Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मेमरीस्टिक

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » ललित » मेमरीस्टिक « Previous Next »

Rga
Tuesday, January 24, 2006 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेमरीस्टिक
................परवा अचानक माझा camera बंद पडला . काय झाल म्हणुन बघायला गेले तर memory stick formatting error.वीकएन्ड ला काढलेले लेकीचे फोटॊ गेले म्हणुन हळहळत बसलेले. तेव्हढ्यात एकदम ल़क्षात आल कि गेल्या महिन्या पासुन मी photo कुठेच साठवुन ठेवले नाहित. म्हणजे त्या मेमरी स्टिक बरोबर गेल्या जवळ जवळ दिड महिन्यातले सारे क्षण पुसुन गेले म्हणायचे .
................जन्मा पासुन माझ्या १८ महिन्याच्या लेकिचे जवळ जवळ प्रत्येक दिवसाचे फोटॊ आहेत. एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता.पण आता अचानक लक्षात आल की december मधला तीचा एकही फोटो माझ्याकडे नाही.म्हणजे तीन १७ महीन्याचा milestone पुर्ण केल्याचा पुरावा कागदोपत्री माझ्याकडे नसणार होता.
................सार सार घट्ट बांधुन ठेवन्याच्या प्रयत्नात अचानक माझ्या मुठीतुन वाळु निसटुन गेल्यासारख वाटल.क्षण जपुन ठेवन्याचा आमच्या पिढीचा हा किती आटोकाट प्रयत्न.!तस बघायला गेल तर माझ्या पिढीतल्या कित्येक मुलान्चे लहानपणी असे दररोज फोटॊ काढले गेले असतील का? मग मी का इतक अस्वस्थ व्हाव ?
................माझा मेंदु मात्र अजुन format झाला नव्हता बहुदा.कारण माझ्या नजरेसमोर stick मध्ये टिपलेले सारे प्रसंग रीळासारखे पुढे सरकत होते.
................सोनेरी उन्हात सकाळी आपल्या पाणीदार डोळ्यानी माझ्या घराच्या गच्चीतुन सुर्या कडे पहाण्याचा प्रयत्न करनारी,daddyच्या हातात आपले इवलसे गोरेपान हात गुंफ़ुन morning walk जाणारी माझी सोनुली. peak boo करुन मला घाबरवणाऱ्या तीचा photo तर अगदी धांदल करुन टिपला होता.या महिन्यात नविन दात आल्यानंतरचा फोटो.
तीच्या nursey तल्या मोठ्या खिडकीतुन दीसणाऱ्या त्या ध्यानस्थ oak व्रुक्षावरुन उडणाया birdi कडे बघुन हरखणारी,आणि त्या खिडकीशीच बसुण आपल्या चित्रविचित्र भाषेत पुस्तक वाचणारी ती.सार काही त्या memory stick मध्ये होत.
मी driving ला बसल्यावर उगाचच(?) फ़िदीफ़िदी हसणारी ,चित्रविचित्र रंगानी रंगुन जावुन वर आणि daddy ला मिठी मारुन tide चा business वाढवणारी माझी लेक छायाचित्रात बंदिस्त करण खरतर कठीणच.पण प्रयत्न करुन सार जमवलेल.यातला खरतर कुठलाच moment delete होन्यासारखा नव्हताच.
................माझ्या शहरात december मध्ये थंडी भरपुर असली तरी बर्फ़ पडत नाही. आणि या वर्षी तर बरेच वेळा वातावरण इतक उबदार होत.सारा december महिना christamas च्या लाल हिरव्या रंगानी रंगलेला आणि सांताक्लाज आजोबांच्या प्रेमळ स्पर्शान अधिकच प्रेमळ भासणरा. christamas tree वरच्या छोटया छोट्या लाइटसच्या सुंदर प्रकाशात तीच्या चेहयावर फ़ुललेले लोभस भाव तर मी अगदी अधाशीपणान बंदिस्त केलेले. सार कस माझ्या मनात साठवलेल आहे.पण ते सार त्या दळभद्री memory stick मुळे गेल होत.मला फ़ार फ़ार स्वताचा राग येत होता.(आणि पर्यायान नवऱ्याचा.तो तर इतर तमाम बायकांप्रमाणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे. काहीही झाल तरी नवऱ्याला जबाबदार धरायच.)
