Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 04, 200620 05-04-06  10:58 am
Archive through May 09, 200620 05-09-06  11:03 pm
Archive through May 27, 200620 05-27-06  1:36 am

Meghdhara
Saturday, May 27, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली खरच.. जगताना.... व्वा! सगळा नुसता खटाटोप.

मेघा


Jo_s
Saturday, May 27, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली
छानच, जिवनातले विरोधाभास छान टिपले आहेत.


Mavla
Saturday, May 27, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आता म्हणतो, नंतर म्हणतो, नेहमिच मी म्हनत असतो
या वेळी नक्की, या वेळी नक्की, पहिल्या पाऊसात भिजायचय

अहो, वर्ष गेले वर्ष, दर वेळि नविन नाटक
आयुश्याच्या ताजमहल ला, नशिबाच तुटक फ़ाटक.
हे फ़ाटक येकदा बदलायचय, पुन्हा येकदा जगायचय
या वेळी नक्की, या वेळी नक्की, पहिल्या पाऊसात भिजायचय

नेमक त्याच वेळी कस हो, आमच कुटुंब लाडात घेतात
" बाबा धुवा, माझी शी झाली " , कच्चि बच्चि आडवी येतात
नको त्या वेळी नको ते, सालं आयुश्याच एकदा धुवायचय
या वेळी नक्की, या वेळी नक्की, पहिल्या पाऊसात भिजायचय

file वाढतात order सुटतात,
साला, पहिल्या पावसाच्याच वेळिच कस
आमच्य बॉस ला Project सुचतात?
अरे रोजच नोकर, रोजच नोकर, एकदा तरी राजा व्ह्यायचय
या वेळी नक्की, या वेळी नक्की, पहिल्या पाऊसात भिजायचय

उगाच सर्दी, ताप खोकला, उगा, त्वचेचे विकार व्ह्यायचे.
प्रदुशनाचे फ़लित सारे, पान्या ऐवजी ऑसिड यायाचे.
य वेळी नको हो क्रुत्रिम नको हो, मला नैसर्गिक मरायचय.
पण पुढच्या वेळी नक्की, पुढच्या वेळी नक्की, पहिल्या पावसात भिजायचयय



मावळा.


Ashwini
Saturday, May 27, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, छान आहे ग कविता. तिकडेच टाकायची होतीस.
अचूक शब्द वापरले आहेस.

मावळा
:-)


Shyamli
Sunday, May 28, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रिश,भ्रमा,पुजा,मेघा,सुधीर आणि अश्विनी

धन्यवाद लोकहो...

पूजा अग तुझ्या कवितेवरुन सुचल मला हे
"कधी जमणार?" म्हणाले ना मी तेंव्हाच
म्हणुन ही इकडे...सो तुझ्या कवितेला क्रेडीट जातं या कवितेचं
...


मावळा... हो हो अगदि पहिल्या नाहि जमल तर मिळेल त्या पावसात भिजायच


Jo_s
Sunday, May 28, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा, जबरीच, पावसाच नंतर पाहू, तुझ्या कवितेत मात्र मनसोक्त भिजलो.
सुधीर


Chingutai
Sunday, May 28, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,
काहीच्या काही ग...कुठेही टाकू नको तुझी कविता..
सुरेख सुंदर कविता!!!

मावळा
लै बेस......पुढ्च्या पावसात

-चिंगी


Dineshvs
Sunday, May 28, 2006 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो श्यामली,
हि कविता ईथे नको होती.
निरपेक्ष, वाली भावना फारच आवडली.


Jayavi
Monday, May 29, 2006 - 12:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, ultimate ! खरंच इथे का टाकलीस? ए लिहीत रहा गं......... धार येतेय तुझ्या कवितेला :-)

Jayavi
Monday, May 29, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा........... खूपच सुरेख! अरे तुम्ही सगळे बीबी विसरलात की काय?

Ninavi
Monday, May 29, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा, सहीच कल्पना आहे.

श्यामली, एवढी छान कविता इथे का? आणि सगळ्यांनी सांगितलं तरी एवढा हट्टीपणा काय? ही तिकडे हलव बघू. गुरूंची आज्ञा आहे.


Mavla
Monday, May 29, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाहो,
कौतुका बद्दल आभार. या अशा कौतुकाच्या जिवावरच तर ईकडे यायच धाडस होत कधि मधि ईकडे यायच. नायतर, तुम्हा लोकन्च्या "पालवी" पुढ आमचा "पाचोळा" काय? असो
तुम्हा लोकान्ची मैफ़ल वाचयला मजा येते. कौतुक करावं तरी कुना कुनाचं म्हनुन गुमान मजा लुतत आसतो.
साभर.
मावळा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators