|
चाउकलेट चिप्स अजूनही तो तिला विसरू शकला नव्हता. त्याच्या मनातील प्रत्येक विचार तिच होता.तिची कुठली ना कुठली आठवण सतत त्याला सतावत रहायची.तिचा चेहरा पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येत रहायचा.तिचं हसणं,तिचं बोलणं,तिचं लाजणं,तिचं डोळ्य्त डोळे घलून पहणं,सगळं सगळं त्याने त्याच्या मनात जपून ठेवलं होतं.तिची आटअवण येताच त्याच्या मनात जपून ठेवलेला हा त्याचा खजिना उघडला जायचा आणि तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्शण्च्या स्म्रुतीने तो अधिकाधिक अस्वस्थ व्हायचा.तो प्रत्येक क्शण त्याला हवाहवासा वाटू लागायचा आणि तिच्या जण्याने अयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीची त्याला प्रकर्षाने जाणीव व्हायची.म्हणायला ती त्याला सोडून गेली होती पण खर्यात ती अद्याफी त्याच्यासोबत होती.....त्याच्या ह्रुदयात. आजही 'ड्रीम्स आईस-क्रीम कौर्नर'पहून त्याच्या मनात पुन्हा तिच्या आठवणी जाग्या झल्या होत्या.इथे फ़िरायला आल्यवर ती दोघं न चुकवता या ठिकाणी आईस्-क्रीम खायला यायची.फ़िरायला यायची ही त्यांची आवड्ती आणि ठरलेली जाग होती. 'पार्कात जायचं ?'सहसा तोच विचारत असे. 'आज नको...आज घरी लवकर जायचंय'ती म्हणायची.पण मनातून तिला त्याच्यासोबत जावसं वाटत असायचं. 'चल ना गं...थोडा वेल'मग तो तिला विनवायचा. 'ठीकाय...पण फ़क्त अर्धा तास.मी अर्ध्या तासात निघणार'ती त्याला बजावायची. 'चालेल'तो ह्यसून म्हणायचा.तिच्या अर्ध्या तासाचा एक तास होनार आहे हे त्याला महीत असायचं. मग ती दोघं इथे यायची.कट्ट्यावर बसून कितीतरी वेळ गप्प मारायची. मग परतताना या पार्लर्कडे येताच तो तिला विचारायचा, 'आएस-क्रीम?' ती डोळे मिच्कावून,खट्याळ्पणे,गालांना खळ्या पडून हसत,मान डोलावायची.तो मग काउंटर्समोर उभा राहून,थंडगार काचेच्या 'केस'वर ऐटीत हात ठेवून तिला विचारायचा. 'कुठलं घेणारैस?' ती 'चाउकलेट्-चिप्स'च सांगणार हे त्याला आधीच माहीत असतानाही. 'चाउकलेट चिप्स'ती क्शणभराचाही विचर न करता लगेच उत्तरायची.तिच ठरलेल.मग तो स्वतःला 'स्ट्राउबेरी'आवडत असतानाही काउंटर्पलिकडच्याला 'दोन चाउकलेट चिप्स' सान्गायचा. त्या दुकानाकडे पाहताच ते सगळं त्याच्याकडे पुन्हा एकदा परतून आलं.सगळं पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर जिवंत झालं.त्या दिवसांमधलं सगळं सोउंदर्य पुम्हा एकवार त्याच्याभोवती बहरलं.पण फ़क्त एका क्शणार्धापुर्तं. सग्ळंकाही तेव्हा अगदी सुरळीत चाललं होतं.पण एक दिवस का कोण जाणे ती त्याला एकाएकी सोडून निघून गेली.तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न दुसर्याच कुणाशी तरी करून दिलं.आणि तिनेही त्या लग्नाला लगेच होकार दिला.तिचं त्या मुलावर प्रेम तर सोडाच पण ती त्या मुलाला नीट्सं ओळखथी नसतान.सगळंच अचानक संपून गेलं.गेलेल्या दिवसांचा माग्मूसही न सोडता. त्या दुःखातून स्वःताला सावरायला त्याला खूप वेळ लागला होत.पण तो स्वताःला सावरू शकला होता.पण मनावरून तिची प्रतिमा मात्र त्याला कधीच पुसता आली नव्हती.त्याचं तिच्यावर अजूनही प्रम होतं.
|
आता त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी मुलगी शोधली होती.कहीच दिवसांपूरवी त्याचा तिच्याशी साखर्पोडाही झाला होता.त्याचं तिच्यावर प्रेम तर सोदच पन तो तिला नीटसं ओळखथी नसताना. सध्या ती दोघं,दोन्हीकडच्या नातेवाईकांनी दिलेली केळ्वणं स्वीकारत फ़िरत होती.आजही ते असेच एका नातेवाईकांकडून दुपारच्या केळवणाचा कार्यक्रम आटोपून येत होते.केळ्वणाचं जेवण देण्यार्यांची पावलं जेवणानंतर जरा सुस्तावताच,दोघांनी त्यांचा निरोप घेतला होता.योगायोगाने त्या नातेवाईकांचं घर 'द्रीम्स आईस-क्रीम काउर्नर' जवळच होतं.तसं ते दुकान, तिच्यासोबत बुज्र्या गप्प मारत हळूवार चालताना,त्याच्या डोळ्यांसमोर आलं आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. त्या दुःखाचं धुकं मनावर पुन्हा दाटू नये म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं.ती मान खाली घालून त्याच्या पावलाला पऊल लावून चालण्याचा प्रयत्न करत होती. 'आईस क्रीम खाणारैस?'त्याने जुन्या सवयीने तिल विचार्लं. 'नको'ती लाजत म्हणाली. 'चल न घेऊया'हे वाक्य आपण आज पहिल्यांदाच उच्चारत आहोत याची त्याला लगेच जानीव झाली. तिने काहीही न बोलता त्याच्याकडे पाहिलं.तिच्या नजरेतलं उत्तर त्याला कळलं.त्याचं तिच्यावर प्रेम तर सोडाच पण तो तिला नीट्सं ओळखथी नसताना. 'चल'तो तिला म्हणाला.आणि ती त्याच्याबरोबर त्या पार्लर्मध्ये शिरली. पार्लरमध्ये नेहमीसारखीच युगुलांची गर्दी होती.मित्र-मैत्रीण,प्रियकर्-प्रेयसी आणि नव्यानेच श्री व सौ झालेली पती-पत्नी यांनी पार्लर भर्लं होतं.तिला घेऊन तो काउंटरपाशी गेला.थंडगार काचेच्या 'केस'वर ऐटीत हात ठेवून त्याने तिला विचारलं. 'कुठलं हवं?' ती क्शणभराचाही विलंब न करता म्हणाली. 'स्ट्राउबेरी...मला तेच आवडतं' त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो हसला.त्या दिवसात 'चाउकलेट चिप्स'मध्ये हरवून गेलेली त्याच्या 'स्ट्राउबेरी'ची आज नकळत ती त्याला देऊन गेली होती.तिचं त्याच्यावर प्रेम तर सोडाच पण ति त्याला नीट्सं ओळखथी नसताना.
|
Chinnu
| |
| Monday, March 13, 2006 - 6:53 pm: |
|
|
... सो स्वीट स्टोरी सलिल!
|
Dineshvs
| |
| Monday, March 13, 2006 - 8:42 pm: |
|
|
सलिल, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी, अनुक्रमे chOkaleT व sTrOberee असे लिहायचे.
|
Jayavi
| |
| Tuesday, March 14, 2006 - 2:00 am: |
|
|
सलिल ........ खुपच गोड
|
धन्यवाद दिनेश.मला नेम्क तेच जमत नव्हतं. चिन्नु आणि जयवी खूप खूप धन्यवाद. आत्ताच चूक दुरुस्त करतो
|
Seema_
| |
| Tuesday, March 14, 2006 - 11:13 am: |
|
|
खरच गोड आहे हं कथा . कल्पना आवडली . सलिल पुढच्यावेळी थोड शुद्धलेखन आणि paragraph ही व्यवस्थित करा , म्हणजे आणखी मज्जा येईल .
|
Champak
| |
| Tuesday, March 14, 2006 - 1:11 pm: |
|
|
क्या बात है.. ..
|
Charu_ag
| |
| Tuesday, March 14, 2006 - 1:21 pm: |
|
|
सलिल, अगदी गोड आहे कथा.
|
I've got browser problem.mhanoon shuddhalekhanaat chukaa jhaalyaa.pudhchyaa velee honaar naheet
|
Manee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:31 am: |
|
|
सलिल, कथा आवडली, एकदम गोड!
|
Meggi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:39 am: |
|
|
सलिल, short and sweet गोष्ट arranged marriage असचं cute असतं, न मागता, न अपेक्षा ठेवता सगळं देणारं.. टीप : मि love marriage च्या विरोधात नाही...
|
Milindaa
| |
| Wednesday, March 15, 2006 - 9:08 am: |
|
|
मि love marriage च्या विरोधात नाही... <<< घाबरली बघा रे
|
कुठल्याही लग्नपद्धतीच्या विरोप्धात किंवा पाठिंब्यात नाही.मी फक्त आयुष्याची गंमत या कथीतून मांडली आहे.
|
छानच लिहिले आहे हं... आयुष्यात मनाजोगी गोष्ट अशी अचानक समोर आली कि एक वेगळाच आंनद होतो ,नाही का?
|
सलील, आवडली कथा. छान लिहिली आहेस.
|
सलील अगदी छान कथा शेवट अगदी गोड आईस्क्रिमसारखा.....
|
धन्यवाद मंडळी. आपण दिलेला प्रतिसाद पाहून आनंद झाला. अशीच सोबत करत रहा.
|
|
|