« | »





निरभ्र (एकांकिका )
लेखक : प्रसाद शिरगांवकर

- प्रसंग एक -

[पडदा उघडतो तेंव्हा स्टेजवर एका उच्च मध्यमवर्गीय घराच्या दिवाणखान्याचा सेट, या मधे एक सोफासेट, एक टीपॉय, एक writing table chair ,एक भारतीय बैठक, एक फोन आणि एक मिनी बार अपेक्षित. रंगमंचावर उजेड होतो तेंव्हा संध्याकाळची साधारण 6 वाजायची वेळ. भारतीय बैठकीवर बसून शिल्पा,वय सुमारे २७ वर्ष, फोनवर बोलत आहे. ]

शिल्पा: (फोनवर) हं... हं... ओ के... पुढे... ओ के ओ के ... समजलं... समजलंय गं आई.... हे मी सगळी तयारी करून ठेवलिये, तो आला रे आला की करून बघीन. नाही ना नाही आला अजून. येईल तासाभरात. तयारी केली की सोपं जाईल करणं. आई काय अगं, झालं की आता वर्ष लग्नाला, जमेल की आता! बरं, मी करते आणि सांगते कसं झालं ते. बाकी तू बोल. ठीक आहे ना सगळं... बाबा कुठे आहेत? आले नाहीत का अजून? (दरवाज्याची बेल वाजते)... आई एक मिनीट हं, कोणीतरी आलंय वाटतं....

(फोन हातात घेऊन जाऊन दार उघडते, मकरंद [वय सुमारे ३०-३२ वर्ष] आलेला असतो, तिच्या चेहर् ०दयावर आश्चर्य... खुणेनीच त्याला लवकर कसा विचारते, आणि एक मिनिटात फोन संपेल असं सांगते. मकरंद शूज काढून कपडे बदलायला आत जातो. ती परत आईशी बोलायला लागते, बोलण्याचा टोन थोडासा बदलतो )

अगं मकरंदच आला आहे. हो ना... तोही लवकरच आलाय आज! .... (लाजरं हसते) आई गप गं! तू पण ना.... अगं नाही.. आम्ही काही ठरवलं बिरवलं नव्हतं... मला खूप कंटाळा आला ऑफिसात म्हणून मी लवकर आले... आणि त्याचा रोजचाच बदलता कार्यक्रम असतो. बरं आता मी ठेवते आणि कामाला लागते. चल अच्छा... हो हो... तू सांगितलंयस तसंच करते.

मकरंद: (घरातले कपडे घालून बाहेर येत) काय म्हणतायत आमच्या सासूबाई? ठीक आहेत ना?

शिल्पा:हो... उत्तम.. मजेत आहे..

मकरंद:हं... फोन काय.... सहज?

शिल्पा: अगदी सहज... अरे मीच केला होता... जरा एक गंमत करायची आहे संध्याकाळ साठी?

मकरंद: अगं... 'गंमत' करायला थेट आईचा गाईडन्स... कमाल आहे तुझी...

शिल्पा: मग? आहे की नाही? मी खूप दिवस ठरवत होते, पण जमतच नव्हतं. शेवटी आईलाच विचारू म्हणलं. सगळी तयारीही करून ठेवली. म्हणलं तू आल्या आल्या करू...

मकरंद: आल्या आल्या?

शिल्पा: हो

मकरंद: शिल्पू, वाटलं नव्हतं हं तू अशीही असशील ते.

शिल्पा: म्हणजे?

मकरंद:अगं, आईला विचारून... सगळी तयारी... गंमत....

शिल्पा: गप रे... खाण्यातली गंमत आहे...

मकरंद:असं होय... मला वाटलं, वळवाच्या पावसाचे दिवस आहेत. मगाशीच मस्त पाऊस पडून गेलाय. नवरा बायको दोघंही जणं न ठरवता आपापल्या ऑफीसातून लवकर घरी आलेत... कोणी येणार नाही... कुठे जायचं नाही... अशा वेळी...

शिल्पा: अशा वेळी तुला... छान छान गरम गरम.... कांदाभजी... खावीशी वाटतात हे माहित आहे मला!

मकरंद: हं.... तेही आहेच म्हणा... पण कांदाभज्यांसाठी आईला फोन? अगं जमतात की तुला ती... रुचिरामधे न बघताही!

शिल्पा: कांदाभजी नाही रे... प्लॅन मे थोडासा चेंज होनेका! घरी आले तर घरात कांदे नाहीत.. भाजीवाल्याकडे गेले तर तिथे कांदे होते, पण शेजारीच ICICI चा एक दत्तू थांबला होता. आणि मी भाजीवाल्याला कांदे मागितल्यावर तो दत्तू लोन स्कीमसाठी माझ्या मागे लागला! कांदे परवडणार् ०द्या गिर् ०दहाईकांना कुठलंही लोन द्यायला तयार आहे बॅंक हल्ली! मी त्याचा ससेमिरा चुकवण्यासाठी शेवटी कांदे कॅन्सल केले आणि कोथिंबीर घेऊन आले.

मकरंद: कोथिंबीर?

शिल्पा: सांगते तुला... आधी मला जरा मदत करायला लाग...

(त्याचा मोबाईल वाजायला लागतो... मकरंद मोबाईल हातात घेतो. येणारा नंबर बघून चेहर् ०दयावर जरा वैतागलेले भाव... आणि खोट्या मधाळ आवाजात फोनवर बोलायला लागतो. )

मकरंद: बोलिये खन्ना सर.. नमस्ते नमस्ते... बस आपकी दुवासे सब ठीक चल रहा है... आप कैसे है... good good! बोला सर कशी काय आठवण काढलीत गरीबाची... साहेब आज जरा कठीण आहे तुमची delivery नाही नाही... तुमचंच काम सुरू आहे... हे काय मी स्वतः उभं राहून करून घेतोय! yes... yes... i understand... सगळ्यांनाच problem आहे. ऐका माझं... उद्या सकाळी सकाळी शंभर पीसेस पोचतीलच... guaranteed... डिलिव्हरी बॉय नसेल तर स्वतः आणून देईन साहेब! Ok sir... thank you... (फोन ठेवतो)

(दुसरा फोन लावतो... typical boss च्या आवाजात)

कोण? भोसले? हां... कशी चाललीये शिफ्ट? ठीके.... बर ऐक... सावंतची टिम काय करतीये?... ठीके... त्यांच्या त्या असेंब्लीज संपल्या की लगेच त्यांना Diginet चं काम घ्यायला सांग... उद्या delivery द्यावीच लागेल. (चिडून) काय?.... त्यांचे PCBs आले नाहीत अजून... थांब बघतो मी... ते येतील... तू पुढच्या असेम्ब्लीज नीट तयार होतील याची व्यवस्था लाव. ठीके...

(अजून एक फोन लावतो.. अत्यंत rude आवाजात.. )

देशपांडे?... मकरंद देसाई देसाई बोलतोय... अहो काय Diginet च्या PCBs ची delivery नाही आली अजून? नाही नाही.. मला अजिबात काही कारणं सांगू नका? हे बघा... मला पुढच्या तासाभरात माझी सगळी ऑर्डर माझ्या कारखान्यात पोचलेली हवी आहे... ठीके... ओ के... ठीके... वाट बघतोय मी...

(फोन बंद करून डोळे मिटून स्वस्थ बसून रहातो... शिल्पा येते...)

शिल्पा: काय रे... टेन्शन मधे आहेस कसल्या ?

मकरंद: अं...?

शिल्पा: काही नाही... म्हणलं टेन्शन मधे आहेस का?

मकरंद: विशेष नाही... नेहमीचंच गं... माझ्या supplier नी मला वेळेवर delivery production आणि delivery schedule वर परिणाम होतो... आणि मग माझे customers specialized electonic assemblies supply करण्याचा ही आपलीच हौस ना... मग भोगा आपल्या कर्माची फळं! तुमचं बरं आहे... तुमच्या field मधे असं काही नाही... तुमचा client म्हणाला छान जाहिरात तयार करा की केली तयार... तो म्हणाला ती पेपर मधे छापा की छापली... नुसते पैसे छापता राव तुम्ही लोक!

शिल्पा: अगदी... अगदी... खरंय बघ तुझं! आद आगेन्cय Grass is always greener on the other side of the river... असो ते जाऊ दे.... मस्त गरम गरम कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत!

मकरंद: आईशप्पत... भारीच आहेस तू...! तू कसं ओळखलंस... सॉलीड भूक लागली आहे मला.. आहा... आणि काय जबरदस्त वास येतोय... पण काय गं... बघ ना.. मस्त संध्याकाळ आहे... छान पाऊस पडून गेलाय... निवांत वेळ आहे... नुसत्या कोरड्याच वड्या का काय... म्हणजे... खूप कोरडही पडली आहे गं घशाला...असं काही छान प्यावंसं नाही वाटत तुला?

शिल्पा: हं... महाराज... काय विचार काय आहे?

मकरंद: अगं जास्त नाही गं... उगाच आपलं लाईट काहीतरी घसा ओला करायला....

शिल्पा: तू पण ना... ऐकत नाहीस बिलकुल... काय प्यायचा mood

मकरंद: ये हुई ना बात... बहुतेक बकार्डी आहे शिल्लक घरात... कोक आहे का फ्रिज मधे?

(ती आत जाते, तो बार मधून बकार्डीची बाटली काढतो, ती बाहेर येताना कोकची बाटली आणि दोन ग्लासेस घेऊन येते.. दोघंजण कोथिंबिरीच्या वड्या खात पेग सिप करत गप्पा मारत बसतात)

मकरंद: काय गं, ही एवढीच कशी शिल्लक?

शिल्पा: अरे हो... मी लवकर आले ना, तेंव्हा गटागट पिऊन टाकली!... तूच बघ, वाढत चाललंय तुझं पिणं

मकरंद: ए बाई, आता please दारू आणि सिगरेटवर लेक्चर नको... मस्त मूड आहे तर छान काहीतरी गप्पा मार ना...

शिल्पा: हं... तू ना.... मला सांग कसा वाटला तुला कालचा सिनेमा?

मकरंद: काल रात्री केबलवर पाहिला तो? ठीक ठीक.. टाईमपास होता.. शेवट आवडला... पण विषय अजिबात पटला नाही! तुला?

शिल्पा: बरंचसं असंच... एकच फरक... विषय खूप आवडला, शेवट बिलकुल पटला नाही!

मकरंद: आवडला?.. आवडण्यासारखं काय होतं त्यात?

शिल्पा: अरे या सिनेमाचा विषय हाच तर त्याचा मुख्य selling point होता ना?

मकरंद: म्हणून तर मला पटला नाही सिनेमा. Live in relationship हा सिनेमाचा विषय होऊ शकतो हे मान्य आहे. पण ते एवढं glorify करायची काय गरज आहे?

शिल्पा: का करायचं नाही? काय वाईट आहे त्यात? किंवा काय चुकीचं आहे?

मकरंद:चुकीचं? काय चूक नाहीये त्यात ते सांग? हे असले सिनेमे बघुन काय भीषण परिणाम होतील लोकांवर. लग्न बिग्न काही न करता तसंच एकत्र रहायचं... रहायचं ते रहायचं वर काय वाट वाट्टेल ते उद्योग करायचे आणि सर्वात कडी म्हणजे मुलांना जन्म द्यायचा.. हे असलं काहीतरी दाखवतात सिनेमात आणि मग लगेच आपल्याकडची तरुण पोरं पोरी या सगळ्याची सरसकट कॉपी करायला लागतात... आपली संस्कृती, आपला समाज वाट लागेल वाट सगळ्याची अशानं...

शिल्पा: (उपहासात्मक हसत)... कधी कधी मला वाटतं की मी अजून पुरेसं ओळखतंच नाही तुला... Live in relationship या कल्पनेलाही तुझा इतका तीव्र विरोध असेल असं कधी वाटलंच नव्हतं मला.

मकरंद:म्हणजे? जे चूक आहे ते चूक आहे.... ए बाई... आता हे सगळं तुला पटतं असं तू सांगू नकोस मला बरं का..

शिल्पा: मला त्यात काहीच चुकीचं वाटत नाही. दोन व्यक् ०द्तींनी संपूर्ण आयुष्य एकत्र काढायच्या आधी मुळात आपण एकमेकांना compatible आहोत का नाही हे तपासून पहाणं, आणि ते पहाण्यासाठी काही काळ एकत्र रहाणं यात हरकत काय आहे?

मकरंद: वा... आणि समजा असं लक्षात आलं की आपण नाहीयोत compatible तर? सोडून द्यायचं? पुढे काय करायचं दुसरा partner शोधायचा... परत एक भातुकलीचा डाव... परत नाही जमलं की परत एकदा ट्यॅम्प्लीज घ्यायची... आणि परत नवा गडी नवा राज.... काय हेच करत रहायचं का काय आयुष्यभर?

शिल्पा: आणि समजा आपला partner आपल्याला compatible नाही हे लग्ना नंतर कळलं तर? केवळ लग्न झालं आहे म्हणून संपूर्ण आयुष्य तडजोडी करत जगत रहायचं?

मकरंद: आयला... म्हणजे तुमचं हे live in realationship यायच्या आधी गेली दहा हजार वर्ष लोकांनी तडजोडी करत संसार केले का? काही तरी फॅडं काढतात राव नवी नवी... एक सांग मला... बाकी समाजात काय असायला पाहिजे काय नको त्याची चर्चा करणं ठीके, पण तू स्वतः केलं असतंस का असं काही? आपलं arranged mariage आहे, पण हे नसतं झालं आणि मी किंवा दुसर् ०द्या कोणी live in relationship चं proposal दिलं असतं तर मान्य केलं असतंस का?

शिल्पा: केलं असतं... नक्कीच केलं असतं... पण भेटलंच नाही असं कोणी... (थोडं लाडात येऊन).. मग तू भेटलास... आणि एकदम लग्नच करावंसं वाटलं!

मकरंद: हुं.... come on शिल्पू... तू इतकी सुंदर, dynamic fields मधे एवढी active ,तुला इतक्या वर्षांत कोणीच असं भेटलं नाही?

शिल्पा: नाही ना रे.. कोणीच नाही...

मकरंद: come on शिल्पू... कधीतरी प्रेमात पडली असशीलच की... कॉलेजमधे तरी...

शिल्पा: एखाद दुसरा teen age crush येऊन गेला रे... nothing serious.. त्या वयात जे गोड गुलाबी आकर्षक वाटलं, ते अनुभवलं... पण त्या पैकी कुठल्याच नात्याचं पुढे काही करावं असं तेंव्हा वाटलं नाही... (थोडी विचारात पडते...) ए तुला कधी अभि बद्दल सांगितलं का रे मी... अभि... खूप चांगला मित्र होता माझा... मित्र, सखा किंवा कदाचित त्याहुन जास्त काहीतरी... काय handsome होता माहितीये... सहा फूट उंच, एकदम well built, well mannered, चकाचक रहायचा... आणि खूप खूप ambitious होता.. खूप धमाल करायचो आम्ही कॉलेजमधे असताना.. म्हणजे तो तसं कमीच बोलायचा पण माझी सगळी बडबड ऐकून घ्यायचा! भरपूर हिंडायचो आम्ही... खरं तर त्यानी मला किंवा मी त्याला कधीच propose केलं नाही. पण आमचे घरचे आणि मित्र मैत्रिणी सगळ्यांना वाटायचं की 'we are made for each other' आणि लग्न करूच आम्ही असं...

मकरंद: मग?... कुठे माशी शिंकली...?

शिल्पा: तो खूप ambitious होता.. त्याला अमेरिकेत शिकायला जायचं होतं.. आणि तिथेच settle ही व्हायचं होतं... पण मला नव्हतं जायचं! आणि दोघांचेही हे विचार एकमेकांना पक्के माहित होते... ते बदलणं शक्य नाही हेही माहित होतं... म्हणून मी कधी त्याला 'थांब' म्हणलं नाही... त्यानी मला कधी 'चल' म्हणलं नाही... त्याची वेळ झाल्यावर तो निघून गेला... तो निघून गेल्यावर त्रास झाला... होणारच होता.. but this is life... चला साहेब....

(शिल्पा उठते, जायला निघते... मकरंद कडे बघते. तो कसल्या तरी गाढ विचारात दिसतो.)

शिल्पा: काय रे काय झालं?

मकरंद: अं... काही नाही....

शिल्पा: सांग ना अरे काय झालं?

मकरंद: खरंच काही नाही... तुला झोप आली आहे का?

शिल्पा: आली आहे खरं.... जेवायचं काय करुया?

मकरंद: भूक नाहिये आता फार, तुला खायचंय काही?

शिल्पा: मलाही नाहीये खरं भूक आणि मी खूप कंटाळली आहे आणि मला अरे उद्या वेळेवर कामाला पोचायचं आहे.... सध्या नव्या बॉस बरोबर काम करतीये ना

मकरंद: अरे हो की.. महिना होऊन गेला ना गं? काय नाव म्हणालीस तू... हां...अवस्थी का काहीतरी ना...

शिल्पा: हो... शशांक अवस्थी... IIM passed out आहे म्हणे... शिवाय Europe मधल्या टॉपच्या एका आगेन्cय ४ १३ ५ disciplined आणि तरीही एक नंबरचा गोड बोल्या... आमच्या सगळ्या टीमला solid impress केलंय...

मकरंद: काय वयाचा असेल गं? आणि दिसाय बिसायला कसा आहे?

शिल्पा: वयाचा अंदाज येत नाही रे.. तरुणच दिसतो बर् ०दयापैकी... आणि खूप चिकणा आहे दिसायला! शिवाय वागण्या बोलण्यात इतकी decency आणि mannerism असतं की बास... असो... तर थोडक्यात काय की मला उद्या लवकर कामावर पोचायचं आहे... त्यासाठी लवकर झोपणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण हा प्रोग्रॅम लवकर आवरणं गरजेचं आहे!

मकरंद: (अत्यंत वेगळ्या आवाजात) शिल्पा मला एक सांग... तुझा बॉस थोडाफार तुझ्या अभि सारखा आहे का गं?

( Shocking music bang & Black out )

- प्रसंग दोन -

( रंगमंचावर उजेड होतो तेंव्हा रात्रीची सुमारे ९ वाजताची वेळ. मकरंद एकटा... अस्वस्थ दिसत आहे. सिगरेट पेटवतो, थोड्या येरझाऱ्या मारतो. सिगरेट विझवतो. खुर्चीवर बसतो. काही कागदपत्रं चाळतो. त्यात लक्ष लागत नसतं. वैतागून कागद टेबलावर आपटतो. फोन उचलतो, काही क्षण विचार करतो, परत फोन खाली ठेवतो. पुन्हा सिगरेटचं पाकीट काढतो. उघडतो, तसंच बंद करून टेबलावर फेकतो. डोक्याला हात लावूव बसून रहतो. शिल्पा येते)

शिल्पा: हाऽऽय

मकरंद: (मान वर करुन चेहऱ्यावर ओढून ताणून नोर्मल भाव आणत) हाय. ये. उशीर झाला?

शिल्पा: हो ना अरे एक presentation करायचं होतं, वेळ लागला.

मकरंद: तुझं कसं काय चाललंय गं आज काल?

शिल्पा: अं... ok type.. nothing interesting. तेच ते चालू आहे आपलं...

मकरंद: तुझा तो boss ...काय बरं नाव... अवस्थी... झाला का settle ...चार पाच महिने झाले ना गं?

शिल्पा: ए एवढे कुठे?... दोन तीनच झाले असतील...

मकरंद: काय busy ठेवतो का फार तो? नाही... उशीरा येतेस हल्ली बर् ०दयाचदा?

शिल्पा: हो ना.. थोडं हेक्टिक सुरू आहे खरं... शशांक बर् ०द्यापैकी perfectionist आहे आणि खूप ambititios clients

मकरंद: तू एकटीच करतीयेस सगळं?

शिल्पा: म्हणलं तर इतर लोक असतात पण मुख्य जबाबदारी माझ्यावर आहे ना... माझ्यावरच पडतं सगळं...

मकरंद: आणि तो अवस्थी? तो खूप helpful directions देतो... शिवाय appreciate ही करतो माझं काम... मजा येते त्याच्याबरोबर काम करायला...

मकरंद: शिल्पा मला एक माणूस भेटायला आला होता

शिल्पा: हुं... हुं...

मकरंद: अनोळखी होता

शिल्पा: ऐकतीये मी...

मकरंद: त्यानी... त्यानी मला... म्हणजे तो काहीतरी... Oh damn it... कसं सांगू...

शिल्पा: (काळजीने) बोल ना... जे झालं आहे ते तसं च्या तसं सांग... काय म्हणाला तो? Anyting serious?

मकरंद: तुझं तुझ्या boss बरोबर affair सुरू आहे असं म्हणत होता..

शिल्पा: What? You are kidding ...अरे कोण आहे हा माणूस? तुला कसा भेटायला आला? काय... काय बोलला? आणि तुझा विश्वास बसला असल्या कशावर?

मकरंद: नाही नाही... अजिबात नाही... म्हणजे... माहित नाही...

शिल्पा: मकरंद मला कळत नाहीये मी काय करू ते... हे काय रे असं मधेच... खूप विचित्र वाटतंय (विचारात गढते)

मकरंद: मला एक सांग...

शिल्पा: (दचकून) अं...

मकरंद: मला एक सांग... तुम्ही दोघं... म्हणजे तो अवस्थी तुला मिठ्या मारतो office मधे?

शिल्पा: मकरंद?...

मकरंद: दिवस दिवस गायब असता तुम्ही ऑफीसमधून?

शिल्पा: मकरंद अरे तू उलट तपासणी घेतोयस का माझी?

मकरंद: उलट तपासणी? का? बोचतायत हे प्रश्न?

शिल्पा: ए बाबा, तू शांत हो आधी.... बस जरा खाली... आणि ऐकून घे माझं... बस ना रे राजा... हूं... thats better ...हे बघ तुला कोण भेटलं आणि त्यानी काय सांगितलं ते मला काही माहित नाही. पण फारच काहीतरी वाईट सांगितलेलं दिसतंय... आपला वर्षाभराच्या सहवासात तू कधीच असा वागला नाहीयेस. कधीच या स्वरात बोलला नाहीयेस..

मकरंद: हे बघ मला...

शिल्पा: तुझ्या मनात काही कारणानी जर संशय शिरलाच असेल तर मी काहीही सांगितलं तरी... कुठलीही गोष्ट नाकारली किंवा कशाचीही explanations दिली तरी तुला काहीच पटणार नाही... (मकरंद काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो... ती त्याला थांबवत) ऐक... ऐक माझं... बोलू दे मला

शशांक आणि मी... (स्वतःशी हलकं कुत्सित हसत) काय आहे बोलण्यासारखं? काय आहे आमचं नातं? अगदी खरं तर कुठल्याही दोन हुषार, dedicated आणि efficient colleagues मधे जसं असू शकतं तसंच आहे.. त्याची कामाची पध्दत, त्याच्या achievements मला आवडतात आणि माझी creativity त्याला...

मकरंद: (थोडं उपहासानी) असं?

शिल्पा: ए वाईट काय आहे रे याच्यात?

मकरंद: वाईट यामधे नाही... काहीच नाही... पण या आवडण्यामधून पुढे जे काही...

शिल्पा: अरे बाबा हा शशांक युरोपमधे राहून आलाय... तिथलं culture ,तिथली workstyle त्याच्या सवयीची झालीये... आपल्या एखाद्या colleague नी खूप छान काही काम केलं तर त्याला किंवा तिलाही मिठी मारून आनंद व्यक् ०दत करणं हे त्याच्या द्रुष्टीनी अगदी स्वाभविक आहे.

मकरंद: आणि हा असा आनंद फक् ०दत तुझं काम बघूनच होतो का त्याला?

शिल्पा: ए तू वाकडं बोलू नको हां... हा शशांक सगळ्यांशी असाच वागतो... मी काही exception नाहीये... निदान मला तरी असं जाणवलं नाही कधी...

मकरंद: हुं (कुत्सित हसतो)

शिल्पा: तू विश्वासच ठेवणार नसशील कशावर तर माझ्या कुठल्याच बोलण्याला काही अर्थ नाही....

मकरंद: शिल्पा... मला असं वाटतं की तू हा जॉब सोडावास...

शिल्पा: काय? काय म्हणतोयस तू? job सोडू मी हा? पण का?

मकरंद: मला तुझी सगळी explanations पटतायत... तुझं सगळं बोलणं मान्य आहे... तरीही मला असं वाटतं की तू हा जॉब सोडावास... मी या शशांक अवस्थी type च्या लोकांना पुरेपुर ओळखतो... हपापलेले असतात... एक नंबरचे हपापलेले असतात हे लोक. आपल्या अधिकाराचा उपयोग करून हाताखालच्या बाईचा वापर करून घेणं बरोबर जमतं यांना... नाही नाही.. नकोच ती भानगड आपल्याला सोडूनच दे तू हा job आपण दुसरं काहीतरी बघू

शिल्पा: दुसरा job बघू?

मकरंद: हो

शिल्पा: बरं... ok ...ठीके.. शशांकबद्दलचं तुझं म्हणणं एक वेळ मान्य करते. मला एक सांग दुसर् ०द्या job च्या ठिकाणी असं कोणीच नसेल. Job च कशाला जिथे कुठे जाईन तिथे महात्मेच भेटतील मला सगळे?

मकरंद: शिल्पा, आग असल्याशिवाय धूर निघत नाही...

शिल्पा: म्हणजे?

मकरंद: तूच म्हणालीस मगाशी.... तुला आवडतो तो अवस्थी

शिल्पा: मकरंद... अरे असं काय...

मकरंद: पुरुषांना बरोबर कळतं कोण आपल्याकडे attract झालंय ते... बरोबर फायदा घेतात साले. मला सांग... तुला खरंच तो खूप आवडतो का गं? तुझ्या अभिपेक्षा जास्त?... माझ्यापेक्षाही जास्त?

शिल्पा: मला तो आवडतोच... मला अभिही आवडायचा... मला तूही खूप आवडतोस.. पण प्रत्येक नातं वेगळं आहे ना.. असं compare कसं करता येईल? प्रत्येक नात्यामधे वेगळ्या छटा असतात ना रे...

मकरंद: हे बघ या असल्या छटा बिटा काही नसतात पुरुषांच्या मनात. त्यांचे विचार black & white सारखे स्पष्ट असतात. त्यांच्या द्रुष्टीनं सहवासातली स्त्री ही फक् ०दत मादी असते आणि तिच्याकडून जे हवं ते ते बरोबर ओरबाडून घेतात. नकोच.... असल्या लोकांच्या जवळही जायला नको आपण... सोडच तू हा जॉब... तू मला का नाही join होत? मलाही मदत होईल आणि तुलाही हवं ते तुला करता येईल.... काय?

शिल्पा: मला हवं ते? करू शकेन इथे?

मकरंद: का? का नाही...? काय वाईट आहे या business मधे?

शिल्पा: अरे वाईट काय असणारे.. चांगलाच आहे हा... आणि 'आपला'ही आहे पण हे माझं field नाहीये रे... मी करियर कसं करू शकीन इथे?

मकरंद: बास.. this is too much ...तुझा आत्ताचा job तू करू नयेस असं मला strongly वाटतं तू दुसरं काय करावंस हे ही मी suggest केलं... नव्या opportunities दिल्या पण तू काही ऐकायलाच तयार नाहीस. This is just too much. मला काय वाततंय, लोक काय म्हणतायत याचा तू विचारच करायला तयार नाहीयेस. फार शहाणी समजतेस का स्वतःला? तुला यातलं काहीच ऐकायचं नसेल तर काय तुला हवं ते कर... (तावातावाने निघून जायला लागतो)

शिल्पा: मकरंद थांब.. please निघून नको जाऊस असा... please थांब ना रे... पूर्ण कर विषय...

मकरंद: मी सांगितलं मला काय सांगायचंय ते...

शिल्पा: ok ...मी हा job सोडू हे तुझं final मत आहे?

मकरंद: अं... हो...

शिल्पा: जरी मला हा job खूप आवडत असला तरी?

मकरंद: (जरासा अस्पष्ट) अं.. हो...

शिल्पा: तुला आज हा माणूस भेटला नसता तरी तू हेच म्हणाला असतास?

मकरंद: ............

शिल्पा: ok ....ठीके... विचार करायला वेळ देशील मला थोडा? बोलुया आपण.... पुन्हा एकदा नीट बोलुया... विचार करूया आणि ठरवुया... ठीके?...

बरं मला मस्त dinner ला नेतोस का कुठे? अं... ए सोड ना रे सगळं... come on... cheer up man!

( black out )


(भाग १ समाप्त...)

निरभ्र(एकांकिका) - भाग २