आमच्या नजरेतून द. कोरिया आणि सिंगापूर कोरियाला जायचे आमचे विमान सिंगापूरमार्गे होते. आम्ही रात्री airport वर सगळ्यांना टाटा करून आत गेलो. Singapore Airlines च्या काऊंटरपाशी आलो तर काय! तो ऑफीसर म्हणाला की तुमचे तिकीट उद्याचे आहे. निघण्याच्या घाईत आम्ही दोघांनीही तारीख नीट पाहिली नव्हती. आणि office मधल्या Carmelin ने पण तारीख बदलल्याचे सांगितले नव्हते. आता सगळे लोक तर निघून गेले होते. पण luckily आम्हाला त्या दिवशीच्या flight मधे जागा मिळाल्या. पण त्याला जोडून पुढे जाणारे कोरियाचे विमान नसल्यामुळे पुढचा एक पूर्ण दिवस आम्हाला Singapore मध्येच काढावा लागणार हे नक्की झाले. आम्ही सकाळी लवकरच सिंगापूरला पोहोचलो. सकाळी सकाळी plane मधून सिंगापूरचे जे मनोहारी दृश्य दिसते त्याला तोड नाही. निळ्याशार पाण्यात काही बेटांचा तो समूह एखाद्या पाचूप्रमाणे शोभत होता. सिंगापूरला घनदाट झाडी आहे. Pollution तर इतकं कमी की एक एक पान स्वछ पुसल्यासारखे दिसते. अजिबात धुळीचा कण नाही त्यावर! इतकं स्वच्छ आणि हिरवेगार सिंगापूर वरून लखलखीत पाचूप्रमाणे न दिसते तरच नवल! तो दिवस आम्ही असाच भटकण्यात घालवला. संध्याकाळी आम्ही Singapore Airport Authority ची free tour करून आलो. City तर खूपच मस्त आहे. मोठे मोठे रस्ते,स्वच्छता, हिरवीगार भरपूर झाडी आहे. सिंगापूर हे नाव 'सिंहाचा देश' ( Lion City ) यावरून पडले आहे. तिथल्या नदीत त्यांचे राष्ट्रीय चिन्ह दिमाखात उभे आहे. पांढर्या दगडात कोरलेले ते, सिंहाचे तोंड आणि खालचा भाग माशाचा, असे आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे नुकतीच 'बदकांची शर्यत' झाली होती. इथे खूप निरनिराळ्या आकारांच्या वैविध्यपूर्ण building आहेत. त्यामुळे प्रत्येक building ही unique piece वाटत होती. आम्हाला तर दिसेल त्या building चे photo घ्यावेसे वाटत होते. airport ला एका terminal वरून दुसर्याला जायला एक sky bus आहे. इकडून तिकडे जायला ती २ min घेते. आम्ही मजा म्हणून त्यात पण २-३ वेळा फिरून आलो. अशाप्रकारे आम्ही पूर्ण दिवस घालवून रात्रीच्या Singapore to Seoul via Bankok flight ला चढलो. Seoul मधे (इथे लोक त्याला सोल म्हणतात. पण अक्षरांवरून त्याचा उच्चार 'सो-ऊ-ल' असा होतो ) आम्हाला घ्यायला गिरीशचे project manager, Mr. Buyong IL Jung (B I Jung) आले होते. मला भेटल्यावर त्यांनी मला 'नमस्ते' केले. त्यांनी ते गिरीशकडून आधीच शिकून घेतले होते. नंतर त्यांच्या गाडीतून आम्ही आमच्या घरी निघालो. सलग दोन रात्री अवघडून प्रवास झाल्यामुळे झोप नीट झाली नव्हती त्यामुळे गाडीत छान ऊब आल्यावर मला झोप लागली. जाग आली तेव्हा आमच्या Suwon मधल्या घरापाशी आम्ही आलो होतो. बाहेर एकदम कडाक्याची थंडी होती, अर्थात ही तर सुरुवात होती. Korean घरांमधे दारापाशीच एक खोलगट चौकोन असतो. तिथेच बूट - चपला काढायच्या आणि ठेवायच्या असतात. घराची जमीन त्यापासून २-३ इंच वर असते. घरात बाहेरच्या चपला अजिबात चालत नाहीत. मी बॅग उघडून, थोडी उचका - पाचक करून चहाचे सामान बाहेर काढले. पुढचे ४-५ तास सामान हलवून जागच्या जागी लावण्यात घालवले. हे एक studio apartment होते. मग दुपारी छान झोप काढली. दुपारी अचानक एकदम धाड-धाड असे दार वाजले. दार उघडावे की नाही असा विचार करत - करत हळूच दार उघडले तर एक आजी होत्या. (त्या आमच्या घरमालकीण आहेत हे मला नंतर कळाले) त्या आत आल्या आणि मग मी सामान कसे कसे लावले आहे ते पाहू लागल्या. आणि माझ्याशी काही बोलू लागल्या. मला फक्त त्यातले 'गिरीश' इतकेच कळाले. त्यावर मी पण त्यांना 'office-office' असे म्हणून गेल्याचे हातवारे केले. मग त्यांनी मला एक मोठा डबा भरून 'Kimachi' दिले. अशा प्रकारे आमची ओळख अगदी गंमतशीर झाली. संध्याकाळी मग मी जरा बाहेर चक्कर मारून आले. प्रचंड थंडीमुळे आणि बोचर्या वार्यामुळे नाक-कान, हात-पाय एकदम pack करूनच बाहेर गेले होते. पण इथले लोक फार क्वचितच डोके-नाक-कान झाकतात. इतक्या गार वार्यात त्यांना कसं सहन होतं काय माहीत, बहुतेक लहानपणापासूनची सवय! आम्ही रहायचो त्या शहराचे नाव Suwon -Si ( Si= city) असे होते. घराजवळच एक Suwon - Yo-Go म्हणजे Suwon Girls High School होती. हा गावाचा जुना भाग असल्याने इथे बैठी घरे जास्त आहेत. Outskirts ला मात्र resindential complexes आहेत. थंडीत दिवसभर एकदम कोवळे ऊन आणि बोचणारे वारे असते. कोवळ्या ऊन्हात फिरायला खूप मजा येते. आजूबाजूला छोटी दुकाने आहेत. आणि लक्षात येणारी गोष्ट म्हणजे दर थोड्या पावलांवर gents-ladies beauty parlours आहेत. ती बहुतेक वेळा पूर्ण काचेची असतात. आणि दोन्हीत ही बहुतेक मुलीच काम करतात. (त्यामुळे गिरीश खुशीत होता :D ) पण एकदा आम्ही त्याचे केस कापायला गेलो तर आत एज बुवा बघून तो निराश झाला पण मागे फिरता येईना म्हणून मग नाईलाजाने केस कापून घेतले. आम्हाला इथे येऊन २ - ३ आठवडे व्हायच्या आतच मी आजूबाजूला बरेच फिरून आले. रस्ते दुकाने बघत मी एकटीच हिंडायचे. करण गिरीश सकळी ६.३० ला जाऊन रात्री ८.३० ला यायचा. (बाप रे !!!!!) इथे temperature ० ते (-१०) पर्यन्त असायचे. मधून थोडा बर्फपण पडायचा. आणि दुसर्या दिवशी तो इतका घट्ट होउन निसरडा व्हायचा की मला चालायचीच भिती वाटायची. घराजवळच एक छोटी टेकडी होती. खरंतर ती एका किल्ल्याची भिंत होती. त्याचे नाव Suwon Fortress आहे. त्याची रचना आपल्य गड - किल्ल्या सारखीच आहे. म्हणजे तटबंदी, टेहळणी बुरुज इ. Suwon हे पूर्वी एका राजाचे राज्य होते. आणि त्याची वस्ती त्या भिंतीच्या आत असणार्या भागात होती. त्या टेकडीवर यायला ५ - ६ ठिकाणाहून पायर्या आहेत. आणि ती तटबंदी खूप लांब असून चीनच्या भिंती सारखी दिसते. आत प्रचंड वस्ती वाढली असुनसुद्धा तिथल्या government ने या पुरातन वास्तू चांगल्या जतन केल्या आहेत. सुरवातीला मी रोज तिथे चढून जायचे (व्यायाम म्हणून!) पण नंतर बोचर्या वार्याचा त्रास व्हायला लागल्यावर बंद केले. गिरीश आधी जे तीन महिने इथे होता तेव्हा त्याला एक Indian भेटला होत. त्याने गिरीशची ओळख एका Indian Group बरोबर करून दिली होती. या group मधले सगळे लोक जमून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी साजरे करतात. त्यांच्यापैकी एक family आहे अनंत आणि सुनिता. हे Suwon लाच पण जरा लांब राहायचे. मी एकदा तिच्याकडे बसने गेले होते. परत येताना मला suwon yak (yak= station) ला उतरायचे होते. पण मी चुकून दोन stop पुढे उतरले. मग आले घरी शोधत-शोधत. अशीच एकदा मी सलग तीन तास फिरत होते. फिरत फिरत इतका लांबचा पल्ला गाठला की घरी परत जायचा कंटाळा आला. पण तेव्हा छान थंडी आणि कोवळे ऊन असल्यामुळे काही वाटायचे नाही हिंडायला. अजून व्क family आमच्या ओळखीची होती, ते 'Namyang' ला रहात होते. तिथून नंतर आम्ही 'Namsan Tower/ Seoul Tower' बघायला गेलो होतो. हा tower जगातील सर्वात उंच अशा २० towers पैकी आहे. तिथे सर्वात वरती एक revolving restaurant आहे. आणि तळाला Korean restaurant आहे. आम्ही तिथे जेवण केले आणि तिथल्या traditional Korean interior चे shooting केले. इथे जेवायला खाली बसतात आणि समोर छोटे table घेतात. आम्हाला आमच्या मालकीणबाईंनी पण असेच एक टेबल दिले होते. या family कडून आम्हाला दोन मराठी लोकांचे पत्ते मिळाले होते. ते Suwon च्या दक्षिणेला 'Tejon' ला रहायचे. Train ने तीन तासांचा प्रवास आहे. वाटेत जाताना बराच बर्फ पडला होता. Tejon हे heavy snowfall साठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय त्याला Science City पण म्हणतात. इथे बर्याच universities आहेत आणि बर्याच मोठ्या कंपन्यांची R&D centres, laboratories आहेत. त्यामुळे इथे खूपजण research/Ph.D. करायला येतात. Korea मधे लोकांना फक्त Korean बोलता येते. english जवळजवळ अजिबात येत नाही. सर्व व्यवहार Korean भाषेतच चालतात. त्यामुळे ती भाषा गरजेपुरती यावी म्हणून मी Korean शिकायचे ठरवले. Korean English पुस्तकासाठी मी बरीच हिंडले. पण मला काही ते मिळाले नाही. शेवटी एका शालेय पुस्तकांच्या दुकानात गेले आणि त्यांना, मला नक्की काय हवे आहे हे सांगण्यात यशस्वी झाले. मग त्या दुकानातल्या मुलाने मला एका दुसर्या दुकानात नेले. आणि हवे ते पुस्तक मिळवून दिले. ते ८००० won ला होते. पण पैसे त्या मुलाने देऊन टाकले. मी त्याला द्यायला लागले तर त्याने घेतलेच नाहीत. शेवटी बळेच त्याला ५००० won देऊन आले. पुस्तक मिळाल्यानंतर त्यातल्या अक्षरांचे उच्चार सुनिताकडून लिहून घेतले. पण कोणीतरी शिकवायला हव म्हणून मग एका teacher चा, जिला English पण येते, शोध सुरू झाला. आमच्या घराजवळ एक छोटे दुकान होते. तिथल्या मुलाला थोडे English यायचे. त्याला मग मी विचारले तेव्हा त्याने माझी ओळख २ मुलींशी करून दिली - Lee Jin Seon (Lois) आणि Na-Joo (Jenny) . त्या दोघी English teachers आहेत. कोरियात सध्या English शिकण्याचे जे वारे आहे त्यामुळे अशा teachers ना खूप मागणी आहे. बालवाडीपासून college च्या मुलांना त्या घरी जाऊन किंवा शाळेत जाऊन शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा मला फायदा झाला असता. पण त्या म्हणाल्या की त्यांना Korean शिकवायचा अनुभव नाही त्यामुळे हो - नाही करत तो बेत रद्द झाला. पण या निमित्ताने त्यांची आणि माझी चांगली ओळख झाली. त्यातल्या त्यात Jenny जास्त चांगली मैत्रिण झाली. ती 29 yrs ची होती. पण Korean counting प्रमाणे ३० ची होती. Korean पद्धतीप्रमाणे मूल जन्मते तेव्हा ते एक वर्षाचे मनतात. इथले लोक मुळचे 'बौद्ध' आहेत. पण उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या विभाजनानंतर इथे अमेरिकेचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे नंतरच्या काळात बरेच जण Christian झाले. त्यामुळे इथे Christians आणि Bouddh अशी सरळ सरळ विभागणी आहे. पण नविन पिढीत मात्र कोणताच धर्म पूर्णपणे पाळायचा नाही असा trend आहे. त्यामुळेच Jenny मला म्हणाली होती की ती दर रविवारी church ला जातेच असे नाही. पण तरी Christmas मात्र सगळे जण उत्साहाने साजरा करतात. Jenny कडे २५ इड्सेंबरला पार्टी होती. तिने मला पण बोलावले होते. पण आम्हाला बाहेर जायचे असल्याने मी गेले नाही. त्यानंतर तीन - चार दिवसांनी मी तिला भेटायला गेले होते तेव्हा तिने, एक पुस्तक जे मला Korean शिकवायला म्हणून आणले होते, ते Christmas gift म्हणून दिले. अमेरिकेच्या प्रभावाचा अजून एक किस्सा म्हणजे इथल्या Professor ना Sir असे म्हणलेले आवडत नाही. ते म्हणतात ती British पद्धत आहे. त्यामुळे त्यांना Professor असेच बोलावलेले आवडते. Korean बायका लग्नानंतर house wife म्हणून राहणे पसंत करतात. खरेतर toll plazas, hotels, stations, stores, अशा बर्याच ठिकाणी बायकाच कामे करतात पण तरी नोकरी न करणार्या जास्त दिसतात. नोकरी - व्यवसाय हे नवर्याचे आणि घर - मुले हे बायकोचे असे सर्वसाधारणपणे दिसून येते. त्याला अजून एक कारण म्हणजे इथले office hours खूप आहेत. आणि त्या शिवाय पण जास्त काम करायची इथल्या लोकांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे नवरा हा जवळ जवळ घरी फारसा नसतोच. म्हणून बायकोलाच ते सगळे बघावे लागते. इथे शिक्षण preschool, middle school, high school, university असे आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा एका विशिष्ट वयानंतर मुलांना Military service compulsory आहे. पण जे Ph.D. करतात त्यांना थोडी सवलत मिळते. Military service मधे त्यांना भरपूर free cigarettes मिळत असल्यामुळे इथे पुरुषांमधे smoking चे प्रमाण प्रचंड आहे. Korean लोक स्वभावाने खूप चांगले आहेत. प्रेमळ आहेत, मदत करणारे आहेत. आम्हाला तर खूप चांगले अनुभव आले. एक किस्सा सांगते. गिरीश चा एक fax मला Bangalore ला करायचा होता. त्याआधी मी तिथे आपल्यासारखे STD/ ISD/ FAX booths पाहिले नव्हते. त्यामुळे मी त्यासाठी बरीच हिंडले. मला नक्की काय हवे आहे ते लोकांना कळावे म्हणून मी ते Korean मधे Jenny कडून लिहून घेतले होते. पण बर्याच दुकानात फक्त कोरियातच करायची सोय होती. शेवटी एक दुकानदार म्हणाल की post office मधून होईल. पण ते तर बंद झाले होते. मग एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी एका mobile विकणार्या दुकानात गेले. तिथे सोय होती. मग तिथल्या मुलाने सगळे code फिरवले तरी काही लागेना. मग त्याने परत कोणालातरी phone करून नक्की विचारून घेतले आणि परत dial केले. यावेळी ते बरोबर लागले आणि fax नीट गेला. एकदाचा जीव भांड्यात पडला! मग मी त्याला किती पैसे म्हणून विचारले तर तो म्हणाल की पैसे नको कारण तुम्ही इथे नवीन आहात. मला तर खूप आश्चर्य वाटले. काय बोलावे तेच कळेना.मग शेवटी 'खमसाहामनिधा' म्हणजे Thank You! म्हणून बाहेर पडले. कोरीयात पण आपल्याप्रमाणे वयाने मोठ्या लोकांना आदर दिला जातो. बोलताना पण आदरार्थी भाषा वापरली जाते. अनोळखी लोकांशी बोलताना पण वेगळी भाषा वापरतात. भाषेच्या बाबतीत बोलायचं तर खूप मजेशीर भाषा आहे ही. यात मुळाक्षरे खूप कमी आहेत. उदाहरणार्थ क, ख, ग, घ ला एकच अक्षर आहे. त्यामुळे एका ठिकाणाचे नाव कधी 'कुरो' असते तर कधी 'गुरो' असते. ही भाषा एकदम soft आहे. Chinese/ Japanese सारखी अवघड नाही. त्यामुळे कमीत कमी दुकानांच्या पाट्या आणि गाड्यांची नावे वाचण्याइतकी तरी व्यवस्थित Korean मी शिकले. इथे खाण्यात veg-nonveg असा प्रकारच नाही. कारण pure veg ही concept च नाही तिथे. त्यामुळे hotel मधे veg सांगितले तरी कमीत कमी fish तरी असायचेच. त्यामुळे आमचं तसं फार अडलं नाही. पण तरीही त्यात beef/pork/dog वगैरे वर्ज्य पदार्थ नाहीत ना याची खात्री करून घ्यावी लागे. चिनी लोकांप्रमाणे हे पण काहीही खातात. इथे खास असे insect food पण मिळते. बाजारात ते किडे असे शिजवून विकायला ठेवले असतात. आपल्याकडे रगाडा पॅटिस ची गाडी असते ना तशी! त्याच्या जवळून गेल्यावर जी दुर्गंधी येते की बस्स!! इथे insect chocolates पण मिळतात. मी TV वर ते कसे करतात ते पण पाहिले होते. त्या किड्याला मधे ठेऊन वरून chocolate syrup ओततात. ई ई ई ई !!!! त्यांच्या या खाण्याच्या सवयीबद्दल म्हणायचे तर त्याला काही कारणे आहेत. एक म्हणजे भौगोलिक परिस्थिती अशी आहे की खूप थंडीत इथे पूर्वी काही मोजक्या भाज्या आणि भात याशिवाय काही पिकायचे नाही (आता बरेच काही मिळते) त्यामुळे अजूनही बर्याच वस्तू ते आयात करतात. दुसर म्हणजे खूप पूर्वी इथल्या लोकांना सततच्या युद्धामुळे जे समोर दिसेल ते खाऊन पोट भरावे लागे. त्यामुळे त्यांच्यात ही सवय वाढीस लागली आहे. इथे कोबी, flower, broccoli, कांदा-पात, कांदा, बटाटा, लसूण, आले, कोथिंबीर, ढब्बू मिरची, मका, सोयाबीन, सोयाबीनचे पदार्थ( टोफ़ु, मोड) हे पण मिळतात. noodles च्या असंख्य varieties मिळतात. इथे त्याला 'राम्यान' म्हणतात. (आपण खातो न 'Top Ramen' !) पहिल्या दिवशी गिरीश येताना त्याचे २ packs घेऊन आला होता. बरोबर chop sticks पण आणले होते. मी हळूहळू त्याने खाल्ले. मला नंतर त्याने चांगले खाता येऊ लागले. Korean जेवणामधे non-veg चे प्रमाण जरी खूप असले तरी रोजचे जेवण साधेच असते. एक bowl भात, जोडीला किमची, सूप, salad. या जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे यात तेल खूप कमी असते. आणि जे असते ते मका किंवा सोयाबीनचे. तूप - लोणी अजिबात नाही, मीठ - साखर खूप कमी, सूप - सॅलड भरपूर, आणि एका वेळचं जेवण पण कमी (अर्थात दिवसभर सारख काहीतरी चरत असतात) यामुळे आणि शिवाय या लोकांची एक ठेवण पण असेल, पण इथले लोक अंगानी बेताचेच असतात. मध्यम जाड - प्रचंड जाड असे लोक इथे अभावानेच दिसतात. वर लिहीलेला 'किमची' हा पदार्थ प्रत्येक घरी आवर्जून बनवला अगर आणला जातो, आपल्या लोणच्याप्रमाणे! किमची ही एक पालेभाजी आहे. साधारण कोबीसारखा पण अजून लांबट आणि जाड पानांचा त्याचा गड्डा असतो. त्याच्या प्रत्येक पानाला तिखट, मसाला, आणि वेगवेगळी sauce लाऊन ते मोठ्या मातीच्या रांजणात ठेवतात. ताजे किमची छान कुरकुरीत लागते. त्याची चव थोडी उग्र असते पण २ - ३ वेळा खाल्ल्यावर ते आवडायला लागते. इथल्या जेवणाचा एक अविभाज्य भाग म्हणजे दारू! थोडी तरी का होईना पण सर्वजण घेतात. आणि ती पण लहानाने मोठ्याला offer करायची असते. इथे वेगळी अशी rice wine मिळते. त्याला 'सोजू' म्हणतात. त्याची चव छान असते. आम्ही तिथे होतो तो Football World Cup 2002 चा सीझन होता. आम्ही पहिल्यांदा Buyong कडे गेलो होतो तेव्हा तिथे जवळ असलेले stadium बघायला गेलो होतो. अशी ७ - ८ नवीन stadiums खास बांधली होती. त्यांची रचना आणि technique पाहून अचंबा वाटतो. अशीच अजून एक building इथे आहे ती म्हणजे Building 63 . ही ६३ मजल्यांची आहे.६१ ते ६३ मजल्यांवर काही offices आहेत. ६० व्या मजल्यावर observation desk आहे. तिथे मोठ्या दुर्बिणी आहेत. शिवाय मागच्या शतकातल्या Korean लोकांचे, त्यांच्या राहणीचे काही photo आहेत. तळ आणि पहिल्या मजल्यावर Sea World Exhibition आहे. एक छोटे थिअटर आहे. या building मधल्या lifts एक सेकंदाला एक मजला या वेगाने जातात. आम्ही वरती मुद्दामहून दुपारी ४ वाजता गेलो. कारण जरावेळाने अंधार झाल्यावर तेव्हाचे आणि आधीचे उजेडातले अशी दोन्ही दृश्य बघायला मिळाली. ही building 'हान' नदीच्या काठावर आहे. Seoul च्या जवळ 'Itewon' म्हणून एक भाग आहे. तो कायम सगळ्या foreigners नी भरलेला असतो. तिथे पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांची खूप दुकाने आहेत. तिथे आपले पदार्थ, हिंदी cassettes मिळतात. २६ जानेवारीला 'Myong-Dong' इथे असलेल्या Indian Overseas bank च्या office मधे सगळ्या भारतीयांचा एक कार्यक्रम होता. गप्पा - गोष्टी, गाणी - कविता, खाणे - पिणे, आणि शेवटी 'वंदे मातरम्' झाले. Suwon हून आम्ही दोघे आणि सुनिता गेलो होतो. म्हणता म्हणता आमची तिथून निघायची वेळ आली. वरच्या आजींना काहितरी present द्यायचे म्हणून आणायला गेले तर काय घ्यावे तेच कळेना. मग ठरवल की सरळ rice bowl घ्यावेत. संध्याकाळी त्यांनी आम्हाला जेवायला बोलावले होते. तेव्हा मी ते त्यांना दिले, तर उलट त्यांनीच मला त्यांच्याकडे असलेले, वेगवेगळ्या आकारांचे, लहान-मोठे, ४-५ डझन bowls दाखवले. आणि मला म्हणाल्या की हे तू आणलेले तूच घेऊन जा! ते ऐकल्यावर मी चाटच पडले. पण त्यांच्या मुलाने त्यांना असे present परत करायचे नसते म्हणून सांगितले, मग त्यांनी ते ठेऊन घेतले. जायच्या दोन दिवस आधी मी Jenny अणि Louis ला जेवायला बोलावले होते. हा भाग, हे लोक, परत बघायला मिळणार नाहीत म्हणून वाईट वाटत होते पण आपल्या घरी परत जायचे हा आनंद पण होता. इथल्या लोकांबरोबर आम्ही इतके छान मिसळून गेलो होतो की त्यांना विसरणे शक्यच नव्हते. पण काही एलाज नव्हता. खूप चांगल्या आणि काही मोजक्या वाईट आठवणी घेऊन आम्ही कोरिया सोडले. आमचे flight सिंगापूर मार्गे होते. तिथे दोन - तीन दिवस थांबून मग आम्ही पुढे जाणार होतो. सिंगापूरला पहाटे एक ला पोहोचलो. पण हॉटेलला घेऊन जाणारी गाडी सहा वाजता येणार होती म्हणून मग थोडा वेळ झोपण्यात, खाण्यात, भरपूर coffee पिण्यात आणि सहा वाजण्याची वाट पहाण्यात घालवला. hotel ला आल्यावर थोडा आराम करून, आवरून बाहेर पडलो. कोरियात मी निघताना तीन स्वेटर घातले होते आणि इथे मुंबई सारखा उकाडा! तो Chinese New Year चा season होता. त्यामुळे बरेच लोक तिथे फिरायला आले होते. जिकडे तिकडे लाल दिवे, आकाश कंदिल, लाल कपडे असा सगळा लाले लाल मामला होता. कोरियाच्या मानाने इथले वातावरण खूप वेगळे होते. कोरियात आपण foreigner म्हणून उठून दिसतो. पण इथे सगळे foreigners च असतात. आणि festive season मुळे तर ते प्रमाण जास्तच होते. आम्ही मेट्रोची चौकशी करून 'Jurong Bird Park' आणि 'Sentosa Island' बघायला निघालो. 'Jurong Bird Park' मधे असंख्य रंगाचे, प्रकाराचे पोपट, पक्षी, त्यांची माहिती, काही bird shows , train safari आहे. Sentosa ला under water world, dolphin show (हा आम्हाला बघता आला नाही.), बीच, सिंगापूरचे चिन्ह असलेल्या सिंहाची प्रचंड मोठी प्रतिकृती आणि त्यात museum आहे. याशिवाय मुख्य आकर्षण म्हणजे अंधार पडल्यावर होणारा laser show . एक मोठे कारंजे आहे आणि त्यात तो laser show दाखवतात. तो तर अगदी अप्रतिम आहे. याशिवाय इतरही बर्याच गोष्टी आहेत जसे एक man-made volcano पण आहे. पण वेळे_अभावी आम्हाला ते बघायला जमले नाही. दुसर्या दिवशी आम्ही night safari ला गेलो होतो. ते एक पार्क आहे. तिथले सगळे जंगली प्राणी मोकळेच आहेत. आणि आपण एका छोट्या train मधून सगळीकडे फिरायचे. पण प्राणी सुट्टे आहेत म्हणून train बंदिस्त नाही, तर उलट 'फुलराणी' सारखी उघडी आहे. त्या प्राण्यांना दिव्याचा त्रास होउ नये म्हणून चांदण्यासारखा उजेड देणारे दिवे लावले आहेत. पण गंमत म्हणजे ते प्राणी अजिबात काही करत नाहीत. जणू काही त्यांना सवय झाली आहे की रोज रात्री आपल्याला बघायला खूप माणसे येतात म्हणून! ही फेरी झाल्यानंतर आपल्याला वाटले तर आपण पायी पण फिरू शकतो. हा सर्व प्रकार खूप मस्त वाटला.तिसर्या दिवशी दुपारी आम्हाला निघायचे होते. म्हणून मग आम्ही सकाळी little India ला भेट दिली. तिथे काही खरेदी केली. हॉटेलवर येऊन सामान बांधले आणि airport वर आलो. एक मोठी सहल संपवून आम्ही भारतात परतत होतो. -Radha_gd1
|