................अगदी सजिव जिवंत अस सार असतानाही निर्जीव कागदावर उमटणारे ती छायाचित्र मला हवीच होती.अस का?कालानुरुप कदाचित माझ्या मनातली आता सजीव वाटणारी सारी चित्र पुसट होत जातील या भितीने?उलटणाया प्रत्येक दिवसागणीक बदलणारी माझी मुलगी आणखी असे हजारो नवी रुप नवे रंग मला दाखवेल.आणि आता माझ्या मनात रेंगाळणाया या प्रसंगावर नवे क्षण overwrite होत रहातील. आणि तेच माझ्या मनातली जागा पटकावुन बसतील.
म्हनजे २००५ च्या december च्या सोनेरी सकाळी आणि रुपेरी रात्रीत ती कशी दीसत होती ते मला कदाचित स्म्रुती ला ताण देवुन आठवाव लागेल.कुठल्याच data recovery tool उपयोग होणार नव्हता मग.
................नाहीतरी आपल्या सर्वानाच सोपी काम करायला आवडत. मग हे सारे हे अस क्लिष्ट लक्षात ठेवण्याऐवजी वाढदीवसाचे, पहिल्यांदा school मध्ये जाण्याचे,vacation चे आपल्या द्रुष्टीने आयुष्यातले मेजर ईव्हेन्ट्स ठरतात आणि तेच ल़क्षात ठेवले जातात.अगदी छोटी सुख, छोटे क्षण कित्येक वेळा अशीच वाया जातात.
................इतके दिवस मला वाटायच माझ्याशिवाय ती राहुच शकत नाही. अर्थात अपवाद तीच्या daddy कडे सोडुन. पण ती daycare मध्ये जायला लागल्या पासुन तीथल्या teacher बरोबर , इतर दोस्ताबरोबर इतकी समरस होवुन जाते ना कि मी तीच्या लक्षात ही रहात नाही. हे accept करण जरा अवघडच गेल मला. म्हणजे चक्क थोडा जळकुटेपणा आला म्हणा ना माझ्या स्वभावात.कुणीतरी तीच्या मायेच भागिदार होण मला जणु मान्यच नव्हत. त्यात ही मुल इतकी भरभर वाढतात ना!पाण्यावरच्या रांगोळी सारखी क्षणोक्षणी बदलत जातात . माझी मुलगी ही इतकी लवकर मोठी होत चालली आहे कि सारेच क्षण काही मला असे घट्ट धरुन ठेवता येणार नाहीत.
काळ उलटतच जाणार आणि क्षणही असेच हरवत जाणार.मुल अधिकाधिक स्वावलंबी होत जाणार. पण ती घरी आली की आपल्या चिमुकल्या हाताचा माझ्या मानेभोवती घट्ट विळखा घालते आणि आपल्या चिमुखड्या अगम्य बोलात मला सार्‍या घडामोडी सांगते.माझा अहंभाव जरा सुखावतोच मग.
................तशी हातातुन निसटन्याची भावना अजुनही मनात घर करुन आहेच.आणि december महीन्याचे photo हरवल्यावर तर ती अधिकच अधोरेखीत झाली.
पण सारच काही जस च्या तस जपुन ठेवता येणार नाही ह्याची जाणीव मात्र झाली आहे.
................प्रत्येक क्षण नवा,एकुलता एक आणि अगदी महत्वाचा अस म्हणुण जगायला लागल कि झाल.सार मनात मग साठतच जाईल.कदाचीत मग ते कधीच पुसल जाणार नाही. सारेच क्षण मग major events ठरतील.
................म्हणुणच मी ठरवलय कालच्या पेक्षाही थोड जास्तच खेळायच तीच्याबरोबर. गाणी dance करणे , चित्र काढने हे तर या पुर्वी करितच होतो आम्ही ( म्हणजे मी आणि तीचा daddy ) पण जमल तर वाळुचे किल्ले बांधायचे , पतंग उडवायचे,कागदी होड्या तयार करुन row row ur boat म्हणायच . रात्री storytime झाल्यावर झोपी गेलेल्या माझ्या सोनेरी परीचा चेहरा न्याहाळत अमंळ थोड जास्तच बसायच. peak boo खेळण्यासाठी घरात नवीन जागा शोधायच्या . शाबसकिच्या थापेन प्रफ़ुल्लित झालेल्या तीच्या चेहर्‍याहुन काही news paper,cnn , क च्या मालिका , idol महत्वाच नाही. कारण आजुबाजुला जगात काहीही घडत असल तरी एक गोष्ट मात्र नक्की, माझ्या जगात ती अशीच मोठी होत जाणार आहे. आणि ते थांबवण माझ्या हातात नाही.




Maitreyee
Tuesday, January 24, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त गं, सुरेख लिहिलय, आवडलं!

Anilbhai
Tuesday, January 24, 2006 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लई छान

Lalu
Tuesday, January 24, 2006 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच लिहिलंय. तू ही रजनीगन्धा वाटतं.
http://rajanigandha.blogspot.com/
लिहीत रहा.

Mavla
Tuesday, January 24, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदरच.
कण कण निसटुन जाणारे आयुष्याचे अनमोल क्षण आधुनिक यंत्रान्च्या सहाय्याने पकडुन ठेवन्याची व्यर्थ धडपड आपण सारेच खरच किती काळजा पासुन करतो. किबहुना आजकाल आपन सारेच आठवनिंच्या सुखसाठी camera, handy cam, cd's, digital memory devices यांवरच किती अवलबत चाललोय.... पण काळाच्या गती पुढची आपली अगतिकता आपण कधिच संपवू शकणार नाही...
हेच सारं RGA आपण खरच खुप सुंदर पणे रेखाटलय.
आपण नविनच सभासद दिसता. असो.
हा लेख म्हंजे नव्या भिडुने आल्या आल्या पहिल्याच बॉल वर six ठोकन्या सारख आहे.


Dineshvs
Tuesday, January 24, 2006 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो आले नाहीत तेच छान झालं. नाहितर हे असे सुंदर शब्दचित्रं नसतं बघायला मिळालं, आम्हा सगळ्याना

Nalini
Tuesday, January 24, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर!         


Ninavi
Tuesday, January 24, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच सुंदर लिहीलयत.
माझ मावळ्याला अनुमोदन. सिक्सर!


Yog
Tuesday, January 24, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुखरुख लागलेली, शब्दात छान उतरलीये.. aggree with Dinesh

Paragkan
Tuesday, January 24, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !

Pama
Tuesday, January 24, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छानच लिहिलयस!! एखादा फोटो टाकच आता तुझ्या पिल्लाचा..जरा बघूदेत या लेखाच्या हिरोईनला..:-)

Manish2703
Tuesday, January 24, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारच छान.. दिनेश ना अनुमोदन..

Storvi
Tuesday, January 24, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rga, you have mirrored my days my 18 mos old baby girl :-)

Aj_onnet
Wednesday, January 25, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच छान! मस्त उतरवलय शब्दात!

Bee
Wednesday, January 25, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RGA अगदी class आत्मनिवेदन केले आहेस. मोत्यासारखी अक्षरे आणि मोत्यासारखे तुझे एक एक वाक्य, त्यातील हृदयाला भिडणार्‍या भावना.

Manee
Wednesday, January 25, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! अगदी सुरेख लिहिलय!!

Mvrushali
Wednesday, January 25, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास,माझी कन्या ३ महिन्यांची आहे,तू लिहिलं आहेस ते सगळं टिपण्याचा प्रयत्न करीन,अर्थात मनात्:-)

Paragkan
Wednesday, January 25, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरीच म्हटलं इतके दिवस अंताक्षरीपासून कशी दूर राहिलीस .. :-)

Mvrushali
Wednesday, January 25, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी वेगळीच अन्ताक्शरी आहे सद्ध्या,पण मायबोलीवर चक्कर असते रोज,त्याशिवाय चैन नाही पडत:-),त्यामुळे पीके कुठे काय करताहेत ते व्यवस्थित कळतं:-),गम्मत रे!

कसा आहेस?


Sandeep_bodke
Wednesday, January 25, 2006 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah...khup chan...!! Aai wadil asach aaplya pillanna khavu pivu ghaltaat....ani hee pilla pankhat bal aala ki udun jaataat...!! mag swatah vishayi pan ashich ek apradhi bhavna yete manaat....!! kunitari asach ekda aaila mhanala hota, bara zali aamchi mula evdha shiklee naheet..ani mag manaatli bhavna aankhi prabal hote, ata partaayla hava parat ghartya kade mhanun....!!

Giriraj
Thursday, January 26, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह छानच! -- -- --

Charu_ag
Thursday, January 26, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! -- --- -- --

Chinnu
Friday, January 27, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या चिमखडीला पाहायची फ़ार इछ्छा आहे. फ़ोटो नक्कि पोस्ट करा. तुमची शब्दचित्रे सहीच, पण आईच्या जिवाचि घालमेल पण चितरली आहे. फ़ार छान.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators