Krishnag
| |
| Monday, June 19, 2006 - 6:28 am: |
| 
|
ज्येष्ट महीना सरत आला तरी एकही चित्र काव्य नाही!! वारकरी निघालेत ह्याच्या भेटी ग्यानबा तुकारामासंगे

|
कृष्णा ... पंढरपूर जवळ जन्मलो .. वाढलो ... अलिकडे कितीतरी दिवस जाणे नाही झाले .. आणि हा जो तू फोटो टाकला आहेस ना हा आमच्या घरात कित्येक पिढ्यानपिढ्या आहे .. ह्या फोटोसमोर दर गुरुवारी भजन व्हायचं ... ह्याला मी माझ्या लहान लहान हातांनी अबीर, गुलाल लावला आहे ... थोडंसं सेंटी व्हायला होतं खरं म्हणूनच मी आज पहिल्या शब्दापासून जे लिहायला सुरुवात करणार आहे ते शेवटपर्यंत न थांबता लिहीणार आहे ... जे उतरेल ते सगळ माऊलीचरणी अर्पण किती किती वर्षे झाली भेट नाही माऊलीची जन्म कोरडा चालतो वाट शुष्क पाऊलीची तुझ्या अंगणी वाढलो नाव काढले जगात तरी अस्तित्व राहिले तिथे तुझ्या पदरात किती वेळा भरोनिया आले होते ह्या आभाळी नाही बरसले काही ऊन लिहीलेले भाळी ऊन सोसता सोसता वेळ जायची जाहली मला ठाऊक नाही ही यात्रा कुठेशी चालली कसे जायचे परी मी भेटीविना निघोनिया रूप साठवून तुझे घ्यावे डोळे मिटोनिया असे इच्छिताच माई जीव वारकरी झाला ओलांडून देह आता तुझ्या भेटीला निघाला
|
Krishnag
| |
| Monday, June 19, 2006 - 7:18 am: |
| 
|
वैभव अप्रतीम!! ह्या पंढरीनाथाकडे पाहिल्यावर मन कसं अंतर्बाह्य उचंबळून येतं. तुझ्या शब्दांनी अजूनच भर घातली!
|
Moodi
| |
| Monday, June 19, 2006 - 7:26 am: |
| 
|
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा नाम तुझे घेता देवा म्हणुनी आठवावे देह प्रपंचाचा दास सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो...( माऊली बघुन हाच अभंग पण आठवला) वैभव फार सुंदर लिहीलेस माऊलीविषयी( खरोखरची विठोबा माऊली). तुझी ही अभंगरूपी प्रत्येक हाक जशी अंतरातुनच प्रकटलीय. 
|
Meenu
| |
| Monday, June 19, 2006 - 8:55 am: |
| 
|
वा रे वैभव अगदी खरच मनापासुन लिहीलस बघ आणी भक्तीरसात न्हाऊ घातलस ... krishna धन्यवाद हा फोटो ईथे टाकुन चांगल लिहायची संधी दिलीस
|
Meenu
| |
| Monday, June 19, 2006 - 9:12 am: |
| 
|
विठु माऊली सावळी तुझी मुर्ती माया पाझरते दिठी म्हणुनी तुज भक्त सारे माऊली म्हणती असा तुची एक देव ज्याला माऊलीचा मान जरी नाही जन्मदाता सोसे प्रसववेदना तुझ्या नामाचा गजर व्यापे आसमंत सारा भारावुनी भक्त चाले पुर्ण पालखी सोहळा जन्मी एकदा तरी या पालखीचा योग यावा जन्म मज पामराचा देवा सार्थकी लागावा
|
Jo_s
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:48 am: |
| 
|
वैभव, मिनू सुंदरच माझाही एक प्रयत्न पहा वीट पायीची ती आहे किती भाग्यवानं जिच्या वर झाले तिथे विठोबा हो स्थापनं किती भाग्य थोर तिचे साधले जवळचे स्थानं त्याच्या सवे होई नित्य पंचांमृताचे हो स्नानं नसे गर्व जरी तिथे माथा टेकती सरेजणं मनोमनी जाणते ती आपुले नेमके स्थानं जगासाठी इतकी युगे भार साहे विठ्ठलाचा कुणी मानेना आभार नाही शब्द हो प्रेमाचा किती झाली तरीही इश्वराशी एकरुप नाही पुसटही सिमा भासे जणू विठ्ठल रुप सुधीर
|
Aavli
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:57 am: |
| 
|
तुमच्याच प्रेमासाठी सोडीले वैकुन्ठ पायी धरीयली आता पुन्डलिकाची वीट...... युगे अठ्ठावीस उभा चंद्र्भागे तीरी...... वाट पाहे सदा भक्ताचा श्रीहरी...... उठूनिया तुम्ही सर्व आता करारे तयारी जवळी आली रे आता पंढरीची वारी..... निघाली रे दिन्डी सज्ज सारे वारकरी......... मुखी गर्जती घोष जय जय राम कृष्ण हरी... ...............आअपली आवली पंढरीनाथा............. तुझ्याच चरणी आता..............
|
Swara
| |
| Thursday, June 22, 2006 - 3:42 pm: |
| 
|
कृष्णा, किती छान आहे माउलीच ध्यान. वैभव सुंदर. मिनू, सुधीर, आवली छान. एक ओंजळ माझी... डोक्यावर मुकुट तो सर्प वर कोरलेला|| वाट पाहत भक्ताची तू रे इथे थांबलेला||१|| तुझ्या भाळावरि टिळा चंदनाचा दरवळे|| आणि कानात कुंडल सुंदरसे हाले डुले||२|| कटेवरी हात तुझे डोळी भाव दाटलेले|| विटेवरी उभा असा मनी रुप साठलेले||३|| मन माझे देवा तुझ्या रुपाने हे भरलेले|| आता तुझ्या दर्शनाचे कारण ना उरलेले||४|| देवा तुझे देवपण भक्तापाशी गळु जाई|| पांडुरंग माय माझी लेकराते पान्हा देई||५||
|
Meenu
| |
| Friday, June 23, 2006 - 12:22 am: |
| 
|
स्वरा सुंदर .. ...
|
Antya
| |
| Saturday, June 24, 2006 - 4:06 am: |
| 
|

|
Gajanan1
| |
| Sunday, June 25, 2006 - 12:34 am: |
| 
|
विठ्ठल महिमा किती हा अपार सर्व सान थोर पूजितात. पूजेमध्ये दन्ग 'सावळ्या ' च्या सन्गे नाव मात्र सान्गे 'पाण्डु' रन्ग! देवाचा रन्ग सावळा, पण नाव मात्र पाण्डुरन्ग म्हणजे पाण्ढरा रन्ग असणारा जोशी साहेब, सावळ्या देवाला पाण्डुरन्ग हे नाव कसे बरे आले असावे?
|