|
समुद्र ! हे शहर म्हणजे एक समुद्र आहे ! दिवसभरातला काळोख पिऊन चकाकता सूर्य झिंगला की त्याला पोटात घेणारा समुद्र ! भर रात्री चंद्राच्या थंड प्रकाशातसुद्धा अस्वस्थ खळाळणारा समुद्र ! सकाळी माणसांच्या लाटालाटानी रस्त्यावर फुटणारा समुद्र ! बसेसमधून भरून फेसाळणारा नि लोकल्समधे तुंबणारा समुद्र ! आत खोल कुठेतरी, आपापले अमृत शोधण्यासाठी सतत चालणाऱ्या मंथनामुळे तळमळणारा समुद्र ! ह्या अशांत समुद्रातले उद्रेकही कधी कळत नाहीत… त्सुनामी झाल्याशिवाय ! ...... तसं आत्ता सगळ ठीक चाललय ! माशाच्या जन्माला आल्यामुळे न बुडता पोहताहेत सगळे.. कुणी लहान तर कुणी मोठा तर कुणी त्यापेक्षाही मोठा... गिळताहेत एकमेकाना. इथला निसर्गनियमच आहे तो! मोठ्यानी छोट्याना गिळायचं आणि अजून मोठं व्हायच .. ह्या समुद्रापासून दूर… सगळीकडे तरी काय आहे ? तळी, तलाव आणि डबकी.. त्याच गढूळ पाण्यात पोहत आहेत सगळे ! समोरचं दिसत नसले तरीही.. ते तळं आहे ना, कोणे एके काळी कुठल्या तरी देवतेने त्या तळ्यात स्नान केले होते म्हणे… म्हणून आज तेही सगळे स्नान करताहेत. पाणी दूषित करुन पुण्य मिळवताहेत ! ठिकठिकाणी आहेत डबकी.. शेवाळ साचलेली .. त्यात डुंबत आहेत काही आत्ममग्न ! त्यालाच समुद्र समजून ! .. सारी धडपड चाललेली आहे डबक्यातला सर्वात मोठा मासा होण्याची ! आणि ह्या इथे .. समुद्रात लटपटणारे मासे.. त्या समुद्राच्या अवाढव्य आकाराने भेदरलेले.. काय करणार ? पाण्यात जगणं आलं नशिबी.. त्यांचे अश्रू कोणाला दिसणार ? का ह्या सगळ्यांच्या अश्रूंचाच बनलाय हा समुद्र ? सगळे पोहत आहेत चवीचवीने .. एकमेकांची दु:ख चाखत ! ह्याच्यापेक्षा तो बरा ! आणि त्याच्यापेक्षा तो ! आणि त्याच्यापेक्षा मी किती चांगला ! सगळेच पोहताहेत एकमेकाना पाण्यात पाहत ! काही गोड्या पाण्याची तहान घेउन जगत आहेत.. तर काही पाण्यात अजून गुदमरून जीव गेला नाही म्हणून ! समुद्र तर सोडवत नाही... एकमेकांच्या विरुद्ध दिशाना पोहताना रोज नव्या जखमा होतात. त्या अंगावर घेउनच जगत आहेत सगळे. हे खारं पाणीही आजकाल त्यांच्या जखमांना झोंबत नाही… त्याना फक्त पोहायच एव्हढच माहिती आहे. दिशाहीन ! मोठा मासा गिळेपर्यंत, किंवा जाळ्यात अडकेपर्यंत.. पण घाई पाहिलीत का ? प्रत्येकाला पोचायचय आहे कुठ तरी… समुद्राचा किनारा नाही आहे सापडत.. खर म्हणजे कुठला किनारा हवाय हे कुणालाच नाही माहीत ! कुणालाच ! ……… समुद्रही कंटाळेल मग एक दिवस .... आणि मग एका त्सुनामीच निमित्त होऊन फेकून दिल सगळ्यांना … कुठल्याशा किना़ऱ्यावर ! ****
|
जोरात मंथन चालु आहे तर. काय निघणार बाहेर?
|
Psg
| |
| Monday, April 03, 2006 - 12:50 am: |
|
|
राहुल, सही लिहिल आहेस!
|
Champak
| |
| Monday, April 03, 2006 - 8:55 am: |
|
|
My Sunday evening
|
Avdhut
| |
| Sunday, April 09, 2006 - 2:48 pm: |
|
|
>> पाण्यात जगणं आलं नशिबी.. त्यांचे अश्रू कोणाला दिसणार ? का ह्या सगळ्यांच्या अश्रूंचाच बनलाय हा समुद्र ? Rahul छान लिहीलेस.
|
Shyamli
| |
| Sunday, April 09, 2006 - 4:16 pm: |
|
|
>>>>>>समुद्रही कंटाळेल मग एक दिवस .... आणि मग एका त्सुनामीच निमित्त होऊन फेकून दिल सगळ्यांना … कुठल्याशा किना़ऱ्यावर !>>>> छान राहुल.. .. .. ..
|
Polis
| |
| Tuesday, April 11, 2006 - 12:12 pm: |
|
|
त्ये एक गानं आहे ना " एक अकेला इस शहर मे, रात और दोपहर मे " तसच हे काहीस लिहीलय... छान!
|
Storvi
| |
| Wednesday, April 12, 2006 - 3:52 pm: |
|
|
सहीच! .. too good
|
Ruchita
| |
| Tuesday, April 18, 2006 - 12:27 am: |
|
|
Rahul.. Tuze likhan mala vachatach yet nahiy, nustech boxes disat aahet. Me navinach maaybolikar banale aahe, tevha plzzzzzzzzzz marathi madhye kasa posting karayche he pan samjavel ka koni.
|
|
|