Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मायबोलिवरील आगामी कार्यक्रमांची रुपरे...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » विनोदी साहित्य » मायबोलिवरील आगामी कार्यक्रमांची रुपरेषा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 18, 200620 05-18-06  5:41 pm

Indradhanushya
Friday, May 19, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या मस्तच रे :-)
>>>>मीनु लिहिले आहे ना साडी दोन्-तीन इंच वर तरंगते म्हणुन
बाई तरंगतेय की...

Kmayuresh2002
Friday, May 19, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु,सहीच गं.. पण रंपाचा इतक्या वेळा उल्लेख होऊनही सरदार सुशिलचंद्रांचे नाव तू यात न घेतल्याबद्दल तुझा रंपा पंचायत, अखिल गडकरी समाज आणि कोथरुडकर मंडळातर्फ़े जाहीर निषेध:-)
लिंब्या,चित्तर झ्याक रे भो.. अशी दिसती व्हय रे आपली मीनुताई? लई भारी:-)


Zakki
Saturday, May 20, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रं पा. चा मी आद्य सभासद. ही पंचायत storvi यांच्या शाळेत ह. ह. इ. नी चालू केली.
'अखिल गडकरी समाज आणि कोथरुडकर मंडळ' यांनी आमची परवानगी न घेता, ठरलेली हजार अमेरिकन डॉलर ही फी खजिनदार (पक्षी मी) यांच्याकडे तीन दिवसात पोचती न केल्यास आमचे वकील श्री. रॉबिनहूड हे तुमच्यावर खटला भरतील, मग तुम्ही कितीही लाच दिलीत तरी तुमची सुटका नाही! हे लक्षात घ्यावे!! तर असा हा 'केला इशारा जाता जाता'!



Pendhya
Saturday, May 20, 2006 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू, छान रुपरेषा!
कार्यक्रमाच्या रुपरेषेत, चहाची सोय, न चुकता केल्या बद्दल आभार.
रंपाचा ऊल्लेख, ....... ऊल्लेखनीय!

केल्याने देशाटन बीबीटन, म्हणतात ते हेच.


Meenu
Monday, May 22, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षमा अध्यक्ष महाराज, घोडचुकचं झाली म्हणायची सरदारांचं नाव अस कस राहिलं?

एक डाव माफि करा... सरदारांकडे सविस्तर माफिनामा पाठवुन देते.

आणी बाकि दिसते अशीच रे फक्त दुसरा हात तेवढा जर कमरेवर ठेवला आणी पदर घट्ट खोचला कि अगदि बरोबर... :-)

(स्वगत... या झक्कि बाबांशी तहाची बोलणी करायला लिंबु भाऊ ला धाडलं मंडळानी तर कमी रकमेत काम होईल का?)


Ramachandrac
Monday, May 22, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनु सही लिहल आहेस...लगी रहो..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators