Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
संक्रांत

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » ललित » संक्रांत « Previous Next »

Nalini
Tuesday, January 17, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


संक्रांत सण आला पण आणि गेला पण. ह्या सणाच्या बालपणीच्या आठवणीच निराळ्या. कधीही न संपणार्‍या.
मकर संक्रांतिच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात काकु तिळ टाकाणार आणि मोठी ताई सगळ्यांना चोळुन, अगदी दगडाने घासुन आंघोळ घालणार. मग छान गंध पावडर पण करुन देणार. ह्या दिवशी भाकरीतपण तिळ घातले जातात. त्यासोबत भोगीची स्पेशल मिक्स भाजी केली जाते. त्यातही तिळ असतातच. ह्यदिवशी वाट पहायची ती संध्याकाळ होण्याची. काय विशेष? संध्याकाळी तिळाच्या लाडवाची तयारी सुरु होते. हावरी म्हणजेच तिळ अर्थात हे घरच्या शेतात पिकवलेले भाजायला सुरुवात होते. भाजलेल्या हावरीचा सुगंध घरभर पसरायला वेळ्ही लागत नाही. ह्यात आमचा रोल काय? भाजलेली हावरी पळवायचा आणि बोकाणे भरायचा. इथुनच खरी आमच्या संक्रांतिला सुरुवात होते.

संक्रांतिच्या दिवशी न सांगता सगळेजण लवकर उठुन तयार होउन चहापाणी उरकुन तयार असतात. सगळ्यांना प्रतिक्षा असते ती मळ्यातुन येणार्‍या जीपची. हो माझे बाबा किंवा आजोबा आम्हा मळ्यातल्या म्हणजेच शेतावरच्या घरी जीप घेऊन न्यायला येणार असतात.
जीप आली आणि त्यात जर बाबा असले तर खुपच मजा आणि आजोबा असले तर लगेच तोंडाला कुलुप लावुन गाडीत जाउन बसायचे. घरी जाईस्तोवर चिडीमिडी गुपचुप. कोणालाच सकाळी सकाळी संक्रांत ओढावुन घ्यायची नसते ना म्हणुन. जर का बाबा असतिल तर मग घरी पोहचेपर्यंत नुसता धुमाकुळ घालायचा.

असेच एका संक्रांतिला माझा मोठा भाऊ सकाळीच सायकलवरुन पडला आणि त्याने आपल्या तोंडाचा नक्षा बदलुन घेतला होता. त्यादिवशी न्यायला नेमके आजोबाच आले होते. त्याला लपवुनच गाडीत घालावे लागले, तसेच लपवुन छपवुन एका कोपर्‍यातल्या खोलित नेवुन झोपवले. दिवसभर तो एकटाच त्या खोलीत. त्याला जेवणही तिकडेच. आजोबा दुपारचा वेळ झोपले तेवढाच वेळ तो त्या खोलीबाहेर पडला होता. परत संध्याकाळी जातानाही हिच कसरत. आता तुम्ही म्हणाल एवढी सगळी कसरत कशासाठी? त्याना का हे समजले असते तर किमान दिवसभर नाॅन स्टाॅप त्यांचा टेप सुरु राहिला असता. असो.

तर एकदाची सगळी जणता गाडितुन खालि उतरली की हुंदडायला सुरुवात. मोठ्या बहिणी घरात आईला आणि काकुला मदत करत आणि आम्ही आजीला. गावातली कुंभारीण आधल्या दिवशीच सुगडे आणुन देते. संक्रांत होउन गेली की मग त्या सुगड्याच्या बदल्यात धान्य घेऊन जाते. तर आजी हे सुगडे धुऊन आणायला सांगते. ते एका टोपलित घालुन विहिरीवरच्या टाकीवर धुवायला घेऊन जायचे आणि मग ते देवघरात नेऊन ठवायचे. मग आता त्यात टाकायच्या सामानाची तयारी सुरु. शेतात जाऊन एक ऊस मोडुन आणायचा. कोयत्याने तो सोलुन त्याचे बारिक तुकडे करुन घ्यायचे. ते एका टोकरीत टाकले की मग शेतातुन हरभर्‍याच्या तिरम्या उपटुन आणायच्या. त्याचे हरभरे तोडुन टोकरीत टाकायचे. बोरिच्या झाडाखालुन अंगात घातलेल्या फ्राॅकचीच ओटी करुन त्यात बोरं गोळा करुन आणायचे. तेही टोकरीत टाकायचे. मग घरातुन आईकडुन शेंगदाणे, हावरी, बिबवा, गाजर घ्यायचे. गजराचेही बारिक तुकडे करायचे.
हे सगळे मिश्रण धुवुन ठेवलेल्या सुगड्यांमध्ये भरायचे. पाच छोटे आणि पाच मोठे असा मिळुन एक खण होतो तर प्रत्येक सवाष्णेचे एक्/ तिन्/ पाच खण असतात.

नैवद्य तयार झाला कि आई, काकु, आजी आणि आम्ही मग आधी तुळशीची पुजा करतो. मग गाईची आणि मग देवांची पुजा होते. पुजेसाठी मग सुगड्यात भरलेले जिन्नस पण वापरले जातात. मग सगळे मिळुन पुरण पोळी, भजी, कुरडई, सार, भातावर ताव मारतात.
मग सगळी चिल्लरपार्टी मिळुन मोर्चा चिंचेच्या झाडाखाली. शक्य तेवढ्या खाऊन आणि शक्य तेवढ्या पिशवीत भरुन घेतल्या जातात. मग मोर्चा उसाच्या शेतात. चांगले पाहुन ऊस कडाकड मोडले जातात. तेही तुकडे करुन पिशवीत रवाना केले जातात. येतायेताच हरभर्‍याच्या शेतातुन किती मोठे हरभर्‍याचे झाडे उपटुन त्यांची हि रवानगी पिशवीत करायची.
सगळा लवाजमा आता बोरिच्या झाडाखाली. वरती जाउन एकाने बोरिचे झाड हुळवायचे आणि बाकिच्यांची तोंड चालु ठेवत ते गोळा करायचे. सगळे एकदा जमा करुन झाले की मग मळ्यात चुलत काकांच्या घरी तिळ घ्यायला जायचे. घरी परतेपर्यंत चार वाजलेले असतात. मग बाबा सगळ्यांना घेऊन गावात विट्ठल रुक्मिनिच्या मंदिरात घेऊन जातात. तिथे पुजा करुन आई व काकु इतर बायकांच्या सुगड्यातल्या साहित्याने ओटी भरतात. हळदी कूंकवाचा कर्यक्रमही तिथेच पार पडतो. वाणांची देवाणघेवाण होते. ज्यांची पहिलीच संक्रांत असतात त्या कुंकवाच्या डब्या वाण म्हणुन वाटतात. चिल्ले कंपनी मात्र तिळगुळ गोळा करण्यात मग्न असते.

पुन्हा सगळा लवाजमा घरी आणला जातो. दुपारी मेहनत करुन जमा केलेल्या सगळ्या गोष्टी ह्या गाडीत भरल्या जातात. शक्यतो आजीमागे आम्हाला बैलगाडीतुन जाऊ दे असा टुमना सुरुच असतो. एव्हाना आजोबा गाडीत स्थानापन्न झालेले असतात. चिडिमिडि गुपचुप.
पुन्हा परत. एकदा खाली उतरले की मैत्रिणीच्या घरी, शेजारी पाजारी सगळीकडे तिळ घ्यायला सोबत एक डबा घेऊन जायचे. एक दोन दबे तिळ तर सहज जमा होतात. खाउन खाउन तरी किती खाणार. कुणाचे जास्त आणि कुणाचे कमी असे बघता बघता संक्रांत संपुन जाते. ह्यानंतरचा काही दिवस चालणारा हळदि कुंकु समारंभ न विसरण्यासारखा. वाण म्हणुन मिळालेली प्रत्येक वस्तु ही खेळ्ण्याच्या सामनात समाविष्ट केल्यीइ जाते.
अशी असते माझी संक्रांत. ही संक्रांत मला कधीच भुतकाळात जमा कराविशी वाटत नाही. आता हे सगळ प्रत्यक्ष जरी घडत नसले तरी मन प्रत्येक संक्रांतीला तिथेच असते.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
आमचे तिळगुळ सांडु नका
आमच्या संगे भांडु नका!


Zelam
Tuesday, January 17, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी किती छान लिहिलस ग!
तुझं शिवार नजरेसमोर आलं.


Dineshvs
Tuesday, January 17, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच तुला म्हणालो लिहित जा, आणि हे समोर आले. छानच.
आमच्याकडे पण अशीच पुजा होते. पण आम्हाला हे सगळे बाजारातुन विकत आणावे लागते. आमच्याकडे तीळपोळ्या असतात. आणि दुसर्‍या दिवशी किंक्रांतीला लाल भोपळ्याचे घारगे आणि सुगडातल्या भाज्यांची भाजी असते.
या दिवसात मुंबईत खास वाणाच्या वस्तुचे ढिग लागतात.


Bhagya
Tuesday, January 17, 2006 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! नलिनी, कधी योग आला तर तुमच्या शिवारात यायची इच्छा आहे.... असंच कुठल्याशा मासिकात गावातल्या चैत्रगोरिच्या हळदीकुन्कवावर खूप छान वाचले होते. वाचून अगदी त्या गावात जायची इच्छा झाली.

Moodi
Wednesday, January 18, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या नलिनीकडे हुरडा पण खायचाय लक्षात ठेव.
नलिनी झक्कास लिहिलेस. खमंग तीळगुळाची गोडी काही औरच. दिवाळीनंतर माझा जास्त आवडता सण म्हणजे संक्रात. वर भरपुर सुके खोबरे घालुन केलेल्या तीळगुळाच्या वड्या मला खूप आवडतात.

आमच्या इथे एकमेकांच्या घरी हळदीकुंकुवाला जाणे, घरी सुगड आणुन त्यात उसाचे करवे, बोरे, हरभरे अन बिब्ब्याची गोड फुले भरुन त्याची पुजा करणे हे किती छान होते. लहानपणाबरोबर त्याच्या गोड खमंग आठवणी कायम रहातात. अन तु त्या परत डोळ्यासमोर उभ्या केल्यास.


Sampada_oke
Wednesday, January 18, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, एकदम मस्त वर्णन. पटकन डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. सगळेच सण खूप डोळसपणे तू अनुभवलेस, म्हणून इतकं सविस्तर लिहू शकतेस.:-)

Charu_ag
Wednesday, January 18, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, काय झकास लिहीलयस!
अगदी अश्शीच असते आमची संक्रांत. खरच ती भुतकाळात जमा कराविशी वाटतच नाही.

मस्तच लिहीलयस.


Bee
Wednesday, January 18, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिब्ब्याची फ़ुले मला लय लय आवडतात :-)

नलिनि खरच मस्त वर्णण केलेस!

संक्रांतीचे वाण घरी आले की त्यातून निवडून एखादे निबर बोर हाताशी लागते का हा माझा आवडता छंद होता. आमच्याकडे नागपूरी बोर मिळतात. ती छान लांबूळकी, टप्पोरी असतात पण जरा किडकी असतात.

संक्रातीनंतर सात दिवसांनी रथसप्तमी असते ना.. त्याबद्दल कुणीच काही लिहिले नाही इथे.

रथसप्तमी पासून दिवस तिळातिळाने मोठा होत जातो असे म्हणतात. ह्या दिवसाला बोळक्यात दूध तांदूळ शिजवले जातात.

पुण्यात मी सदाशिव पेठेत राहत होतो. तिथल्या प्रत्येक मेसेस मधे ह्या दिवसाला तिळ घालून भाकरी करतात.


Dineshvs
Wednesday, January 18, 2006 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रथसप्तमी सात दिवसानी नाही, वेगवेगळ्या फ़रकाने येते. संक्रांत सुर्याचा सण तर रथसप्तमी चंद्राची, त्यात ताळमेळ नसतो.

Nalini
Thursday, January 19, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम, दिनेशदा, भाग्या, मुडी, संपदा, चारु आणि बी मनापासुन धन्यवाद.
हो ग मुडी, आपण सगळे भारतात गेलो कि हुरडा पार्टी नक्की करु आणि तेही आमच्याच शेतात.
दिनेशदा, माझ्या ऐकीव माहीतीनुसार दिवस हा संक्रांतीपासुनच तिळातिळाने वाढतो आणि दांडी पौर्णिमेपासुन दांड्यादांड्याने वाढतो असे म्हणतात.


Dineshvs
Thursday, January 19, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मकर संक्रांतीला सुर्य मकर वृत्त ओलांडतो म्हणजे हळु हळु उत्तरेकडे सरकतो. दिवस दोन्हीकडुन ताणला जातोय हे सध्या आपण बघतोच कि. आता तुझ्याकडे हळुहळु ऊन्हाळा आणि आपल्या भाग्यश्रीकडे हळुहळु थंडी पडणार.

Prajaktad
Thursday, January 19, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नले!मस्तच लिहलस अगदी!घरची आठवण झाली बघ,गुळाच्या पोळ्या तुप घालुन...करेला संक्रांतिनंतरचा दुसरा दिवस्)आमच्याकडे गुळाचि किंवा तिखट धिरडी करतात.संक्रातिला पतंग पण उडवला जातो.
संक्रात ते रथसप्तमी मग हळदिकुंकुवाची धुम असते.
जावई लोकांना पहिल्या संक्रातिला हलवा(तिळगुळ्) चांदिच्या वाटितुन मिळतो.
नविन लग्न झालेल्या मुलिंची तर फ़ारच मजा काळी साडी,हलव्याचे दाग़िने
लहान बाळांना पण हलव्याचि बाळलेणी चढ्वलि जातात.
" बोरनहाण " घातले जाते.


Megha16
Thursday, January 19, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलीनी
खुप छान लिहल आहे तुझा लेख वाचताना प्रत्यक्षात अनुभाल्या सारख होत. सगळ अगदी डोळ्या समोर येऊन उभ राहत बघ. अस वाटत की कधी एकदा भारतात जाउन पुन्हा सगळे सण अगदी पारपारीक पद्ध्तीने साजरे करु अस झालय.
मेघा.


Cool
Wednesday, January 25, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वा खुपच छान, अगदी संक्रान्तीला घरी गेल्यासारख वाटलं,..
आतली खबरं म्हणजे collage मधील बरेच जण संक्रांतीची खुप वाट बघत ( अगदी सुवासीनी बघत नसतील एवढी.. ) ...

कशासाठी....
...
..
..

कारण त्या दिवशी सर्व मुलींच्या घरी राजरोस जाता येत असे ना म्हणुन...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators