वसंतराव घरी येण्याची खबर त्यांच्या मुलांना ते येण्याअगोदर लागत असे.तशी ती आजही लागली होती.त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या येण्याची चाहूल लागताच लगेच हातात पुस्तकं घेऊन घराच्या दोन कोपर्यांना जाऊन बसली. वसंतरावांनी घरात प्रवेश केलाआणी त्यांनी घराच्या दोन्ही कोपर्यांवरून नजर फिरवली.दोन्ही मुलं हातात पुस्तकं घेऊन बसलेली पाहून त्यांना बरं वटलं. नही म्हंटलं तरी आपल्या मुलांमध्ये असलेला आपल धाक पहून ते जरा सुखावले. ते त्यांच्या ठरलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. मुलं आपण येण्याअगोदर काय करत असतील याचा त्यांना चांगलाच अंदाज होता. त्यांनी प्रथम आप्ल्या मुलाला जवळ बोलावलं. 'कसला अभ्यास चालला आहे?'
|
Deemdu
| |
| Friday, April 21, 2006 - 4:33 am: |
| 
|
-- -- -- --
|
Ruchita
| |
| Wednesday, April 26, 2006 - 3:19 am: |
| 
|
सलिल.. किती वाट पाहायची... पुढची पोस्ट टाक ना लवकर...
|
वाह ! छोटी आणि सुटसुटीत .... दिवा घे रे बाबा आणि पूर्ण कर लवकर
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 26, 2006 - 9:25 pm: |
| 
|
वैभव, मुलगा उत्तर काय द्यायचे, याचा विचार करतोय बहुदा ! आपल्यासारखा निर्ढावलेला नाही ना तो मुलगा.
|
काय पण जरब वसंतरावांची. तोंडातून शब्द फुटेना पोराच्या.
|
Jayavi
| |
| Thursday, April 27, 2006 - 8:51 am: |
| 
|
संघमित्रा....... सही ! अरे लवकर लिही रे बाबा नाहीतर अशा प्रतिसादांनीच ही कथा पूर्ण होईल. ए खरंच, एखादी गोष्ट अशीसुद्धा लिहून बघायची का
|
Ninavi
| |
| Thursday, April 27, 2006 - 10:43 am: |
| 
|
वैभव, सन्मी. जया, चांगली आहे कल्पना. सुरुवात कर तूच. 
|
Lalu
| |
| Thursday, April 27, 2006 - 10:48 am: |
| 
|
दोन मुलं आहेत. कुठल्या कोपर्यात कोण बसलं होतं आणि नक्की कोणाला प्रथम बोलावलं ते पण ठरायचं आहे! जया, अशी गोष्ट लिहीतो ना आपण गणेशोत्सवात sty मधे.
|
'भुगोल'मुलगा उत्तरला 'पन तुझ तर गणित कच्चं आहे'ते ताठर्पणे म्हणाले.'त्याचा अभ्यास कधि करणार?' मुलगा काहीच बोलला नाही. 'काय रे?..काय विचारतोय मी?'ते त्याच्यावर गरजले. 'गणीत दुपारी करून झाला'मुलगा चाचरत उत्तरला. 'अस?....तेरा सक किती सांग' 'आम्हाला तेराचा पाढा नाही शिकवलाय' 'बेरीज तरी शिकवलीय कि नाही?'ते त्याच्या अंगावर खेकसले. 'हो'तो थरथरत म्हणाला. 'मग कर!!' त्याने कशीबशी भीत भीत बेरीज केली आणि तो उत्तरला. 'अढुसष्ट' 'अढुसष्ट होय' म्हणत त्यांनी त्याच्या कानाखाली एक जोराची लावून दिली. पोर कळवळून मागे सरकलं. बापाच्या भितीने पुन्ह सरळ उभ राहिलं. 'अढुसष्ट म्हणे'त्याने पुन्ह एक त्याच्या दुसर्या कानाखाली लावून दिली. यावेळी मात्र तो खाली कोसळला.
|
वसंतरावांच्या चेहर्यावर विजयी भाव झळकले. 'तेरा सक अठ्ठ्यात्तर'ते रोखून त्याच्याकडे पाहत म्हणाले.'किती?' 'अठ्ठ्यात्तर'तो आपलं रडणं दाबत उत्तरला. 'जा... तेराचा पाढा पाठ कर. आणि शिकवला नसेल तर बेरीज करून बनव. कितिपर्यंत शिकवले आहेत शाळेत?'उठून उभं राहण्याचा प्रयत्नात असलेल्या त्याच्या किरकोळ देहयष्टीवर त्यांनी प्रश्न फेकला. 'दहा पर्यंत'मुलगा स्वतला सावरून उभ करत म्हणाला. 'मग त्या पुढचे पंधरापर्यंत्चे पाढे बेरीजीने तयार करून पाठ कर जा.'त्यांनी त्याच्या अंगावर फर्मान सोडला. पोरगं निमूटपणे दिलेल्या आदेशाचं पालन करायला निघून गेलं. वसंतराव आतून सुखावले. स्वतच्या या कर्तुत्वावर ते किंचित भाळून गेले. त्यांनी आप्ल्या मुलांना एवढ्या धाकात ठेवला होता याबद्दल त्यांना स्वतचा अभिमान वाटला. आपली मुलं आपल्याला घाबरतात या गोष्टीचा त्यांना गर्व वाटला. आपल्या व्यक्तिमत्त्वातील या गुणावार ते जाम खुश झाले. आनंदाच्या याच भरात त्यांनी आपल्या मुलीला जवळ बोलावलं. 'तुझ काय चाललय ग?'
|