Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चित्रकविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » चित्रकविता « Previous Next »

  Thread Posts Last Post

Diiptie
Monday, March 06, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


खूप दिवसांपुर्वी एका जाहीरातीत पाहिलेला गणपती
चित्रकवितेचा शुभारंभ करण्यासाठी...


Mavla
Tuesday, March 07, 2006 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला चित्र कविते बरोबरच श्लोक ने सुरवात करुया...

प्रारंभी विनंती करु गणपती
विद्या दया सागरा ||
अज्ञानत्व हरुनि बुद्धी दे मतिदे
आराध्य मोरेश्वरा ||
चिंता क्लेश दरिद्र दुक्ख अवघे
देशन्तरा पाठवी ||
हेरंबा गणनायका गजमुखा
भक्ता बहु तोषवी ||


Chinnu
Wednesday, March 08, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरंगी..

आज पुन्हा प्रपंच्याच्या
रंगलो मी रंगी

कुणी म्हणे गजमुख, कुणी मज गणपती
आरास लेवुन भक्तीपुष्पांची अंगी
आज पुन्हा प्रपंच्याच्या
रंगलो मी रंगी

नादस्वराने बांधिली पुजा
ध्यान शिवगौरीचे स्मरतो अंतरंगी
आज पुन्हा प्रपंच्याच्या
रंगलो मी रंगी

गणांचा मी नायक, बुद्धीदाता विनायक
परी मातृसेवेच्या भावावर मन वेगळे तरंगी
..तरीही..
आज पुन्हा प्रपंच्याच्या
रंगलो मी रंगी!!


Diiptie
Sunday, March 12, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा,चिनू मस्त सुरवात केलिये तुम्ही...
पण बाकी सगळे कुठे आहेत?


Jo_s
Sunday, March 19, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पांढरट पिसे अन, चोच अणकुचीदार
थाटात बैसला तेथे, तो गरुडराज थोर

निरखुनी पाहतामात्र, चुकचूकली पाल मनात
हा खराच गरुड की कोण्या, बहुरुप्याचा हात

आजकाल सर्वत्र, हे असेच आहे घडतं
कातडे पाघरुन कोणी, फसवती हातोहात

आसपास फिरती आपुल्या, किती मुखवटेधारी
सावधपणेच ऐकावे, बोलले मधूर ते किती जरी

सुधीर


Jo_s
Sunday, March 26, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या सृष्टीचे हे वैभव
आम्हास का कळेना
विनाशाच्या उंबर्‍यावरही
अजुनही वळेना

कुणी मारती मोरही कुठे
शिकार चाले कुठे हरणांची
किनार्‍यासही कासवे मरती
हौस भागेना तरी मनाची

किती प्राणी ते नष्टची झाले
किती त्याच वाटेवर
पुढील पिढ्याना दाखवायला
असेच रंगवू मग हातावर

सुधीर


Ldhule
Monday, March 27, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, दोन्ही कविता केवळ अप्रतीम.

Chinnu
Monday, March 27, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

cant believe it! काय सुंदर कल्पना मांडलीत सुधीर. वाह!

Lopamudraa
Tuesday, March 28, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chaan!!! mast!!.. .. .. .. .. ..

Kandapohe
Tuesday, March 28, 2006 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, दोन्ही कल्पना अप्रतीम!! :-)

Shriramb
Tuesday, March 28, 2006 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, छान आहेत कविता!

Shriramb
Tuesday, March 28, 2006 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हात

हात जुळे नमनास, हात वाहतो फुलास
हात कौतुकाची थाप, हात दानाचेही माप

हात लेखणीचे मन, हात कुंचल्याचा प्राण
हात मृदुंगाचा स्वर, हात छेडतो सतार

हात भाजतो भाकरी, हात पंगत वाढतो
हात खरा अन्नदाता, हात रोज भरवतो

हात राबतो अपार, हात चालवे नांगर
हात बोले गणकाशी, हात मोजतोही ज्वर

हात हातात हवासा, हात मृदुलसा स्पर्श
हात धाडतो चुंबन, हात मिठीचाही पाश

हात शस्त्राचीही धार, हात शेवटचा वार
हात सैनिकाचे शौर्य, हात गरुडाचे क्रौर्य

हात पडतो वाकडा, हात हातात खुपतो
हात अतृप्त गिधाड, हात फूल कुस्करतो

~ श्रीराम


Neel_ved
Wednesday, March 29, 2006 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर,मस्तच....

श्रीराम.... ही कविता लिहिणार्‍या तुमच्या हाताचे चुंबन घावेसे वाटतेय.... अप्रतिम...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators