|
Arun
| |
| Monday, April 03, 2006 - 8:30 am: |
| 
|
आज सकाळी नाश्ता करत असताना, सहज चाळा म्हणून TV चे channels surf करत होतो आणि अचानक Zee marathi वरील गुडमॉर्निंग महाराष्ट्र कार्यक्रम बघू लागलो. निवेदक निवेदिकेची रटाळ बडबड संपली होती आणि 'सूरताल' या कार्यक्रमाचा सेट दिसत होता. तेव्हड्यात स्क्रीनवर अक्षरं झळकली मावळत्या दिनकरा. गायिकेने (गायिका होती विभावरी आपटे) सुरेल आवाज लावायला सुरुवात केली होती. मावळत्या दिनकरा अर्ध्य तुज जोडुनी दोन्ही करा का कोणास ठावूक, पण channel surfing करायचं सोडून मी ते गाणं नीट कान देऊन ऐकू लागलो. एकिकडे लता मंगेशकरांचा आवाज कानात घुमू लागला होता, पण त्याचबरोबर विभावरी आपटेंचा आवाज पण तितकाच ताकदीचा असल्याचे जाणवू लागले. मुळात भा. रा. तांब्यांचे शब्द आणि त्याला हृदयनाथांचे संगीत हा असा सुरेल संगम झाला होता. पहिलं कडवं सुरू झालं. शब्द प्रधान गायकी किंवा कवीचे शब्दावरील प्रभुत्व अशा सारखे विचार मनात न येता, मी केवळ ते शब्द ऐकत राहिलो. जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळत्या रीत जगाची ही रे सवित्या स्वार्थपरायणपरा किती अचूक आणि चपखल वर्णन केलं आहे नाही जीवनाचं? जिथे जाल तिथे प्रामुख्याने आपल्याला हेच दिसतं. कळत नकळत कदाचित आपल्याकडून सुद्धा हेच केलं जातं. जो पर्यंत समोरचा आपल्या फायद्याचा असतो तो पर्यंत आपण त्याच्याशी संबंध ठेवून असतो, पण काम संपताच, कोणत्याही कारणांमुळे का होईना, पण आपल्याला जणू त्यच्या विसर पडतो. जाणूनबूजून किंवा नकळत होतं अस. हे मात्र खरं उपकाराची कुणा आठवण 'शिते तोवरी भुते' अशी म्हण जगात भरले तोंडपुजेपण धरी पाठिवर शरा 'असतील शितें तर नाचतील भुतें' या म्हणीचा किती समर्पक उपयोग करून घेतला आहे, या कडव्यात! पहिल्या कडव्याला अनुसरूनच पुढे कवी म्हणतो, की इथे कोणी कुणाची उपकार स्मरत नाही, केवळ तोंडदेखला नमस्कार चमत्कार चालू असतो. गाणं एकीकडे चालूच होतं आणि माझ्या डोक्यात मात्र विचारचक्र चालू झालं. नेहमीच सगळीकडे असच होत असत का? जग इतकं निष्ठूर असतं का? मला असं कोणी भेटल होतं का? घरात, बाहेर, ऑफीसमध्ये सगळीकडे हेच आपल्याला बघायला मिळतं का? आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे बघतो, ज्यांना भेटतो, ज्यांना आपलं म्हणून आपली सुखदुःख शेअर करतो, ते सगळे असेच वागतात? नाही, सगळीकडे नेहमी हे असं होत नाही. तुमच्या अवतीभवती इतकी माणसं असतात, इतक्या घटना घडत असतत, की ज्याच्यामुळे कदाचित आपल्या लक्षात येत नाही, पण हे जग इतकं निष्ठूर नाहिये. कदाचित हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन असू शकेल. इकडे TV वर गाणं संपलं होत आणि मी भानावर आलो. कवीने या गाण्यात मांडलेले विचार पटोत अगर न पटोत, पण त्याने मला विचार करायला मात्र लावलं होत. कदाचित हेच या गाण्यातून कवीला सांगायचे असेल.
|
A_b_h_i
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:07 am: |
| 
|
वा!! अरुण .. ..
|
Deemdu
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:52 am: |
| 
|
खुप छान अरुण -- -- -- --
|
छानच रे.. मस्त विचार करायला लावणारे गाणे. पण सकाळी ऐकण्यासारखे नाहीये. 
|
Sushya
| |
| Tuesday, April 04, 2006 - 6:13 am: |
| 
|
अरुण, सुंदर छान लिहिले आहेस रे
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 04, 2006 - 11:41 am: |
| 
|
अरुण, गाणे छान आहे, तु लिहिलेस हि छान. पण हे सत्यच आहे. मला वाटते कविला सार्वजनिक आयुष्य असलेल्या व्यक्तीविषयी बोलायचे आहे. वैयक्तीक पातळीवर वेगळे अनुभव येतीलहि पण सार्वजनिक क्षेत्रात हेच खरे. अटलबिहारी वाजपेयीना, आपण विसरलो कि !
|
|
|