Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 09, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » इतर कला » माझी चित्रकला » Archive through May 09, 2006 « Previous Next »

Kashi
Saturday, April 29, 2006 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala chira post karayce aahe pan tyachi size 50kb peksha jasta hote..to reduce size kay karave?

Dineshvs
Sunday, April 30, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक सोपा ऊपाय म्हणजे ते चित्र पेंटब्रश मधे ऊघडायचे आणि Image-strech-skew करुन ७० % साईझ कमी करायचे. मग वेगळ्या नावाने सेव्ह करायचे. साझ बघायची. असे दोनतीनदा केले कि ५० च्या आता साईझ होते.
मग पोस्टुन टाकायचं.


Kashi
Thursday, May 04, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thankx...dinesh..now i can post my chitra..


Kashi
Thursday, May 04, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maze water colour madhle ek chitra...water colour around 20 varshani vaparte aahe...my drawing

Charu_ag
Thursday, May 04, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kashi , अप्रतिम आहे चित्र. फोटोचा भास होतोय, इतकं खरखुरं वाटतय. सुंदर.

Chinnu
Thursday, May 04, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी, अतिशय सुंदर चित्र! एक शंका आहे. त्या मुलाला आणि उजव्या बाजुच्या पानांना पाहिले तर प्रमाणाची गडबड नाहि वाटत?
बाकी रंगसंगती उत्तम आहे.


Moodi
Thursday, May 04, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी कसे ग एवढे अप्रतीम चित्र काढलेस? व्वा!!
चिनु म्हणतेय त्याचा मात्र विचार कर. तो मुलगा हरवलाय त्या रंगात. विरुद्ध रंगछटा घे.


Dineshvs
Thursday, May 04, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशि, चित्र छानच आहे. २० वर्षानी असे म्हणायची काहि गरज नव्हती.
ईतक्या मोठ्या पानाची झाडे आहेत ईथे, पण ती जरा गडद असतात. शिवाय मुलाच्या मागे असणार्‍या झाडाची छटा निळसर हिरवी हवी होती.
पण तरिही चित्रकाराचे स्वातंत्र्य मला मान्य आहे.


Jo_s
Thursday, May 04, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kashi sundarch aahe chitra. agadi photo saarakha.

Limbutimbu
Friday, May 05, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वॉटरकलरमधे...! गुड, सुन्दर चित्र काढल हे :-)
वॉटरकलर वापरणे खुप अवघड अस्ते!


Maudee
Friday, May 05, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्र अप्रतिम आहे...... just excellent

Rupeshtalaskar
Saturday, May 06, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi
मी माZया
website वर काही concept arts upload केल्या आहेत जमल्यास तुमच्या commends तीथे post क्रा.

my website
http://www.rupeshtalaskar.blogspot.com/






Jayavi
Sunday, May 07, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश, खूप सुरेख !! सगळीच चित्रं आवडली तुझी !!
काशी, अप्रतिम !!


Kashi
Monday, May 08, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saglyana dhanyavad..etke divas water colours..vaprat navte..khup avghad vatayche pan atta prayatna karayla zan vatate aahe..tumchya pratikriya pahun hurup vadhala.

Smi_dod
Monday, May 08, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी आतिशय सुंदर अप्रतिम तु काय आर्टिस्ट आहेस का ग?मला असे चित्र काढायला शिकायचे आहे? कारण वॉटर कलर चे तंत्र मला शिकुन घ्यायचे आहे.मी एक छंद म्हणुन वॉटर कलर पेंटिग करते.तुला काही माहिती असल्यास सांग

Kashi
Tuesday, May 09, 2006 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Smi..artist vagre nahi..mi pan haushi kalakar aahe..etke divas oil madhya karayche...ata water colours try karte aahe..

Smi_dod
Tuesday, May 09, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मला शिकायची आहे तंत्रशुध्द चित्रकला.कोणी मला काय करावे याचे मार्गदर्शन करेल का?

Limbutimbu
Tuesday, May 09, 2006 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता, काय काळजी घ्यावी हे सान्गता येत! कोणत चित्र कस काढ हे लिखित स्वरुपात सान्गण अवघड हे!
वॉतरकलर वापरताना पुढील काळज्या घ्याव्यात!
१. कागद शक्यतो गुळगुळित किन्वा "आर्ट पेपर" असु नये, असल्यास पेपर आडवा ठेवुन चित्र काढावे लागते अन्यथा ओघळ येतात! सरावा नन्तर तिरका उभा ठेवुन चित्र काढता येते! मात्र चकाकदार चित्र होण्याकरता आर्ट पेपर उत्कृष्त! यावर पोस्टर कलर तसेच ऍक्रेलिक कलर्स छान दिसतात!
२. कागद जर जाडसर "ड्रॉइन्ग पेपर" किन्वा "कॅनव्हास" असेल तर स्टॅण्डवर तिरके ठेवुन चित्र काढता येते व शक्यतो तसेच भिन्तीला किन्वा स्टॅण्डला तिरके ठेवुन काढावे
३. चित्र काढताना आधी रफ स्केचेसनी नेमके जे काढायच हे त्याcआ सराव वेगळ्या कागदान्वर करुन घ्यावा! एकदा जे काढायच हे ते मनःचक्षुन्पुढे उभे राहीले की मगच मुख्य कॅनव्हॉसला हात घालावा!
४. कागदावर हलक्या हाताने पेन्सिलने ढोबळ चित्र काढुन घ्यायची पद्धत हे! मात्र नवशिक्यान्नि एक काळजि घ्यावी की या रेषान्चा काळा रन्ग नन्तरच्या रन्गकामात बाधा आणणार नाही. सरावाने नन्तर चित्राच्या विषयानुरुप रन्गसन्गतीप्रमाणे जो बेसिक वॉश देवुन घेतला जातो त्या वॉश मध्येच चित्राची रुपरेषा रेखाटता येते व पेन्सिल वापरायची गरज पडत नाही.
५. कोणत्याही माध्यमातून चित्र रन्गवताना आधी दुरच्या प्रदेशाचे दिसणारे चित्रीकरण करुन रन्ग भरले जातात, जे दिवसाची वेळ असल्यास बहुदा फिक्के असतात व अन्धाराची वेळ असल्यास डार्क! त्यानन्तर क्रमाक्रमाने अलिकडिल बाबी चितारीत जाव्यात
६. कागद आर्ट पेपर असल्यास आधी दिलेला रन्ग वाळण्यास वेळ लागतो तर कॅनव्हास किन्वा जाड ड्रॉइन्ग पेपर असल्यास रन्गातील पाणी झटकन शोषले जाऊन ब्रश कोरडा पडु शकतो! वॉटरकलर मध्ये चित्र काढताना ब्रशच्या ओलाव्याकडे लक्ष देणे अत्त्यावश्यक असते व गरेजे नुसार आणि कागदाच्या प्रकारानुसार रन्गाचे ब्रशमधिल वहाते स्वरुप निश्चित करावे लागते. जसे की थबथबलेला ब्रश, नुस्ता ओला, जवळपास कोरडा करत आणलेला, किन्वा फक्त टोकाला रन्ग घेतलेला वगैरे!
७. वॉटरकलर मधे चित्र काढताना सगळ्यात जास्त गरज असते ती धीराची! आधि दिलेला रन्ग वाळण्याआधिच दुसरा रन्ग देणे किन्वा नाही देणे हे चित्राच्या विषयानुरुप ठरते, पण ते टायमिन्ग जमविताना शब्दश जेव्हा धीराने वाट बघायला लागते ते अवघड असते. अशा वेळेस, थेवलेल्या चित्रा पासुन दोन, चार, सहा, आठ फूट अशा अन्तरावर जावुन आपले चित्र निरखुन बघणे! कधी डोळे किलकिले करुन तर कधी सताड उघडे थेवुन! असे पाहिल्यास चित्रात काय चुकते आहे, काय सुधारणा करु शकतो याचे ज्ञान होते
८. सुरवातीस कोणतीही नवि शेड तयार करुन मूळ चित्रावर लावायच्या आधी काही रफ कागद बरोबर ठेवुन त्यावर ऍप्लाय करावे म्हणजे रन्गकामात चूक होण्याची शक्यता मावळते
९. कोणताही रन्ग कालवुन वापरताना आवश्यक तेवढा पुरेपुर रन्ग घ्यावा, वाया जाईल ही भिती मनातून काढावी अन्यथा वॉश किन्वा मोठ्या भागात सलग रन्ग वापरताना मधेच रन्ग सम्पला तर पुन्हा तशीच शेड बनविणे अवघड जातेच शिवाय नव्याने रन्ग कालवेस्तोवर आधी दिलेला रन्ग वाळुन नवा रन्ग आणि आधिचा यात सुक्ष्म सीमारेषा तयार होते.
१०. शुन्य ते सहा नम्बर पर्यन्तच्या ब्रशचे काम सगळ्यात शेवटी ठेवावे जेव्हा मोठ्या आकाराने रन्ग लेपन करायचे काम आधी करावे.
११. चित्राचा आकार जसा महत्वाचा तसेच रन्गकाम ही तितकेच महत्वाचे! त्यात अनेक प्रयोग करता येतात, चित्राच्या विषयाप्रमाणे, रन्ग लेपनाच्या पद्धतीत बदल करावा लागतो. सहसा फ्री हॅण्डवाले मिनिएचर चित्रान्च्या वाटेला जात नाहीत, प्रत्येकाचा एक ट्रेण्ड, सृष्टीकडे बघण्याची नी त्याला समजुन घेण्याची एक नजर असते, त्यानुसार तो विषय निवडतो आणि भरीव, ढोबळ किन्वा बारकाईने रन्ग काम करतो
१२. महत्वाचे म्हणजे, काधलेले चित्र हेच अन्तिम हे किन्वा अन्तिम दर्जाचे आहे असे स्वतःहुन कधिही समजुन घेवु नये! भले लोक कौतुक करत असतीलही किन्वा बक्षेसेही मिळत असतील... अधिकाधिक परीपुर्ण होण्यासाठी सातत्याने सराव हवा! अगदीच सुरवातीला फार मोठ्या आकाराच्या किन्वा क्लिष्ट विषयान्ची चित्रे निवडु नयेत, पुर्ण न झाल्यास किन्वा समाधानकारक न उतरल्यास निराशा येवु शकते!
आजची ही सहा हजार सातशे एकावी पोस्ट चित्रकलेकरता समर्पित!
यात चुकभुल असल्यास देणे घेणे
:-)

Smi_dod
Tuesday, May 09, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लिंबु, तु पण आर्टिस्ट आहेस का? तुझी या विषयाची जाण उत्तमच दिसते. मी साधारण तु सांगितल्या प्रमाणे बर्‍याच गोष्टी करते. पण मला अगदी शास्त्र शुध्द शिकयाचे आहे.त्यासाठी एखादे पुस्तक किंवा अजुन काही मला मिळेल का?

Smi_dod
Tuesday, May 09, 2006 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच माहितीपुर्ण लिहीलेस.परत एकदा धन्यवाद...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators