Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 12, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » इतर कला » माझी चित्रकला » Archive through May 12, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Tuesday, May 09, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता, मराठीतुन फारच कमी पुस्तके उपलब्धहेत! शिवाय, सर्व पुस्तके काय सराव करायचा ते सान्गुन सरावाची अपेक्षा करतात! त्यासाठी पुस्तकाच्या दुकानात जाऊन वेगवेगळी पुस्तके बघुन आपल्या चालू क्षमतेनुसार पुस्तक निवडणे केव्हाही चान्गले मात्र
त्या आधी, मी तर असे सान्गिन की कोणताही उद्देश मनात न ठेवता रेषा अन रन्गान्शी भरपुर खेळ, शब्दशः खेळ.. खेळता खेळता चित्रकलेची नैसर्गिक भाषा तुला कळु लागेल, ती कळली की मग पुस्तकान्चा उपयोग केवळ रन्ग, कागद, ब्रश यान्ची नविन तन्त्रे समजुन घेण्यासाठी होतो!
की बोर्ड बदडायला जसा टायपिन्गचा सराव लागतो अगदी तस्सेच, आपला हात सफाइदार पणे फिरण्यास, मग ते पेन्सिलचे काम असो की चारकोल चे, खडु असोत की ब्रश, योग्य दाब, योग्य वळण, योग्य गती असे जमण्यास रफ कागदान्वर केलेला भरपुर सराव महत्वाचा! वेळेला आठ बाय आठ इन्चान्च्या कागदा पासुन ते आठ बाय आठ फुटान्च्या घरच्या फरशी पर्यन्त काहीही या सरावासाठी वापरता येते!
हाताच्या रेखाटन आणी ब्रशवरच्या सफाइ बरोबरच, बाजारात ऍनॉटोमी वरची जी पुस्तके मिळतात ती घेऊन त्यान्चे निरीक्षण आणि अभ्यास करावा! ज्यामुळे केवळ निसर्गचित्रात अडकुन न पडता जिवित सृष्टीची बाकीची हलती चालती बोलती अन्गे हेत त्यान्चे प्रमाणबद्ध चित्रण करणे सोपे जाते!
तुझा प्रश्ण बरोबर हे, कोणे एकेकाळी मी आर्टिस्ट म्हणुनच नव्हे तर आर्ट टीचर म्हणुन पण वावरलो हे! (ते वावरण आता इतिहासजमा झाल हे पण तुझ्या पोस्ट मुळे आठवणीन्ना उजाळा मिळाला येवढेच)

आता कोणतरी येईल अन ह्या पोस्ट इथे का अशी विचारणा करणारच नाही याची खात्री मी देऊ शकत नाही म्हणुन इथुन आता कलटी मारतो!
DDD

Smi_dod
Tuesday, May 09, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरोखर मस्तच सांगितले.ईतकी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुझे शतश धन्यवाद

Kashi
Tuesday, May 09, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

smi milind mulik chi pustaka changli aahet.
ek navin pustak aahe jotsna prakashanche..shivaji tupenche .very useful..baki tar practice hech saglyaat uttam marga.
limbu..tumhi nav limbutimbu he dharan karta..pan murlele gadi aahat..

Dineshvs
Tuesday, May 09, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु, smi_dod आता बाजारात मराठीतहि खुप छान पुस्तके आहेत या विषयावर. स्टेप बाय स्टेप नाही, पण बर्‍यापैकी मार्गदर्शन आहे. त्यातली चित्रे बघुन वाटते असे नुसते स्केच ईतके सुंदर असु शकते, क्रेयॉन्स ने ईतके जिवंत चित्र काढता येते ?
खुप वर्षे जरी मधे गेली असली तरी हि पुस्तके परत एकदा आपल्याला प्रयत्न करायला भाग पाडतात.


Smi_dod
Tuesday, May 09, 2006 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार दिनेश, या पुस्तकांची नावे देता येतील का? धन्स,काशी दिनेश

Dineshvs
Wednesday, May 10, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्योत्स्ना प्रकाशनने, राहुल देशपांडे आणि गोपाळ नांदुरकर या चित्रकारद्वयींची पुस्तके प्रकाशि केली आहेत.
कलर पेंसिल, रंगमाध्यम परिचय असे नाव आहे. हि एक मालिकाच आहे.


Smi_dod
Wednesday, May 10, 2006 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा धन्यवाद दिनेश, मी आता ही पुस्तके आणेन...

Dineshvs
Thursday, May 11, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याला नाही मिळाली तर मुंबईला आयडियल मधे नक्कीच मिळतील.
पण प्रकाशक पुण्याचेच आहेत, पत्ता असा

ज्योत्स्ना प्रकाशन
धवलगिरी.
४३० ३१, शनिवार पेठ
पुणे ४११ ०३०

आणि माझे आभार मानण्यापेक्षा, स्वहस्ते काढलेले चित्र, ईथे पोस्ट केले तर जास्त आनंद होईल मला.


Smi_dod
Thursday, May 11, 2006 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काढलेले बरेच चित्र आहेत पण ईथे ते कसे पोस्त करयचे ह प्रश्न आहे कारण ते कॉम वर नाही तर कागदावर काढलेले आहेत

Limbutimbu
Friday, May 12, 2006 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मगाच्या दहा मिन्टात मी एक चित्र काढायचा प्रयत्न केला हे!

विशेष सुचना: वरल्या चित्रात दिसल्याप्रमाण कुणी दिसल्यास लगी लगी त्या व्यक्तीला, "तुला लिम्ब्या भेटला होता का" अशी त्या व्यक्तीची उलटतपासणी घेवु नये! DDD

पन्चान्गात सन्क्रान्तीच वर्णन असत तस हीच वर्णन म्हन्जे,
ऐऽऽका भाडळीचा सहदेव सान्गतो या कर्मा, हिची कहाणी.... ती हिरवळीवर आरुढ झाली असुन अदिदास चे शूज पश्चिमेला काढुन ठेवले असुन ती इशान्येकडे पहात आहे, तिने खुरमान्डी घातली असुन डाव्या हातात पुस्तक धरुन उजवा हात जमिनीला टेकवला हे, तिने केस मोकळे सोडले असुन ती प्रसन्नवदना आश्चर्य व कुतुहल मिश्रित नजरेने पहात हे, ती उत्तरेकडुन येवुन पुन्हा उत्तरेकडे जाणार हे, अग्निरथ हे तिचे वाहन असुन ती सुलक्षणी हे व आर्द्रा नक्षत्रावर तिचे आगमन असुन त्यानुसार यन्दा भरपुर पाऊस, भरपुर पीक येणार असुन व्यापार उदिम तेजित चालेल, विद्द्यार्ठ्यास हे वर्ष कठीण जाणार असुन, उन्हाचा कडका वाढणार हे! तिची नजर अर्धोन्मिलित नसुन शोधक हे तर अनेकानेक गुन्हेगार या वर्षात गजा आड होतिल... तिने शुज काढुन बसल्यामुळे, यन्दाच्या वर्षात धार्मिक नैतिकतेच्या वातावरणाचा सगळीकडे जोर राहील या बोलान्नी भाडळीचा सहदेव ऐकल ना सान्गितली भावणुक... ओम नम शिवाय!!


Rutu_hirwaa
Friday, May 12, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बुजी

चुकून फिरता फिरता इथे आले
चुकून म्हणायचे कारण एवढेच की...मला चित्रकलेतले ओ की ठो पण नाही कळत(म्हणजे ओ काढायला गेले की ठो होतो...)

पण तरीही हे चित्राचे वर्णन वाचून भयानक हसले...
तुम्ही सही आहात बास....तुमच्या सगळीकडच्याच पोस्ट्स मला लै लै आवडतात..


Smi_dod
Friday, May 12, 2006 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु....सही... चित्र छान आहे... पण त्यापेक्षा वर्णन भन्नाट आहे

Lopamudraa
Friday, May 12, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु... वर्णन फ़ार भारी केलय....(जे फ़क्त तुलाच जमते)..
तुझे उत्तर मिळाले नाही बरा का... !!!!


Limbutimbu
Friday, May 12, 2006 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुतु हिरवा, स्मिता, लोपामुद्रा, प्रतिक्रियान्बद्दल तुमचे मनःपुर्वक आभार! :-)
रुतु, तुला माझ्या पोस्ट्स आवडतात हे वाचुन बरे वाटले! :-)
स्मिता, लोपा, वर्णन अगदी सहज आठवल तस केल... नशिब "तिने फिक्कट निळी जीनची पॅण्ट घातली असुन त्यावर शुभ्र पान्ढरा टॉप घातला हे, काखेत मोतीया रन्गाची कापडी ढोकटी पर्स अडकवली असुन तिच्या समोर भेळीचा पुडाहे" इत्यादी इत्यादी वर्णन लिहायला मला सुचल नाही... DDD
एनीवे, तुमच्या प्रतिसादाने हुरुप टिकुन रहातो! :-)
लोपामुद्रा, तु कसला प्रश्ण विचारला हेस? कुठ? कधी?


Krishnag
Friday, May 12, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु, चित्र चांगलय पण संक्रांतीच्या रुपात वर्णिलं????


Moodi
Friday, May 12, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्र तर झकास हे रे लिंब्या. ही एखादी गडकरीण वाटतीय मात्र. नवीन की जुनी रे?

Limbutimbu
Friday, May 12, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>> पण संक्रांतीच्या रुपात वर्णिलं????
अस्सा कसा रे किस्ना तू! तीकड त्या क्रशच्या बीबीवरच्यान्ना विचार.... ते सान्गतिल..... सन्क्रान्तीच्या फेर्‍याप्रमाणच क्रशचा फेरा कसा अस्तो ते! :-) अवतीभवती कुठ अस्तित्व जाणवल तरी धडधड वाढू लागती....! फाऽऽर काय? मनातल्या मनात आठवल तरी मन दोलायमान होत!
मूडी, मला काय माहीत?
गडकरीण दाखवायची अस्ती तर अस्सल मराठमोळी, नऊवारी नेसलेली, कपाळीला कुन्कवाची चन्द्रकोर रेखलेली, नाकात नथ अन कमरेवर पाण्याचा हन्डा किन्वा दुधाची कळशी अशी दाखवली नस्ती का? DDD


Lopamudraa
Friday, May 12, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

limbu, tulaa mail keliye.. .. .. . .!
सन्क्रांतीच्या फ़ेर्‍यासारखा crush चा फ़ेरा असतो.....

Charu_ag
Friday, May 12, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या, तुझे म्हणजे तू काढलेले चित्र आणि त्याचे वर्णन दोन्ही आवडले.

Chinnu
Friday, May 12, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बुभाव, यु रॉक! चित्र भारी, वर्णन लयी भारी! तुमची पोष्टलेली सगळी चित्रे आवडलीत बरं का!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators