Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Silvia......No music???

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » ललित » Silvia......No music??? « Previous Next »

Champak
Wednesday, January 18, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिल्विया, माझी लॅब मेट. माझ्या समोरच्या टेबलवर गेले दोन वर्षापासुण Ph.D. चे काम करणारी मुलगी. वय फ़क्त २४ वर्षे. एकदम अल्लड निरागस, एकदम निरागस हसते, अन नेहमी हसमुख असते…… वैतागली तर एक सिगारेट प्यायला जाणार अन मग निवंत येवुन काम सुरु करणार! सिगारेट अन संगीत हे तिचे लॅब मधले आवडते टाईम पास! अन बाहेर च्या जगात Dance! . ती एक उत्कृष्ट flemenco dancer आहे. स्पेन च्या वेग वेगळ्या भागात होणार्‍या नाच गाणी महोत्सवाला जाणे हा तिचा सुट्टी च्या काळातला आवडता उद्योग!

दररोज ती आली कि आमच्या लॅब चा MP•3player धाड धाड वाजायला सुरुवात होते. त्यामुळे जर एखाद्या दिवशी ती आली नाही किंवा आलेली असली अन कामामुळे mp-3 player सुरु झलेला नसेल तर मी मोठ्याने ऑरडतो……. silvia……. no music??? मग ती प्रोफ़ेसर च्या नावाने एक बोम्ब मारुB mp3 सुरु करते………. अन तो mp3 अगदी सन्ध्याकाळी ती गेली तरीही चालु च राहणार.

ह्या वीकेन्ड ला काम केल्यामुळे सोमवाई जरा उशीरा च लॅब मध्ये गेलो होतो. त्यामुळे नविन reaction च्या गडबडीत होतो. लॅब मध्ये mp3 चे संगीत सुरु नव्हते त्यामुळे जरा शांत च होते. अन पोरे पोरी ही २ - ४ च जण आलेली दिस्त होती. पण सोमवार सकाळ अशी च असते त्यामुळे मी ही लक्ष दिले नाही! अचानक मी जेथे glassware साफ़ करित होतो तिथे येउन एक लॅब मेट म्हटली ¨ अरे, आज सकाळी च आपल्या सिल्विया चा boy friend ला त्याच्या कंपनीत अपघात झाला अन तो जागी च ठार झाला ¨ :-( मी तर हादरलो च! लॅब मधली ती शांतता एकदम भेसुर वाटायला लागली! मग लॅब मधल्या तुरळक उपस्थीती चे कारण लक्षात आले. लॅब ला जोडुन च असलेल्या मोकळ्या स्पेस मध्ये सगळे लॅब मेट जमले होते. अन पोरी रडत होत्या. तिच्या टेबल वर काम करणार्‍या पोरी ने त्रोटक माहीती दिली. अन तिच्या घरी फ़ोन करुण मग funeral ला जायचे ठरवत होतो. पण कंपनी त अपघा झालेला असल्याने पोलीस अन विमा कंपन्यांचे सोपस्कार पुर्ण व्हायला वेळ लागणार असल्याने funeral बद्दल कोणी च सांगु शकत नव्हते….. ¡

संपुर्ण दिवस्भर सगळी पोरे अन प्राध्यापक एकदम धक्का बसल्यागत वावरत होती. सिल्वी ( तिला याच नावाने हाक मारतो आम्ही ) त मला एकदम दोळ्यासमोर दिसु लागली. दररोज आली कि गाणी सुरु करुण देणार अन ऑला बरात….. (Hello bharat) असे ओरडुन म्हणणार……. मग ते तिचे खळखळुण हसणे अन ´ मी बोय ´ (I am going ….. to work!) म्हणने आठवले……

सकाळी ११ वाजले कि तिचा cofee time , ह्या वेलेला ती सापडणार ते तळमजल्यावर काॅफ़ी मशीन समोर, अन हातात एक सिगारेट घेवुन! ११ वाजता ती जाता जाता 2-4 जणांना काॅफ़ी ला हाक मारणार अन नाही आले कोणी च त तिच्या टेबल्वर काम करणार्‍या पोरीला घेवुन जाणार्…… तिच्या सिगारेट पिण्या च्या सवयी मुळे तिला नेहमी सुट्टे पैसे लागत, मशीन मधुण पाकीट घेण्या साठी, मग ती ५ किंवा १० येरुओ ची नोट घेवुन बरेच जणांना सुट्टे आहे का विचरे. मी तेल बरेचदा सुट्टे पैसे दिल्यामुळे ती नंअतर थेट माझेकडे येत असे अन समोर उभे राहुण्…… बरात, change!!! असे ऑरडत असे……….. माझ्याजवळ इतके सुट्टे कसे? हे विचारले कि मी ही मग सकाळी च train station or bus stop ला मागत फ़िरत होतो असे सांगितले की खळखळुण हसत असे………….!!

आम्ही आखेन जर्मनी ला ९ जण गेलो होतो त्यात ती ही होती. तिच्या boyfriend ची माझी पहिली अन शेवट ची भेट त्यावेळी च झाली होती, तो तीला train station वर सोडवायला आला होता………..! मला त आता त्याचे नाव ही आठवट नाही. धडपड्या पोरगा होता……… तीन चार वेग वेग्ळ्या ठिकाणी काम करुण स्वतः चे Work shop सुरु करायच्या तयारीत होता……सिल्वी नेहमी त्याच्या बद्दल बोलायची! जाम प्रेम आहे / होते(¿?) तिचे त्याच्यावर! सगळ्या सुट्ट्या तोअ न ती त्यांच्या गावी जात, त्याच्या आई बाबाकडे! ही नाताळची सुट्टीही त्याच्या आई बाबा सोबत च घालवुण सिल्वी एकदम खुशीत कामावर आली होती…….. अन एका आठवड्यात घात झाला……… :-(

आखेन ला असताना च एक दिवस तिला त्याचा मोबाईल फ़ोन लागेना म्हणुण तिने घरे फ़ोन केला तर तो मुलगा आजारी आहे समजले……. सिल्वी त्या दिवशी जेवली नव्हती! इतके उत्कट प्रेम करणारी partner असुन देखील त्या पोराच्या आयुष्याची दोरी इतकी कमकुवत कशी? हे मला पडलेले एक कोडे च आहे! :-(

नाताळच्या सुट्टीवर जाण्यापुर्वी बोलताना तिने सांगितले होते कि तिने अन त्याने मिळुण एक फ़्लॅट घेतला आहे अन नविन वर्षा च्या सुरुवातीला ती दोघे तिथे रहायला जाण्या च्या बेतात आहेत. अन जमले च तर लवकर च लग्न ही करणार आहेत……….. पण सगळे च अधुरे राहीले!

……… सोमवारी funeral ला जावु न शकल्याने काल त्यांच्या गावातील चर्च मध्ये prayer service ला आम्ही सगळे लॅब मेट गेलो होतो. आम्ही चर्च च्या दरवाजात च उभे होतो….. तिला एका गाडीतुण आणले होते…….. तिच्या नजरेस नजर मिळवावी कि नाही अन नजर मिळवली त तीला रडु फ़ुटेल कि काय अश्या द्विधा मनःस्थितील आम्ही सगळे च होतो, पण तिला जे गाडीतुण उतरवले ते तिच्या एका नातलगाने थेट चर्च मध्ये नेले. तिच्या चेहरा ओझरता च दिसला…….. ती रडत च होती prayer संपल्यावर पुन्हा आम्ही दरवाजात उभे राहीलो……. तिला पुन्हा तसेच थेट गाडीत बसवले गेले…….. ती खुप च मोठ्याने रडत होती…………

ज्या चर्च मध्ये, ज्या partner सोबत नववधु च्या रुपात फ़ुलांच्या गालीच्यावरुण चालत जायचे स्वपन ती पहात होती त्या च चर्च मध्ये त्या च partner च्या funeral साठी यावे लागणे तिच्या नशीबी आले………. 

भातुकली च्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी…………….!!!


….आमची सिल्वी हे दुःख खंबीरपणे सहन करो अन पुर्वीच्या च उत्साहाने आमच्या समोर येवो ही च ईश्वरचरणी प्रार्थना!

आता ती जेंव्हा ही कधी परत लॅब ला येईल तेंव्हा मी ही silvia……. no music??? म्हणु शकेल कि नाही, ही मात्र मला शंकाच आहे :-(

गेले दोन दिवस आमच्या लॅब चा mp3 player शांत शांत आहे.........!!
....



Limbutimbu
Wednesday, January 18, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> silvia……. no music??? म्हणु शकेल कि नाही,
म्हणुही नकोस!
व्हेरी सॅड स्टोरी! :-(


Moodi
Wednesday, January 18, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नियतीचा खेळ दुसरे काय?!!!!!!

Rupali_rahul
Wednesday, January 18, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

very sad & touching story I hope it's not a true story…….


Nalini
Wednesday, January 18, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरचं, खुपच वाईट घडले. :-(

Zelam
Wednesday, January 18, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच वाईट झाले.
I hope she recovers


Kmayuresh2002
Wednesday, January 18, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंप्या भौ,आज रडवलस गड्या तू:-( खूपच वाईट झालं बघ.

Ninavi
Wednesday, January 18, 2006 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे..
तिच्या आयुष्यात पुन्हा
music येवो!

Bhagya
Wednesday, January 18, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पक, खरच हृदयस्पर्शी रे!

Dineshvs
Wednesday, January 18, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिल्वियाचा MP3 प्लेयर पुन्हा सुरु करुन द्यायची जबाबदारी, तुम्हा सगळ्यांची आहे.

Nika
Thursday, January 19, 2006 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय चंपु,
खुपच वाईट घडले रे तिचा फोटो पहिला होता का मी तुझ्या album
मधे??

तुम्हि सगळ्यांनिच तिला सांभाळुन
घ्यायला हवे आणी तु करशिल.


Dineshvs
Thursday, January 19, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि अशी आनंदाची देणी वाटत फ़िरणारी माणसं असतात ना त्यांच्या नेहमी ॠणात रहावे.
आणि जेंव्हा त्याना अश्या क्वचित प्रसंगी जर गरज पडली तर या देण्याची सव्याज परतफ़ेड करावी.


Gajanandesai
Friday, January 20, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-(:-( .... .... .... ....

Pama
Friday, January 20, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक.. खूप touching आहे सिल्व्हियाची कहाणी. छान लिहिलयस.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators