|
Meenu
| |
| Friday, March 31, 2006 - 3:40 am: |
|
|
खडतर परिस्थितीत ती, खुप अभ्यास करते परिक्षेचा रिझल्ट लागतो ती फस्ट क्लास फस्ट येते.. हे फक्त सिनेमात च्यायला आपल्या life मधे अस काही होत नाहि प्रथमच ती त्याला भेटते माहीती खूप नसूनही चक्क त्याच्या प्रेमात पडते अनेक संकट येऊनही त्याच्याशीच लगीन घडते हे फक्त सिनेमात च्यायला आपल्या life मधे अस काही होत नाहि छोटसं एक घर असतं चारच माणसं असतात आयुष्यभर जोडीन प्रेमानी राहतात म्हातारी झाल्यावर एक दिवस मरुन जातात सनसनाटी अस त्यांच्या life मधे काहीसुद्धा घडत नाही हे फक्त आपल्या life मधे सिनेमात अस साध सुरळीत कधी सुद्धा होत नाही
|
Shyamli
| |
| Friday, March 31, 2006 - 3:42 am: |
|
|
क्या बात है मिनु..... आज काय खास आहे का?
|
नविन वर्शाची सुरवात फ़ार जोरात ग!
|
Mavla
| |
| Saturday, April 01, 2006 - 12:56 pm: |
|
|
सहि रे भिडु, मस्त जमलय च्यायला आपल्या life
|
Dha
| |
| Saturday, April 01, 2006 - 2:30 pm: |
|
|
मीनु, खूप सुन्दर कविता आहे.
|
Meenu
| |
| Monday, April 03, 2006 - 1:54 am: |
|
|
श्यामली, लोपा, मावळा, dha धन्यवाद...
|
Mavla
| |
| Monday, April 17, 2006 - 10:58 am: |
|
|
ईकडे कोनितरि छान छन नवि कविता टाका, किति दिवस वाट पहाय्चि?
|
प्रत्येक ठिकाणी कोणास ठाउक आम्हीच का लेट असतो आम्ही सोडून प्रत्येकाचा मामला अगदि सेट असतो जन्मलो आम्ही तेंव्हा नेमका प्रेमदिन होता डॉक्टरही म्हणे फक्त त्याच गोष्टित प्रविण होता वाढदिवसाला आमच्या फुलांचाच जास्त रेट असतो आम्ही सोडून प्रत्येकाचा मामला अगदि सेट असतो तसं रोजचंच होतं आमचं शाळेला उशीर होणं मैदानाच्या दहा फेर्या आणि रोजचंच होतं दमणं जीभही होते खारट जेंव्हा आठवणीतही स्वेट दिसतो आम्ही सोडून प्रत्येकाचा मामला अगदि सेट असतो आम्हासही येते कधी पुण्यकर्माची उर्मी रक्तदान करु म्हणतो बनु मानवधर्मी हजार जणांच्या लायनीत फक्त आम्हीच अंडरवेट असतो आम्ही सोडून प्रत्येकाचा मामला अगदि सेट असतो तसं आमचं दिलही प्रत्येकीवर भाळतं जी दिसेल तिच्यामागे रोजरोज पळतं गालावर चपलेचा ठळक ठसा आम्हास सप्रेम भेट असतो आम्ही सोडून प्रत्येकाचा मामला अगदि सेट असतो ठरवतो कधी मनात आपणही करावी मजा एक दिवसाचा का होईना आपणही व्हावं राजा महिन्याचे पहिले पाच दिवस आपणही अगदी शेठ असतो आणि आपलाहि मामला फक्त तेंव्हाच अगदी सेट असतो
|
Jayavi
| |
| Tuesday, April 18, 2006 - 1:35 am: |
|
|
मावळा बघ लगेच देवानी तुझी मागणी पूर्ण केली. एकदम सही देवा
|
देवादता तुझी प्रत्येक कवीता नवी भेट असते.. आणि विडंबन तुझे अगदी सेट असते...
|
तारुण्यांच्या फ़ांदीला वसंताचा मोहर कश्या सोसाव्या यातना आधी त्या डोळ्यांना आवर... तळ्यातल्या मासळीला गळ फ़ासतो धीवर कसे यावे ते भानावर आधी त्या नजरेला आवर... धोनीच्या स्ट्राईकवर शेवटची ओवर चुकतो काळजाचा ठोका अधी त्या हसण्याला आवार... माजलाय निर्देशांक परकीय बैलांची पॉवर सुटलयं वारू चौखूर आधी त्या ओठांना आवर... फ़ऍशन शोच्या जोडीला ओपन शोची झालर माधूरीचा पडला विसर आधी त्या गजगामीनीला आवर...
|
haa...haa..!!!! good one.. .. .. . . . ..
|
Chinnu
| |
| Tuesday, April 18, 2006 - 9:39 am: |
|
|
क्या बात है देवा, सही! इंद्रा, छान आहे रे..मीनु आवडली ग..
|
Kandapohe
| |
| Tuesday, April 18, 2006 - 10:55 pm: |
|
|
देवाची सेट, ईंद्रा आवर. सहीच!!
|
Jayavi
| |
| Wednesday, April 19, 2006 - 5:47 am: |
|
|
ए आम्ही ना इथे कुवेतला 'आम्ही दोघं राजाराणी' म्हणून एक स्पर्धा घेतली होती. तिच्यातला Elimination Round म्हणजे होती एक प्रश्नावली. ती सोडवताना background मधे आम्ही टिंगलाष्टकं लावली होती. ती स्वरबध करुन music सकट वाजवली होती. ती इथे टाकतेय. बघा आवडतात का........ वधूवरहो.....सावधान (दोघे) आता सावध सावधान घटिका, संपूर्ण आली भरुन राजा राणी कशी समोर बसती, हाती पेन धरुन (तो) प्रश्नांच्या झडती कशा नौबती, चिंता कशाची परी अर्धांगी असूनी सखी तू मनी, राजा तुझ्या अंतरी होती वाद जरी सदा तुजसवे, प्रिती मनी तुजवरी गोडी त्या वादातही मज मिळे, प्रिती तुझी आगळी (ती) नाही ठाऊक कोण बॉस त्याचा, सदनी असे बॉस तो त्याचा शब्द सदैव मी उचलते, पदरी किती त्रास तो नाही काही इलाज आज उरला, गतजन्मीचे फ़ेडणे नवरा हा मजलाच का लाभला, नशिबीच हे भोगणे (तो) भांडे राणी जरी घरी कचकचा, राजासवे कितीतरी सांभाळे राजाच ती परिणीता, दोषी किती ती जरी राणी ही करते वसूल सगळे, व्याजासवे झडकरी पुरवूनी त्या मागण्या नवनव्या, राजाच हफ़्ते भरी (ती) घरची सारी खुषी तुझ्यावर परी, जेव्हा तू येतो घरी दुनियेचा सगळाच राग निघतो, माझ्यावरी का परी मित्राच्या पत्नीवरीच मग का, असते फ़िदा ही स्वारी पदरी ध्यान गजानना तू दिधले, आता निभावू कशी (तो) कामे आटपूनी कशी पसरते, राणी बिछान्यावरी राजा येई घरी परतूनी, राणी असे फ़ोनवरी थकलेल्या राजास जेवण मिळे, ते थंड बर्फ़ापरी म्हणूनी ह्या राजास नित्य वाटे, मित्राची पत्नी बरी (ती) गुरुवारी मज वाटते कधी हवी, स्वैपाकास सुटी पण राजा म्हणतो सदैवच बरा, स्वैपाक तो घरगुती फ़र्माईश करील तोच मजसी, कर तू घरी भाकरी राजा हा असतोच मालक सदा, राणी करे नोकरी (तो) वाचूनी हे प्रश्न आज सगळे, कळले मला जीवनी नव्हती जाणीव ती कशी मज परी, माझीच ती स्वामिनी (दोघे) विसरुया मतभेद आज अपुले, कर घेऊनी हे करी मिळूनी ही करु वाटचाल पुढची, बनूनी सखे सोबती वधूवरहो सावधान तदेव लग्नम.............
|
Ruchita
| |
| Thursday, April 20, 2006 - 1:06 am: |
|
|
Jaya..Chhanach lihilays.A wachatanach evhadi majja yetey, ani tumhi tar pratyaksha enjoy keley..Pati Patnichi hi ekmekanvishayi chi premal takrar Mastachh. Me pan char oli lihilya aahet tya ethe det aahe .... Tuze Ni Maze Swapna Doghanche...Abolyatalya Apulkiche...Alwarpane Satyat Utarle...Tuze Ni Maze Ghar Doghanche
|
Ruchita
| |
| Thursday, April 20, 2006 - 1:28 am: |
|
|
श्वासान्चे जुलले नाते आता टुज़े नि माज़े तोद्दु नको कधि हि हे बन्ध रेशमाचे आनोलखि मी अन अनोलखि तु नकलत समीप आलो कसे श्वासानाही कलले नाही एकरुप आपन ज़ालो कसे नुरले अन्तर श्वासान्मधले तनमन आता मोहरले ज़ालास तु माज़ा अन माज़ी मी न राहीले...
|
Himscool
| |
| Thursday, April 20, 2006 - 5:31 am: |
|
|
इंद्रा, सही आहे कविता रुचिता, तुझ्या चारोळ्या झुळूक वर टाक.
|
|
|