Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Good Luck

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » ललित » Good Luck « Previous Next »

Arch
Friday, March 31, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good Luck

लिसाची लग्नाच्या altar वर जायची तयारी चालली होती. मैत्रिणी, आज्या, मावशा खात्री करून घेत होत्या तिच्याकडे something new, something old, something borrowed, something blue आहे की नाही. हे सगळ कशासाठी तर तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी Good Luck द्यायला. हा Good luck किंवा Good luck charm चा custom सगळीकडेच दिसून येतो. अगदी लहानमुलांच्या खेळापासून ते pro games मध्ये. साध्या शाळेच्या परिक्षेपासून ते job interviews ला जाताना. म्हणजे जेंव्हा केंव्हा निर्णयावर भविष्य किंवा तत्सम अवलंबून असत तेंव्हा हे Good Luck नेहेमीच डोक वर काढत.

लहानपणी शाळेत असताना, परिक्षेत पहिल्या दिवसाचा पेपर चांगला गेला की तोच uniform मी सगळ्या परिक्षांना घालून जायची, रोज धुवून बरका. म्हणजे तो uniform त्या परिक्षांपुरता माझा Good Luck charm होता. ही माझी परंपरा इथे आले तरी चालू होती. इथे आल्यावर पहिल्या परिक्षेच्या वेळेला जी कुडती घातली होती आणि तेंव्हा चांगले marks मिळाले होते तिच कुडती मी M.S. च्या अगदी defense लापण घालून गेले होते.

अगदी साध्या साध्या गोष्टिंसाठीपण हा Good Luck charm concept बघायला मिळतो. गेल्याच आठवड्यातली गोष्ट. NCAA च्या games आम्ही एकामित्राकडे बघत होतो. आमची team, final 16 त्याच्या घरी game बघत असताना जिंकली. म्हटल, आता पुढची आमच्याकडे बघूयात. लगेच एक मित्र म्हणाला नको इथेच बघूयात. इथे बघत असताना जिंकलो. पण पुढे final 8 त्याच्याकडेच बघत असताना हरलो. बर झाल आमच्याकडे बघितली नाही नाहितर घरानेच नाट लावला अस तो मित्र म्हणाला असता.

तस बघायला गेल तर खरच ह्या Good Luck charm ला अर्थ असतो का? bride ने ते सगळ नवीन, जुन, उसन, नीळ घातल तर तिच वैवाहिक जीवन चांगल होईल का एकमेकांना समजून घेऊन चांगल होईल? माझी कुडती जर मला चांगले marks देऊ शकत असती तर मला अभ्यासाची जरुरतच नव्हती का? मग काय हे सगळे मनाचे खेळ म्हणायचे? का मनाला आधार द्यायला माणूस काहितरी शोधत असतो? का आपल्या अपयशाच कारण इतर कशावर ढकलायचा प्रयत्न असतो? लहानपणी ती काळी मांजर आडवी गेली की आम्ही ५ पावल मागे जायचो आणि मग पुढे जायच म्हणजे कामात काही अडथळा येत नाही. आता घरातलीच मांजर काळी असली हणजे? कधीच काम पूर्ण होणार नाहीत की.

पण गंमत काय आहे, नेहेमीच म्हटल जात की प्रत्येक यशापयशात नशिबाचापण भाग असतो. तर मग हे नशीब जर अशा म्हणजे इतर कोणावर भार न टाकता किंवा न दुखवता साध्या साध्या Good Luck Charms नी मिळवता येत असल तर काय हरकत असावी नाही का?




Maanus
Friday, March 31, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त ग!

क्रिकेट बघताना मी सचिनचा good luck charm होतो, मी अमुक एका ठिकाणी बसलो, असे बसलो की सचिन चांगली batting करतो असे वाटायचे :-)


Chinnu
Friday, March 31, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आर्च! अगदी मनातलं लिहिलस..

Moodi
Friday, March 31, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च खुप छान लिहीलस. परीक्षेच्या वेळी तुळशीचे पाने अन दही खाऊन जाणे, एकमेकाला best luck देणे. असेच प्रकार सुद्धा खुप छान वाटायचे त्या वेळी.

Manuswini
Friday, March 31, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आई मला नेहमी तुळशीचे पान द्यायचीच परिक्षेला जाताना
त्याचे कारण ती हे सांगयची की मुख्शुद्धी आणी शुभ म्हणुन वाटतं


Dineshvs
Saturday, April 01, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, आम्ही परिक्षेला जाताना गायी शोधत जायचो. तिची शेपटी डोक्यावरुन फिरवुन घ्यायचो.
दोन सिनेमातले प्रसंग आठवले.
पेस्तनजी सिनेमात नव्या नवरीवरुन अंडे ओवाळुन कोपर्‍यात फेकतात. आणि मेमोयार्स ऑफ़ अ गैश्या मधे, ती रात्री बाहेर पडताना सखी गारगोट्यातुन ठिणग्या काढते.


Zelam
Monday, April 03, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलय आर्च.
cricket match बघताना बर्‍याच वेळा आपल्या बाजूने काही चांगलं घडत नसेल तर माझे बाबा सारखी उठबस करतात. हमखास काहीतरी interesting घडते.
माझ्या मैत्रिणीने engineering च्या चारही वर्षांच्या सगळ्या परीक्षांसाठी including orals एकच dress वापरला होता.


Rupali_rahul
Wednesday, April 05, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च छान लिहिलयस. हे सगळे किस्से माझ्या लहानपणिचेच आहेत. तोच युनिफ़ाॅर्म शाळेत धुवुन घालणे, आईने हातावर दहीसाखर थेवणे, तुळशीची पानं देणे. अगदी आत्ता आत्ता घडलेला किस्स म्हणजे आॅस्ट्रेलिया साउथ अफ़्रिकाची हाय स्कोर क्रिकेटमॅच बघताना साउथ अफ़्रिका जिंकावी म्हणुन मी, पप्पा, भाउ, आई सगळ्यांनी केलेली प्रार्थना आणि मी तर आपली जागा न बदलण्याचा एकाच स्थितित रहाण्याचा केलेला प्रयत्न...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators