्त कॉम्प्युटर कीडा नाही.खेळ,वाचन,निबन्ध,राजकारण सर्वान्ची आवड आहे
त्याला.खूपशी बक्षिसे मिळविली आहेत अभ्यासाशिवाय! तुझ्यासारखीच म्हण ना हवी तर!!
तिचा चेहरा पाहुन मनुला हसू यायला लागले होते.पण ते आवरुन कसेतरी म्हणाली,"खेळात कुठे ग मला काही
मिळाले आहे?"
पल्लु: माहीती किती आहे तुला!! मला तर एक सचिन तेन्डुलकर सोडला तर बाकीचे कोण कुठल्या खेळात आहेत हे
पण ठामपणे सान्गता येणार नाही.
मनु:ओह!.मग छान इम्प्रेशन पाडायचे आहे वाटत आमच्या जिजाजिन्वर!
पल्लु: हो ग पण मला तुझी यात मदत हवी आहे.
मनु: म्हणशील ती करीन. आफ़्टरऑल तु माझी जिवलग मैत्रीण आहेस.शिवाय मला लाडुही खायचे आहेत.
मनुनी आता चेष्टा सुरु केलि.
पल्लु अजुनही खुलत नव्हती."मनु,खरेच मदत करशील?" पल्लुने मनुचा हात हातात घेतला.
"हो ग अगदी नक्की!"मनु तिचा हात दाबत म्हणाली.
पल्लु: मग तू मी म्हणुन इ-मेल आणि चाटिन्ग करशील त्याच्याशी?
"काय?" मनु उडालीच. हे कसे शक्य आहे?
लग्नापुर्वी एकमेकाना समजुन घेण्याचा हा महत्वपुर्ण काळ! आणि त्यात हा विश्वासघात आहे असे मनुला वाटत होते.
पण शेवटी पल्लुने तिला आपले म्हणणे ऐकण्यास भागच पाडले. आणि तिचा होकार ग्रुहित धरुन पल्लुने एक अकाउन्ट
उघडलेही इ-मेल आणि चट्टीन्गसाठी!
"पोरीनो! जेवुन घ्या बर पटकन" सीतामावशीन्च्या हाकेसरशी पल्लु जाम भुक लागलीय मला असे म्हणत
खाली पळाली.
मनुही सम्भ्रमावस्थेत तिच्यामागोमाग जेवायला आली.
मावशीनी दोघीन्च्या आवडीचा मेथीची थालीपीठे,वान्ग्याचे दह्यातील भरीत,जीरा राईस असा मेनु केला
होता.पल्लुला परत नॉर्मल झालेले बघुन मनुला एका बाजुने बरे वाटत होते पण आपण मात्र पुरते या पल्लु
प्रकरणात अडकलो गेलोय असे तिला राहुन राहुन वाटत होते.
प्रोजेक्टचा फ़ायनल प्रोग्रम लिहीला अन दोघीनी झोपायची तयारी केली तेव्हा रात्रीचा दिड वाजुन गेला होता.
"कॉफ़ी घेणार का?" असे मनुने विचारताच पल्लु म्हणाली "नको ग! झोपतेच मी आता!पण जर बघ बर मेल आलीय का प्रथमची ते!"
ओह! नाव प्रथम आहे जिजुन्चे तर! मनुला नाव मनापासुन आवडले. तिने अकाउन्ट अक्सेस करायला पासवर्ड विचारला.
तर पल्लु म्हणाली या वर्षीचा नेहेमीचाच!
"म्हणजे मनस्वी४२२ तर" मनु पुटपुटली.
मानसी + पल्लवि यातुन त्यानी मनस्वी तयार केले होते व चौथ्या वर्षापासुन्ची मैत्री आणि चालु वय
बदलायचे असा दोघीन्चा पासवर्ड होता
मनुने अकाउन्ट उघडले अन प्रथमची मेल वाचुन तीला धक्काच बसला!
"वेन्धळे!नेहेमीप्रमाणेच माझेच नाव लिहीले आहेस तु मेलमध्ये!त्याला सान्गितले पाहीजे!"
"काही सान्गु नकोस ग! मी प्रत्यक्ष भेटल्यावर सान्गेन त्याला. आता उगाच चेन्ज करू नकोस.पहिल्यान्दाच माझा
वेन्धळेपणा कळायला नको" पल्लु उत्तरली व शान्तपणे झोपी गेली.
मनुलाही तिचा वेन्धळेपणा नवीन नव्हता पण आता मैत्रीखातर काहीहि करायची तिची तयारी झाली
होती.खाली जाउन तिने शान्तपणे कॉफ़ी बनवली.सीतामावशी निवान्त झोपल्या होत्या. कॉफ़ीचा मग घेउन ती वर
आली आणि तिने मेल लिहायला सुरु केली.

(क्रमश:-)


Dineshvs
Saturday, May 20, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया चांगली सुरवात आहे. अनुस्वाराच्या n च्या आधी एक पुर्णविराम दिला तर अनुस्वार दिसतो. जसा धर्मेंद्र हे dharme.ndra असे लिहायचे.

Dha
Saturday, May 20, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा छान वाटतेय,
आता please ही कथा लव्कर पूर्ण कर.

काही कथा अर्ध्यातच सोडल्या जातात, आणि मग अपेक्षाभंग होतो.


Kanak27
Monday, May 22, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It's too good . Waiting for next page.

Shreeya
Monday, May 22, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस झरझर पळत होते.कॉलेजची शेवटची टर्म,प्रोजेक्ट्स,प्रक्टिकल्स,सेमिनार्स यात दिवस कधी संपायचा ते कळत नव्हते. पण यातुनही वेळात वेळ काढुन मनु प्रथमला मेल करीत होती. तीच्या लाडक्या पल्लुसठी एवढे ती निश्चितच करू शकत होती.
प्रथमनेही पहिल्यांदा आपण एकमेकांच्या आवडी-निवडी जाणुन घेउ या,मैत्री करू या असेच मत व्यक्त केले होते.लग्नाविषयिचा निर्णय,जोडिदार म्हणुन एकमेकाना योग्य आहोत की नाही ही खूप नंतरची गोष्ट आहे. आणि तो निर्णय एकमेकाना प्रत्यक्ष भेटुन व शांतपणे आपला वेळ घेउन घ्यावा असे त्याला वाटते असे सान्गितल्यावर तर मनुला आपल्या डोक्यावरचे खूपस ओझे कमी झाले आहे असे वाटु लागले.
सुरुवातीला मोजुन मापुन क्वचित अडखळत लिहिणारी मनु हळुहळु चान्गलीच मोकळेपणाने लिहायला लागली.तिला आपल्याला एक चांगला मित्र भेटला असे वाटायला लागले.त्याबद्दल ती पल्लुला कयम सांगत असे.पण पल्लु मात्र तिच्यावर शम्भर टक्के विश्वास असल्याने आपणहुन जास्त विचारत नसे.
अगदी परीक्शेच्या काळातही मनु अर्धा तास का होईना त्याच्याशी संपर्क साधत असे. परीक्षा संपली अन मनुला भरपुर वेळ मिळू लागला. सकाळी उठल्यावर कधी एकदा प्रथमची मेल वाचतेय असे तिला होई. चाटीन्गचीही ती हल्ली हल्ली आतुरतेने वाट पाही.फोनलाअ मात्र तिने साफ़ नकार दिला होता.तिचे आणि पल्लुचे पितळ उघडे पडले असते ना!
पल्लुलाही ती जबरदस्तीने सर्व वाचायला देई.पण आता ती ही मावसबहीणीच्या लग्नाला बडोद्याला गेली होती. आता पन्धरा दिवस मनुला खायला उठणार असे मनुला वाटले.पण नाही या १५ दिवसात अगदी क्वचित तिला पल्लुची आठवण आली होती. रात्री या विचाराने खर तर मनु दचकलीच होती. नक्की काय झाले आहे आपल्याला?तिचे तिलाच कळेना.प्रथमच्या प्रेमात तर नाही ना पडलोय आपण? छे अजिबात नाही!कारण आपल्याला परदेशातला मुलगा मुळी नकोच आहे.
मम्मी-पप्पांपासुन खूप दूर राहु शकत नाही आपण.भारतात असलो की काय कधीही येउ शकू आपण त्यांना भेटायला. तसेच त्याच्याही आई-वडिलांनादेखील मुलाचा संसार कधीही पहाता यावा. कोण असणार आणि आपल्याएवढे करणार तरी कोण त्यान्चे? मनुने मान झटकली.
बरं एकदम मेल करणे ती कमी करू शकत नव्हती.त्याने फोन बिन केला तर? पल्लुही इथे नव्हती.काय करावे तिला कळेना.पल्लु आल्यावर मात्र ती यातुन बाहेर पडणार हे नक्की! तोपर्यंत थोडे दिवस चालु दे असा विचार करून ती मेलला उत्तर लिहु लागली. आणि अचानक दोन दिवसांपुर्वी प्रथमच्या मेलमधुन तिला कळले की अजुन एक्-दोन वर्षानी जर आर्थिक बाजु मजबुत झाली की तो कायमचा भारतात परतणार होता.तो ही त्याच्या फमिलिशिवाय राहु शकत नव्हता. आतापर्यंत त्याच्या बौद्धिक,वैचारिक प्रगल्भतेने भारावलेली मनु हे वाचुन परत एकदा तिच्याही नकळत त्याच्याकडे आकर्षिली गेली. दोन दिवस मनाचा कोपरा न कोपरा सांगत होता,होय तु प्रथमच्या प्रेमात पडली आहेस. तुला तो आवडतोय! आणि ती स्वत्:शीच परत परत नाकारत राहीली. हे नाकारणे वरवरचे आहे हे तिला कळत होते पण पल्लुचे काय? या प्रश्नांनन्तर ती परत या सत्याकडे पाठ फिरवित होती.
कडाडकड..... विजेच्या आवाजाने ती विचारांच्या गर्दीतुन भानावर आली. बाप रे! चान्गलाच पाऊस सुरु झाला आहे वळीवाचा!! छान होईल थोडासा गारवा येईल आता वातावरणात. मनु खुर्चीवरुन उठुन खिडकी बन्द करू लागली. एवढ्यात मनुची आई खोलीत आली व म्हणाली"अग पल्लुचा फोन आला होता.येतेय भेटायला तुला लगेच."
"मम्मा,एवढ्या पावसात? " मनुने आश्चर्याने विचारले.
"तुला माहीती आहे न तिचा स्वभाव! मी ही तिला समजावले पण गरमागरम कन्दा भजी तयार ठेवा म्हणाली. ड्रायव्हरबरोबरच येतेय गाडीने.तिच्या आईने सान्गितले आहे पोहोचल्यावर फोन करायला.जाते ग मी कान्दाभजीची तयारी करायला.दम नाही धरवणार तिला." बोलता बोलता आई घाईत निघुनही गेली.
मनुला पल्लुच्या सामोरे जाताना उगीचच अपराधी वाटत होतं. ती मात्र नेहेमीसारखीच चिवचिवाट करत खोलित शिरली. गळाभेट झाल्यावर आज तिने पहिल्यांदाच प्रथमबद्दल विचारले. मनुनेही ठरवल्याप्रमाणे सर्व माहीती दिली व आता तु सर्व सांभाळ असे सांगितले. पण आपला आवाज भरुन आलाय हे तिला जाणवले.
पल्लुने शांतपणे तिला जवळ बसवत विचारले,"मनु काय झाले? प्रथमच्या प्रेमात तर नाही ना पडलीस?"
मनुला रडावेसे वाटले.कितीही झाली तरी ती तिची जिवलग सखी होती.काहीहि न सांगता सर्व काही ती ओळखू शकत होती.पण कसेबसे ईतकेच म्हणाली"नाही ग काहीतरीच तुझे?"
पल्लु डोळ्यात डोळे घालुन सान्ग बर हेच!! आणि मनु तिच्या कुशीत शिरुन रडु लागली.माफ कर,मलाही काही कळले नाही असे काहीतरी म्हणु लागली. आता पल्लु आअपल्याशी मैत्री तर तोडणार नाही न,ती आपल्यापासुन दूर तर नाही न जाणार असे तिला मनोमन वाटु लागले.
पण कसचे काय, पल्लु खो-खो करुन हसत सुटली होती. तिने पटकन खाली जाउन मनुच्या आई-बाबांना बोलावले व म्हणाली,"काकु,चला लग्नाची तयारी सुरु करा बरं"
मनुला गोंधळली पाहुन तर तिघांना हसु फुटले. पण शेवटी पल्लुच म्हणाली,"मनु, हा खरा काक-काकुंचा प्लान. मी फ़क्त सान्गकामी. प्रथमचे स्थळ त्यांना हातातुन जाउ द्यायचे नव्हते.पण मुलगा अमेरिकेतला आहे मग तु काहीच ऐकुन घेतले नसतेस! म्हणुन हे सर्व! "
"म्हणजे तु जाणुन्-बुजुन माझे नाव घातले होते तर आणि..." मनुला अजुनही काहीच खरे कळत नव्हते.
"ते सर्व नाटकच होते" पल्लु तिला तोडत म्हणाली."बाईसाहेब, आता तरी मान्य करा की प्रथम आवडतोय ते!"
"चल काहीतरीच !" मनु लाजुन पपांच्या कुशीत शीरली.
"पण पल्लवी मडम तुमची खुशखबरी सान्गा ना आता. मगाशी तुझ्या आईने सांगितले सर्व काही" मनुची आई आता पहिल्यान्दाच बोलली."मावस बहीणीचीच धाकटी जाऊ होणार आहे आता पल्लु!"
"काकु काय हे!" पल्लु लाजेने चांगलीच गोरीमोरी झाली होती.
"बर पोरिनो! बसा आता निवांतपणे बोलत. मी काहीतरी पाठवते खायला दोघीना पण पहिल्यांदा देवाला काहीतरी गोड दखविते" मनुची आई खाली जात म्हणाली. बाबाही दोघींकडे मिश्किलपणे बघत हासत होते.
"पाऊस थांबला वाटते" पल्लु खिडकी उघडीत म्हणाली.
वळीव थांबला होता. वैशाखात तापलेली सृष्टी
आता वेगळीच भासत होती.काही न बोलता दोघीजणी तिचे नवीन रूप डोळ्यात साठवीत होत्या.

(समाप्त)










Princess
Tuesday, May 23, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया, खुप सुरेख लिहिलिस कथा.

Maudee
Tuesday, May 23, 2006 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया,
तुझी भाषाशैली ख़ूप छान आहे....आणि कथा पण:-)


Dhani
Tuesday, May 23, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहलयस श्रीया, sweet, cute. मला गोष्ट आवड्ली, fairytale सारखी आहे.

Jayavi
Tuesday, May 23, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिया, मस्त ओघवत्या शैलीत लिहिली आहेस गं. 'माझ्याऐवजी तू मेल पाठवशील का' असं जेव्हा पल्लु म्हणते ना तेव्हा पुढची थोडी कल्पना आली होती......पण हा आई बाबांचा प्लॅन होता हे मात्र डोक्यात आलं नव्हतं. सुरेख! खूप आवडली तुझी गोष्ट.
तुझ्या पुढच्या लिखाणासाठी खूप सार्‍या शुभेच्छा :-)


Dha
Tuesday, May 23, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिया, कथा खूप छान आहे. मला माझ्या जिवलग मैत्रिणीची आठवण झाली. माझ्याकडून प्रेम कबूल करून घेण्यासाठी तिनेही अशिच नाटकं केली होती.

Meggi
Tuesday, May 23, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया, cute च गं... कथेचं नाव पण खुप छान निवडलस :-)

Pavbhaji
Tuesday, May 23, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया, मस्तच लिहिली आहेस कथा!

Marathi_mitra
Tuesday, May 23, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया,
कथा फारच छान उतरली आहे.

अमोल


Jyotip
Tuesday, May 23, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया..सुरेख़ लिहील आहेस... तुझ्या पुढच्या लिखाणासाठी खूप सार्‍या शुभेच्छा

Rachana_barve
Tuesday, May 23, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया मस्तच :-) cute ... ..

Savani
Tuesday, May 23, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया, छान आहे गं पहिला प्रयत्न. अशीच लिहित रहा. तुला शुभेच्छा!

Shreeya
Tuesday, May 23, 2006 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्र-मैत्रिणीनो!!
माझ्या पहिल्याच लेखनाला प्रतिसाद दिल्याबद्दल!
शुद्धलेखनाच्या जरा चुका झाल्या आहेत पण पुढच्या वेळेस सुधारायचा नक्की प्रयत्न करीन!
पुन्हा एकदा धन्यवाद!


Rupali_rahul
Thursday, May 25, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया खरच खुप छान कथा. पहिली कथा असुनही मांडणी, हाताळणी, लेखनाची शैली मस्तच....




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators