|
>>>>> समजा फ़ुटकळ कारण असेल तर आणखी दुःख नाही का होणार? दुःख कशाचे? "निर्णय" चुकल्याचेच ना? तेच तर काही वाचकान्ना समजुन घ्यायच हे की निर्णयाच्या ठामपणाशिवायही काही पर्यायान्चा विचार "निर्णयातील" ठामपणा राखुन पण "निर्णयातील" वैविध्यतेने करता आला नसता का? आईवडील पाच पन्चवीस वर्षे वाढवितात म्हणुन कारण जाणुन न घेता घेतलेला निर्णय म्हणजे आन्धळी निष्ठा होत नाही का? अशा आन्धळ्या निष्ठेचा आक्षेप घेण्या आधी कारण समजुन घेणे काही वाचकान्ना जरुरीचे वाटले असावे! एनिवे, कूल, कथा छानच लिहिली हेस यात वाद नाही! 
|
Smi_dod
| |
| Wednesday, May 10, 2006 - 1:35 am: |
| 
|
कुल,कथा छान मांडली आहे पण कथा वाचल्यावर काहीतरी राहीले असे वाटते.. मला वाटते आई खरे कारण काय सांगते ते न कळाल्या मुळे असावे..
|
कुल कथा खुपच हळवी आणि छान पण खरच मलाही असे वाटते की ते कारण कळावे.
|
Gs1
| |
| Wednesday, May 10, 2006 - 6:10 am: |
| 
|
कारणावरून त्याचा निर्णय चूक की बरोबर ठरवणारे आपण कोण ? त्यामुळे कथेत कारण गुलदस्त्यात ठेवले आहे तेच योग्य, नाहीतर कथेचा मूळ विषय बाजूला आणि इथे कारणावरून v&c जुंपले असते. वाचकांचे ठीक आहे, पण तोलाही कारण कळले नसेल तर मात्र त्याच्यावर अन्याय झाला असेच वाटते.. बाकी काय, यथा काष्ठं च काष्ठं च म्हणायचे आणि पुढे जायचे... भावुक, प्रामाणिक शैलीत लिहिलेली कथा.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:43 pm: |
| 
|
अनिलभाई, सांगत्ये ऐका चा शेवट पण तुम्ही लिहिल्याप्रमाणे होता. चंद्र आणखी पृथ्वी यांचे काय असावे नाते, या गाण्यात हा मुद्दा आलाय, त्या सिनेमात.
|
Arch
| |
| Wednesday, May 10, 2006 - 1:38 pm: |
| 
|
Cool बाकी काही असो पण कारण काय असेल ते समजण्यासाठी प्रत्येकानी गोष्ट पूर्णपणे वाचलेली दिसते. हेच तुझ्या गोष्टीच यश. माणूस नेहेमी दुसर्याने बरोबर decision घेतल की नाही हे ठरवायला खूप अधीर असतो. आणि ही गोष्ट सत्यकथेवर आधरीत असल्यामुळे मलाही कारण समजल असत तर गोष्ट अधूरी वाटली नसती. असो.
|
सुंदर कथा, पण आयुष्यात असा निर्णय घ्यायला लागणे खरच दुर्दैवी..., अन्याय च झाला असे वाटते..., आपल्यावरच्या अन्यायाचे कारण " तो " ला मात्र नाक्किच कळायला हवे...
|
कथा खुपच हळवी होती पुर्ण touchy वाटली निख्खळ प्रेमाची भावना खुप सुरेख असते 'कारण' काय असेल हे जाणुन घ्यायला बहुतेक आपली human tendency आहे. कुतुहलता? चुक की बरोबर निर्णय? हट्ट मलाही कुतुहल होते पण मला वाटले की एवढे प्रेम असताना,आई वडील open-minded असताना का नाही 'त्याने' विश्वासात घेवून स्वःताच्या आईला कारण विचारले? कधी कधी मला असे वाटते अई वडील ह्यांना काही hidden facts मुलेही पटवुन शकतात. माहीत नाहे एथे काय situation होती पण हे आपले माझे मत. वाचकांना 'कारण' सांगणे म्हत्वाचे मला तरी वाटत नाही कारण ही सत्य घटना असल्याने कदाचीत ते सांगणे उचीत नाही. आणि वाचकांनी हट्ट करणे चुकीचे आहे असे आपले माझे मत आहे. कोणास ठावूक 'कारण' कदाचीत ज्यास्त दुख देवु शकणारे पण असु शकते शेवटी आता ह्या क्षणाला 'कारण' discuss करुन, तो निर्णय चुक का बरोबर हे discuss करुन 'त्या' कथेतील नायकाला का दुखीः करा आता? मुलीचे लग्न झाले आहे तेव्हा काही अर्थ ही नाही आता life moves on
|
Yog
| |
| Wednesday, May 10, 2006 - 3:46 pm: |
| 
|
Cool, कथा सुन्दर लिहीली आहेस.. सत्यकथा असल्याने कारणमिमांसा अनावश्यक आहे. cause i think this is a story of what happened more so how it ended than "why" मला तुझ्या कथेतील खालील वाक्य कथेचा मूळ गाभा किव्वा सूत्र असल्यागत भासल : "हिम्मत असेल तर एकमेकान्च्या प्रेमात आणि आठवणीत आयुष्य जगवून दाखवा.."
|
>>>>>>>> माणूस नेहेमी दुसर्याने बरोबर decision घेतल की नाही हे ठरवायला खूप अधीर असतो. अर्थात आर्च, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने माणुस दुसर्याच्या बरोबर किन्वा चुकान्वर लक्ष ठेवुन असतो! हे नैसर्गिक हे, त्यात गैर काहीच नाही! अन त्यामुळेच "ते" कारण काय होत याची उत्सुकता हे!
|
Kanak27
| |
| Tuesday, May 16, 2006 - 6:03 am: |
| 
|
कथा खुप सुन्दर आहे. पण एखाद्या शुल्लक कारणा मुळे का म्हणुन विरह सहन करावा
|
Psg
| |
| Tuesday, May 16, 2006 - 6:46 am: |
| 
|
कथा आवडली. मला वाटतं की नकाराचे कारण हा कथेचा विषय नाहिये, तर 'तो' आणि 'ती' ज्या प्रगल्भतेनी हा निर्णय मान्य करतात आणि पुढे जगतात हा कथेचा focus आहे. माणसाने कितिही ठरवले, कितिही तयारी केली तरी शेवटी सगळे त्याच्या मनासारखे होईलच असे नाही, तेव्हा finally जे होईल ते तसे accept करणे आणि पुढे जाणे.. फ़ार पटली ही कथा
|
Dha
| |
| Tuesday, May 23, 2006 - 7:46 am: |
| 
|
कथा छान आहे ह्यात वादच नाही. पण मलाही kanak चे म्हणणे पटते.
|
Bee
| |
| Wednesday, May 24, 2006 - 7:15 am: |
| 
|
कूल, कथच्या शैली बद्दल, लिहिण्याबद्दल काहीच वाद नाही. खूप खूप आवडली. पण सगळे म्हणत आहेत त्या प्रमाणे एकदम अपूर्ण आणि जिवाला घोर लावून जाणारी वाटली. जरा तरी कुठे एखादा तर्क लावता येईल असा मुद्दा यायला हवा होता की असे काय घडले की फ़क्त त्याच घरातील मुलाशी मुलीचे लग्न होऊ शकले नाही. म्हणजे हिंदी चित्रपटात जसे दाखवितात की २ पिढ्यांची पुर्वीची दुश्मनी असते आणि मग त्यांची मुले एकमेकांवर प्रेम करतात. एकतर बंड करून ती एकमेकांशी लग्न करतात किंवा नंतर शेवटी काहीबाही निर्णय घेऊन आपल्या आईवडीलांना भानावर आणतात. कयामतसे कयामत तक सारखा करुण अंत क्वचित घडतो. असे काही इथे नाहीच रे.. तू मुद्दाम कारण दडपून टाकले असे खात्रीने वाटते आहे. ..ऽसो काही गोष्टी चारचौघात बोलायच्या नसतात. कथा उत्तम, लिहित रहा!!!!! .. त्याला आणि तिला आपले भावी पत्नी आणि पती आणखी प्रेम करणारे लाभोत अशा माझ्याकडून शुभेच्छा..
|
|
|